✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

चांदीचा पेला, ५५+ वैग्रे

व
विनायक प्रभू यांनी
Fri, 11/18/2011 - 14:24  ·  लेख
लेख
बुट घालुन बाहेर निघणार होतो इतक्यात 'वार्डन' ने अंगावर काही तरी स्प्रे मारला. "आता हे नविन काय"? फ्रेश वाटेल. चांगला परफ्युम आहे. घामाचा वास येणार नाही. "कुणाला"? तुला आणि कुणाला. दिवसभर लेक्चर असतात ना. घाम येतो ना. मग? "चला म्हणजे नवरा घाम गाळतोय हे तरी कळतय" न कळायला काय झाले? "हे ते १८+ वगैरे नाही ना."? नाही. ५५+ आहे. "पण जाहीरातीत दाखवतात तसे काही झाले तर? बर झाल. माझ्या मागची पिडा टळली. "बघ हो. उद्या तक्रार करु नकोस" काहीही होणार नाही.जाहीरातीचे काय घेउन बसलायस. उल्लु पुरषांना आणखी मुर्ख बनवायची आयडीया असते ती. आपण कायम सुंदर ललनांच्या गराड्यात हे स्वप्न रंजन कुणाला नको असते. "ठीक आहे. मी आपली वार्नींग दिली." थांब जरा. पाणी पिउन जा. रात्रभर चांदीच्या पेल्यात ठेवलेले होते. "आता ह्याने काय होते"? उर्जा पातळी कमी होणार नाही. "आता हे तुला कुणी सांगितले"? माझ्या मैत्रिणीने. तीच्या नवर्‍याला प्रॉब्लेम होता. रोज चांदीच्या पेल्यातुन पाणी देते ती. पंधरा दिवसात आराम पडला. "हो का? बर बर. म्हणुनच गेले आठवडाभर दहा नंतर फोन नाहीये. अतिरिक्त उर्जेच्या मॅनेजमेंट मधे बिझी असेल" चहाटळ पणा पुरे. गपचुप पाणी पी. पण माझी उर्जापातळी लेक्चर्स मुळे वाढते. त्यात आणखी हे पाणी. बघ हो. नंतर तक्रार करु नकोस. पाणी पी आणि निघ. विद्यार्थी खोळंबतील.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
19040 वाचन

💬 प्रतिसाद (87)

प्रतिक्रिया

हा हा हा ....

निवेदिता-ताई
Fri, 11/18/2011 - 21:37 नवीन
असेच म्हणते..!!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि

चांदीच्या

यकु
Fri, 11/18/2011 - 20:55 नवीन
चांदीच्या पेल्यापेक्षाही तुळशीच्या मंजूळांचे लहान चमचाभर बी काढून ते दुधात उकळून प्या.. चार आठ दिवसानंतर व्यनि करुन परिणाम सांगा अनुवादाला आलेल्या पुस्तकात वाचून मी मजा म्हणून करुन पाहिलं होतं. अवघड झालं होतं.
  • Log in or register to post comments

कुणाला अवघड झालं होतं म्हणे

सूड
Sat, 11/19/2011 - 06:21 नवीन
कुणाला अवघड झालं होतं म्हणे ?? उत्सुकता म्हणून विचारलं. उत्तर द्यायलाच पाह्यजे असं नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यकु

एक शंका

सर्वसाक्षी
Fri, 11/18/2011 - 20:57 नवीन
मास्तर, शिर्षक जरा 'हे' वाटतय. म्हणजे वगैरे च्या ऐवजी "वैग्रे" - हा शेवटचा शब्द सूचक अपभंश तर नव्हे?
  • Log in or register to post comments

+१

कुंदन
Fri, 11/18/2011 - 21:05 नवीन
असेच म्हणतो. वैग्रा लिहावयाचे असेल मास्तरना. ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्वसाक्षी

ससाबा

विनायक प्रभू
Sat, 11/19/2011 - 09:16 नवीन
अहो ससाबा, क्रिप्टीक या नावाला जागायला नकॉ का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्वसाक्षी

तुमच्या सगळ्यांच्या लक्षात येतय का?

jaypal
Sat, 11/19/2011 - 21:32 नवीन
मास्तर अजुनही स्वतःला फक्त ५५+ च समजत आहेत ;-)
  • Log in or register to post comments

कोणीतरी या लेखाचे रसग्रहण करा

शिल्पा ब
Sun, 11/20/2011 - 05:13 नवीन
कोणीतरी या लेखाचे रसग्रहण करा बॉ!! कैच समजलं नै :(
  • Log in or register to post comments

शिल्पतै एवध्या रसरशीत

किचेन
Tue, 11/22/2011 - 16:01 नवीन
शिल्पतै एवध्या रसरशीत प्रतिक्रिया वाचूनही कैच समजल नाही? अवघड आहे बुआ!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

तुम्ही लौकर ग्रहण केलंय !!

वपाडाव
Wed, 11/23/2011 - 11:04 नवीन
आता वधु-वर सुचक केंद्रातुन म्हणे लग्नात भेट म्हणुन चांदीचे पेले गिफ्ट देण्यात येणार आहेत..... थोडा प्रकाश टाकावा ही विनंती.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किचेन

च्याय्ला तरीच लग्नात येवढे

गणपा
Wed, 11/23/2011 - 13:05 नवीन
च्याय्ला तरीच लग्नात येवढे चांदीचे पेले गिफ्ट आले होते. आता पडला प्रकाश टाळयात. :) (लेट करंट) गणा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वपाडाव

=)) =))

धमाल मुलगा
Wed, 11/23/2011 - 14:07 नवीन
झालं! आता उभ्या आफ्रिकेचं काही खरं नाही. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

=)) =))

वपाडाव
Wed, 11/23/2011 - 14:17 नवीन
आफ्रिकेत गोर्‍यांच प्रमाण वाढतंय ते काही उगाच नाही !!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

गणपा कमरेला पाने बांधून

प्यारे१
Wed, 11/23/2011 - 14:18 नवीन
गणपा कमरेला पाने बांधून 'ऊर्जितावस्थेत' -मोअर मोअर- असे ओरडतोय आणि अफ्रिकन 'जनता' सैरावैरा धावतेय असे चित्र डोळ्यापुढं उभं राहिलं आणि ड्वाळे ओसंडले. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

_/\_

मी-सौरभ
Wed, 11/23/2011 - 15:52 नवीन
प्यारे१: थोडं जपून लिवा हसून हसून ठसका लागला ना मला.......
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

उभी आफ्रिका

शाहिर
Wed, 11/23/2011 - 15:55 नवीन
उभी आफ्रिका आडवी झाली ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

चांगली कल्पना आहे. १५ दिवस

किचेन
Sun, 11/27/2011 - 13:53 नवीन
चांगली कल्पना आहे. १५ दिवस आधीच देऊन ठेवते जास्त फायदा होईल ;)त्यांचे आशीर्वाद मला मिळतील. बर तांब्याचे पेले चांदीच पोलिश करून दिले तर चालतील काय? आणि त्या तुळशीच्या मंजुळा पण देते. ............खुश?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वपाडाव

आम्हाला काय विचारताय एकदा

वपाडाव
Tue, 11/29/2011 - 11:42 नवीन
आम्हाला काय विचारताय एकदा देउन बघा..... एखाद्या जोडप्याला.... त्यांची काय प्रतिक्रिया येते त्यावरुन सांगा.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किचेन

तुलाच देते तुझ्या लग्नात! १५

किचेन
Tue, 11/29/2011 - 14:47 नवीन
तुलाच देते तुझ्या लग्नात! १५ दिवस आधी देते हव तर! सांग मला फायदा झाला का नाही! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वपाडाव

=))

सोत्रि
Tue, 11/29/2011 - 15:19 नवीन
उगीचच 'बाजारात तूरी....' ही म्हण आठवली ;) - (तूर महागल्याच्या चिंतेत असलेला) सोकाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किचेन

हरकत नसल्यास याच्यासाठी

किचेन
Tue, 11/29/2011 - 16:03 नवीन
हरकत नसल्यास याच्यासाठी तुरडाळ शोधायचं कामही मीच करेल.पण त्याबदल्यात आहेराचा खर्च निम्मा वाटून घ्यायचा. काय म्हणताय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोत्रि

आहेराचा कि हुंड्याचा? एवीतेवी

अन्या दातार
Tue, 11/29/2011 - 16:06 नवीन
आहेराचा कि हुंड्याचा? एवीतेवी तूर तुम्हीच शोधुन देते म्हणालात म्हणून विचारतोय. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किचेन

हुंडा घेण आणि देन कायद्याने

किचेन
Wed, 11/30/2011 - 18:29 नवीन
हुंडा घेण आणि देन कायद्याने गुन्हा आहे. आहेराबाबत कायदा काहीच बोलत नाही.म्हणून मी वप्याला लालेले आहेर स्वीकारण्यास मि तयार आहे. वप्या तुझ्या लग्नामध्ये मी तुम्हा दोघांच्या मध्ये थांबणार आहे.आहेर स्वीकारला कि लगेच माझ्या हातात द्यायचा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अन्या दातार

आहेराचा खर्च निम्मा वाटून

सोत्रि
Tue, 11/29/2011 - 16:29 नवीन
आहेराचा खर्च निम्मा वाटून घ्यायचा.
त्यपेक्षा आलेला आहेर निम्मा-निम्मा वाटून घ्यायची कल्पना अशी वाटते? ;) - (१ तीळ ७ जणांत वाटून खायला आवडणारा ) सोकाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किचेन

अतिशय उत्तम! वप्या लवकर लग्न

किचेन
Wed, 11/30/2011 - 18:26 नवीन
अतिशय उत्तम! वप्या लवकर लग्न कर.आणि पत्रिकेवर 'फक्त आहेरच स्वीकारले जातील.कृपया पुष्प्गुच्ह अनु अन्येत ' असहि लिही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोत्रि

तुळशीच्या मंजुळा पण देते अहो

रेवती
Tue, 11/29/2011 - 19:22 नवीन
तुळशीच्या मंजुळा पण देते अहो किचेनताई, तुळशी नावाच्या बाईच्या मंजुळा नावाच्या मुलीची प्रतिक्षा चाललिये आणि तुम्ही वेगळच म्हणताय.;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किचेन

ती मंजुळा भेटल्यावरही ह्या

किचेन
Wed, 11/30/2011 - 18:30 नवीन
ती मंजुळा भेटल्यावरही ह्या मंजुळाची गरज लागणारच आहे! पूर्वतयारी बरी!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

बोंबला

सर्वसाक्षी
Sun, 11/20/2011 - 10:07 नवीन
शिल्पातै गेले तीन दिवस चावुन चोथा झाला की हो! आता रस उरलाच नाही तर ग्रहण कसले करणार?
  • Log in or register to post comments

़।आस्ङ्ड़ाङ्स्ऴ्आ।स्;ऴ्आल्क्

पक पक पक
Sun, 11/20/2011 - 23:10 नवीन
़।आस्ङ्ड़ाङ्स्ऴ्आ।स्;ऴ्आल्क्ज्ज्ञ्न्झ्क्ष्म्क्ष्;लक्;लक्स्;अक्स;ल्स्क
  • Log in or register to post comments

प्रयोग सुरु?

धमाल मुलगा
Wed, 11/23/2011 - 16:06 नवीन
चांदीच्या पेल्याचा प्रयोग सुरु केला काय? सगळ्या कीज क्यापिटल उमटल्यात म्हणून शंका आली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पक पक पक

धम्या,

वपाडाव
Wed, 11/23/2011 - 16:17 नवीन
त्यांचं नावही चांदीच्या पेल्याचा प्रयोग सुरु झाल्याचं द्योतक आहे......मग उगाच प्रश्न का विचारा बुवा...... देव यांच्या गुडघ्यांच रक्षण करो.... का जॅकी श्रॉफला फोन लावता..... सर्व प्रकारची तेलं विकतो तो आजकाल.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

=))

धमाल मुलगा
Wed, 11/23/2011 - 17:43 नवीन
मेलो! मेलो तिच्यायला....ठार खपलो. :D आधीच धिंगाणा काय कमी होता म्हणून पुन्हा आणि तेल विकणार्‍या जॅकी श्रॉफला आवताण होय? =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वपाडाव

ह्म्म्म्म

आदिजोशी
Mon, 11/21/2011 - 19:25 नवीन
काका गँग ऑन फायर :)
  • Log in or register to post comments

ये आग नही बूझेगी....

सुहास झेले
Wed, 11/23/2011 - 11:18 नवीन
ये आग नही बूझेगी.... ;) ;-)
  • Log in or register to post comments

सगळे झुंजारवीर थकले वाटते

चिंतामणी
Mon, 11/28/2011 - 19:17 नवीन
चांदीच्या पेल्यात ठेवलेले .............................. ;) ;-) :wink:
  • Log in or register to post comments

चांदीचा पेला, ५५+ वैग्रे

चिंतामणी
Tue, 11/29/2011 - 17:56 नवीन
खूप विचार केला शिर्षकाबद्दल. शिर्षकातील "वैग्रे" शब्द चुकला आहे असे वाटते.:~ :-~ :puzzled: विनायक प्रभू - मी म्हणतो ते बरोबर आहे का?? ;) ;-) :wink:
  • Log in or register to post comments

प्रतिसाद

अन्या दातार
Tue, 11/29/2011 - 19:39 नवीन
फारसा विचार नाही करावा लागला प्रतिसादातील "शिर्षक" हा शब्द चुकला आहे चिंतामणी - मी म्हणतो ते बरोबरच आहे. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिंतामणी
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा