✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

चांदीचा पेला, ५५+ वैग्रे

व
विनायक प्रभू यांनी
Fri, 11/18/2011 - 14:24  ·  लेख
लेख
बुट घालुन बाहेर निघणार होतो इतक्यात 'वार्डन' ने अंगावर काही तरी स्प्रे मारला. "आता हे नविन काय"? फ्रेश वाटेल. चांगला परफ्युम आहे. घामाचा वास येणार नाही. "कुणाला"? तुला आणि कुणाला. दिवसभर लेक्चर असतात ना. घाम येतो ना. मग? "चला म्हणजे नवरा घाम गाळतोय हे तरी कळतय" न कळायला काय झाले? "हे ते १८+ वगैरे नाही ना."? नाही. ५५+ आहे. "पण जाहीरातीत दाखवतात तसे काही झाले तर? बर झाल. माझ्या मागची पिडा टळली. "बघ हो. उद्या तक्रार करु नकोस" काहीही होणार नाही.जाहीरातीचे काय घेउन बसलायस. उल्लु पुरषांना आणखी मुर्ख बनवायची आयडीया असते ती. आपण कायम सुंदर ललनांच्या गराड्यात हे स्वप्न रंजन कुणाला नको असते. "ठीक आहे. मी आपली वार्नींग दिली." थांब जरा. पाणी पिउन जा. रात्रभर चांदीच्या पेल्यात ठेवलेले होते. "आता ह्याने काय होते"? उर्जा पातळी कमी होणार नाही. "आता हे तुला कुणी सांगितले"? माझ्या मैत्रिणीने. तीच्या नवर्‍याला प्रॉब्लेम होता. रोज चांदीच्या पेल्यातुन पाणी देते ती. पंधरा दिवसात आराम पडला. "हो का? बर बर. म्हणुनच गेले आठवडाभर दहा नंतर फोन नाहीये. अतिरिक्त उर्जेच्या मॅनेजमेंट मधे बिझी असेल" चहाटळ पणा पुरे. गपचुप पाणी पी. पण माझी उर्जापातळी लेक्चर्स मुळे वाढते. त्यात आणखी हे पाणी. बघ हो. नंतर तक्रार करु नकोस. पाणी पी आणि निघ. विद्यार्थी खोळंबतील.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
19040 वाचन

💬 प्रतिसाद (87)

प्रतिक्रिया

हॅ हॅ हॅ

सर्वसाक्षी
Fri, 11/18/2011 - 14:41 नवीन
तरीच चांदी इतकी महागत चालली आहे. ता. क. - पुढे काय झाले?
  • Log in or register to post comments

खिक्

गणपा
Fri, 11/18/2011 - 14:51 नवीन
१० नंतर फोनवुन पहा. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्वसाक्षी

=))

ऋषिकेश
Fri, 11/18/2011 - 15:34 नवीन
हा हा हा _/\_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

ल्...ल्..लुईसवाडीचा!

धमाल मुलगा
Fri, 11/18/2011 - 15:46 नवीन
काय पण सल्ला दिलायस. फोन करणार्‍याची श्रवणेंद्रियं अगदी पावन होऊन जातील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

खीक्क

परिकथेतील राजकुमार
Fri, 11/18/2011 - 15:55 नवीन
आता चांदीचे गुणधर्म कळाल्यावरती, १० नंतर फोनशी कोण खेळत बसेल गणपा ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

हा हा हा !!!!

सुहास झेले
Wed, 11/23/2011 - 11:11 नवीन
हा हा हा !!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

१५

विनायक प्रभू
Fri, 11/18/2011 - 14:55 नवीन
पंध्रवड्यात कळवतो. बाटलीतल्या दवबिंदुचा खर्च तुम्ही करायचा बर का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्वसाक्षी

या मास्तर्...मदद!

धमाल मुलगा
Fri, 11/18/2011 - 15:47 नवीन
उर्जापातळी कमी करण्यासाठी कोणत्या पेल्यातून काय पिऊ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू

पेला?

विनायक प्रभू
Fri, 11/18/2011 - 16:06 नवीन
प्यायला पेला? धम्या माठच हाइस की तु.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

पेला?

विनायक प्रभू
Fri, 11/18/2011 - 16:06 नवीन
प्यायला पेला? धम्या माठच हाइस की तु.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

मी आडानी है....

धमाल मुलगा
Fri, 11/18/2011 - 16:15 नवीन
आता आमच्यासारख्या आडाण्याला नाय कळत तर सांगायला नको? :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू

पेल्यातुन ? कधी मोठ्ठा होणार

गणपा
Fri, 11/18/2011 - 16:08 नवीन
पेल्यातुन ? कधी मोठ्ठा होणार रे तु ध्मु? डायरेक्ट तोंडाला लावा बाटली. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

बाब्बो!

धमाल मुलगा
Fri, 11/18/2011 - 16:16 नवीन
साईड इफेक्ट्स नायत ना काही?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

मिलिंद बोकिलांच्या शाळा

हंस
Sat, 11/19/2011 - 13:25 नवीन
प्रभुमास्तर, मिलिंद बोकिलांच्या शाळा पुस्तकातील "बाटली फुटल्याचा" किस्सा आठवला. ^_^
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू

+१

छोटा डॉन
Fri, 11/18/2011 - 15:14 नवीन
>>तरीच चांदी इतकी महागत चालली आहे. साक्षीदेवा, अक्षरशः हेच खरडायला आलो होतो ;) - छोटा डॉन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्वसाक्षी

मजेशीर. आवडलं लिखाण. अवांतर

दत्ता काळे
Fri, 11/18/2011 - 14:56 नवीन
मजेशीर. आवडलं लिखाण. अवांतर : हल्ली चांदीसुध्दा ५५+ झाली आहे.
  • Log in or register to post comments

आँ?

धमाल मुलगा
Fri, 11/18/2011 - 15:45 नवीन
चांदीची उर्जापातळी कोण वाढवतं हो?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दत्ता काळे

हा.. हा..

दत्ता काळे
Fri, 11/18/2011 - 16:01 नवीन
घाम निघायला लागल्यावर उर्जा पातळी वाढवण्याची आवश्यकता वाटली असावी असाही एक संकेत. कृ. ह. घ्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

ऑबॉबॉबॉ.....

धमाल मुलगा
Fri, 11/18/2011 - 16:03 नवीन
=)) =)) प्रभूमियाँ तो प्रभूमियाँ, दत्ताकाका भी सुभानअल्ला! _/\_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दत्ता काळे

सध्या तांब्याचे भांडे प्रयोग

JAGOMOHANPYARE
Fri, 11/18/2011 - 16:11 नवीन
सध्या तांब्याचे भांडे प्रयोग सुरु आहे. आता त्यातच चांदीचा चमचा ठेवावा.
  • Log in or register to post comments

तांब्याच्या भांड्याचा प्रयोग

सोत्रि
Fri, 11/18/2011 - 16:27 नवीन
तांब्याच्या भांड्याचा प्रयोग ठीक आहे. पण 'तांब्या पालथा' झाला की तो प्रयोग अंगाशी यईल.;) - (प्रयोगशील) सोकाजी ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: JAGOMOHANPYARE

ठ्ठो !!

कपिलमुनी
Fri, 11/18/2011 - 23:35 नवीन
सोकाजीराव, घुमवुन हाणलात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोत्रि

सोकाजी,

वपाडाव
Wed, 11/23/2011 - 10:53 नवीन
पण 'तांब्या पालथा' झाला की तो प्रयोग अंगाशी यईल.
तांब्या उलथा-पालथा, सरळ्सोट, चांदीचा कसा का असेना? अंगाशी येणं महत्वाचं.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोत्रि

_/\_ _/\_ _/\_

सुहास झेले
Wed, 11/23/2011 - 11:14 नवीन
!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोत्रि

प्रयोग

विनायक प्रभू
Fri, 11/18/2011 - 16:14 नवीन
जामोप्या चे धातुचे प्रयोग?
  • Log in or register to post comments

हम्म्म

परिकथेतील राजकुमार
Fri, 11/18/2011 - 16:33 नवीन
जामोप्या चे धातुचे प्रयोग?
कॉलिंग रामदास काका....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू

मास्तर दुसर्‍यांची ऊर्जा

प्यारे१
Fri, 11/18/2011 - 16:19 नवीन
मास्तर दुसर्‍यांची ऊर्जा काढून घेतात तरी त्यांची का कमी पडावी बरे?????? ;)
  • Log in or register to post comments

मस्त

सोत्रि
Fri, 11/18/2011 - 16:23 नवीन
एकदम खुसखुशीत ! आवडले :) - (ऊर्जित) सोकाजी :)
  • Log in or register to post comments

चरचा

विनायक प्रभू
Fri, 11/18/2011 - 16:39 नवीन
अरे मुलांनो जरा त्या स्प्रे वर पण चरचा करा. मार्ग दर्शन जरुरी आहे.
  • Log in or register to post comments

साधं "मार्ग दर्शन" घडायलाही

आत्मशून्य
Fri, 11/18/2011 - 17:05 नवीन
साधं "मार्ग दर्शन" घडायलाही स्प्रे पाहीजे ? हम्म, उर्जापातळीच मग काय खरं नाय राव...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू

कुठल्या??

प्रभाकर पेठकर
Fri, 11/18/2011 - 18:20 नवीन
कुठल्या स्प्रे वर?? चांदीच्या पेल्यातील पाण्याच्या प्रयोगा आधीचा की नंतरचा?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू

पेठकर साहेब,

वपाडाव
Wed, 11/23/2011 - 11:00 नवीन
इंजेक्टर अन स्प्रेयर मध्ये खुप फरक आहे..... जमीन-अस्मानाचा फरक नसला तरी... हा स्प्रेयर Image removed. अन हा इंजेक्टर Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

विषय...

प्रभाकर पेठकर
Wed, 11/23/2011 - 11:42 नवीन
हा:..हा:...हा:... फार 'खोलात' शिरून 'विषया'चा अभ्यास केलेला दिसतो आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वपाडाव

+१

प्यारे१
Wed, 11/23/2011 - 11:51 नवीन
वप्याचा अभ्यास 'दांडगा' आहे. थिअरी पक्की केली आहे. आता प्रात्यक्षिकांची वाट पाहतो आहे झालं. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

ऑ ?

परिकथेतील राजकुमार
Wed, 11/23/2011 - 12:09 नवीन
थिअरी पक्की केली आहे. आता प्रात्यक्षिकांची वाट पाहतो आहे झालं.
प्रात्यक्षीकांची ? का प्रात्यक्षीक करायला मिळण्याची ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

वपा कॉलिंग वपा, थेट गाठभेट

प्यारे१
Wed, 11/23/2011 - 12:19 नवीन
वपा कॉलिंग वपा, थेट गाठभेट बरी. काय? ;) अलाऊन्समेण्टः कंडक्टर नं. ४२० वपाडाव, आपन चौकशी /कंट्रोलर केबिन पाशी येऊन तोरीत भेटा. कंडक्टर नं. ४२० वपाडाव. आपन असाल तेथून लौकर येऊन भेटा. सांगितलंय. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

वप्या पर्‍याबरोबर

शिल्पा ब
Wed, 11/23/2011 - 12:54 नवीन
वप्या पर्‍याबरोबर प्रात्यक्षिक करणार? अरे वा!! छान.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

घ्या !

परिकथेतील राजकुमार
Wed, 11/23/2011 - 12:59 नवीन
ह्यांची एक कायम वेगळीच आवड असते ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

मीरा नायर प्रस्तुत 'फायर' हीच

प्यारे१
Wed, 11/23/2011 - 13:18 नवीन
मीरा नायर प्रस्तुत 'फायर' हीच खरी आवड असेल कदाचित.... ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

--

वपाडाव
Wed, 11/23/2011 - 14:24 नवीन
संमंच्या फैरी झाडुन घ्यावयाच्या नसतील तर ही 'फायर' इथेच मिटवुन/दाबुन/विझवुन टाका..... संपादीत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

हेच म्हणते...मनात एक असतं पण

शिल्पा ब
Wed, 11/23/2011 - 14:26 नवीन
हेच म्हणते...मनात एक असतं पण लोकं दाखवतात दुसरंच!! भले मग ते नाव का असेना.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वपाडाव

क्षमता....

प्रभाकर पेठकर
Fri, 11/18/2011 - 18:16 नवीन
"बघ हो. उद्या तक्रार करु नकोस" अशाच एका प्रसंगी एकाची बायको म्हणते,' अहो! त्यात काय काळजी करायची? आपल्या गल्लीतली कुत्री नाही एखाद्या कारच्या मागे धावत?? पण त्यांच्यात कार चालवायची क्षमता थोडीच असते?' चांदीच्या पेल्याचा खरंच परिणाम होतो?? - एक शंका.
  • Log in or register to post comments

हाहाहा

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 11/18/2011 - 18:18 नवीन
लै भारी. :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

प्रयोग

विनायक प्रभू
Fri, 11/18/2011 - 18:33 नवीन
प्रयोग करुन बघा पंधरवड्याकरता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

आता पुढचे पंधरा दिवस

चतुरंग
Fri, 11/18/2011 - 18:38 नवीन
पेठकरकाका गायब का मिपावरुन? ;) -रंगा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू

शंका

विनायक प्रभू
Fri, 11/18/2011 - 18:41 नवीन
ते काय सांगता येत नाही. पण चांदीच्या पेल्याची विक्री वाढणार यात शंका नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

अट नाही...

प्रभाकर पेठकर
Sat, 11/19/2011 - 00:55 नवीन
पेठकरकाका गायब का मिपावरुन? तशी काही अट दिसत नाहिए. हां... वयोमानानुसार डोस भारी पडल्यास कायमचा गायब होण्याचीच शक्यता आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

आत्ता लक्षात आले

चतुरंग
Fri, 11/18/2011 - 18:28 नवीन
तरीच तुमच्याकडच्या सगळ्या तांब्या-भांड्यांना कापड गुंडाळून ठेवले होते!! विचारले तेव्हा पाणी गार राहते म्हणालात! ;) (चांदीच्या वाटीतून पंचामृत पिणारा) पंचरंग
  • Log in or register to post comments

ठ्ठ्ठो!

धमाल मुलगा
Fri, 11/18/2011 - 18:40 नवीन
मरतंय तिच्यायला आज मी! काय सगळे भैताडल्यागत झालेत आज. >>(चांदीच्या वाटीतून पंचामृत पिणारा) पंचरंग अग्गायायायाया........ या अल्ला......उठा ले रे बाबा....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

प्रतिक्रिया वाचून ह ह पु वा.

शुचि
Fri, 11/18/2011 - 20:15 नवीन
प्रतिक्रिया वाचून ह ह पु वा. लेख तर नेहमीप्रमाणे यशस्वी.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा