Skip to main content

का असे हे घडले ?

लेखक navinavakhi यांनी शनिवार, 26/11/2011 17:54 या दिवशी प्रकाशित केले.
आज पुन्हा मी रडले, का असे हे घडले ? खरंच का ती इच्छा होती, का मनाची भीती ? का नाही मज उमगली, ही नात्यातील प्रीती कसे समजवू मी मनाला ? का मुकले मी आनंदाला ? खरेच का सर्व दोष फक्त माझा होता ? यास्तव प्याला का माझाच रिता होता ? वाटे एकदाच परत जावे कुशीत शिरून पुन्हा रडावे का नाही ही ओढ त्याला ? का न उमगे मजला ? काळही सरला, ना वेळही उरला संयम माझा पुन्हा ढळला
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1302
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया

बाकी एकदा निर्णय घेतला कि त्याबद्दल फेरविचार करण्याचा मानस ... खास करुन ज्याच्यासाठी करायचा आहे, त्याला जर त्याची किंमतच नसेल तर - योग्य वाटत नाही !!

छान .. आहे कविता !!