आठवण आणि सलाम
तीन वर्षांपूर्वीचा हाच बुधवार. चार दिवस सलग थँक्सगिव्हींगची सुट्टी म्हणत घरी येण्यासाठी लवकर निघालो होतो. गाडीत रेडीओ लावला तेंव्हा ओझरती बातमी आली होती की मुंबईत कोण्या एका बंदूकधार्याने गोळीबार केला म्हणून. सुरवातीस काहीतरी स्थानिक असेल असे वाटले. पण घरी जाईस्तोवर लक्षात आले की हा काहीसा अतिरेकी हल्ला आहे.... आणि नंतरच्या तासाभरातच त्याचे गांभिर्य हे जास्तच समजले कारण तो पर्यंत करकरे, साळसकर, कामटे यांच्या हत्येची बातमी देखील समजली होती. पुढचे अनेक दिवस हे सर्वच भारतीयांना आणि जागतीक माध्यमांमुळे कुठल्याही संवेदनाशील मनाला अस्वस्थ करणारे ठरले होते. अजूनही अस्वस्थता कुठेतरी मनात दडून राहीली आहे असे वाटते...
आज ही खपली निघायचे कारण केवळ नोवंबरमधील बुधवार हे नसून, काल पिबीएसवर "फ्रंटलाईन" वार्तापटात पाहीलेले संशोधनात्मक, "ए परफेक्ट टेररीस्ट" हे वृत्तचित्र. दाऊद गिलानी उर्फ डेव्हीड हेडली कसा (बि)घडला आणि त्याने हा हल्ला आयएसआय, लष्करे तोयबा यांच्या मदतीने आणि त्यांना मदत करत कसा यशस्वी केला या संदर्भातील भेदक संशोधन आपल्याला एका तासात पहायला मिळेल आणि ते अवश्य पहावेत...
२६/११ ला काय झाले हा आता एक काळा इतिहास आहे. त्यात जितकी भारतीय राजकारण्यांची जाड त्वचा दिसली तितकेच भारतीय पोलीस, विशेष सैन्यपथक, सामन्य आणि असामान्य नागरीक यांचे धैर्य आणि प्रेम दिसले... करकरे, कामटे, साळसकर, इतर अनेक पोलीस आणि विशेष करून हुतात्मा तुकाराम ओंबळे यांनी मुंबईची आणि देशाची लाज राखली. रतन टाटांनी नंतर केलेल्या मदतीबद्दल, ताज जनरल मॅनेजर करमबीर कांग यांच्या असामान्य आणि अथक कर्तव्यतत्परते बद्दल तसेच त्यांच्या व्यवस्थापनाच्या अथक परीश्रमाबद्दल तोड नाहीच पण छत्रपती शिवाजी टर्मिनस वरील सुचना देणार्या कर्मचार्याने देखील प्रसंगावधान दाखवून लोकांना दहशतवाद्यांपासून दूर ठेवण्यात जे शक्य होते तितके यश मिळवले, तो आता काय करत असेल याचे राहून राहून कुतुहल वाटत रहाते.
२० नोव्हेंबर २०११ ला हुतात्मा ओंबळे यांच्या खालील अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण गिरगाव चौपाटीवर झाले.
आज भारत हे लोकांनी चालवलेले राष्ट्र आहे का हे माहीत नाही, पण लोकांनी वाचवलेले लोकांचे राष्ट्र नक्कीच आहे असे वाटते...
...
आज भारत हे लोकांनी चालवलेले राष्ट्र आहे का हे माहीत नाही, पण लोकांनी वाचवलेले लोकांचे राष्ट्र नक्कीच आहे असे वाटते...
...वर्गीकरण
प्रतिक्रिया
आज भारत हे लोकांनी चालवलेले
+१
+ ?
शेम ओन मायसेल्फ !!
आठवण आणि सलाम.
आठवण आणि सलाम!
सलाम वगैरे ठिक आहे हो...
अतिशय भावूक पण तितकेच भेदक सत्य !!
आठवण आणि सलाम!
सलाम...
मनापासून सलाम !