Skip to main content

सहज

सहज

Published on बुधवार, 23/11/2011 प्रकाशित मुखपृष्ठ
एकदा सहज असे वाटले कि स्वप्नांच्या गावी फिरून यावे .. थोडेसे आठवणींचे गाठोडे घेऊन एकटेच बाहेर पडावे .. निवांत स्वतः स्वतःला शोधून पाहावे. काही तरी जुने फिरून नव्याने मिळते का पाहावे .. नाही जरी मिळाले तरी जुने विश्व पुन्हा एकदा अनुभवावे .. म्हणून मग आठवणींचे गाठोडे उघडून बसले नि - त्यात कधी हरवून गेले माझे मलाच कळले नाही. स्वप्नांच्या गावी जाण्याची गरजच जणू उरली नाही. जुनीच स्वप्ने पुन्हयांदा नवी वाटू लागली. मला पण माझी भीती वाटू लागली. पण स्वप्नेच ती किती वेळ सुखावण्याची ताकद असणार त्यांच्यात ?? परिस्थितीचे भान दिल्याशिवाय ती तरी कशी सत्यातून जाणार ? मी पण मग हट्टाला पेटले. पुन्हा एकदा स्वप्नात हरवायचे ठरवून त्यांचा मागोवा घेऊ लागले. का कुणास ठाऊक ? मन परत उगाच शहारले .. तलम कापड अंगावर घेतल्यासारखे, मोरपीस गालावर फिरल्यासारखे ..

याद्या 2910
प्रतिक्रिया 17

मस्त मुक्तक, आवडले! स्वप्नांच्या जादुई दुनियेत रमायला मलाही आवडते. - (स्वप्नाळू) सोकाजी चित्रः आं.जा.वरून साभार

मला स्वप्न खुप अवद्तत. स्वप्नन्मधे जग्न महत्वच वस्त्तव खुप निरशवदि अस्त , पन स्वप्न कशि मस्त अस्तत्त ? सहिच जम अवद्ल लेख.. तुम्हि लिहित जा, अम्हि वचत जतो

In reply to by मीनाक्षी देवरुखकर

एक प्रश्न !! तुमचं सदस्यनाम तुम्ही कसं काय टैप केलंत ब्वॉ ?? नाही, प्रतिसाद टंकताना तुमची चाललेली तारांबळ वाचून वाटलं हो.

In reply to by किचेन

किचेन आधी स्वतः सेट्ट्ल व्हा. नंतर दुसर्‍यांना मदत करा. नाहीतर 'आपलंच धड नाय आन दुसर्‍याचं बगून उपयोग काय' असं व्हायचं. बरोबर ना?

In reply to by वपाडाव

तसंच असतं रे !! आपल्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही, पण दुसर्‍याच्या डोळ्यातलं कुसळ पटकन दिसतं. (म्हणी पण जमायला लागल्या ब्वॉ)

अलगद अल्लाद स्वप्नाच्या दुनियेतून फिरवून आणलत..

मन परत उगाच शहारले .. तलम कापड अंगावर घेतल्यासारखे, मोरपीस गालावर फिरल्यासारखे ..>> शहारले की मोहरले? दंगलींच्या आठवणींनी मन शहारते प्रेयसीच्या आठवणीने मन मोहरते. मोरपीस, तलम कपडा वगैरे (वैग्रे नाही) गोष्टी दुसर्‍या कलमाशी जुळतात असे वाटते. तज्ञांनी मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती

जुन्या आठवणी कितीही हव्याशा वाटल्या, तरी त्या सत्याची बोचक जाणीव करून देतच असतात. अशा वेळेस मोहरायला होत नाही शहारायला होतं !!

@ नविनवखी जुन्या आठवणी कितीही हव्याशा वाटल्या, तरी त्या सत्याची बोचक जाणीव करून देतच असतात. अशा वेळेस मोहरायला होत नाही शहारायला होतं !! वाह वाह ! क्या लिखेला है मस्त रे एकदम :)