Skip to main content

कोण होती ती.... (3)

लेखक फिझा
Published on बुधवार, 23/11/2011
कोण होती ती.... (3) जाऊदे.. मला काय त्याचे.. कोण कुठली मग मी का उगाच ....कशासाठी .... न ओळख न पाळख कशाला तसदी घ्या ... अरे मग एवढा विचार तरी कशाला.... निघताना तिथून पण ....एक नजर टाकली होती ..... ती तिथेच उभी होती....तशीच ..... तिच्या नजरेने मला जखमा झाल्या होत्या ... बंद केलेले दरवाजे उघडले जात होते .. घुसमट होत होती माझी ..... कधी हा पाऊस संपणार ...... जावे तडक परत आणि विचारावे सरळ सरळ .... काय .... कुणाला.... तिला ?.... कशाबद्दल .... माहीत नाही ...... पण ती तिथेच उभी होती....तशीच ..... ती मात्र अगदी निरपेक्ष उभी होती कसलाच गोंगाट नाही कलकलाट नाही कसलाच आनंद नाही आणि दुख्खहि एक निरागस शांतता घेऊन ..... ती तिथेच उभी होती....तशीच .....
लेखनविषय:

याद्या 1260
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया

३ ही कविता छान आहेत.

अवस्थ करणारा काव्यानुभव. बाय द वे... नक्की कुठे उभी आहे ती?

कसलाच आनंद नाही आणि दुख्खहि एक निरागस शांतता घेऊन ..... ती तिथेच उभी होती....तशीच ..... ओळी आवडल्या . कविता ४ मधे पुढे काय झाले ...? लिहा .