पावले
.
चालता चालता पावले
थांबतात,
थकतात,
कि कानोसा घेतात..
आपल्याच मनोबलाचा!
चालता चालता पावले
अडखळतात,
मागे फिरतात,
कि चाचपतात. .
आपल्याच विश्वासाला!
चालता चालता पावले
शिणतात,
वैतागतात,
कि विचार करतात..
"ती चालता आहेत,
कि चालवली जात आहेत याचा!"
चालता चालता पावले
चाचपतात,
विचार करतात,
कि पडताळून पहातात..
"ध्येय आहे म्हणून..
ती चालतात,
कि ती चालतात म्हणून..
ध्येय आहे?"
चालता चालता पावले
थांबतात,
अडखळतात,
कि विचारी बनतात!!!
====================
आपली स्वाती फडणीस................1995
Taxonomy upgrade extras
| लेखनविषय: |
|---|
वाचने
4665
प्रतिक्रिया
13
मिसळपाव
प्रतिक्रिया
वाह!
सुंदर
In reply to वाह! by सहज
ठिक वाटली.
आभार
In reply to ठिक वाटली. by ऋषिकेश
मनापासून आभार!
:-)
In reply to मनापासून आभार! by स्वाती फडणीस
आवडले
ती चालता
In reply to आवडले by धनंजय
आशयगर्भ
वा !!
चिंतनात्मक कविता आवडली!
ह्म्म
In reply to चिंतनात्मक कविता आवडली! by चतुरंग
नक्कीच!
In reply to ह्म्म by स्वाती फडणीस