✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

(हल्ली मी घेतच नाही ...(؟)... )

ग — गणपा, Fri, 11/18/2011 - 20:02
फिझा यांची माफी मागुन त्यांच्या लिहिण्याला ही आमची पोच. हल्ली मी काही घेतच नाही ..(؟)... भांजाळला गाल एकदा पाठीवर उमटले वळ ... आणि निघाली कमरेतुनी कळ त्या कळीची दाहकता कुणा कळतच नाही हल्ली मी काही घेतच नाही ... घेण्याची कारणे होती हजार चढणार प्रेट्रोल,वाढती महागाई वर तुटपुंजा पगार ... विदेशी 'टाकुन', देशी घेतली तरीसुद्धा ..... कळी माझी खुलतच नाही हल्ली मी काही घेतच नाही ... नाही नाही म्हणत परत बळेच भरला ग्लास ... पुढ्यातला चखणा आणि माझं मुस्काट यांची सांगड घालणे मला जमलेच नाही .... पण हल्ली मी घेतल्या वाचुन रहातच नाही ...

प्रतिक्रिया द्या
6996 वाचन

💬 प्रतिसाद (21)

पीनेवालोंको

पैसा
Fri, 11/18/2011 - 20:06 नवीन
पीने का बहाना चाहिए!!! गणपाभौ, ही पाकृ पण मस्त. फोटो कुठेय?
  • Log in or register to post comments

फोटो कुठेय? लै भारी, एक लंबर

सोत्रि
Fri, 11/18/2011 - 22:37 नवीन
फोटो कुठेय?
लै भारी, एक लंबर ! - (बहाणेबाज) सोकाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

स्वयंपाकघर सोडून गणपा

रेवती
Fri, 11/18/2011 - 20:10 नवीन
स्वयंपाकघर सोडून गणपा तिर्थक्षेत्री वळलेला बघून भावना आवरता आल्या नाहीत.;) आणि कमरेतुन निघाली कळ याऐवजी आणि निघाली कमरेतूनी कळ हे कसे वाटेल? अर्थात कसेही लिहिले तरी कळ काही थांबणार नाही.;)
  • Log in or register to post comments

रेवतीतै, सहमत! आणि जास्त काळ

सोत्रि
Fri, 11/18/2011 - 22:36 नवीन
रेवतीतै, सहमत! आणि जास्त काळ कळ थांबली नाहीच तर मग काळंही थांबणार नाही ;) - (कळकाढू) सोकाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

बदल आवडल्या गेला आहे.

गणपा
Sat, 11/19/2011 - 00:07 नवीन
बदल आवडल्या गेला आहे. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

वा....

दि ग्रेट मराठा
Fri, 11/18/2011 - 20:16 नवीन
छान आहे.
  • Log in or register to post comments

मस्त !

चाफा
Fri, 11/18/2011 - 20:24 नवीन
एक विरोधाभास वाचुन गंमत वाटली मुळ कवितेपेक्षा विडंबन जास्त लोकप्रीय झालं :) बाकी गणपा शब्द चपखल बसलेत :)
  • Log in or register to post comments

सर्वसमावेशक...

प्रभाकर पेठकर
Sat, 11/19/2011 - 12:17 नवीन
मुळ कवितेतील आपली भावना सुंदर आहे पण ती 'कवी' पुरती संकुचित आहे. इतरांना त्याचा 'एहसास' होईलच असे नाही. पण, श्री. गणपा ह्यांनी व्यक्त केलेली भावना सर्वकालीक आणि सर्वसमावेशक असल्याने जास्त 'लोकप्रिय' झाली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चाफा

_/\_ भन्नाट. पाककलानिपुण

प्रचेतस
Fri, 11/18/2011 - 20:33 नवीन
_/\_ भन्नाट. पाककलानिपुण तज्ज्ञ श्री श्री गणपा महाराज हे कवितानिपुण पण.
  • Log in or register to post comments

घेऊनच ईडंबन केलंय का? अगदी

यकु
Fri, 11/18/2011 - 21:09 नवीन
घेऊनच ईडंबन केलंय का? अगदी पहिल्या धारेचं झालंय म्हणून हो. ;-)
  • Log in or register to post comments

काय हे?

नाटक्या
Fri, 11/18/2011 - 23:36 नवीन
गणपाशेट, तुम्ही सुध्दा?
  • Log in or register to post comments

काय गणपाशेट लई भारी. झिंग

अविनाश खेडकर
Sat, 11/19/2011 - 13:11 नवीन
काय गणपाशेट लई भारी. झिंग आली बरं का.......................................................
  • Log in or register to post comments

झक्कास !

परिकथेतील राजकुमार
Sat, 11/19/2011 - 13:35 नवीन
गणपा रं गणपा.. एक नंबर रे. अवांतर :- 'विडंबन म्हणजे दारू' हे चित्र कधी बदलणार ? हे विडंबन वाचून कवि गणेशा ह्यांच्या मनाला आता किती यातना होतील बरे :( आकाशातला बाप त्यांना अजून सहनशीलता देवो. आमेन !
  • Log in or register to post comments

अवांतर :- 'विडंबन म्हणजे

विजुभाऊ
Mon, 11/21/2011 - 19:02 नवीन
अवांतर :- 'विडंबन म्हणजे दारू' हे चित्र कधी बदलणार ? हे विडंबन वाचून कवि गणेशा ह्यांच्या मनाला आता किती यातना होतील बरे आकाशातला बाप त्यांना अजून सहनशीलता देवो. ग्ण्पा भौ क्व्ता छान आहे. क्दाच्ति प रा ( सालं हे टंकताना चुकलं की प रा चा उगाचच प्रा होतो) भौ नी मोकलाया दही दिश्या... ही क्विता वच्ली न्सावी. किवा त्य्ना फ्क्त द्रु च दिस्ते त्य्मुळे त्य्ना विंड्ब्न हे ब्निआ द्रुचे होतस्ते हे ठौक न्ही.त्यत त्यंची च्कू न्सावी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

भन्नाट विडंबन

जाई.
Sat, 11/19/2011 - 14:11 नवीन
भन्नाट विडंबन
  • Log in or register to post comments

व्वा गणपाशेठ.... एकदम जोरदार

सुहास झेले
Sat, 11/19/2011 - 16:45 नवीन
व्वा गणपाशेठ.... एकदम जोरदार !! :) ;)
  • Log in or register to post comments

मस्त रे!!

प्रभो
Sat, 11/19/2011 - 23:11 नवीन
मस्त रे!!
  • Log in or register to post comments

भन्नाट!! आवडल्या गेले आहे.

सूड
Sun, 11/20/2011 - 14:24 नवीन
भन्नाट!! आवडल्या गेले आहे.
  • Log in or register to post comments

नो कमेन्ट्स !!!

फिझा
Mon, 11/21/2011 - 10:19 नवीन
नो कमेन्ट्स !!!
  • Log in or register to post comments

अहो, एवढं का मनाला लावून घेताय ?

वाहीदा
Mon, 11/21/2011 - 15:48 नवीन
चांगल्याच कवितेचे विडंबन येते अन मुख्य म्हणजे लोकप्रिय रचनेचेच तुमची कविता लोकांना आवडली ही त्याची पावती आहे :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: फिझा

मस्त !

मदनबाण
Mon, 11/21/2011 - 16:19 नवीन
मस्त ! ;)
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा