✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

सिंहीण

च
चेतन सुभाष गुगळे यांनी
गुरुवार, 11/10/2011 - 19:25  ·  लेख
लेख
खरं तर http://www.misalpav.com/node/19536#comment-348648 इथेच कबूल केलं होतं त्याप्रमाणे लिहीणार होतो पण काही कारणास्तव तेव्हा जमलं नाही. आज सायंकाळी आमच्या दारावरील घंटी वाजली. दरवाजा उघडून पाहिले असता कोणी दिसले नाही परंतू आमच्या पत्रपेटीत खालील कागद आढळला. हा कागद वाचताच माझी एक जुनी आठवण जागी झाली. साधारण दोन दशकांपूर्वीची हकीगत आहे. तेव्हाही असाच एक कागद आमच्या पत्रपेटीत आढळला होता. फक्त तेव्हा वक्तृत्व स्पर्धा होती आणि स्पर्धेचे आयोजक होते लायन्स क्लब ऑफ निगडी, पुणे. स्पर्धेसाठी विषय होता जातीयवाद - समस्या आणि उपाय. कागदावरील आवाहनास अनुसरून लगेचच जुळवाजुळव सुरू झाली. दोन दिवसांत भाषण लिहून काढले आणि पुढचा एक आठवडा पाठांतर व सरावात घालवला. स्पर्धेचा दिवस उजाडला. ज्या क्रमाने स्पर्धेकरीता नावे नोंदविली गेली होती त्या क्रमाने एकेक जण पुढे येऊन व्यासपीठावर भाषण करू लागला. ती भाषणे ऐकताच माझा उत्साह मावळला. बहुतेक सर्वांनीच जातीयवादाचा संदर्भ चालु घडामोडींशी जोडला होता. जातीनिहाय आरक्षण ठेवल्यामुळे गुणवत्तेला डावलले जाऊन अपात्र लोकांना संधी मिळत असून त्यामुळेच समस्या निर्माण होत आहेत व यावर उपाय म्हणजे जातिनिहाय आरक्षण पूर्णपणे नष्ट करून गुणवत्ता हा एकमेव निकष ठेवला जावा असाच सर्व स्पर्धकांचा सूर होता. याउलट माझ्या भाषणात मी जातीयवादाचा संबंध प्राचीन काळाशी जोडून त्याकाळी चातुर्वर्ण्य पद्धतीमुळे शूद्र ठरविल्या गेलेल्या जातींवर इतर तथाकथित उच्च जातींकडून कसा अन्याय झाला वगैरे मुद्दे मांडले होते. जातिभेदामुळेच पानिपतच्या लढाईत मराठे अब्दाली पुढे हरले या गोष्टीचेही दाखले माझ्या भाषणात होते. जातिभेद विसरून सर्वांनी एकजुटीने राष्ट्राची प्रगती साधण्याकरिता कटिबद्ध व्हायला हवे हा संदेशही शेवटी होताच. आपले भाषण आऊड ऑफ डेट आहे हे मला जाणवू लागले तसेच इतर स्पर्धकांच्या तूलनेत माझ्या भाषणात अतिशय साधी व अनाकर्षक वाक्ये होती. इथे स्पर्धकांच्या वाक्यांना टाळ्यावर टाळ्या पडत होत्या आणि माझ्या मनावर निराशेचे सावट पडू लागले होते. तरीही, त्याच मनस्थितीत माझे नाव पुकारले गेल्यावर मी व्यासपीठावर गेलो आणि पाठ केलेले भाषण एका लयीत म्हंटले. अपेक्षेप्रमाणेच पूर्ण भाषणा दरम्यान व भाषण संपल्यावरही सभागृहात स्मशान शांतता होती. इतर स्पर्धकांना हंशा व टाळ्या यांचा भरघोस प्रतिसाद देणार्‍या प्रेक्षकांनी माझ्या भाषणाला अतिशय शांत चित्ताने ऐकून घेतले होते. आपला काय निकाल लागणार हे उमजून मी जागेवर जाऊन बसलो. त्यानंतर परीक्षकांनी आपले मनोगत ऐकवायला सुरूवात केली. त्यांच्या दृष्टीने लोकानुनय करण्यासाठी इतर स्पर्धकांनी जी टाळ्याखेचक वाक्ये भाषणात वापरली होती ती केवळ जनक्षोभ भडकविण्याच्या लायकीची होती. स्पर्धेत अशी भाषणे बाद केली जात असल्याने त्यांचा विचार गुणांसाठी केला गेलेला नव्हता. त्यामुळे अगदी अनपेक्षितरीत्या परीक्षकांनी मला त्या स्पर्धेचा विजेता घोषित केले. त्याच दिवशी सायंकाळी आठ वाजता लायन्स क्लबच्या गेट टुगेदर मध्ये मला पारितोषिक स्वीकारण्यासाठी आमंत्रित केले गेले. सायंकाळी मी कार्यक्रमाला निघण्याआधी आई मला म्हणाली, "नेहमीप्रमाणे बोरिंग कपडे घालु नको. तुझ्याकरिता मी नवीन ड्रेस आणलाय तो घालुन जा." हा नवा कोरा ड्रेस म्हणजे गुलाबी रंगाची बॅगी जीन्स पॅन्ट, जिला गुडघ्यावर खिसा, खिशाला एक फ्लॅप, फ्लॅप वर बोटभर लांबीची पट्टी आणि ती पट्टी अडकविण्यासाठी पुन्हा खिशावर एक स्टील ची रिंग आणि या पॅन्ट सोबत भडक काळ्या रंगाचा टीशर्ट, टीशर्ट वर पोटाजवळ अगदी मधोमध कांगारूच्या पोटपिशवीची आठवण व्हावी इतका मोठा खिसा. हा पोशाख बघूनच मला झिणझिण्या आल्या. पण आईच्या मते क्लबातल्या पार्टीत जायचे म्हणजे असाच "मॉडर्न" ड्रेस हवा. शेवटी अनिच्छेनेच मी तो पोशाख परिधान केला. त्यानंतर माझ्या चेहर्‍यावर बळेच कुठलीशी पावडर थोपली गेली आणि कपड्यांवर परफ्युम शिंपडण्यात आले. कहर म्हणजे पायांत हिरव्या पांढर्‍या रंगातील स्पोर्ट शूज. कारण पार्टीत फॉर्मल शूज बरे दिसत नाहीत. अशा प्रकारे एकदाचा मी माझ्या मातोश्रींच्या अपेक्षेप्रमाणे पार्टी ऍनिमल दिसू लागल्यावरच मला घराबाहेर जाऊ देण्यात आले. तर अशा अवतारात मी एकदाचा गेट टुगेदरच्या स्थळी ठीक आठ वाजता पोचलो. अर्थात तेव्हा तिथे चिटपाखरूही हजर नव्हते. साडेआठ नंतर हळूहळू एक एक करून मंडळी येऊ लागली. हे सर्व क्लबचे सदस्य होते. त्यांच्या आपसात गप्पा रंगु लागल्या. माझ्या ओळखीचे कोणीच नसल्याने मला अवघडल्यासारखे होऊ लागले. थोड्या वेळाने एका व्यक्तिने ओरडून सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले. हा एक मध्यमवयीने इसम दिसत होता. त्याने हातात एक मोठे कापड घेतले होते. दुसर्‍या हातात सीझ फायर सारखे एक उपकरण होते. अर्थात त्याच्या या वस्तुचे नाव वेगळे होते. त्याच्या म्हणण्याप्रमाणे हे उपकरण त्याच्या वर्कशॉपमध्ये बनले होते आणि आग विझविण्यासाठी सीझ फायरपेक्षा अनेक पटींनी जास्त कार्यक्षम व स्वस्त ही होते. म्हणजे थोडक्यात तो तिथे त्याच्या उत्पादनाची जाहिरात करीत होता. तरी आता वेळ घालवावा म्हणून मी त्याचा उपद्व्याप पाहत होतो. त्याने बराच गाजावाजा करून आधी ते कापड पेटविले आणि डाव्या हातात धरले. नंतर लोकांचे आपल्याकडे पुरेसे लक्ष आहे ह्याची खात्री करून घेत उजव्या हातातील फायर एक्स्टिन्ग्विशरने त्यावर फवारा सोडण्यास सुरूवात केली. भरपूर फवारा सोडूनही ती आग काही आटोक्यात येईना. नंतर त्याच्या डाव्या हाताला चटके बसू लागले. शेवटी लोक ओरडू लागल्यावर त्याने ते जळते कापड खाली फरशीवर सोडले आणि शेवटी त्यास बुटांच्या साहाय्याने विझविले. त्याची फजिती पाहून लोक फिदीफिदी हसत कुजबुजू लागले. एक शॉर्ट फिल्म संपली. चला आता पुन्हा कंटाळवाणी प्रतिक्षा असा विचार करून मी एका रिकाम्या जागी जाउन बसू लागलो तोच मला कोणीतरी "हॅल्लो हॅल्लो" करून बोलावते आहे असे जाणविले. आवाजाच्या दिशेने पाहिले असता, एक तरूणी हात करून मला तिच्या जवळच्या रिकाम्या आसनावर बोलावत असल्याचे दिसले. तिने गरबा/दांडिया खेळताना वापरतात तसा भडक जांभळ्या रंगाचा पोशाख (त्यास चणिया चोली का कायसे म्हणतात. अर्थात हे मला तेव्हा ठाऊक नव्हते) परिधान केला होता. तशाच जांभळ्या रंगाची लिपस्टीक व चेहर्‍यावरही खुपसा मेक-अप केला होता. पापण्या व भुवयांसोबतच डोक्यावरचे केसही रंगविलेले होते. तिच्या आवाजाला एक वेगळाच घोगरा टोन होता (नेमक्या शब्दांत सांगायचं तर तिचा आवाज अगदी राणी मुखर्जीसारखा होता. अर्थात तेव्हा मी राणी मुखर्जीचा आवाज ऐकला नव्हता). त्या अमराठी तरूणीने मला स्वत:च्या शेजारी बसवून हिंदी-इंग्रजी मिश्र भाषेत संवाद सुरू केला जो मी इथे मराठीत देत आहे. ती : हाय. नवीन सभासद का? मी : नाही. वक्तृत्व स्पर्धेत पारितोषिक मिळालेय, ते घ्यायला आलोय. ती : व्वॉव! अभिनंदन! काय विषय होता? मी : जातीयवाद - समस्या आणि उपाय. ती : ???? मी : (घसा खाकरून) जातीय... ती : बरं ते जाऊ दे. आज रात्री काय प्रोग्रॅम आहे? मी : रात्री? आता रात्रच नाही काय? आता दहा वाजेपर्यंत हा कार्यक्रम संपला की सरळ घरी जाऊन झोपणार. ती : (माझ्या डावीकडून स्वत:चा उजवा हात माझ्या उजव्या खांद्यावर ठेवत) बोरिंग! काहीतरीच... ही काय रात्र थोडीच आहे? ही तर सायंकाळ आहे. आणि आताशी सव्वानऊ वाजतायेत. हा कार्यक्रम साडे अकरा आधी संपत नाही. तू काही दहा वाजता घरी पोचू शकत नाहीस. मी : (तिने ज्या पद्धतीने माझ्या खांद्यावर हात ठेवून मला वेढून घेतले होते तो अनुभव मला एकदम नवीनच होता. त्यामुळे अतिशय गडबडून) काय? छे! इतका उशीर. मला घरी रागावतील. मला निघायलाच हवे. (मी उठून उभा राहू लागलो) ती : (हातांनी माझा खांदा दाबून मला खाली बसवत) बस रे! असा कसा जातोस? तुझं प्राईझ नाही का घेऊन जाणार? आणि इतका भितोस काय? साडे अकरा म्हणजे काही उशीर नाही. मी तर त्यानंतर एका डान्स पार्टीला जाणार आहे. इन्फॅक्ट मी तुला तेच विचारणार होते. मला कुणी पार्टनर नाहीये. तू होतोस का माझा डान्स पार्टनर? मी : पण मला दांडिया खेळता येत नाही. ती : (हसत) तूला कोणी सांगितलं मी तिथ दांडिया खेळणार आहे म्हणून? मी : तुमच्या ड्रेस कडे पाहून मला वाटलं तसं... ती : (आणखी मोठ्याने हसत) अरे मला तुम्ही काय म्हणतोस. कॉल मी XYZ (तिने तिचे नाव सांगितले). मी : बरं, पण मला कुठलाच डान्स येत नाही (मला आता तिथून माझी सुटका करून घ्यावीशी वाटत होती). ती : अरे त्यात फारसं काही अवघड नसतं, आणि त्यातूनही काही अडचण आलीच तर मी आहेच की तुझ्याबरोबर. बाय द वे तुझं नाव काय? चे त न खरं तर माझ्या घशाला इतकी कोरड पडली होती की त्यातून एखादा शब्द मोठ्या मुश्किलीने कुजबुजण्याइतपत आवाजातच निघाला असता. अचानक माझा आवाज इतका मोठा कसा झाला? अर्थात मला जास्त वेळ आश्चर्य करावेच लागले नाही कारण पुन्हा तितक्याच मोठ्याने माझ्या नावाचा पुकारा करणारा आवाज आला आणि माझ्यासह इतर अनेकांनी आवाजाच्या दिशेने पाहिले. माझे वडील माझ्याकडे अतिशय रागाने पाहत सभागृहाच्या प्रवेशद्वारातून आत येत होते. मी चटकन त्या तरूणीचा माझ्या खांद्यावरील हात झटकून टाकीत वडिलांपाशी पोचलो. मला घेऊन ते कार्यक्रमाच्या आयोजकांपाशी गेले आणि म्हणाले, "मी चेतनला इथून घेऊन चाललोय." आयोजक उद्गारले, "अहो, असं काय करता? सकाळी स्पर्धेच्या वेळी आमचे सभासद हजर नव्हते. आता सर्वांनाच चेतन त्याचं सकाळचं भाषण ऐकवेल. मग आम्ही त्याला पारितोषिक देऊ." " हे पाहा. तुम्हाला वेळेवर कार्यक्रम सुरू करता येत नाही की संपवता येत नाहीत. तिकडे सगळे त्याची घरी वाट पाहतायेत आणि इथे तुम्ही अजून त्याला थांबवून ठेवायची भाषा करताय. तुमचं बक्षीस बिक्षीस काही नको आम्हाला. हा मी त्याला घेऊन चाललो." माझ्या वडीलांचा उग्र आवेश पाहून आयोजक बावरले. त्यांनी लागलीच पारितोषिकाची ट्रॉफी माझ्या हाती ठेवली आणि मी वडिलांसोबत घरी निघालो. घरी पोचेपर्यंत आणि त्यानंतरही वडील घडल्या प्रसंगाबद्दल काहीच बोलले नाहीत. परंतु जे घडले ते त्यांना निश्चितच आवडले नसणार. त्यानंतर मी ठरविले की जीन्स टीशर्ट असा विदुषकी पोशाख कधीच परिधान करायचा नाही. तेव्हापासून मी पिकनिक असो की पार्टी कायमच कटाक्षाने "फॉर्मल अटायर" परिधान करतो आणि स्पोर्ट शूज ही मॉर्निंग वॉक शिवाय इतर वेळी वापरत नाही.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
समाज
लेखनप्रकार (Writing Type)
अनुभव

प्रतिक्रिया द्या
73111 वाचन

💬 प्रतिसाद (174)

प्रतिक्रिया

खुप दिवसांनी मिपा वर कॉमेडी

Dhananjay Borgaonkar
Fri, 11/11/2011 - 12:12 नवीन
खुप दिवसांनी मिपा वर कॉमेडी लेख वाचला. धन्यवाद गुगळे. असच लिहित जा ;)
  • Log in or register to post comments

नक्कीच प्रयत्न करेन

चेतन सुभाष गुगळे
Fri, 11/11/2011 - 12:21 नवीन
धनंजय बोरगांवकर. << खुप दिवसांनी मिपा वर कॉमेडी लेख वाचला. >> आभारी आहे. अर्थात या मागची प्रेरणा म्हणजे रोहित भिडे यांच्या लेखावरचा स्मिताजींचा प्रतिसाद. तेव्हा त्यांना आणि त्याचबरोबर यशवंत एकनाथ कुलकर्णी व इतरही सदस्यांना याचे श्रेय द्यायला हवे ज्यांनी हा किस्सा इथे मांडण्याची आग्रही मागणी केली होती. << असच लिहित जा >> आपल्या सारखे प्रोत्साहन देणारे वाचक असल्यावर भविष्यातही असेच लिहीण्याचा प्रयत्न केला जाईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Dhananjay Borgaonkar

धन्यवाद

स्मिता.
Sat, 11/12/2011 - 01:55 नवीन
माझ्या विनंतीला मान देवून इथे किस्सा टाकल्याबद्दल धन्यवाद चेतन! लेख आणि त्यावरचे प्रतिसाद वाचून भरपूर करमणूक झाली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चेतन सुभाष गुगळे

आपल्याला त्या पोरीच्या

प्यारे१
Fri, 11/11/2011 - 12:41 नवीन
आपल्याला त्या पोरीच्या चाणाक्ष बुद्धीची दाद द्यावीशी वाटते..... ;) १३.५ वर्षाचे अतिशय विदूषकी दिसणारे पण अगदी निरुपद्रवी पोर (हा सगळा डेटा चे.सु.गुगळे यांचाच) ग्रुपला दाखवायला बरे पडेल असा काहीसा विचार त्या कन्यकेने केला असेल. (थोडेसे भेजा फ्राय सारखे असावे काय परकरन? ;) )
  • Log in or register to post comments

छान

विनायक प्रभू
Fri, 11/11/2011 - 13:48 नवीन
मस्त लेख. असो. एक प्रश्न : आता तरी दांडिया रास खेळु लागलात का नै?
  • Log in or register to post comments

मास्तरांनु, तुमका भारी

विश्वनाथ मेहेंदळे
Fri, 11/11/2011 - 15:00 नवीन
मास्तरांनु, तुमका भारी चवकश्या !! ईचार काय असा तुमचा नेमका ?? ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू

नाही.

चेतन सुभाष गुगळे
Fri, 11/11/2011 - 15:29 नवीन
नृत्याविषयी पूर्वीपासूनच नावड आहे, म्हणूनच तिने नृत्याचा विषय काढताच मी तिथून जाऊ लागलो होतो. नृत्याविषयीची ही नावड अजूनही तशीच आहे त्यामुळे पुन्हा कुठल्याही नृत्यप्रकाराच्या वाट्याला गेलो नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू

बोंबला

विनायक प्रभू
Fri, 11/11/2011 - 15:59 नवीन
बोंबला. जे आयला दांडिया रास हा नृत्य प्रकार आहे हे तुम्हाला कुणी सांगितले?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चेतन सुभाष गुगळे

हुर्रे°°°° सेंन्चुरी झाली

जोशी 'ले'
Fri, 11/11/2011 - 18:20 नवीन
हुर्रे°°°° सेंन्चुरी झाली
  • Log in or register to post comments

अभिनंदन!!

नरेश_
Fri, 11/11/2011 - 18:32 नवीन
अभिनंदन गुगळेसाहेब या शतकोत्तर प्रतिसादी धाग्याबद्दल! जियो. आणि हो - धन्यवाद, आभारी आहे असले शब्द लिहून आपल्या मित्रांना परकं नाही करायचं. You deserve it!
  • Log in or register to post comments

मूळ धागा

तिमा
Fri, 11/11/2011 - 19:01 नवीन
मूळ धागा वाचून जेवढी करमणुक झाली त्यापेक्षा जास्त करमणुक शतकोत्तर प्रतिक्रियांनी झाली. म्हणून लेखकाचे व सर्व प्रतिसादकर्त्यांचे मनःपूर्वक आभार!!!
  • Log in or register to post comments

+१ ११/११/११ च्या मुहुर्तावर

जाई.
Fri, 11/11/2011 - 23:33 नवीन
+१ ११/११/११ च्या मुहुर्तावर चांगले मनोरंजन झाले
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तिमा

हया शतकोत्तरी धाग्याबद्दल

यकु
Fri, 11/11/2011 - 19:29 नवीन
हया शतकोत्तरी धाग्याबद्दल पुणें येथील मिपाकरांनी श्रीयुत गुगळे यांच्याकडून पार्टी वसूल करावी. :)
  • Log in or register to post comments

जवळपास २० वर्षापूर्वीचा काळ ,

पक्या
Fri, 11/11/2011 - 23:04 नवीन
जवळपास २० वर्षापूर्वीचा काळ , लेखकाचे साडे तेरा वय लक्षात घेता आणि पोशाखाचे वर्णन वाचून (गुलाबी पँट, लूझर टि शर्ट - टिपीकल गोविंदा स्टाईल) लेखातील सर्व प्रसंग पटले.
  • Log in or register to post comments

क्या पक्याभाय...

धन्या
Sat, 11/12/2011 - 00:40 नवीन
तुम भी ना... वोह रायटरने थोडाभौत तेरेको हवा क्या दिया और तू हल्लूच उडने लगा?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पक्या

गुगळेकाका....

सूड
Sat, 11/12/2011 - 08:30 नवीन
>>त्यानंतर मी ठरविले की जीन्स टीशर्ट असा विदुषकी पोशाख कधीच परिधान करायचा नाही. गुगळेकाका, मला तुमचा निर्णय आवडला. गुलाबी रंगाची जीन्स घालण्यापेक्षा फॉर्मल कधीही बेस्ट !!
  • Log in or register to post comments

वाचनिय

चिरोटा
Sat, 11/12/2011 - 14:27 नवीन
वाचनिय विनोदी लेख.
  • Log in or register to post comments

आ भा र

चेतन सुभाष गुगळे
Sat, 11/12/2011 - 14:37 नवीन
अभिप्रायाबद्दल धन्यवाद चिरोटाजी. अर्थात या लेखाकरिता मी विशेष मेहनतही घेतली नाही. जसं घडलं तसं केवळ वीसेक मिनीटांत टंकलं. माझ्या कल्पनाशक्तीला इथे वाव नव्हता. तरीही केवळ वीस तासांत शतकी प्रतिसाद मिळालेले पाहून मलाही आश्चर्यच वाटलं. कित्येक दिवस विचार करून मेहनत घेऊन टंकलेल्या माझ्या पूर्वीच्या लेखांनाही इतका भरघोस प्रतिसाद मिळाला नव्हता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिरोटा

तरीही केवळ वीस तासांत शतकी

स्पा
Sat, 11/12/2011 - 14:40 नवीन
तरीही केवळ वीस तासांत शतकी प्रतिसाद मिळालेले पाहून मलाही आश्चर्यच वाटलं. कित्येक दिवस विचार करून मेहनत घेऊन टंकलेल्या माझ्या पूर्वीच्या लेखांनाही इतका भरघोस प्रतिसाद मिळाला नव्हता. ५० रन्स तर तुमच्याच आहेत गुगळे काका ;)
  • Log in or register to post comments

तद्दन फालतु व टाकावु लिखाण....

वेताळ
Sat, 11/12/2011 - 18:05 नवीन
एक तरुणी तुम्हाला नाचासाठी निमंत्रण देते व तिच्या हेतुविषयी तुम्ही घेतलेली शंका शंकास्पद आहे. निदान नाचा व्यतिरिक्त तिचा दुसरा कोणताही हेतु तुमच्याबद्दल होता, हे तुमचा फोटो पाहुन वाटत नाही.
  • Log in or register to post comments

लेख

प्रसाद गोडबोले
Wed, 04/09/2014 - 10:00 नवीन
लेख शोधुन काढुन वाचला ... लईच भारी नशीबवान आहात तुम्ही ...आमच्या तर स्वप्नातही असे काही होत नाही :D
  • Log in or register to post comments

अगागागा... हा लय भारी लेख आहे

आदूबाळ
Wed, 04/09/2014 - 16:46 नवीन
अगागागा... हा लय भारी लेख आहे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

मुक्तपीठीय लेख..

राजो
Wed, 04/09/2014 - 17:20 नवीन
मुक्तपीठीय लेख..
  • Log in or register to post comments

परिक्षेत उत्तरे

जातवेद
Wed, 04/09/2014 - 20:01 नवीन
परिक्षेत उत्तरे लिहिल्यासारख्या प्रतिक्रीया का देता हो चेतन? लास्ट ईयरला काय गोल्डनला राहिलेलं काय?
  • Log in or register to post comments

ह्याला म्हनायचं खरा पच्चिम

प्यारे१
Wed, 04/09/2014 - 20:11 नवीन
ह्याला म्हनायचं खरा पच्चिम म्हाराष्ट्र ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जातवेद

ख्याक

जातवेद
Wed, 04/09/2014 - 20:48 नवीन
ख्याक ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

जातिभेद

आयुर्हित
Wed, 04/09/2014 - 22:15 नवीन
जातिभेद विसरून सर्वांनी एकजुटीने राष्ट्राची प्रगती साधण्याकरिता कटिबद्ध व्हायला हवे हेच खरे! अजून एक विनंती: जातिभेदामुळेच पानिपतच्या लढाईत मराठे अब्दाली पुढे हरले या गोष्टीचेही दाखले मिपावर वाचायला नक्कीच आवडतील.
  • Log in or register to post comments

सिंहीण हा लेख तुमच्यामुळे

प्यारे१
Wed, 04/09/2014 - 22:28 नवीन
सिंहीण हा लेख तुमच्यामुळे पुन्हा वाचला. मज पामराच्या मनात सिंहीण लेखाचा विषय वेगळाच आहे असा संशय होता तो आपल्या प्रतिसादामुळं दूर झाला. आभार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आयुर्हित

ळोळ्झ...

धन्या
Fri, 04/11/2014 - 08:37 नवीन
आपण आणि मा. वपाडाव यांनी "सिंहाचा" पुणे गेट कटट्याला केलेला सत्कार आमच्या लक्षात आहे. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

कसचं कसचं!

प्यारे१
Fri, 04/11/2014 - 16:12 नवीन
कसचं कसचं!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

@पुणे गेट कटट्याला केलेला

अत्रुप्त आत्मा
Fri, 04/11/2014 - 17:28 नवीन
@पुणे गेट कटट्याला केलेला सत्कार>>> =)) +++++१११११ =)) . . . . सदर- सत् कारास, हजर असलेला-आत्मू खोड्याळ! =)) :p =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

आँ??? काय झाल्तं म्हणे गुर्जी

बॅटमॅन
Fri, 04/11/2014 - 17:33 नवीन
आँ??? काय झाल्तं म्हणे गुर्जी? जमल्यास शेअर करा की ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

@ काय झाल्तं म्हणे गुर्जी?>>>

अत्रुप्त आत्मा
Fri, 04/11/2014 - 17:39 नवीन
@ काय झाल्तं म्हणे गुर्जी?>>> Image removed. काय सांगू तुला, त्या दोघांची गोष्टंsssss! Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

त्या दोघांची गोष्टं, सांगा

बॅटमॅन
Fri, 04/11/2014 - 17:41 नवीन
त्या दोघांची गोष्टं, सांगा करून सपष्टं!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

माताय

रामपुरी
गुरुवार, 04/10/2014 - 02:43 नवीन
ह्या सिंहीणीला पिंजर्‍यातून बाहेर कोणी काढलं? हसून हसून परत एकदा प्राण कंठाशी आले ना राव. चेतन सुभाष गुगळे यांना "मिपा ब्रम्हे" (आठवा- मुक्तपिठ...ब्रम्हे...लुना...४००० रूपये...) हा पुरस्कार देण्यात यावा अशी नम्र सुचना. हा त्याहून एक कांकणभर सरसच आहे.
  • Log in or register to post comments

बाकी हा लेख वाचल्यापासून

रामपुरी
गुरुवार, 04/10/2014 - 02:51 नवीन
बाकी हा लेख वाचल्यापासून "फॉर्मल अटायर" वर "स्पोर्टस शूज" हा "विदूषकी" पोशाख बघायची फार्फार इच्छा आहे. (अति अवांतरः जाण्यापूर्वी चेसुगु ना ते जॉगींग कुठ करतात हे विचारून घ्यायला हवं होतं.. छ्या...)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामपुरी

मला गुलाबी जीन्स आणि "लूझर" (

आदूबाळ
गुरुवार, 04/10/2014 - 13:52 नवीन
मला गुलाबी जीन्स आणि "लूझर" (!) टीशर्ट बघायची उत्सुकता आहे. बाकी काही असो, पण लायन्स क्लबचं ऐकीव वर्णन या लेखापेक्षा फारसं दूरचं नाही...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामपुरी

++७

आत्मशून्य
Fri, 04/11/2014 - 16:21 नवीन
लायन्स क्लबचं ऐकीव वर्णन या लेखापेक्षा फारसं दूरचं नाही...
=)) लहानपणी मोठ्या लोकांसोबत त्यांच्या मिटींगला जाणे होत असे... तो काळ वेगळा होता म्हणा तरीही जर माझी स्मृती धोका देत नसेल तर आपल्या वाक्याशी संपुर्ण सहमत व्हावे असेच म्हणेन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

हहपुवा!

भाते
गुरुवार, 04/10/2014 - 14:20 नवीन
धागा आणि इथे दिसत असलेल्या प्रतिक्रिया वाचुन धागा संपादित करायला सं.मं.ला बराच त्रास झाला असेल याची जाणिव झाली. :)
  • Log in or register to post comments

धमाल धागा . . . मस्त लिहिलाय

चौथा कोनाडा
Fri, 04/11/2014 - 07:11 नवीन
धमाल धागा . . . मस्त लिहिलाय अनुभव ! अजय देवगणच्या सिंघम नंतर थेट चेतन गुगळेंची सिंहिण सुपरहिट ! लेखाखालच्या प्रतिक्रिया वाचून तर हसून हसून मुरकुंडी वळाली ! पैशे वसूल धागा !
  • Log in or register to post comments

लायन्स क्लबचं ऐकीव वर्णन या लेखापेक्षा फारसं दूरचं नाही...

ईश्वरसर्वसाक्षी
गुरुवार, 02/04/2016 - 19:44 नवीन
लायनेस क्लब म्हणायचय का आपल्याला
  • Log in or register to post comments

परवाच ह्याधाग्यााची फार्फार

चंबा मुतनाळ
Fri, 02/05/2016 - 16:14 नवीन
परवाच ह्याधाग्यााची फार्फार आटवण आली होती. तेंव्हा धागा वर आणल्याबद्दल धन्यवाद !!
  • Log in or register to post comments

चंबा मुतनाळ

होबासराव
Fri, 02/05/2016 - 16:25 नवीन
स्वरि बर का ! हा आय डी म्हंजि कस आहे, विचारायच हे हा कि हे एग्झॅक्टलि काय आहे म्हंजि 'मुतनाळ'
  • Log in or register to post comments

होबास राव, तुम्ही कल्पना

चौथा कोनाडा
Sat, 02/06/2016 - 20:36 नवीन
होबास राव, तुम्ही कल्पना करताय तसे काही नाही. काही वर्षांपुर्वी "चंबा मुतनाळ " असा कुस्तीगिर असल्याचे आठवते. मि. चंबा मुतनाळ , जर प्रकाश टाका की तुमच्या नावावर ! काय आहे हे नक्की ? मिपाकरांचे गैरसमज होताहेत नावा बद्दल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: होबासराव

होय, चंबा मुतनाळ या नावाचे एक

बॅटमॅन
Tue, 02/09/2016 - 15:48 नवीन
होय, चंबा मुतनाळ या नावाचे एक फेमस पैलवान होते, १९६०-८० मध्ये कधीतरी आय गेस. सत्पाल, गणपतराव आंदळकर, हरिश्चंद्र बिराजदार, दादू चौगुले, हिंदकेसरी मारुती माने यांच्या लायनीत यांचेही नाव असायचे. (संदर्भः मातीवरील कुस्तीचे फ्यान असलेले आमचे पिताश्री)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौथा कोनाडा

तेरा वर्षाच्या पोरामागे

अजया
Fri, 02/05/2016 - 19:14 नवीन
तेरा वर्षाच्या पोरामागे सिंहिण का लागली राणी मुखर्जीसारखा आवाज काढून? ( उत्तर माहित असून न देणाऱ्याच्या मिपा आयडीची शंभर शकले होतील )
  • Log in or register to post comments

उमगले नाही

माहितगार
Sat, 02/06/2016 - 23:34 नवीन
फ्रँकली चेतनचे तेव्हाचे वय या धाग्यावर आणि मिपाधाग्यावर शोधण्या दुष्टपणा आत्ता मी सुद्धा केला मला त्यांचे नेमके वय शोधता आले नाही, आपण १३ हा आकडा कसा आणला ते उमगले नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया

13 आकडा अशुभ असतो. आज पण तोच

अभ्या..
Sat, 02/06/2016 - 23:40 नवीन
13 आकडा अशुभ असतो. आज पण तोच आकडा आहे. काही व्यक्ती अन वये स्थिरांक असतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार

न्युमरॉलॉजीवाले अशुभच शुभ

माहितगार
Mon, 02/08/2016 - 15:25 नवीन
न्युमरॉलॉजीवाले अशुभच शुभ करण्यासाठी आकड्यांची बेरीज करतात म्हणे :) (ह.घ्या.)
काही व्यक्ती अन वये स्थिरांक असतात.
वयाचा उंबरठा पार करतानाचा स्थिरांक समजता येतो, पुढच्या वयाचा उंबरठा गाठताना आधीच्या वेळी एखादा विशीष्ट रंगीत चष्मा लागला कि असे होत असावे बर्‍याच व्यक्तींच्या बाबतीत !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

http://www.misalpav.com

अजया
Sun, 02/07/2016 - 10:13 नवीन
http://www.misalpav.com/comment/351516#comment-351516 बघा.पुराव्याने शाबित केलंय ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा