Skip to main content

(सौंदर्याचे प्रौक्षण करुनि)

लेखक मेघवेडा यांनी शुक्रवार, 28/10/2011 20:27 या दिवशी प्रकाशित केले.
प्राजुच्या दिवाळीच्या कवितेचं मागल्या वर्षी विडंबन केलं होतं. यंदाही प्रयत्न करतो आहे! म्हटलं तर विडंबन म्हटलं तर निराळी कविता. कसंही. :) प्रेरणा : केंद्रि रिकामा तांब्या घेऊन 'रंभा' अवतरली "देताय ना दुध?", खिडकीवरती येऊन ती म्हटली जागी झाली दृष्टी माझी ऐकून ती हाळी ब्लॅक्कॅण्डव्हाईट दुनिया सारी झाली रंगोळी! सोपानावरी तिज पाहुनिया बाबू गडगडला सायकल आडवी होऊनि परश्या भूवरी आपटला लगबग झाली दाहिदिशांतुन बया पाहण्याला "राईसप्लेटीं मुर्गमसाला कुठुनि बरें आला?" हसली पाहुनि, सिंचन झाले रोमी हर्षाचें मनी माझिया फूल उमलले प्रेमिक आशांचे तांब्या सोडूनि हात धरावा इच्छा मनी होती खिळली तिजवर दृष्टि, पेटल्या मनी लाख ज्योती पण स्वप्नांची विझून गेली सुंदर फुलबाजी "ए भुसनळिच्या, दे की दुध"- ऐकुन आतिषबाजी! नवीन आकांक्षांवर गरगर फिरली भुईनळी सौंदर्याचे प्रौक्षण करुनि फसवी दिवाळी! -- आमच्या लाडक्या साळूस समर्पित.
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 2693
प्रतिक्रिया 11

प्रतिक्रिया

ह्या वेड्याला खवतुन उसंत मिळाली म्हणायची एकदाची. ;) प्रेरणेचा दुवा न मिळाल्याने एक स्वतंत्र काव्य म्हणुनच वाचले. आवडली. :)

खातंय मार प्राजुचा...

पण मला ही स्वतंत्र कविता म्हणूनच आवडली. विशेषतः सगळे जमिनीवर येण्याचा भाग तर भारीच! कोणीतरी या कवितेचं रसग्रहण करा रे!

LOL

वाह वाह !! तरी म्हणतच होतो विडंबनकुमारांनी काही डकवलं नाही इतक्यात. आवडलं परीक्षण, मला स्वारगेटच्या शिवनेरीप्रतिक्षागृहाची (वेटिंग रुम, वेटिंग रुम) आठवण झाली. ;)

पण स्वप्नांची विझून गेली सुंदर फुलबाजी "ए भुसनळिच्या, दे की दुध"- ऐकुन आतिषबाजी मस्त..आवडले

छान रे मेवे! ;) (भुसनळ्या) रंगा