Skip to main content

प्रवास .....

प्रवास .....

Published on मंगळवार, 25/10/2011 प्रकाशित मुखपृष्ठ
वाटेवरून चालताना हलकीच ठेच लागते, कुणीतरी “जा” म्हणाले तरी थांबावेसे वाटते थांबताच मनातल्या आठवणी काहूर करतात , आणि कधीचे दाटलेले पाणी डोळे भरून टाकतात , जड जड पायांनी परत आपण चालू लागतो वाट , अंधारातून चालता चालता होऊ लागते पहाट , ओंजळ भर मोगरा बाकी पारिजताकाच सारा , निळ्या निळ्या आकाशात शुभ्र ढगांचा पसारा , मन सकाळीच तेवढे प्रसन्न , मग गहिवरून येते , वाऱ्यासंगे वाहता वाहता परत फुलापाशी थांबते , मेघ येतात दाटून मग ,बरसून जातात संध्याकाळी , तेव्हाच बहरतो निशिगंध आठवणींच्या वेळी , विसरव म्हणले तरी विसरता येत नाही , दिवस संपून जातो पण मन कुठंच लागत नाही , पाउस पडून गेला तरी आठवणींचे आभाळ मोकळ होत नाही , आठवण आली नाही असे कधी होताच नाही , आठवायला विसरावे लागतं पण विसरता कधी येतच नाही , वाट संपून जाते पण प्रवास कधी संपतच नाही , बरोबर असावा गंध फक्त निशिगंध आणि मोगऱ्याचा , कारण काटा रुततोच शेवटी त्या गुलाबाचा ……!!!!!!
लेखनविषय:

याद्या 1151
प्रतिक्रिया 5

ओंजळ भर मोगरा बाकी पारिजताकाच सारा , निळ्या निळ्या आकाशात शुभ्र ढगांचा पसारा
सुंदर!!
बरोबर असावा गंध फक्त निशिगंध आणि मोगऱ्याचा , कारण काटा रुततोच शेवटी त्या गुलाबाचा ……!!!!!!
तोड नाही!! खुप आवडली.

वाटेवरून चालताना हलकीच ठेच लागते, कुणीतरी “जा” म्हणाले तरी थांबावेसे वाटते थांबताच मनातल्या आठवणी काहूर करतात छान . .आवडली कविता ..!!