Skip to main content

प्रवास .....

लेखक फिझा यांनी मंगळवार, 25/10/2011 11:48 या दिवशी प्रकाशित केले.

वाटेवरून चालताना हलकीच ठेच लागते,

कुणीतरी “जा” म्हणाले तरी थांबावेसे वाटते

थांबताच मनातल्या आठवणी काहूर करतात ,

आणि कधीचे दाटलेले पाणी डोळे भरून टाकतात ,

जड जड पायांनी परत आपण चालू लागतो वाट ,

अंधारातून चालता चालता होऊ लागते पहाट ,

ओंजळ भर मोगरा बाकी पारिजताकाच सारा ,

निळ्या निळ्या आकाशात शुभ्र ढगांचा पसारा ,

मन सकाळीच तेवढे प्रसन्न , मग गहिवरून येते ,

वाऱ्यासंगे वाहता वाहता परत फुलापाशी थांबते ,

मेघ येतात दाटून मग ,बरसून जातात संध्याकाळी ,

तेव्हाच बहरतो निशिगंध आठवणींच्या वेळी ,

विसरव म्हणले तरी विसरता येत नाही ,

दिवस संपून जातो पण मन कुठंच लागत नाही ,

पाउस पडून गेला तरी आठवणींचे आभाळ मोकळ होत नाही ,

आठवण आली नाही असे कधी होताच नाही ,

आठवायला विसरावे लागतं पण विसरता कधी येतच नाही ,

वाट संपून जाते पण प्रवास कधी संपतच नाही ,

बरोबर असावा गंध फक्त निशिगंध आणि मोगऱ्याचा ,

कारण काटा रुततोच शेवटी त्या गुलाबाचा ……!!!!!!

लेखनविषय:

वाचने 1168
प्रतिक्रिया 5

प्रतिक्रिया

ओंजळ भर मोगरा बाकी पारिजताकाच सारा ,
निळ्या निळ्या आकाशात शुभ्र ढगांचा पसारा

सुंदर!!

बरोबर असावा गंध फक्त निशिगंध आणि मोगऱ्याचा ,
कारण काटा रुततोच शेवटी त्या गुलाबाचा ……!!!!!!

तोड नाही!!

खुप आवडली.


वाटेवरून चालताना हलकीच ठेच लागते,

कुणीतरी “जा” म्हणाले तरी थांबावेसे वाटते

थांबताच मनातल्या आठवणी काहूर करतात

छान . .आवडली कविता ..!!