अंधारातील रजतरेषा: डॉ. सुनील गाजरे यांचे संशोधन; रक्त शुद्धीकरण उपचार पद्धतीने 10 वर्षात 110 रुग्णांना जीवदान
अंधारातील रजतरेषा: डॉ. सुनील गाजरे यांचे संशोधन; रक्त शुद्धीकरण उपचार पद्धतीने 10 वर्षात 110 रुग्णांना जीवदान
दैनिक दिव्य मराठीतील दिनांक २४ ऑक्टोबर २०११ मधील खाली दिलेली बातमी आशादायक आहे. आताच्या नित्याच्या बातम्यांमधे भ्रष्टाचार, खुन, दरोडे, पोलीसांची गुन्हेगारांशी हातमिळवणी, बॉलिवूडी अभिनेत्यांच्या बातम्या, त्यांनी ट्विटरवर काय लिहीले, राजकारणी, प्रिंस काय जेवला, कोणत्या झोपडीत काय खाल्ले आदींसारख्या, एक बिग अभिनेता व एखादा खेळाडू पैशासाठी व स्व:तासाठी सारी मेहनत करत असून सामाजिक योगदान शुन्य असतांनाही त्याला भारतरत्न आदींसारखे पुरस्कार देण्याची मागणी केली जाते अन त्या व्यक्तीही मुकसंमती देतात या असल्या काळ्या बातम्या असतात. अंधारातील रजतरेषा ठरावी अशी दैनिक दिव्य मराठीतील वरील तारखेची बातमी जशीच्या तशी देत आहे. आताच्या काळात डॉक्टरलोकंही व्यापारी झालेत. डॉक्टर सुनिल गाजरेंसारखे सन्माननिय अपवाद प्रत्येक क्षेत्रात आहेत म्हणूनच त्या बॉलबेअरींगरूपी माणसांमुळे देश चालतोय.
डॉक्टर सुनिल गाजरेंना मानाचा मुजरा!
पॅरालिसीसचा दोन लाखांचा उपचार 20 हजारात!
(सुनील बडगुजर । जळगाव)
डॉ. सुनील गाजरे यांचे संशोधन; रक्त शुद्धीकरण उपचार पद्धतीने 10 वर्षात 110 रुग्णांना जीवदान
हातापायाचा पॅरालिसीस झाल्यानंतर ‘आयव्हीआयजी’ या उपचार पद्धतीचा वापर केला जातो. यासाठी सुमारे दोन लाख रुपयांपर्यंत खर्च होतो. र्शीमंताना हा खर्च परवडणारा असला तरी गरिबांना मात्र ही उपचारपद्धती न परवडणारी आहे. परिणामी अनेक रुग्णांना उपाचाराअभावी अपंगत्व किंवा थेट मृत्यूला सामोरे जावे लागते. या दुर्दैवी प्रसंगावर मात करण्याच्या दृष्टीने न्युरोफिजिशिअन डॉ. सुनील गाजरे यांनी ‘लो डेअसर प्लाझ्मा फेरेसेस’ (रक्त शुद्धीकरण) पद्धत शोधून काढली असून यामुळे अवघ्या 20 हजारांत रुग्ण बरा होत आहे. या पद्धतीने आतापर्यंत 110 रुग्णांना जीवदान मिळाले आहे.
हवा आणि पाण्यातील विषाणूंमुळे इमिनो अँलर्जीचे इनफेक्शन शरीरात झाल्याने हाता-पायाचा पॅरालिसीस होतो. यामुळे रुग्ण आयुष्यभर लुळा होतो. त्यापुढेही अधिक लागण झाली तर यात मृत्यूही ओढवण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे अशा रुग्णांवर विशेष पध्दतीने इलाज करावा लागतो.
अशी आहे नवीन आणि स्वस्त उपचार पद्धती
या रोगाच्या रुग्णांवर डॉ. गाजरे त्यांनी संशोधन केलेल्या नवीन उपचार पद्धतीचा वापर करतात. या पद्धतीला त्यांनी ‘लो डेअसर प्ला ामा फेरेसेस’ (रक्त शुद्धीकरण) पद्धत हे नाव दिले आहे. यात ते रुग्णांच्या शरीरातून दिवसाला दोन वेळा 350 एमएल रक्त काढतात. ते रक्तपेढीत पाठविल्यानंतर तेथे प्रक्रिया होऊन रक्तातील प्लाझ्मा व लाल-पांढर्या पेशी वेगळ्या काढल्या जातात. त्यामध्ये अँण्टी बॉडीज असल्याने त्या नष्ट करण्यात येतात. त्यानंतर शुद्ध झालेले रक्त पुन्हा रुग्णाला दिले जाते. असा उपचार पाच दिवस केला जातो. यासाठी दिवसाला तीन ते चार हजार रुपये असे पाच दिवसासाठी फक्त 20 हजार रुपये खर्च येतो.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
ग्रेट!!!!!!!
अभिनंदनिय....
चांगली माहिती. गव्ह्यांच्या
एआयडीपी / गीयां बारे सिंड्रोम
उत्तम प्रतिसाद!
साती..अगदी जरुर..परवानगी कसली
आपला लेख वाचला. फारच