प्रसारमाध्यमांचा बेजबाबदारपणा..
काल पुणे मिरर पान क्र.२ वरील बातमी वाचली आणी तळपायाची आग मस्तकात गेली. काही महिन्यांपूर्वी हिंजवडी येथे एका महिलेवर सामूहिक बलात्कार करणार्या तीघांना जन्मठेप झाल्याच्या बातमीबरोबरील फोटो पाहून कोणत्याही सामान्य माणसाला चीड आल्याशिवाय राहणार नाही.
शिक्षा झालेला गुन्हेगार एखाद्या ऑलिंपिक विजेत्याच्या थाटात हात उंचावून, जमलेल्यांना निगरगट्टपणे अभिवादन करत होता. मुळात, बलात्कारासारखा नीच गुन्हा करून एका स्त्रीच्या व तिच्या संपूर्ण कुटुंबाच्या आयुष्याची राखरांगोळी करणार्या हरामखोरांना अतिशय निर्घ्रुण शिक्षेची तरतूद असायला हवी. त्याचबरोबर प्रश्न असा पडतो की असला फोटो छापून या माध्यमांनी काय साध्य केले? हे फोटो पाहून सामान्य, कायद्याचे पालन करणार्या, लोकांना आपल्या दुबळ्या न्यायव्यवस्थेबद्दल आदर वाटेल का? बलात्कार झालेल्या मुलीच्या कुटुंबियांवर, मित्रमैत्रिणींवर, असले फोटो बघून काय परिणाम होईल? त्यांच्या प्रति या माध्यमांची काही जबाबदारी नाही का? न्याव्यवस्थेवर विश्वास असलेल्यांचे मानसिक खच्चिकरण असल्या गोष्टींमुळे होत नाही काय? अप्रत्यक्षपणे गुन्हेगारांच्या उदत्तिकरणास यामुळे हातभार मिळत असावा काय?
असल्या गुन्हेगारांना पोलीस फरपटत नेत आहेत, तुडवून काढत आहेत, अशी द्रुश्ये फक्त चित्रपटातच पहायला मिळणार काय?
प्रतिक्रिया
निर्लज्जपणाचा कळस आहे.
श्रीरंग , प्रत्येक शब्दाशी सहमत.
-१
तसं वाटत नाही.
बरोबर आहे गवी. निर्लज्जपणा