दोन बडबडगीते
१) ढग वाजले ढम ढम ढम
ढग वाजले ढम ढम ढम
विज चमकली चम चम चम
पाऊस पडला छम छम छम
नाच नाचूनी भिजले कोण?
भिजले कोण?
ढग वाजले ढम ढम ढम
विज चमकली चम चम चम
पाऊस पडला छम छम छम
नाच नाचूनी भिजले कोण?
भिजले कोण?
२) चिमणे चिमणे
चिमणे चिमणे हे दाणे घे हे दाणे घे
आमच्या बाळाला खेळायला ने खेळायला ने
काऊदादा काऊदादा भुर्रकन ये भुर्रकन ये
आमच्या बाळाला युक्ती दे युक्ती दे
ईकडे ये रे भु भु
बाळाशी खेळतोस का तू?
हम्मा हम्मा शेपूट हलव
आमच्या बाळाला पाळण्यात झुलव
- पाषाणभेद
वाचने
2290
प्रतिक्रिया
9
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान
एकदम छान लिहिलेस रे मित्रा.
अत्यंत सोपी सहज व सूट्सूटीत,
अत्यंत सोपी सहज व सूट्सूटीत, मजा येते वाचायला.
छान.
छान.
छानच......
छानच......:)
छान रे... प्रमाणाच्या बाहेर
छान रे...
प्रमाणाच्या बाहेर अवांतर :--- माझ्या खवतं बडबडगीत इस्प्येश्यल इडियो डकवला आहे, पाहुन घे जरा. ;)
छान.....
छान.....
छान
चिमणे चिमणे हे बालगीत मस्तच आहे. मुलीला जेवण भरवताना कंपल्सरी गायला लागते, तेव्हा उपयोगी पडेल.
ह्या गाण्यांचा काही
In reply to छान by michmadhura
ह्या गाण्यांचा काही प्रॅक्टीकल उपयोग होतो आहे हे वाचून मला खरोखर आनंद झालाय.
सर्व रसिकांना धन्यवाद.
योजक दुर्लभ असतो
In reply to ह्या गाण्यांचा काही by पाषाणभेद
हेच खरे. गीतं आवडली.