✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

हा कोणत्या दिशेचा आहे प्रवास अजुनी

र — राजेश घासकडवी, Sun, 10/16/2011 - 19:08
जखमेस तेल मागू, कितिदा जगास अजुनी? हा कोणत्या दिशेचा आहे प्रवास अजुनी? हे शीड फाटले अन्, तुटले जरी सुकाणू क्षितिजा तरी तुला का, माझाच ध्यास अजुनी? ज्योती फुकून टाकू, ही वल्गना कशाला? वणवा उठेल गगनी, नियतीस आस अजुनी! उद्दाम शुष्क पर्णे झाकोळती मला का? उत्स्फूर्त वादळांचे जपलेत श्वास अजुनी! ही पाउले खुणेची नेती मला कुठेशी? कुठल्या मुशाफिराचा रस्त्यास भास अजुनी (इतरत्र पूर्वप्रकाशित)

प्रतिक्रिया द्या
12059 वाचन

💬 प्रतिसाद (70)

क्षितिजा तरी तुला का, माझाच

गणेशा
Mon, 10/17/2011 - 20:41 नवीन
क्षितिजा तरी तुला का, माझाच ध्यास अजुनी?
अप्रतिम
  • Log in or register to post comments

क्षितिजा तरी तुला का, माझाच

गणेशा
Mon, 10/17/2011 - 20:41 नवीन
क्षितिजा तरी तुला का, माझाच ध्यास अजुनी?
अप्रतिम
  • Log in or register to post comments

श्रेय

मुक्तसुनीत
Mon, 10/17/2011 - 20:52 नवीन
घासकडवी यांनी खालील रचनांचे श्रेय द्यायला हवे आहे अशी मी मागणी करतो : तोवर या कवितेचा आस्वाद निर्मळ मनाने मला घेता येणार नाही असं मला खेदाने नमूद करावसं वाटतं. "अजुनि या विजनातही ..." विंदा करंदीकर "तरुण आहे रात्र अजुनि" - सुरेश भट "अजुनि रुसून आहे" - अनिल "बगळ्यांची माळ फुले अजुनि अंबरात"
  • Log in or register to post comments

माझं श्रेय?

Nile
Mon, 10/17/2011 - 20:59 नवीन
माझ्या नावातला नी वापरल्याचे श्रेय कधी मिळणार?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत

असो.

मुक्तसुनीत
Mon, 10/17/2011 - 21:04 नवीन
नायल्या. तो दीर्घ नी आहे. दीर्घ "नी"च्या आसपास जाऊ नये याची मी काळजी घेतो. विशेषतः घासकडवींच्या संदर्भात हा विषय स्फोटक आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

ऱ्हस्व आणि दीर्घ...

राजेश घासकडवी
Mon, 10/17/2011 - 21:13 नवीन
माझ्या कवितेत मी दीर्घ 'नी' वापरला आहे. तुम्ही दिलेल्या शब्दांमध्ये ऱ्हस्व 'नि' आहे. तेव्हा हा मुद्दा गैरलागू आहे. उगाच आक्षेप घेण्यापूर्वी विचार करु'नी' आक्षेप घ्यावा ही विनंती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत

कृपया

मुक्तसुनीत
Mon, 10/17/2011 - 21:36 नवीन
कृपया माझ्या उपरोक्त प्रतिसादातले सर्व "अजुनि" या शब्दाचे उल्लेख "अजूनी" असे वाचावेत. थोडक्यात, प्रश्न र्‍हस्व किंवा दीर्घाचा नसून, येनकेनप्रकारेण तुमच्या काव्याच्या श्रेयापासून तुम्हाला बेदखल करावे असा माझा हेतू होता. या मागील भावना समजून घ्याव्यात. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

हम्म्म

परिकथेतील राजकुमार
Tue, 10/18/2011 - 10:56 नवीन
श्री. मुक्तसुनीत सर हे इतके दिवस मला सेन्सीबल वाटले होते. पण.. असो...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत

_/\_

सोत्रि
Tue, 10/18/2011 - 12:09 नवीन
_/\__/\__/\_ :) - (सेन्सीबल) सोकाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

ब्र

राजेश घासकडवी
Tue, 10/18/2011 - 17:07 नवीन
त्यांची सेन्सिबिलिटी संपल्यामुळे ते आता "ब्र " काढण्याची देखील हिंमत करत नाहीत, असं तेच परवा सांगत होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

योग्य निर्णय

परिकथेतील राजकुमार
Tue, 10/18/2011 - 17:52 नवीन
त्यांची सेन्सिबिलिटी संपल्यामुळे ते आता "ब्र " काढण्याची देखील हिंमत करत नाहीत, असं तेच परवा सांगत होते.
बरोबर आहे त्याचे. उद्या त्यांनी "ब्र" काढला रे काढला की लगेच तुम्ही "ब्र" ज्वलन करायला धावाल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

हा हा

मुक्तसुनीत
Tue, 10/18/2011 - 18:58 नवीन
त्यांची सेन्सिबिलिटी संपल्यामुळे ते आता "ब्र " काढण्याची देखील हिंमत करत नाहीत, असं तेच परवा सांगत होते.
माझी व्यक्तिगत मते कानामात्रेचाही फरक न करता इथे उधृत केली जात आहेत याबद्दल मी आभारी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

>>>उद्या त्यांनी "ब्र" काढला

प्यारे१
Wed, 10/19/2011 - 11:12 नवीन
>>>उद्या त्यांनी "ब्र" काढला रे काढला की लगेच तुम्ही "ब्र" ज्वलन करायला धावाल. स्वतःच्या मुखावाटे काढतात की आणखी कसे? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

हा हा हा !

सुहास..
Wed, 10/19/2011 - 12:19 नवीन
हा हा हा !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

स्वतःच्या मुखावाटेच

राजेश घासकडवी
Wed, 10/19/2011 - 20:02 नवीन
त्यांनी स्वतःच्या मुखावाटेच काढलं. इतर कुठून कुठून काढण्याचा अनुभव तुम्हाला असेल तर सांगा, म्हणजे माहितीची देवाणघेवाण होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

(No subject)

आत्मशून्य
Wed, 10/19/2011 - 20:58 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

प्रश्न

मुक्तसुनीत
Wed, 10/19/2011 - 20:55 नवीन
स्वतःच्या मुखावाटे काढतात की आणखी कसे? Wink प्रश्न माझ्या संदर्भात आहे म्हणून याचा विचार करणे क्रमप्राप्त आहे. माझ्या अल्पमतीला प्रश्न नीटसा कळला नाही. प्रश्नानंतरची स्मायली आणि त्यावर आलेला हास्यवाचक प्रतिसाद त्या प्रश्नात काहीतरी गूढ व्यंगात्मक अर्थ आहे असं सुचवीत आहेत. परंतु अशी गूढलिखिते आम्हांस कशी कळावी. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

!

बिपिन कार्यकर्ते
गुरुवार, 10/20/2011 - 16:42 नवीन
<कोकणी अ‍ॅक्सेंट> अँ! किंतें रें!! आंकांशींचीं अंधोंरेंखिंतें वांचंणांरें तुंम्हीं, यंवंडीं सांधीं गूंढंलिंखिंतें वांचंतां यें नां तुंमांसं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत

कै नै

परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 10/20/2011 - 18:20 नवीन
< /कोकणी अ‍ॅक्सेंट > टॅग बंद करायला आलो होतो. बाकी तुमची काढ घाल चालू द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

कवितेचे लेखक ( की कवि ? कवि

विजुभाऊ
Tue, 10/18/2011 - 12:57 नवीन
कवितेचे लेखक ( की कवि ? कवि हे नाव पुण्यात कर्वे पथावर कुठल्याशा प्राध्यापक महोदयांचे भेटण्याचे ठिकाण आहे असे ऐकिवात आहे.) हे भौतिक शास्त्राचे तज्ञ आहेत. सेन्सीबल हे कोणत्या प्रकारचे बल आहे याचा खुलासा इथले पराकोटीचे जाणकार करतील का? सेन्सिबल हे बल न्युटन च्या कोणत्या नियमात बसते. तसेच या बलाला मोजण्यासाठी कोणते एकक उपयोगात आणतात.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा