Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by राजेश घासकडवी on Sun, 10/16/2011 - 19:08
जखमेस तेल मागू, कितिदा जगास अजुनी? हा कोणत्या दिशेचा आहे प्रवास अजुनी? हे शीड फाटले अन्, तुटले जरी सुकाणू क्षितिजा तरी तुला का, माझाच ध्यास अजुनी? ज्योती फुकून टाकू, ही वल्गना कशाला? वणवा उठेल गगनी, नियतीस आस अजुनी! उद्दाम शुष्क पर्णे झाकोळती मला का? उत्स्फूर्त वादळांचे जपलेत श्वास अजुनी! ही पाउले खुणेची नेती मला कुठेशी? कुठल्या मुशाफिराचा रस्त्यास भास अजुनी (इतरत्र पूर्वप्रकाशित)

Submitted by श्रावण मोडक on Sun, 10/16/2011 - 20:04

Permalink

वा, वा...

वा, वा... रचना उत्तम जमली आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by जयंत कुलकर्णी on Sun, 10/16/2011 - 20:11

Permalink

G............R.............E.

G............R.............E...............A..............T. फारच अर्थपूर्ण. प्रत्येक मानवाला पडणारा आणि छळणारा हा प्रश्न... त्याचे उत्तर एकच..... आपण अश्वथामा नसल्यामुळे नशिबवान !
  • Log in or register to post comments

Submitted by धनंजय on Mon, 10/17/2011 - 22:59

Permalink

छान

छान. जखमेसाठी तेल मागत वणवण फिरणार्‍या अश्वत्थाम्याची कथा ऐकलेली आहे. त्या उपमेसारखी कवीची तडफड चालू आहे. पण अश्वत्थाम्यापेक्षा वेगळा असा हा कवी अजून आशा ठेवून आहे. शैली लक्षणीय आहे. (काहीसे संस्कृतप्रचुर शब्द आणि "अजुनी" सारखा लडिवाळ-जुना शब्द एकत्र क्वचित दिसतात. ["अजुनी" बरोबर सामान्यपणे लडिवाळ-जुने-मराठमोळे शब्द असलेली शैली बघायची सवय आहे.] पण राजेश घासकडवी यांच्यासाठी ही शैली नैसर्गिक असू शकते.) पहिल्या कडव्यातली दुसरी ओळ, आणि त्यातील अंत्ययमक हे समस्यापूर्तीकरता कवीला कोणीतरी दिलेले आहे, असे खालील प्रतिसाद वाचून समजले. त्यामुळे अंत्ययमक - म्हणजे समस्या मांडणार्‍याच्या शैलीतला "अजुनी" शब्द - आणि उर्वरित समस्यापूर्तीतील कवीच्या शैलीतील उत्स्फूर्त शब्दप्रयोग यांच्यातली तफावत आता अधिक समजली. छिद्रान्वेष : "हा प्रवास", "हे शीड", "ही वल्गना", "ही पाउले" ; या सर्व ठिकाणी सारखे सारखे निर्देशक "हा/ही/हे" इतकेसे आवडले नाहीत. सारखा-सारखा निर्देश भद्दा वाटतो आहे. आणि त्याहूनही वाईट म्हणजे वृत्तासाठी घेतलेला भरीचा शब्द वाटत आहे. आता हा भरीचा नसून प्रत्येक ठिकाणी शब्दशः निर्देश अर्थासाठी आवश्यक आहे, असे कोणी म्हणू शकतो. मी स्वतः असे म्हणून कविता समजून घ्यायचा प्रयत्न केला. परंतु प्रयत्न फसला.
  • Log in or register to post comments

Submitted by मनिष on Sun, 10/16/2011 - 21:09

Permalink

आवडली!

आवडली! :-)
  • Log in or register to post comments

Submitted by शैलेन्द्र on Sun, 10/16/2011 - 21:57

Permalink

"उद्दाम शुष्क पर्णे झाकोळती

"उद्दाम शुष्क पर्णे झाकोळती मला का? उत्स्फूर्त वादळांचे जपलेत श्वास अजुनी!" खुपच छान... फार आवडली..
  • Log in or register to post comments

Submitted by प्रशांत on Sun, 10/16/2011 - 22:05

Permalink

उत्तमच :)

ही पाउले खुणेची नेती मला कुठेशी? कुठल्या मुशाफिराचा रस्त्यास भास अजुनी
  • Log in or register to post comments

Submitted by प्रकाश१११ on Sun, 10/16/2011 - 22:17

Permalink

खूप सुंदर ..!!

खूप सुंदर ..!!
  • Log in or register to post comments

Submitted by मन१ on Sun, 10/16/2011 - 22:30

Permalink

मस्त!

आठवी ते दहावीदरम्यान आरती प्रभू आणि बी ह्यांच्या चिंतनात्मक कविता ह्याच धाटणीच्या होत्या. त्यांची आठवण झाली. एरव्ही कविता वाचन नसतच; पण ही वाचून मुद्दाम प्रतिक्रिया द्यावीशी वाटली. गंमत म्हणजे मनोगतावरही फार फार वर्षांनंतर चक्कर टाकली मागच्या आठवड्यात तेव्हा शीर्षकाशी जशाला तशा जुळनार्‍या ओळी http://www.manogat.com/node/22431 इथे सापडल्या होत्या. फक्त त्या कवितेतला भाव अगदिच वेगळा, आशावादी वाटतो. आणि ह्या कवितेतला मात्र काहिसा भ्रमित, विचारमग्न प्रकारचा. ( ठेचाळलो तरी मी नाही उदास अजुनी हा कोणत्या दिशेचा आहे प्रवास अजुनी ह्या त्या ओळी ज्या शीर्षकाशी सही सही एकसारख्या दिसतात. )
  • Log in or register to post comments

Submitted by विजुभाऊ on Tue, 10/18/2011 - 12:48

In reply to मस्त! by मन१

Permalink

मनराव कविवर तुम्ही वांङ्मय

मनराव कविवर तुम्ही वांङ्मय चोरीचा आरोप करीत आहात. शब्द कोशात तर सर्वच शब्द असतात. एखाद्या वाक्यात शब्दांचा क्रम जसाच्यातस्सा आला म्हणून शब्द चोरी होत नाही. मला भूक लागली हे प्रत्येक मूल याच शब्दात व्यक्त करते म्हणून त्याच्यावर शब्द चोरीचा हीन आणि हिडीस आरोप करणे ही तौहीन होते. ;) असो. सल्तनेतील रय्यतेला खविंदाना काही सांगायचे असल्यास परवानगी लागते. फक्त खविंदांचा जै जै कार असो हेच शब्द उच्चारत्ता येतील
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on Sun, 10/16/2011 - 22:29

Permalink

वाहव्वा,,, क्या बात,,,क्या बात,,,क्या बात

ही पाउले खुणेची नेती मला कुठेशी? कुठल्या मुशाफिराचा रस्त्यास भास अजुनी........................ :-)
  • Log in or register to post comments

Submitted by शिल्पा ब on Sun, 10/16/2011 - 22:30

Permalink

मस्त कविता आहे. समजली अन

मस्त कविता आहे. समजली अन आवडली.
  • Log in or register to post comments
Profile picture for user आत्मशून्य

Submitted by आत्मशून्य on Sun, 10/16/2011 - 22:33

Permalink

:)

.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Sun, 10/16/2011 - 23:11

Permalink

क्या बात है.

ही पाउले खुणेची नेती मला कुठेशी? कुठल्या मुशाफिराचा रस्त्यास भास अजुनी व्वा....! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
Profile picture for user सुहास झेले

Submitted by सुहास झेले on Mon, 10/17/2011 - 01:55

Permalink

वाह वाह... उत्तम रचना !!

वाह वाह... उत्तम रचना !!
  • Log in or register to post comments

Submitted by सन्जोप राव on Mon, 10/17/2011 - 05:53

Permalink

वाहवा..

उत्तम रचना. मौनाचे पर्व सरले, किंचीत घाव भरले स्मरते तरी अजूनी , होतो उदास अजुनी
  • Log in or register to post comments

Submitted by प्यारे१ on Mon, 10/17/2011 - 09:43

Permalink

>>>उद्दाम शुष्क पर्णे झाकोळती

>>>उद्दाम शुष्क पर्णे झाकोळती मला का? उत्स्फूर्त वादळांचे जपलेत श्वास अजुनी! <<< तो ये है आपकी जिंदादिली का राझ... ;)
  • Log in or register to post comments

Submitted by ऋषिकेश on Mon, 10/17/2011 - 09:53

Permalink

वा!

वा! रचना आवडली!
  • Log in or register to post comments

Submitted by मिसळलेला काव्यप्रेमी on Mon, 10/17/2011 - 10:59

Permalink

सुंदर

सुंदर रचना!! खुप आवडली.
  • Log in or register to post comments

Submitted by अमोल केळकर on Mon, 10/17/2011 - 12:09

Permalink

सुंदर रचना अमोल केळकर

सुंदर रचना :) अमोल केळकर
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on Mon, 10/17/2011 - 12:17

Permalink

च्यायला कविता आहे होय ! मला

च्यायला कविता आहे होय ! मला वाटले बालकोडी किंवा झबल्याचे फटू आहेत.
  • Log in or register to post comments

Submitted by बिपिन कार्यकर्ते on Mon, 10/17/2011 - 12:48

Permalink

वा!

वा!
  • Log in or register to post comments

Submitted by राघव on Mon, 10/17/2011 - 13:06

Permalink

सुंदर

सगळेच शेर सुंदर! रचना खूप आवडली. :) राघव
  • Log in or register to post comments

Submitted by मेघवेडा on Mon, 10/17/2011 - 13:32

In reply to सुंदर by राघव

Permalink

+ १

असेच म्हणतो. मस्त रचना.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रभो on Mon, 10/17/2011 - 19:23

In reply to + १ by मेघवेडा

Permalink

+२

मस्त रचना.
  • Log in or register to post comments

Submitted by वाहीदा on Mon, 10/17/2011 - 13:58

Permalink

कविने मूळ कवि अन कवितेला श्रेय द्यायला हवे होते

तुमच्या कवितेचे जे मूळ स्फूर्तीस्थान http://www.manogat.com/node/22431 आहे त्यांना तुम्ही श्रेय द्यायला किंवा त्यांचा नुसता उल्लेख तुम्ही करायला येथे काहीच हरकत नाही.. बरोबर ना ? पण ते तुम्ही टाळले :-( आहे प्रवास अजुनी ठेचाळलो तरी मी नाही उदास अजुनी हा कोणत्या दिशेचा आहे प्रवास अजुनी विसरून प्रेम पहिले जगणे मला न जमले धोका दिला तरीही मज तू हवास अजुनी वृध्दाश्रमात दिसले चैतन्य आपुलेपण कोमेजल्या फुलांना आहे सुवास अजुनी दसर्‍यास पारध्यांनी शस्त्रास पूजिले पण आक्रोश सावजांचा नकळे कुणास अजुनी विसरून सर्व जावे समजावले मला मी पण काचतात धागे माझ्या जीवास अजुनी क्षितिजास गाठण्याला उडतोय मी कधीचा थकण्यास वेळ नाही माझ्या परास अजुनी साठीत खूप ग़ज़ला श्रंगार काव्य लिहितो मी मोजलेच नाही माझ्या वयास अजुनी शोधात आपुल्यांच्या आयुष्य खर्च केले दु:खी कुणी न माझ्या दिसले शवास अजुनी परकाच वाटलो मी "निशिकांत" का जगाला? जगणे तृणासवे ना जमले दवास अजुनी -- निशिकांत देशपांडे
  • Log in or register to post comments

Submitted by प्यारे१ on Mon, 10/17/2011 - 15:18

In reply to कविने मूळ कवि अन कवितेला श्रेय द्यायला हवे होते by वाहीदा

Permalink

>>>>साठीत खूप ग़ज़ला श्रंगार

>>>>साठीत खूप ग़ज़ला श्रंगार काव्य लिहितो मी मोजलेच नाही माझ्या वयास अजुनी<<<< विसरले असतील वयोमानानुसार :P आपा, समजून घ्या. ;)
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on Mon, 10/17/2011 - 15:23

In reply to कविने मूळ कवि अन कवितेला श्रेय द्यायला हवे होते by वाहीदा

Permalink

अरे रे !

त्यांना तुम्ही श्रेय द्यायला किंवा त्यांचा नुसता उल्लेख तुम्ही करायला येथे काहीच हरकत नाही.. बरोबर ना ? पण ते तुम्ही टाळले
गुर्जी हा कोणत्या दिशेचा आहे प्रवास ?? ज्या ठिकाणी व्यास, वाल्मिकी आणि कालिदासांच्या तोडीचे लेखक लिखाण करतात तिथे तुम्ही हे असे करावे. दुर्दैव !!
  • Log in or register to post comments

Submitted by मन१ on Mon, 10/17/2011 - 15:31

In reply to कविने मूळ कवि अन कवितेला श्रेय द्यायला हवे होते by वाहीदा

Permalink

ओsssssssssssय

मी वरच्या प्रतिसादात मनोगतावर अशीच एक कविता असल्याचा उल्लेख केलाय. तुमच्या प्रतिसादाचे जे मूळ स्फूर्तीस्थान http://www.misalpav.com/node/19430#comment-346593 आहे त्यांना तुम्ही श्रेय द्यायला किंवा त्यांचा नुसता उल्लेख तुम्ही करायला येथे काहीच हरकत नाही.. बरोबर ना ? पण ते तुम्हीही ते टाळले. :(
  • Log in or register to post comments

Submitted by वाहीदा on Mon, 10/17/2011 - 15:44

In reply to ओsssssssssssय by मन१

Permalink

मनोबा, मी तुझा प्रवास पाहीला नाही रे ;-)

मनोबा, मी तुझा प्रवास पाहीला नाही रे ;-) निशिकांत देशपांडे यांची कविता वाचली होती आधी म्हणून सरळ प्रतिसाद दिला असो आता तुला ही श्रेय देते, मनोबा अन माझ्या वाचनानुसार मुळ कवि निशिकांत देशपांडे यांना श्री, श्री घासकडवि यांनी श्रेय द्यायला हवे होते
  • Log in or register to post comments

Submitted by सविता on Mon, 10/17/2011 - 16:57

In reply to कविने मूळ कवि अन कवितेला श्रेय द्यायला हवे होते by वाहीदा

Permalink

You too, Brutus?

You too, Brutus?
  • Log in or register to post comments

Submitted by राजेश घासकडवी on Mon, 10/17/2011 - 17:33

In reply to कविने मूळ कवि अन कवितेला श्रेय द्यायला हवे होते by वाहीदा

Permalink

श्रेय देण्या-घेण्याचा प्रश्नच नाही

'हा कोणत्या दिशेचा आहे प्रवास अजुनी' ही ओळ या दोन गझलांमध्ये सामायिक आहे. आणि त्याला कारण आहे. मायबोलीवर डॉ. कैलासराव गायकवाड हे तरहीसाठी ओळ सुचवतात. ती ओळ मतल्यामध्ये दुसरी ओळ येईल अशा पद्धतीने प्रत्येकाने स्वतंत्र गझल लिहायची असते. अनेक जण आपापल्या गझलांतून त्याच ओळीच्या वेगवेगळ्या भावांची अभिव्यक्ती करतात. 'हा कोणत्या दिशेचा' हे गूगलवर शोधल्यास अशी वेगवेगळी उदाहरणं सापडतात. प्राजुताईंनी देखील हीच ओळ घेऊन वेगळी, अतिशय छान गझल लिहिलेली आहे. त्यामुळे यात कोणी कोणाला श्रेय देण्याघेण्याचा प्रश्नच येत नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on Mon, 10/17/2011 - 17:51

In reply to श्रेय देण्या-घेण्याचा प्रश्नच नाही by राजेश घासकडवी

Permalink

छे छे !

अशा प्रगल्भ संस्थळावर हा खुलासा पटण्याजोगा नाही. वाल्याचा वाल्मिकी झाला, म्हणून तुम्हाला सूट मिळेल असे नाही. ह्या तुमच्या कृत्यामुळे सदर संस्थळावरील सन्माननीय सदस्यांना* आणि ते सन्माननीय सदस्य ज्यांच्या गुडबुकात आहेत अशा अधिकारी व्यक्तींना मानसीक त्रास झाल्याचे आम्हाला खेदाने नमूद करावेसे वाटत आहे. *सन्माननीय सदस्यांची व्याख्या इतरत्र प्रकाशित.
  • Log in or register to post comments

Submitted by राजेश घासकडवी on Mon, 10/17/2011 - 19:16

In reply to छे छे ! by परिकथेतील राजकुमार

Permalink

हे पहा माननीय श्री श्री परा

सन्माननीय सदस्य, अधिकारी व त्यांची गुडबुकं हा अत्यंत पवित्र मामला आहे. अशा गोष्टींची जाहीर चर्चा करून तुम्ही खोडसाळपणा करत आहात हे आमच्या लक्षात येत नाही का? याला खाजवून खरूज काढणे असं म्हटलं जातं. अशा चिखलफेकीच्या प्रयत्नाबद्दल तुम्हाला एखाद्या चतुष्पाद प्राण्याची उपमा द्यावी असं आमच्या मनात सारखं घोळत आहे. जास्त वटवट केलीत तर प्रथम खोडी काढण्याबद्दल तुमच्यावर आठ दिवसांची बंदी घालून ती दहा दिवस राबवण्यात येईल, सांगून ठेवतो.
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on Tue, 10/18/2011 - 11:03

In reply to हे पहा माननीय श्री श्री परा by राजेश घासकडवी

Permalink

मा. श्री. घासकडवीजी

जास्त वटवट केलीत तर प्रथम खोडी काढण्याबद्दल तुमच्यावर आठ दिवसांची बंदी घालून ती दहा दिवस राबवण्यात येईल, सांगून ठेवतो.
तुम्ही यंदा हिरव्या देशात दिवाळी कार्यक्रमात 'आया आया बॉडीगार्ड' ह्या गाण्यावर नृत्य करणार आहात ह्याचा अर्थ असा नव्हे की तुम्ही आम्हाला सतत दमात घ्यावे. 'खाजवून खरूज काढणे, चतुष्पाद प्राणी' असले असंसदीय शब्द अशा निर्मळ ठिकाणी टाईपताना तुमचा किबोर्ड फुटला कसा नाही ? ह्यापुढे तुम्ही योग्य ती काळजी घ्याल अशी अपेक्षा ठेवतो. अन्यथा तुम्हाला आमच्या गुडबुकात ठेवावे का नाही ह्याचा विचार करावा लागेल. तसेच तुमच्यासाठी ह्यापुढे आम्ही तुमच्या विरोधकांच्या खवत जौन त्यांना दमदाटी देखील करणार नाही ह्याची नोंद घ्यावी.
  • Log in or register to post comments

Submitted by राजेश घासकडवी on Wed, 10/19/2011 - 17:13

In reply to मा. श्री. घासकडवीजी by परिकथेतील राजकुमार

Permalink

सन्माननीय पराजीमहाराज,

'खाजवून खरूज काढणे, चतुष्पाद प्राणी' असले असंसदीय शब्द अशा निर्मळ ठिकाणी टाईपताना तुमचा किबोर्ड फुटला कसा नाही ?
या अशा गोष्टी तुम्हाला अनकंफर्टेबल करत असतील तर मिपा सोडून जा असंच म्हणेन. आणि काय हो, चतुष्पाद प्राणी म्हणणं असांसदीय का वाटतं? विष्णूचा दुसरा अवतार वराह होता. वराहाला जर तुम्ही गलिच्छ, ओंगळ समजत असाल तर तो विष्णूचा अपमान होईल आणि आमच्या भावना दुखावल्या जातील, सांगून ठेवतोय. गणपतीचं वाहन कुठचे! आणि आम्हाला दमदाटी केलीत तर तुम्हाला ब्र देखील काढता येणार नाही अशी व्यवस्था करेन.
  • Log in or register to post comments

Submitted by श्रावण मोडक on Mon, 10/17/2011 - 17:56

In reply to श्रेय देण्या-घेण्याचा प्रश्नच नाही by राजेश घासकडवी

Permalink

अपेक्षीत

हे अपेक्षीत होते. मन1 यांनी दोन्ही कवितांतील एक फरक नोंदवला होता, त्याकडे नीट पाहिले असते तरी आक्षेपकर्त्यांना घाईबाज मतप्रदर्शन करून नामुष्की पत्करावी लागली नसती. एक प्रयत्न तर फक्त स्कोअर सेटल करण्याचाच दिसला. आता, कैलास गायकवाड यांच्या कल्पनेतली ओळ घेतल्याचे श्रेय का दिले नाही, असेही म्हटले जाईल. तो अगदी ज्याची त्याची समज, आकलन असा विषय असला तरीही, तसे झाल्याने फक्त अवांतर वाद असेच स्वरूप याला प्राप्त होईल. या संस्थळाचे संपादक यासंदर्भात काही भूमिका बजावू शकतात. पण राजेश, इथं परत तुम्ही गुगल करायला का सांगताय? असे गुगल करून, प्रक्रिया समजून न घेता, त्यातल्या प्रत्येक निकालावर श्रेयवाद सुरू व्हायचा ना... ;)
  • Log in or register to post comments

Submitted by मेघवेडा on Mon, 10/17/2011 - 18:06

In reply to अपेक्षीत by श्रावण मोडक

Permalink

+ १

मन1 यांनी दोन्ही कवितांतील एक फरक नोंदवला होता, त्याकडे नीट पाहिले असते तरी आक्षेपकर्त्यांना घाईबाज मतप्रदर्शन करून नामुष्की पत्करावी लागली नसती
तंतोतंत. एवढे आणि एवढ्याशीच सहमत. तरही गझल बराच प्रसिद्ध प्रकार आहे. आणि छान जमलाय हो घासकडवी.
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on Mon, 10/17/2011 - 18:19

In reply to अपेक्षीत by श्रावण मोडक

Permalink

हम्म्म

तो अगदी ज्याची त्याची समज, आकलन असा विषय असला तरीही, तसे झाल्याने फक्त अवांतर वाद असेच स्वरूप याला प्राप्त होईल.
पण मुळात 'श्री. घासकडवी ह्यांचेच लिखाण हे अवांतर वाद वाढवण्यासाठी असते' असे आम्ही काही सन्माननीय सदस्यांनी बोललेले ऐकले आहे आणि लिहीलेले वाचले आहे. अधिक उजेड सन्माननीय लोक पाडतीलच.
  • Log in or register to post comments

Submitted by श्रावण मोडक on Mon, 10/17/2011 - 18:41

In reply to हम्म्म by परिकथेतील राजकुमार

Permalink

उजेड

उजेड पडायचा तेव्हा पडो. तोवर आपण अंधारात चर्चा करू. कसे? कधी येऊ? ;)
  • Log in or register to post comments

Submitted by बिपिन कार्यकर्ते on गुरुवार, 10/20/2011 - 16:36

In reply to उजेड by श्रावण मोडक

Permalink

तोवर आपण अंधारात चर्चा

तोवर आपण अंधारात चर्चा करू.
श्रावण यु टू? ;)
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on गुरुवार, 10/20/2011 - 19:12

In reply to तोवर आपण अंधारात चर्चा by बिपिन कार्यकर्ते

Permalink

त्यांना करायच्या असल्या

अंधारात बसून "काही नोंदी... कशाबशाच" तर तुम्ही कोण हो विचारणारे? ;) -रंगा
  • Log in or register to post comments

Submitted by वाहीदा on Mon, 10/17/2011 - 18:37

In reply to अपेक्षीत by श्रावण मोडक

Permalink

घासुंची बाजू सावरायला आलेला प्रतिसादही अपेक्षीतच

आम्ही काहीही नामुष्की पत्करली नाही .. खरेतर, घासुंची बाजू सावरायला आलेला प्रतिसादही अपेक्षीतच नाही का ? हेच जर सर्व सामान्य सदस्याकडून झाले असते तर ? अन संस्थाळावरील कायदे हे सर्वांना सारखेच असावे. आम्ही लहान मान्य , प्रस्थापितांविरोधात कसे जाऊ शकतो नाही का? असो ज्याची त्याची जाण समज आकलन ...
  • Log in or register to post comments

Submitted by श्रावण मोडक on Mon, 10/17/2011 - 19:10

In reply to घासुंची बाजू सावरायला आलेला प्रतिसादही अपेक्षीतच by वाहीदा

Permalink

अच्छा

आम्ही काहीही नामुष्की पत्करली नाही ..
चांगलं आहे. नामुष्की पत्करली हे माझे मत आहे, ते तुम्ही केव्हाही निकालात काढू शकता.
घासुंची बाजू सावरायला आलेला प्रतिसादही अपेक्षीतच नाही का ?
त्यांची बाजू भक्कम आहे. ती सावरण्याची गरज नाही, इतके जे झाले ते स्वयंस्पष्ट आहे. तरीही तुमच्या या मताचा आदर करतो.
हेच जर सर्व सामान्य सदस्याकडून झाले असते तर ? अन संस्थाळावरील कायदे हे सर्वांना सारखेच असावे.
कायदे सारखेच आहेत, असे मला वाटते. संपादक आणि सल्लागार अधिक बोलतील. थोडे आत डोकावून पहा. कायदे कसे आहेत हे तर नीट लक्षात येईलच, आणखीही काही लक्षात येईल.
आम्ही लहान मान्य , प्रस्थापितांविरोधात कसे जाऊ शकतो नाही का?
जरूर जा. पाठिंबा आहे. घाई करू नका. तसे केले तर ते लहान तोंडी मोठा घास ठरते.
असो ज्याची त्याची जाण समज आकलन ...
आपल्या मतांचा आदर करतो. एकूणच, व्यक्तीगणीक मतांचा आदर असल्याने येथेच थांबतो. वरकड टाकण्याची तुम्हाला संधी आहे.
  • Log in or register to post comments
Profile picture for user सुहास..

Submitted by सुहास.. on Mon, 10/17/2011 - 19:17

In reply to घासुंची बाजू सावरायला आलेला प्रतिसादही अपेक्षीतच by वाहीदा

Permalink

हसतोच आहे अजुन !

घासुंची बाजू सावरायला आलेला प्रतिसादही अपेक्षीतच नाही का ? >>. झोंबायचे तिथे झोंबले असे आडुन्-आडुन तर म्हणायचे तर नाही ना ;) अजुन दोन चार राहिले आहेत प्रतिसादक :)
  • Log in or register to post comments
Profile picture for user सुहास..

Submitted by सुहास.. on Mon, 10/17/2011 - 14:02

Permalink

हा हा हा हा

सेम हियर ! ;)
  • Log in or register to post comments

Submitted by गणपा on Mon, 10/17/2011 - 19:00

Permalink

एवढे चांगले काव्य रचले आहे

एवढे चांगले काव्य रचले आहे त्याचा आस्वाद घ्यायचा सोडुन नसती भांडण कसली उकरुन काढता रे? एक कविता म्हणुन आवडली. :)
  • Log in or register to post comments

Submitted by विकास on Mon, 10/17/2011 - 19:10

In reply to एवढे चांगले काव्य रचले आहे by गणपा

Permalink

+१

एवढे चांगले काव्य रचले आहे त्याचा आस्वाद घ्यायचा सोडुन नसती भांडण कसली उकरुन काढता रे? एक कविता म्हणुन आवडली. गणपाभाऊंशी सहमत.
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Mon, 10/17/2011 - 19:12

Permalink

गझल मस्त जमलीय!

या संभ्रमाला उत्तर म्हणून माधव जुलियन यांची एक जुनी कविता आठवली. कायदा पाळा गतीचा, काळ मागे लागला, थांबला तो संपला| धावत्याला शक्ति येई आणि रस्ता सापडे, भ्रांत तुम्हा का पडे|| आपलं आयुष्य म्हणजे एक प्रवास, त्याचं शेवटंचं ठिकाण येईपर्यंत चालत रहाणं भाग आहे. तेव्हा, "चरैवेति, चरैवेति।"
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on Mon, 10/17/2011 - 19:58

Permalink

छान रचना!

आमची दाद इथेही वाचता येईल! ;) -रंगा
  • Log in or register to post comments

Submitted by ढब्बू पैसा on Mon, 10/17/2011 - 20:04

Permalink

वाह

रचना उत्तम. खालच्या ओळी खूपच आवडल्या.
उद्दाम शुष्क पर्णे झाकोळती मला का? उत्स्फूर्त वादळांचे जपलेत श्वास अजुनी!
जियो! :)
  • Log in or register to post comments

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • Next page Next ›
  • Last page Last »
  • Log in or register to post comments
  • 12059 views

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com