नेक्स्ट इज व्हॉट ???
लहानपणी बाबांना दोन रुपये लिटरने फटफटीच्या टाकीत पेट्रोल भरताना बघितलं. आता सत्तरी गाठली (मी नव्हे, पेट्रोलने.. !!)
फोन सगळ्या गावात एकादोघांच्या घरी होते. काळे जड ठोकळ्यासारखे. कटर्र कटर्र आवाज करत डायल करण्याचे.
पेजर येऊन "वा.. काय टेक्नॉलॉजी आहे.." म्हणण्याच्या आत जुने झाले.
आता मोबाईल सगळ्यांकडे आहे..
वरुन थ्री जी आलं..
टॅब तीनहजारात येऊ घातलाय..
फार पूर्वी पंजाबात अतिरेकी होते. मग काश्मिरात, आता मध्यपूर्वेत.. आणि जगभरात.. फास आवळतो आहे असं फीलिंग सगळीकडे आहे.
आर्थिक बाबतीत आता युरोपमधे जबरदस्त क्रायसिस आहे.. आपण यातले अडाणी.. पण ऐकून ऐकून इंटरेस्ट येतोच.
कंझ्युम करण्यासाठी त्यांच्याकडे पुरेशी वाढती लोकसंख्या नाही असं काही म्हणतात.. काही म्हणतात की वेल्फेअर पद्धतीने (कमावणार्यांनी रिटायरांचा भार उचलायचा) चाललेली त्यांची व्यवस्था आहे. त्यात कमावणारी लोकसंख्या आणि रिटायर्ड लोकसंख्या यांचं प्रमाण उलटं होत चालल्याने समस्या उभी राहात आहे. त्यांना कदाचित लोकसंख्या वाढवायला लागेल. किंवा बाहेरच्या देशांतून नागरिक आणावे लागतील. काहीजण म्हणतात की भारत, ब्राझील वगैरे देशांकडून हे युरोपियन मदत मागतील.. कोणी म्हणतात की त्याबदल्यात आपण त्यांना अटी घालू आणि आपल्या लोकांना तिथे पाठवू..
उडणारी कार ही बालकथांमधे किंवा फँटसी पिक्चरमधे असायची. आता अनेक कोटींची का होईना पण शक्य कोटीतली अशी कार बनली आहे. प्रत्यक्ष रस्त्यावर आली तरी त्यात चॅलेंजेस खूप आहेत, ट्रॅफिक आणि कायद्याचे. पण तरीही ती आता अशक्य गोष्ट राहिली नाही.
मरण हे एजिंग प्रोसेसमुळे येतं.. या प्रोसेसवर इतकं संशोधन झालं की आता वय वाढण्याची प्रक्रिया अमर्यादित लांबवणं शक्य होऊ घातलंय. अर्थात मनुष्य अमर होणं हेही आता प्युअर फँटसी म्हणून मानता येणार नाही. या प्रकारे नैसर्गिक मरण टाळता आलं तरी अपघात, इजा, हत्या यांनी येणारं मरण टाळता येणार नाही. पण नैसर्गिक मरण टाळता येणं हेही नसे थोडके.
सुरुवातीला हे अमरत्व महागडं असेल पण आत्तापर्यंतचा इतिहास पाहिला तर सगळ्या नवीन शोधांच्या किंमती इव्हेंच्युअली स्वस्त होत जाऊन सर्वांना परवडण्याजोग्या होतातच.
असं झालं तर मग जिवंत राहण्याविषयीच्याच शेकडो समस्या येतील. नवीन जन्म बंद करावे लागतील.
स्पेसमधे प्रवास करणं हे हाताच्या बोटावर मोजण्याइतक्यांना शक्य झालं होतं. आता स्पेस टुरिझम फार दूर नाही. सध्या महाग आहे पण वीसतीस वर्षांत तेही केसरी टूरतर्फे जावं इतकं सहज होईल.
एड्सवर औषध अजून नाही. प्रसार झपाट्याने होतोय.
तापमान वाढतंय, बर्फ वितळ्तंय.
इन्फ्लेशन म्हणजे नेमकं काय? ते वाढतंय.. झिंबाब्वेसारख्या देशांत किमान लाखालाखांच्या नोटा छापाव्या लागताहेत.
महागाई किती वाढेल? मुंबईत तीन वर्षांपूर्वी दहा लाखात मिळणारा फ्लॅट आज चाळीस लाखाचा झालाय आणि मुंबईच्या थोडं बाहेर दहा वर्षांपूर्वी चाळीस लाखात मिळणारा जमिनीचा प्लॉट वीस कोटीचा झालाय.
किंमती अनंतापर्यंत वाढत जातील? घराची किंमत तीनशे कोटी आणि पगार एक कोटी अशी स्थिती खरंच येईल?
आणखी काय काय होईल जगात?
......................................
हे सर्व वेडंवाकडं मिश्रण वर छापण्याचं कारण हे, की मला येणार्या शंभरेक वर्षांबाबत तुमच्या कल्पना जाणून घ्यायच्या आहेत. तुमच्या मते:
कोणते शोध प्रत्यक्षात येतील? तंत्र किती पुढे जाऊ शकेल? की त्याला लोक विटतील?
कोणत्या इव्हेंट्स / घटनांमुळे जगात जबरदस्त बदल होतील?
आपली / आपल्या पुढच्या पिढीची लाईफस्टाईल कशी असेल?
आर्थिक बाबतीत काय स्थिती असेल?
माणसं सहज शंभरी गाठतील का?
आणखीही अनंत मतं आणि विचार (आपापल्या वर्किंग फिल्डशी संबंधित किंवा जनरलही) आपल्या मनात येत असतील, किंवा आता येतील.. ते इथे मांडून आपली काही फोरसाईट दिलीत तर खूप आनंद होईल.
आजच्या दिवसात जगावं, उद्याचा विचार करु नये अशी एक फिलॉसॉफी आहे, तिचा आदर करुन इथेच त्याची पोच देतो. कारण अशा स्वरुपाच्या प्रतिसादाने विचार पुढे जाणार नाही, म्हणून केवळ ते न म्हणण्याची विनंती करतो.
मी स्वतःपासून सुरुवात करतो:
काय होऊ शकेल याच्या कल्पना:
-बँका फक्त मीडिएटर राहतील आणि कर्ज देऊ इच्छिणारा ग्राहक कर्ज घेऊ इच्छिणार्याला बँक या एजंटमार्फत थेट कर्ज देईल.
-लग्न ही संकल्पना कालबाह्य
-भारतीयांना अमेरिका / युरोप यांचे दरवाजे पुन्हा सताड खुले.
-अवकाशप्रवासाची सहज उपलब्धता
-कॅन्सरवर मूलगामी उपाय
-मानवी मेंदूची मेमरी अन्य डिव्हाईसमधे ट्रान्सफर करुन घेणे शक्य.
.................
.............
नेक्स्ट इज व्हॉट??
वर्गीकरण
प्रतिक्रिया
सॅमसंग....
१. सूर्यमालेतील सर्व ग्रह
फार चिंता
तिसरं महायुद्ध होईल व बरीचशी
मरण हे एजिंग प्रोसेसमुळे
अमर्यादित लांबवणं याबद्दल साशंक आहे
श्री श्री गविशंकर काय म्हणजे
चिंता? ऑ? चिंता कुठेशी
इतर ग्रहांवर वसती वगैरे होणार
विजुभाय
*lol*
आणखी
कोणते शोध प्रत्यक्षात
लांब कुठे माणसांची गर्दी नसेल
जमीन व्यक्तिगत मालमत्ता
डिस्प्ले रिलेटेड शोध लागतील
तसेच सॅमसंग त्यांची नविन ओएस
ज्या Tizen बद्धल बरीच चर्चा
तसेच अॅन्ड्रोइडला स्पर्धा
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- मेरे Dil Ka तुमसे Hai केहना... ;) { Armaan }एलजीचा भिंतीवर चिटकवता येणारा
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Kehdoon Tumhen... :- DJ Aqeelवातावरण / पर्यावरण तसेच
वेगवेगळे डिव्हाईस शरीरात
साधारण पुढे काय होईल
कितीही काहीही झालं...
हे भौतिक बदल झाले
बाकी काय शोध आलो न लागो पण ते
ट्रान्स्पोर्टर जाऊ द्या तेल लावत.
हे फार दूर आहे असं नाही वाटत.
मिसळपावचे मालक बदलतील ;) बाकी काय जास्त डोकं चालत नाय.
ह्याला अंदाज म्हणाव, सुप्त
वास्तव
५१ पैकी कोणत्या, म्हंजे
५१ पैकी कोणत्या, म्हंजे
माझ्या कल्पना ...
हे उत्तम्...............
छोटा डॉन्शास्त्रेनी २०११ मधे
माझा अत्यंत आवडता असा हा
पुढील शंभर वर्षात भारत
आर्थिक बाबतीत काय स्थिती
छ्या:! कल्पनारंजनाचा प्रश्न
यशदांशी सहमत !
सर्व सायंस फिक्श्न
नेक्स्ट इज व्हॉट हे वाचुन
व्वॉव....
शंभर वर्षांनंतर...
अचूक सांगणे अवघड आहे.
आमची एक्स्पायरी डेट
सोन्याचे वाढते दर पाहून
मस्त धागा
जबरा...