Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by गवि on Tue, 10/18/2011 - 14:11
लहानपणी बाबांना दोन रुपये लिटरने फटफटीच्या टाकीत पेट्रोल भरताना बघितलं. आता सत्तरी गाठली (मी नव्हे, पेट्रोलने.. !!) फोन सगळ्या गावात एकादोघांच्या घरी होते. काळे जड ठोकळ्यासारखे. कटर्र कटर्र आवाज करत डायल करण्याचे. पेजर येऊन "वा.. काय टेक्नॉलॉजी आहे.." म्हणण्याच्या आत जुने झाले. आता मोबाईल सगळ्यांकडे आहे.. वरुन थ्री जी आलं.. टॅब तीनहजारात येऊ घातलाय.. फार पूर्वी पंजाबात अतिरेकी होते. मग काश्मिरात, आता मध्यपूर्वेत.. आणि जगभरात.. फास आवळतो आहे असं फीलिंग सगळीकडे आहे. आर्थिक बाबतीत आता युरोपमधे जबरदस्त क्रायसिस आहे.. आपण यातले अडाणी.. पण ऐकून ऐकून इंटरेस्ट येतोच. कंझ्युम करण्यासाठी त्यांच्याकडे पुरेशी वाढती लोकसंख्या नाही असं काही म्हणतात.. काही म्हणतात की वेल्फेअर पद्धतीने (कमावणार्‍यांनी रिटायरांचा भार उचलायचा) चाललेली त्यांची व्यवस्था आहे. त्यात कमावणारी लोकसंख्या आणि रिटायर्ड लोकसंख्या यांचं प्रमाण उलटं होत चालल्याने समस्या उभी राहात आहे. त्यांना कदाचित लोकसंख्या वाढवायला लागेल. किंवा बाहेरच्या देशांतून नागरिक आणावे लागतील. काहीजण म्हणतात की भारत, ब्राझील वगैरे देशांकडून हे युरोपियन मदत मागतील.. कोणी म्हणतात की त्याबदल्यात आपण त्यांना अटी घालू आणि आपल्या लोकांना तिथे पाठवू.. उडणारी कार ही बालकथांमधे किंवा फँटसी पिक्चरमधे असायची. आता अनेक कोटींची का होईना पण शक्य कोटीतली अशी कार बनली आहे. प्रत्यक्ष रस्त्यावर आली तरी त्यात चॅलेंजेस खूप आहेत, ट्रॅफिक आणि कायद्याचे. पण तरीही ती आता अशक्य गोष्ट राहिली नाही. मरण हे एजिंग प्रोसेसमुळे येतं.. या प्रोसेसवर इतकं संशोधन झालं की आता वय वाढण्याची प्रक्रिया अमर्यादित लांबवणं शक्य होऊ घातलंय. अर्थात मनुष्य अमर होणं हेही आता प्युअर फँटसी म्हणून मानता येणार नाही. या प्रकारे नैसर्गिक मरण टाळता आलं तरी अपघात, इजा, हत्या यांनी येणारं मरण टाळता येणार नाही. पण नैसर्गिक मरण टाळता येणं हेही नसे थोडके. सुरुवातीला हे अमरत्व महागडं असेल पण आत्तापर्यंतचा इतिहास पाहिला तर सगळ्या नवीन शोधांच्या किंमती इव्हेंच्युअली स्वस्त होत जाऊन सर्वांना परवडण्याजोग्या होतातच. असं झालं तर मग जिवंत राहण्याविषयीच्याच शेकडो समस्या येतील. नवीन जन्म बंद करावे लागतील. स्पेसमधे प्रवास करणं हे हाताच्या बोटावर मोजण्याइतक्यांना शक्य झालं होतं. आता स्पेस टुरिझम फार दूर नाही. सध्या महाग आहे पण वीसतीस वर्षांत तेही केसरी टूरतर्फे जावं इतकं सहज होईल. एड्सवर औषध अजून नाही. प्रसार झपाट्याने होतोय. तापमान वाढतंय, बर्फ वितळ्तंय. इन्फ्लेशन म्हणजे नेमकं काय? ते वाढतंय.. झिंबाब्वेसारख्या देशांत किमान लाखालाखांच्या नोटा छापाव्या लागताहेत. महागाई किती वाढेल? मुंबईत तीन वर्षांपूर्वी दहा लाखात मिळणारा फ्लॅट आज चाळीस लाखाचा झालाय आणि मुंबईच्या थोडं बाहेर दहा वर्षांपूर्वी चाळीस लाखात मिळणारा जमिनीचा प्लॉट वीस कोटीचा झालाय. किंमती अनंतापर्यंत वाढत जातील? घराची किंमत तीनशे कोटी आणि पगार एक कोटी अशी स्थिती खरंच येईल? आणखी काय काय होईल जगात? ...................................... हे सर्व वेडंवाकडं मिश्रण वर छापण्याचं कारण हे, की मला येणार्‍या शंभरेक वर्षांबाबत तुमच्या कल्पना जाणून घ्यायच्या आहेत. तुमच्या मते: कोणते शोध प्रत्यक्षात येतील? तंत्र किती पुढे जाऊ शकेल? की त्याला लोक विटतील? कोणत्या इव्हेंट्स / घटनांमुळे जगात जबरदस्त बदल होतील? आपली / आपल्या पुढच्या पिढीची लाईफस्टाईल कशी असेल? आर्थिक बाबतीत काय स्थिती असेल? माणसं सहज शंभरी गाठतील का? आणखीही अनंत मतं आणि विचार (आपापल्या वर्किंग फिल्डशी संबंधित किंवा जनरलही) आपल्या मनात येत असतील, किंवा आता येतील.. ते इथे मांडून आपली काही फोरसाईट दिलीत तर खूप आनंद होईल. आजच्या दिवसात जगावं, उद्याचा विचार करु नये अशी एक फिलॉसॉफी आहे, तिचा आदर करुन इथेच त्याची पोच देतो. कारण अशा स्वरुपाच्या प्रतिसादाने विचार पुढे जाणार नाही, म्हणून केवळ ते न म्हणण्याची विनंती करतो. मी स्वतःपासून सुरुवात करतो: काय होऊ शकेल याच्या कल्पना: -बँका फक्त मीडिएटर राहतील आणि कर्ज देऊ इच्छिणारा ग्राहक कर्ज घेऊ इच्छिणार्‍याला बँक या एजंटमार्फत थेट कर्ज देईल. -लग्न ही संकल्पना कालबाह्य -भारतीयांना अमेरिका / युरोप यांचे दरवाजे पुन्हा सताड खुले. -अवकाशप्रवासाची सहज उपलब्धता -कॅन्सरवर मूलगामी उपाय -मानवी मेंदूची मेमरी अन्य डिव्हाईसमधे ट्रान्सफर करुन घेणे शक्य. ................. ............. नेक्स्ट इज व्हॉट??
  • Log in or register to post comments
  • 35570 views

प्रतिक्रिया

Submitted by अनन्न्या on Fri, 03/15/2013 - 12:48

Permalink

ते शिल्कीतले मिल्क पिऊन काय तरी नवीन अचाट, अफाट...

असे घड्वेल नवीन पिढी!! बाकी त्याची कल्पना करणे हे इंस्टंट वाल्याना जमेल. कल्पना विस्ताराला शुन्य मार्क!!!
  • Log in or register to post comments

Submitted by कवितानागेश on Fri, 03/15/2013 - 12:56

In reply to ते शिल्कीतले मिल्क पिऊन काय तरी नवीन अचाट, अफाट... by अनन्न्या

Permalink

+१

प्रत्येक गोष्टीतली 'कृत्रिमता' वाढलेली दिसतच आहे. तीच अजून वाढेल. प्रेमाची भूक भागवणार्‍या गोळ्या आणि इन्जेक्शन्स मिळतील. सर्व लोक सुखी होतील! ;)
  • Log in or register to post comments

Submitted by यसवायजी on Fri, 03/15/2013 - 19:41

Permalink

फुटुरे (future)..

Image removed. 1 more- Image removed. 3. Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by ज्ञानव on Fri, 01/10/2014 - 09:51

In reply to फुटुरे (future).. by यसवायजी

Permalink

Eve will say....

Adu Dear It takes 9 months to download a baby its better to get it printed.....
  • Log in or register to post comments

Submitted by विटेकर on Fri, 01/10/2014 - 09:55

Permalink

ह्म्म...

भोग-वादाचा आणि चंगळ-वादाचा अतिरेक झाल्याने लोक सार्वकालिक आणि चिरंतन सुखाचा मार्ग शोधण्यासाठी मोठ्या आशेने भारतीय संस्कृतीकडे पाहतील. भारतीय संस्कृती विश्वविजयी होईल. ही माय थोर होईल, वैभवे दिव्य शोभेल जगतास शांती देईल तो सोन्याचा दिन येवो.. ( हा माझा भाबडा आशावाद नाही .. तर खात्री आहे , ते पहायला मी नक्की असेन ,.. कदाचित वेगळ्या जन्मात ! ) बाकी हिंदू मान्यतेनुसार प्रलय तर होणारच आहे आणि पुन्हा नव्याने सृजन होणार आहेच, त्यावर विश्वास ठेऊन आपला "विवेक-प्रलय" करुन घ्यावा आणि सुखी रहावे....! उत्पत्ति स्थिति संव्हार| याचा निरोपिला वेव्हार |परमात्मा निर्गुण निराकार| जैसा तैसा ||१|| ये तो होनेवालाच है !
  • Log in or register to post comments

Submitted by अनिरुद्ध प on Fri, 01/10/2014 - 12:40

In reply to ह्म्म... by विटेकर

Permalink

+१

+१ सहमत
  • Log in or register to post comments

Submitted by प्यारे१ on Fri, 01/10/2014 - 14:47

In reply to ह्म्म... by विटेकर

Permalink

>>> आपला "विवेक-प्रलय" करुन

>>> आपला "विवेक-प्रलय" करुन घ्यावा आणि सुखी रहावे....! एवढंच खरं. :)
  • Log in or register to post comments

Submitted by राजेश घासकडवी on Wed, 06/04/2014 - 07:41

Permalink

लेख वर आल्यामुळे लेख आणि

लेख वर आल्यामुळे लेख आणि प्रतिक्रिया पुन्हा वाचल्या. काही तांत्रिक प्रगती सोडल्यास मानवजातीबद्दलची इतकी भीषण भाकितं वाचून थोडं सुन्न झाल्यासारखं झालं. लोकहो, तुमच्या डोळ्यासमोर गेल्या पंचवीस - तीस - चाळीस वर्षांत अभूतपूर्व प्रगती झालेली आहे! आणि इतकं असूनही तुम्हाला भविष्य इतकं अंधकारमय वाटतं? का? पुढच्या शंभर वर्षांचा विचार करताना शंभर वर्षांपूर्वी जगाची काय हालत होती हे तपासून पाहणं इष्ट ठरेल. - जगातली ८०% हून अधिक लोकसंख्या पारतंत्र्यात होती. वसाहतवाद बोकाळला होता. मूठभर युरोपियन/अमेरिकन जनता सुखी राहण्यासाठी जलियावाला बाग हत्याकांडं होत होती. - रोगराई प्रचंड माजलेली होती. १९१८ साली इन्फ्लुएंझाच्या साथीने पाच ते दहा कोटी माणसं मेली. पोलियो, कुष्ठरोग, देवी तर होतेच. गेल्या शंभर वर्षांत या रोगांचं उच्चाटन झालेलं आहे. - दुष्काळ आणि अन्नाचा तुटवडा यामुळे कोट्यवधी माणसं मरत. शंभर वर्षांपूर्वीच का, १९४३ साली बंगालच्या दुष्काळातच सुमारे पंधरा ते चाळीस लाख लोकं मेली. आता आपण पाच हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्यांनी हादरतो (हादरायलाच हवं - पण कुठे चाळीस लाख आणि कुठे पाच हजार!) - सुमारे पंच्याण्णव टक्के जनता निरक्षर होती. आता ८५% साक्षर आहेत. - जन्माला आलेल्या पोराचं अपेक्षित आयुर्मान ३५ वर्षं होतं. आता ७० च्या आसपास आहे. प्रत्येक आईबापांना सात पोरं व्हायची आणि त्यातलं किमान एक पण बऱ्याच वेळा दोन मरायची. आता दोन पोरं होतात आणि मोजक्या आईबापांना मूल दगावल्याचा अनुभव येेतो. गेल्या शंभर वर्षांत ज्या मानवी जीवनात सुधारणा झालेल्या आहेत त्याच पुढे चालू राहतील. कारण आता मनुष्याच्या जिवाची किंमत वाढलेली आहे. युद्धपिपासा कमी झालेली आहे. अन्नधान्य सुरक्षितता वाढलेली आहे. तेव्हा माझी भाकितं खालीलप्रमाणे २११४ साली - निरक्षरतेचं उच्चाटन झालेलं असेल. किंबहुना ग्रॅज्युएट होणारांचं प्रमाण ९० टक्क्यांच्या जवळ असेल. - आत्ता जे अविकसित देश आहेत ते सिंगापूरसारख्या प्रगत देश आत्ता आहेत त्या स्थितीत असतील. (सुबत्ता, आरोग्य, आणि सुशिक्षितता यांनुसार) - जगाची लोकसंख्या २०५० च्या आसपास ८ ते ९ बिलियनपर्यंत वाढून घसरत शतकाअखेरीस सुमारे ६ ते ७ बिलियनला स्थिरावेल. - अपेक्षित आयुर्मान वाढून ते ९० च्या आसपास जाईल. ७५ वर्षांपर्यंत सुधृढ राहणारांचं प्रमाण वाढेल. - तेलावर असलेलं अवलंबित्व संपून सौर ऊर्जैवर ट्रांझिशन झालेलं असेल. हे पुढच्या तीसेक वर्षांतच मोठ्या प्रमाणात होईल अशी आशा आहे. - स्त्रीपुरुष समानता हा प्रश्न जवळपास शिल्लक राहणार नाही. स्त्रीभ्रूणहत्या थांबलेल्या असतील. - लोकं चंद्रावर, मंगळावर वसाहती वगैरे बिलकुल करणार नाहीत. परग्रहांवरचं अस्तित्व हे केवळ तिथे मिळणाऱ्या संसाधनांसाठी असलं तर असेल. याबाबतही मला प्रचंड शंका आहे. - जगातली ९९ टक्केहून अधिक लोकं पक्क्या बांधलेल्या घरात राहत असतील, व त्या सर्वांना घरात पाणी, वीज, आणि शौचालयाची सोय असेल. - युद्धांमध्ये होणारे मृत्यू, दहशतवादापायी होणारे मृत्यू, खुनांमुळे होणारे मृत्यू हे आजच्या प्रमाणात सुमारे शंभर पटीने कमी झालेले असतील. असो. अजूनही बरंच काही लिहिता येईल, पण इथे थांबतो. इतका दुर्दम्य आशावाद लोकांना पचनी पडत नाही - त्याचा पाया कितीही निरीक्षणांत रोवलेला असला तरीही. त्यामुळे एक शेवटचं भाकित करतो. - इतकं चांगलं झालेलं असूनही 'परिस्थिती कशी बिघडत चालली आहे' वगैरे पिरपीर करणारे लोकं तेव्हाही असतीलच.
  • Log in or register to post comments

Submitted by ब़जरबट्टू on Wed, 06/04/2014 - 13:02

In reply to लेख वर आल्यामुळे लेख आणि by राजेश घासकडवी

Permalink

अगदी...

- इतकं चांगलं झालेलं असूनही 'परिस्थिती कशी बिघडत चालली आहे' वगैरे पिरपीर करणारे लोकं तेव्हाही असतीलच. :)) .. हे आक्शी बरोब्बर बघा.. अजुन एक.... "विग" नावाचा आय. डी.. "पाव-मिसळ" वर २००० साली जग कसे होते, यावर एक हजारी धागा काढेल... :))
  • Log in or register to post comments

Submitted by पिंपातला उंदीर on Wed, 06/04/2014 - 15:13

In reply to लेख वर आल्यामुळे लेख आणि by राजेश घासकडवी

Permalink

+११११११११११११११११११११११११११११

+१११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११. सह्मत
  • Log in or register to post comments

Submitted by अर्धवटराव on गुरुवार, 06/05/2014 - 02:39

In reply to लेख वर आल्यामुळे लेख आणि by राजेश घासकडवी

Permalink

डजण्ट साउण्ड रिएलिस्टीक !!

- निरक्षरतेचं उच्चाटन झालेलं असेल. किंबहुना ग्रॅज्युएट होणारांचं प्रमाण ९० टक्क्यांच्या जवळ असेल. >> कदाचीत हेच बेरोजगारीचं कारण देखील असेल. - आत्ता जे अविकसित देश आहेत ते सिंगापूरसारख्या प्रगत देश आत्ता आहेत त्या स्थितीत असतील. (सुबत्ता, आरोग्य, आणि सुशिक्षितता यांनुसार) >> त्याकरता आज जे विकसीत देश आहेत त्यांना सुपर विकसीत व्हावं लागेल. विकसीत-विकसनशील-अविकसीत यामधल्या गॅपच्या संतुलनावर विश्वशांतीचा डोलारा उभा आहे. अन्यथा रिसोर्सेस आणि स्वामित्वाच्या भावनेचा असह्य ताण जगाच्या मुळावर उठेल (त्याची सुरुवात झाली आहे) - जगाची लोकसंख्या २०५० च्या आसपास ८ ते ९ बिलियनपर्यंत वाढून घसरत शतकाअखेरीस सुमारे ६ ते ७ बिलियनला स्थिरावेल. >> पण हे ट्रांझीशन ज्या गतीने होतेय त्यागतीने सामाजीक आणि मानवी व्यवहारात सुधारणा होण्याचे चान्सेस किती? - अपेक्षित आयुर्मान वाढून ते ९० च्या आसपास जाईल. ७५ वर्षांपर्यंत सुधृढ राहणारांचं प्रमाण वाढेल. >> सहमत. - तेलावर असलेलं अवलंबित्व संपून सौर ऊर्जैवर ट्रांझिशन झालेलं असेल. हे पुढच्या तीसेक वर्षांतच मोठ्या प्रमाणात होईल अशी आशा आहे. >> सहमत. केवळ सौर ऊर्जाच नव्हे तर पुनर्प्रक्रियेच्या उद्योगात देखील अतिप्रचंड बदल(सुधारणा) होतील. त्यातुन ऊर्जेचे अन्य पर्याय विकसीत होतील. - स्त्रीपुरुष समानता हा प्रश्न जवळपास शिल्लक राहणार नाही. स्त्रीभ्रूणहत्या थांबलेल्या असतील. >> सहमत. इन एडीशन टु दॅट सद्यः काळात स्त्रीया भोगत असलेली दु:ख पुरुषांच्या वाट्याला देखील येतील... खास करुन बलात्कार, वेश्या व्यवसाय वगैरे. पण स्त्रीस्वातंत्र्याला फार चांगले दिवस येतील हे नक्की. - लोकं चंद्रावर, मंगळावर वसाहती वगैरे बिलकुल करणार नाहीत. परग्रहांवरचं अस्तित्व हे केवळ तिथे मिळणाऱ्या संसाधनांसाठी असलं तर असेल. याबाबतही मला प्रचंड शंका आहे. >> मनुष्य जात पृथ्वीवर टिकुन राहिली तर पुढील दोन शतकात परग्रहांवर वस्ती नक्की होईल. - जगातली ९९ टक्केहून अधिक लोकं पक्क्या बांधलेल्या घरात राहत असतील, व त्या सर्वांना घरात पाणी, वीज, आणि शौचालयाची सोय असेल. >> सहमत. पण तोवर या सर्व सोयी बेसीक गरजांच्या यादीतुन हद्दपार झालेल्या असतील. - युद्धांमध्ये होणारे मृत्यू, दहशतवादापायी होणारे मृत्यू, खुनांमुळे होणारे मृत्यू हे आजच्या प्रमाणात सुमारे शंभर पटीने कमी झालेले असतील. >> किमान दोनशे पटीने वाढलेले असतील. पण त्यातले बरेचसे मृत्यु आनंददायी असतील व त्यामुळे त्याला गुन्हा समजल्या जाणार नाहि. --असो. अजूनही बरंच काही लिहिता येईल, पण इथे थांबतो. इतका दुर्दम्य आशावाद लोकांना पचनी पडत नाही - त्याचा पाया कितीही निरीक्षणांत रोवलेला असला तरीही. त्यामुळे एक शेवटचं भाकित करतो. - इतकं चांगलं झालेलं असूनही 'परिस्थिती कशी बिघडत चालली आहे' वगैरे पिरपीर करणारे लोकं तेव्हाही असतीलच. >> त्याकाळच्या समस्या आजच्यापेक्षा बर्‍याच वेगळ्या असतील. व त्यापुढे हतबल असणारे लोकं पिरपीर करण्यापलिकडे काय करु शकतील?
  • Log in or register to post comments

Submitted by राजेश घासकडवी on गुरुवार, 06/05/2014 - 08:50

In reply to डजण्ट साउण्ड रिएलिस्टीक !! by अर्धवटराव

Permalink

तुम्ही बरीच भाकितं स्वीकारली,

तुम्ही बरीच भाकितं स्वीकारली, पण काहींबद्दल असहमती दर्शवलीत. म्हणून त्यातल्या
विकसीत-विकसनशील-अविकसीत यामधल्या गॅपच्या संतुलनावर विश्वशांतीचा डोलारा उभा आहे.
गेल्या पन्नास-साठ वर्षांत ही गॅप कमी कमी होत चाललेली आहे. पैसा, आयुर्मान, शिक्षण - सर्वच बाबतीत जगातल्या आहेरे आणि नाहीरे मधलं अंतर कमी होत चाललेलं आहे. आणि घटकाभर धरून चालू की विषमताही वाढेल. पण त्यावेळचे सर्वात गरीब लोक आत्ताच्या सिंगापूरींसारखे राहत असतील ही आनंदाची गोष्ट नाही का?
पण हे ट्रांझीशन ज्या गतीने होतेय त्यागतीने सामाजीक आणि मानवी व्यवहारात सुधारणा होण्याचे चान्सेस किती?
खरंतर लोकसंख्यावाढीचा वेग आता जगभर फारच मंदावला आहे. सत्तरीच्या दशकात जगाची लोकसंख्या काही दशकांत दुप्पट होत होती, त्यामुळे माल्थुशियन क्रायसिसची भीती जगभर होती. आता जगाची लोकसंख्या पुढच्या पस्तीस चाळीस वर्षांत हळुवारपणे पंचवीस टक्के वाढेल. आणि त्यानंतर हळूहळू थोडी कमी होऊन आत्ताच्याच पातळीला येईल.
किमान दोनशे पटीने वाढलेले असतील. पण त्यातले बरेचसे मृत्यु आनंददायी असतील व त्यामुळे त्याला गुन्हा समजल्या जाणार नाहि.
हे खरोखरच समजलं नाही. गेल्या सत्तरेक वर्षांचा इतिहास बघितला तर सर्वच प्रकारची युद्धं - आणि त्यात होणारे मृत्यू कमी होत चाललेले आहेत. हे शतक कदाचित मानवी इतिहासातलं सर्वात शांततामय शतक होईल अशी मला तरी आशा वाटते. Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by अर्धवटराव on गुरुवार, 06/05/2014 - 09:20

In reply to तुम्ही बरीच भाकितं स्वीकारली, by राजेश घासकडवी

Permalink

एक प्रयत्न !

सध्याचे गरीब लोक, आताच्या सिंगापूरसारखी तर फार लांब राहिलं, सोमालीयासारखी राहिली तरी पुरे अशी परिस्थिती येणार आहे पुढे. आजचं अन्न, वैद्यक, इंधन, वाहातुक, शिक्षण, तंत्रज्ञान...हे इतक्या झपाट्याने ऑब्सोल्युट होइल कि त्यावर विचार आणि श्रम करायला कोणि धजावणारच नाहि व ज्यांना त्याची गरज असेल असे लोक हे सर्व प्राप्त करण्याच्या क्षमतेचेच नसतील. लोकसंख्या वाढीचा वेग जरी स्टेबल झाला तरी जगात पुरेशी गर्दी झालेली असणार. लोकल ट्रेनचा डबा ६० पॅसेंजर वाहुन नेऊ शकतो. त्यात सरसरी ९० लोक चढलेले असणार. डब्याचा आकार, बाथरूम-पंखे आदि सुवीधा, इंजीनाची वाहक क्षमता मात्र सुधरणार नाहि. परिणामी गाडी बसेल एक दिवस. राहिला मुद्दा शांततामय शतकाचा... बंदुकीच्या फक्त फैरी झडतानाचा आवाज म्हणजे युद्ध नाहि व बंदुक लोड करण्याचा काळ म्हणजे खरी शांतता नाहि. सध्या जग अस्त्रं-शस्त्र पारजुन घेण्यात गुंतलय. त्यांचा वापर अटळ आहे. इक्वेशन अगदी सोपं आहे. शक्ती प्रचंड वाढतेय...अगदी भयावह वेगाने... पण शक्तीचं विकेंद्रीकरण, डिस्ट्रिब्युशन, आणि शक्ती वापराचा विवेक त्याच प्रमाणात डेव्हलप होतोय का? मला तरी रियलिस्टीक उत्तर 'नाहि' असं वाटतय... अर्थात, माझि गृहीतकं चुकीची ठरली तर सर्वात जास्त आनंद मलाच होइल.
  • Log in or register to post comments

Submitted by नगरीनिरंजन on Fri, 06/06/2014 - 16:43

In reply to तुम्ही बरीच भाकितं स्वीकारली, by राजेश घासकडवी

Permalink

लोकसंख्येचा आकडा महत्त्वाचा

लोकसंख्येचा आकडा महत्त्वाचा नाहीय. अमेरिकेत जगातले ५% लोक राहतात आणि ते जगातले २५% रिसोर्सेस वापरतात. त्या दृष्टीने अमेरिकेची लोकसंख्या १.५ अब्ज आहे. सगळं जग अमेरिकन्स किंवा सिंगापुरी लोकांसारखं राहायला लागेल हे दिवास्वप्नही म्हणता येणार नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by असंका on गुरुवार, 06/05/2014 - 11:08

In reply to लेख वर आल्यामुळे लेख आणि by राजेश घासकडवी

Permalink

सुरेख भविष्यवाणी...

सुरेख भविष्यवाणी... "परीस्थिती बिघडत चालली असल्याची पिरपिर" म्हणजे कहर झाला! पण एकंदरीत बघितलं तर अशा कुरकुर करणार्‍या़ंकडे दूर्लक्ष न केल्यामुळेच मनुष्याला कुठल्या दिशेला जायचं ते कळतं, असं वाटत नाही का? आहे ती परीस्थिती उत्तम आहे असं म्हणणारे काय प्रगती करणार?
  • Log in or register to post comments

Submitted by बाळ सप्रे on गुरुवार, 06/05/2014 - 11:16

In reply to सुरेख भविष्यवाणी... by असंका

Permalink

पण एकंदरीत बघितलं तर अशा

पण एकंदरीत बघितलं तर अशा कुरकुर करणार्‍या़ंकडे दूर्लक्ष न केल्यामुळेच मनुष्याला कुठल्या दिशेला जायचं ते कळतं, असं वाटत नाही का? आहे ती परीस्थिती उत्तम आहे असं म्हणणारे काय प्रगती करणार?
असलेल्या परिस्थितीत समाधान न मानणारेच प्रगती करतात हे खरं पण ही कुरकुर वेगळी, याच्यामुळे प्रगतीला हातभार नाही लागत. हे म्हणजे काही झालं की जायचं डॉक्टरकडे पण म्हणायच आजकालच्या औषधामुळे आरोग्य बिघडतं पूर्वीची लोकं कशी आरोग्यवान असायची!!
  • Log in or register to post comments

Submitted by असंका on गुरुवार, 06/05/2014 - 12:00

In reply to पण एकंदरीत बघितलं तर अशा by बाळ सप्रे

Permalink

पूर्वीची लोकं कशी आरोग्यवान

पूर्वीची लोकं कशी आरोग्यवान असायची!!
म्हणजे पूर्वीची लोकं आपल्यापेक्षा आरोग्यवान नव्हती असं म्हणायचंय की काय आपल्याला!!!!! How blasphemous!! :-)) (ह. घ्या.) कुरकुर वाईटच हो...पण मला म्हणायचंय की पुढे जाणारा समाज सगळ्यांना घेऊन पुढे जातो. त्यांच्या कुरकुरीलाही उत्तर देण्याचा/शोधण्याचा प्रयत्न करतो. तिकडे दुर्लक्ष करत नाही. त्यातूनही कधी कधी दिशा सापडते.
  • Log in or register to post comments

Submitted by बबन ताम्बे on Wed, 06/04/2014 - 19:11

Permalink

पुढच्या १०० नाही पण ३० वर्षांनी (सन २०४५) भारतात काय असेल ....

पुढच्या १०० नाही पण ३० वर्षांनी (सन २०४५) भारतात काय असेल याचे कल्पनाचित्र मी खालील लेखात लिहीले होते. मित्रास पत्र (सन 2045- एक झलक) स्व.गोपिनाथ मुंडेजींचा त्या लेखात उल्लेख आहे. त्यांना भावपुर्ण श्रद्धांजली.
  • Log in or register to post comments

Submitted by कॅप्टन जॅक स्पॅरो on गुरुवार, 06/05/2014 - 07:44

Permalink

१. ५० किंवा १०० वर्षात गुगल

१. ५० किंवा १०० वर्षात गुगल जगाला टेकओव्हर करेल. २. थ्री डी प्रिंटर मधुन माणसाचे अवयव डी.एन.ए. सकट प्रिंट करता येतील. माणसाच्या मेंदुचा बॅकअप घेता येईल. डी.एन.ए. मधल्या तुटलेल्या साखळ्या जोडुन माणसं सुपर-ह्युमन स्टेज ला पोचतील. कोणीही अंध-अपंग असणार नाही. ३. अ‍ॅनिमस सारखी सिस्टीम खरचं अस्तित्वात येऊन आपल्या सर्व पुर्वजांच्या आठवणी आपल्याला पाहाता येतील किंवा त्यात प्रत्यक्ष सहभागही घेता येईल. (असासिन्स क्रिड गेम खेळणार्‍यांना नक्की समजेल काय प्रकार आहे हा ते. बाकीच्यांनी गुगलवा) ४. टाईम मशिन चा किमानपक्षी टेलिपोर्टेशनचा शोध लागेल. पुण्यात सहज फिरता यावं म्हणुन टेलिपोर्टेशन मशिन अंडरग्राऊंड बसवावीत का ओव्हर्हेड ह्यात २५ वर्षं खर्ची पडतील. शिवाय ह्यामधे 'माल'माडी, 'मुत'वार, 'मनी'मोळी, 'खा'व्हाण,'खा'.राजा, 'खाऊ'प्रसाद ई. मंडळी 'खा'टाळे करतील. आय.आर.बी. वाले "पैस"कर टेलिपोर्टेशनवर सुद्धा टोलवाटोलवी करतील. आम्ही पुणेकर मात्र लक्ष्मी रोडवर 'हॉवर' बाईक कुठे तरंगवायची तो विचार करत बसु. ५. शेतकरी राजा एकत्रं येईल आणि कॉर्पोरेट पद्धतीनी शेती करेल. अंबानी, टाटांच्या यादीमधे शेतकर्‍यांच्या कॉर्पोरेट फुड ऑर्गनायझेशन्स सुद्धा दिसतील. (खरचं घडु दे असं). शेतकर्‍यांच्या घामाचा-रक्ताचा पैसा खाणारे "भडवे" उपाशी मरतील. ६. मिसळपाव साठीची स्पेशल चिप मेंदुमधे एमबेड करुन घेता येईल. मिसळपाव चा विचार आला आणि उघडायची कमांड दिली की लेटेस्ट ट्रेंड्स, लिखाण आदी ग्लासेस वर दिसु लागेल. :)...जय हो टेक-सॅव्ही मिसळपाव की.
  • Log in or register to post comments

Submitted by तिमा on गुरुवार, 06/05/2014 - 12:29

Permalink

सूक्ष्मात

ते बाकीचे शोध वगैरे जाऊ दे! आम्हाला विनोबा भावे जसे सूक्ष्मात जायचे तसे जाण्याची इच्छा आहे. म्हणजे तसा शोध लागला, तर आम्ही सूक्ष्मात जाऊन बाकीच्या जगाची मजा बघू, असे म्हणतो आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by म्हैस on गुरुवार, 06/05/2014 - 15:18

Permalink

@मदनबाण

@मदनबाण प्रत्येक मुद्द्याशी सहमत आहे १. निंदा, नालस्ती, टवाळी , चिमटे, गुद्दे , सूड, खून, बलात्कार ,पाशवीपणा ह्या गोष्टी बहुदा खूपच वाढतील असा वाटतंय. लोक सुसंस्कारित राहणार नाहीत. २. सगळ्यात मोठा परिणाम तापमान आणि पर्यावरणामुळे होईल असा वाटतंय . तसाच accidents चा प्रमाण बरंच वाढून सामूहिकरीत्या माणसं मरण्याच प्रमाण वाढेल असं वाटतंय . ३. display आणि automobile मध्ये नवीन शोध लागतील. nanotechnology चा वापर वाढेल . पण medical field मध्ये नवीन शोध लागणार नाहीत असं वाटतंय. माणसं वयाची ३० तरी गाठतील कि नाही अशी शंका आहे . :-( ४. धर्मसंस्था अस्तित्वात रहाणार नाही. जगबुडी होऊन भयानक मानवसंहार झाल्यानंतर (तरी) माणसाचा देवाच्या अस्तित्वावर पुनर्विचार होईल. ५. लग्नसंस्था अस्तित्वात रहाणार नाही. माणसं प्रजननासाठी लैंगिक संबंध ठेवणार नाहीत. क्लोन्स आणि टेस्ट्ट्यूब बेबीजच होतील.
  • Log in or register to post comments

Submitted by मंदार कात्रे on Fri, 06/06/2014 - 23:58

Permalink

सहमत

भारत, ब्राझील वगैरे देशांकडून हे युरोपियन मदत मागतील.. कोणी म्हणतात की त्याबदल्यात आपण त्यांना अटी घालू आणि आपल्या लोकांना तिथे पाठवू..>> असे झाले तर फार छान ! -लग्न ही संकल्पना कालबाह्य / कुटुंब व्यवस्था नामशेष ! -भारतीयांना अमेरिका / युरोप यांचे दरवाजे पुन्हा सताड खुले. -अवकाशप्रवासाची सहज उपलब्धता -एड्स / कॅन्सरवर मूलगामी उपाय -मानवी मेंदूची मेमरी अन्य डिव्हाईसमधे ट्रान्सफर करुन घेणे शक्य.>> हे शक्य आहे!
  • Log in or register to post comments

Submitted by मंदार कात्रे on Sat, 06/07/2014 - 00:02

Permalink

सन्दर्भ- माझी (अपूर्ण) लघु-कादम्बरी

अद्भुत भाग ३ प्रेषक, मंदार कात्रे, Sun, 10/03/2013 - 08:35 8 आज आपण एक नवीन तंत्र अभ्यासणार आहोत. त्याला Future Progression असे म्हणतात.अमेरीकेतील काही तज्ज्ञ संशोधक आणि Hypnotists यांनी हे तंत्र शोधून काढले आहे. दुसर्याा दिवशी पहाटे तीन वाजता पुन्हा गुरुजींनी त्याला उठवले. ध्यानाच्या गुंफेत गेल्यावर परत कालप्रमाणेच सम्मोहन सुरू झाले. ...... मी 1 ते 10 अंक म्हणतो.... आता तू भविष्यात जाणार आहेस. हे 2236 साल आहे.तुझ्या आसपास जे घडत आहे ते मला सांग पाहू....................... तुझे नाव काय? बार्बरा पुखरेस्ट तुझे वय काय? 134 वर्षे मी न्यू टेक्सास अंडरवॉटर सिटीमध्ये असते. तुझ्या नावावरून तू एक स्त्री आहेस हे मी ओळखले. तुला मी बार्बरा म्हणून हाक मारू का? हो चालेल ना. तुझे वय इतके जास्त कसे? आणि तुम्ही पाण्याखाली कासेकाय राहता? इ.स.2120 साली लागलेल्या काही आश्चर्यकारक वैज्ञानिक शोधांमुळे मानवाचे आयुर्मान वाढले होते . सध्या मानवाचे सरासरी आयुर्मान 200 वर्षे आहे. कॅन्सर आणि एड्स सारख्या रोगांवर आता गोळ्यांचा तीन महिन्यांचा एक कोर्स पुरा केल्यास कॅन्सर आणि एड्स सुद्धा बरे होतात. मृत्युचे प्रमाण कमी झाल्याने आणि वयोमान वाढल्याने पृथ्वीवर लोकसंख्या बेसुमार वाढली . आणि त्यामुळे सर्वांना राहायला,पोसायला जमीन कमी पडू लागली. त्यामुळेच अंडरवॉटर आणि अंडरग्राऊंड सिटीज बनवल्या गेल्या. ................ तुझ्याबरोबर आणखी कोण आहे?/ अॅन आहे तो कोण आहे? अर्धमानव म्हणजे? म्हणजे मानवी शरीराशी तंतोतंत जुळणारी तशीच यंत्रणा वापरुन कृत्रिम-रित्या बनवलेला रोबोट .फक्त दर आठवड्यातून एकदा त्याला रीचार्ज करावे लागते... आणि त्या रोबोमध्ये अॅलेक्स नावाच्या एका व्यक्तीचा आत्मा आहे ,जो 2057 साली मृत झाला होता. तो कसा काय? 2187 मध्ये एक नवीन महत्त्वपूर्ण शोध लागला ज्याने मानवी जीवन आणि मृत्यू यांच्या परिभाषाच बदलून टाकल्या . या शोधामुळे ज्या मृत व्यक्तींचे आत्मे astral plane वर suspended animation या अवस्थेत आहेत, त्यांना रोबोटमध्ये implant करण्यात शास्त्रज्ञांना यश मिळाले. अच्छा. म्हणजे हे भुतानी माणसांना झपाटण्या सारखेच दिसतेय... नाही.अगदी तसेच काही नाही. पण पूर्वीच्या काळात दुष्ट आत्मे सामान्य माणसांना झपाटून त्रास द्यायचे ,पण आता तसे होत नाही. Astral plane वर आता कायदा आणि सुव्यवस्था आहे. गुंड आणि समाजविघातक दुष्ट प्रवृत्तीच्या आत्म्याना रोबॉट्स मध्ये प्रवेश नाकारला जातो. अच्छा ,मग या अॅनला म्हणजेच अॅलेक्सला पूर्वीचे काही आठवते का? हो. तो जीवंत असताना 2010 साली त्याने हिमालयात जावून साधना केलेली होती. रोहन देसाई नावच्या मित्राबरोबर त्याने एका तिबेटी मठात बुद्धिस्ट गुरूंकडून दीक्षा घेतली होती. अच्छा ,म्हणजे आता अॅन आणि तुझे संबंध कशा प्रकारचे आहेत? अॅन एक पुरुष रोबोट आहे आणि मी एक जीवंत स्त्री. पण तरीही आम्ही जोडीदाराप्रमाणेच राहतो. म्हणजे नवरा-बायको? हो. आणि शारीरिक संबंध देखील? त्यात काय विशेष?अॅन अन्य कोणत्याही जीवंत पुरुषा पेक्षा अधिक चांगल्या प्रकारे मला तृप्तिचे सुख देवू शकतो. फक्त त्याच्याकडून अपत्यप्राप्ती होऊ शकत नाही. त्यासाठी आम्हाला कृत्रिम fertility centre ची मदत घ्यावी लागते. असे का? कारण 21 व्या शतकाच्या उत्तरार्धात ढासळलेल्या पर्यावरण संतुलनाचा दुष्परिणाम , अन्नातील विषारी औषधांचा दुष्प्रभाव आणि सेक्सविषयीच्या लोकांच्या अतिविकृत संकल्पना ,तसेच अनियंत्रित सेक्स यामुळे मानवाची जनन-क्षमता कमी झालेली होती. यास्तव मग कृत्रिम-रीतीने स्त्रीबीज आणि पुरुषबीज यांचा संयोग मशिनद्वारे करून प्रयोगशाळेत मानव जन्माला घातले जावू लागले. ही सर्व बालके अतिशय सुनियंत्रित वातावरणात आणि आवश्यक ती सर्व पोषकद्रव्ये देवून ,रोगप्रतिकारक औषधे देवून वाढविली जातात. आणि बाळ एक वर्षाचे झाल्यानंतर आई किंवा बाबांच्या ताब्यात दिले जाते. आई किंवा बाबा? का? कपल्स नाहीत का? बरेच पुरुष व स्त्रिया अर्धमानवा सोबतच राहतात . काही तर पूर्ण यंत्रमानवा सोबतही! त्यामुळे आजकाल शुद्ध मानवी जोडी पाहायला मिळणे मुश्किलच आहे. नाही म्हणायला भारतात काही ठिकाणी अजूनही पूर्ण मानवी कपल्स आहेत. जे देवांची पूजा आणि देवळांची व्यवस्था वगैरे पाहतात ! ...... http://www.misalpav.com/node/24187
  • Log in or register to post comments

Submitted by ससन्दीप on Fri, 06/12/2015 - 00:29

Permalink

रोहित शेट्टी अॅन्ड

रोहित शेट्टी अॅन्ड ग्रेन्डसन्स प्राॅडक्शनचा स्पेस शटलच्या अवकाशात उसळणार्‍या टक्कर असलेला 'गोलमाल १००' नावाचा टूकार चित्रपट येईल.
  • Log in or register to post comments

Submitted by अन्नू on Sat, 06/13/2015 - 19:43

Permalink

हा हा हा!

धागा वाचून सुहास शिंरवळकरांच्या अनुभव पुस्तकातील "योगायोग" या कथेची आठवण झाली. पुढे काय? याचं अगदी तंतोतंत वर्णन त्यांनी त्या कथेत केलं आहे. :)
  • Log in or register to post comments

Submitted by विवेकपटाईत on Sat, 06/13/2015 - 21:11

Permalink

माणसाला भौतिक शरीराची गरज

माणसाला भौतिक शरीराची गरज लागणार नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by एक एकटा एकटाच on Sat, 06/13/2015 - 23:06

Permalink

लोक honeymoon साठी खऱ्या moon

लोक honeymoon साठी खऱ्या moon वरच जातील.
  • Log in or register to post comments

Submitted by नमकिन on Mon, 06/15/2015 - 22:50

Permalink

भविष्यवादी

The Island, oblivion इ. व इतर हॅालिवुडपटात यथार्थ चित्रण आहेच, परंतु अंतिमत: प्रेम ही भावना राहीलच. बाकी प्रदूषण व भेसळ यामुळे "सिडलेस" मानव जमात निर्माण होऊन मानवाचा निसर्ग मार्ग मोडुन निसर्गावर मात केल्याच्या आविर्भावात "वैज्ञानिक शोध" ने उपकृत भावना जोपासली जाईल. पुढे जाऊन मानवी मनातील विचारांवर नियंत्रण इथपर्यंत झेप/मजल जाईल का? हा प्रश्न.
  • Log in or register to post comments

Submitted by एक एकटा एकटाच on Mon, 06/15/2015 - 23:21

Permalink

jokes apart

आत्ताच्या मानवाच्या लोभी आणि हव्यासामुळे काय होउ शकते ह्याचे उत्तम चित्रण WALL-E ह्या अनिमेटेड चित्रपटात फार चांगल दाखवलय. ज्यांनी हां चित्रपट अजुन पाहिला नाहिए त्यांनी तो आवर्जुन पहावा.
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Tue, 06/16/2015 - 12:32

In reply to jokes apart by एक एकटा एकटाच

Permalink

WALL-E ह्या अनिमेटेड

WALL-E ह्या अनिमेटेड चित्रपटात फार चांगल दाखवलय.ज्यांनी हां चित्रपट अजुन पाहिला नाहिए त्यांनी तो आवर्जुन पहावा. या चित्रपटा बद्धल बरंच ऐकल आहे,पहावयास हवा. मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- में गोरी चिट्टी छमिया... ;)
  • Log in or register to post comments

Submitted by गवि on Tue, 06/16/2015 - 12:36

Permalink

४जी चं काय स्टेटस आहे लेटेस्ट

४जी चं काय स्टेटस आहे लेटेस्ट? ..याच्या स्पीडमुळे सिनेमा, टीव्ही अशा बर्‍याच कन्सेप्ट्स बोलतील असं ऐकलं होतं.
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Tue, 06/16/2015 - 12:43

In reply to ४जी चं काय स्टेटस आहे लेटेस्ट by गवि

Permalink

४ जी बद्धल अजुन जास्त वाचलं

४ जी बद्धल अजुन जास्त वाचलं नाहीये... परंतु मागच्या वर्षी फास्ट इंटरनेट टेस्ट घेतली होती त्याचा एक दुवा दिल्याचा आठवतो. तो परत इथे देतो. 'Fastest ever' broadband passes speed test स्मार्ट टिव्ही एक वेगळा बदल घडवेल का ? याचा हल्ली विचार करतोय. सध्या याचा अनुभव घेतोय आणि स्मार्ट टिव्हीवर मिपा वाचन तसेच युटूब पाहताना मजा आली. :) मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- में गोरी चिट्टी छमिया... ;)
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Sat, 06/25/2016 - 23:22

Permalink

IBM is developing a brain

IBM is developing a brain implant that can can detect and predict seizures US Scientists Developing Brain Implants That Can Connect Human Brain to Digital World From The Designers Of Fitbit, A Digital Tattoo Implanted Under Your Skin Forget wearable tech, embeddable implants are already here

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- सोने का पानी चढाके पिया, हुइ गोरी जवानी... रेशमसे मेरे बदन कि पिया, सारी दुनिया दिवानी ! ;) :- Badlapur
  • Log in or register to post comments

Submitted by कैलासवासी सोन्याबापु on Sun, 06/26/2016 - 09:47

Permalink

हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड

हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड ने ब्राह्मोस मिसाईल अन सुखोई 30 एमकेआय एकत्र केलेत , बहुतेक हे जगात पहिल्यांदा झाले आहे !! , तसेही ब्राह्मोस हे जगातले सर्वाधिक घातक क्रूझ मिसाईल समजले जातेच, ह्या एका तांत्रिक प्रगतीमुळे परत एकदा ताकदीचा तराजू भारताच्या बाजूने झुकला आहे, भारतीय वायुसेना अन हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या अभियंते तंत्रज्ञ अन वैज्ञानिकांचे हार्दिक अभिनंदन
  • Log in or register to post comments

Submitted by चंपाबाई on Sun, 06/26/2016 - 12:11

Permalink

१

एच आय व्ही वर औषधे आहेत.
  • Log in or register to post comments

Submitted by गवि on Tue, 01/16/2024 - 17:23

Permalink

https://m.economictimes.com

https://m.economictimes.com/news/international/business/china-introduces-revolutionary-nuclear-battery-that-lasts-50-years-without-charging/articleshow/106880627.cms ५० वर्षे सलग चालणारी बॅटरी आणि तीही नाण्याइतक्या आकाराची. आण्विक बॅटरी इतक्या छोट्या आकारात येणे हा मोठा ब्रेक-थ्रूच आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by टर्मीनेटर on Fri, 01/19/2024 - 13:11

Permalink

धागा आणि प्रतिसाद दोन्ही भारी!

धागा आणि प्रतिसाद दोन्ही भारी 😀
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com