Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by गवि on Tue, 10/18/2011 - 14:11
लहानपणी बाबांना दोन रुपये लिटरने फटफटीच्या टाकीत पेट्रोल भरताना बघितलं. आता सत्तरी गाठली (मी नव्हे, पेट्रोलने.. !!) फोन सगळ्या गावात एकादोघांच्या घरी होते. काळे जड ठोकळ्यासारखे. कटर्र कटर्र आवाज करत डायल करण्याचे. पेजर येऊन "वा.. काय टेक्नॉलॉजी आहे.." म्हणण्याच्या आत जुने झाले. आता मोबाईल सगळ्यांकडे आहे.. वरुन थ्री जी आलं.. टॅब तीनहजारात येऊ घातलाय.. फार पूर्वी पंजाबात अतिरेकी होते. मग काश्मिरात, आता मध्यपूर्वेत.. आणि जगभरात.. फास आवळतो आहे असं फीलिंग सगळीकडे आहे. आर्थिक बाबतीत आता युरोपमधे जबरदस्त क्रायसिस आहे.. आपण यातले अडाणी.. पण ऐकून ऐकून इंटरेस्ट येतोच. कंझ्युम करण्यासाठी त्यांच्याकडे पुरेशी वाढती लोकसंख्या नाही असं काही म्हणतात.. काही म्हणतात की वेल्फेअर पद्धतीने (कमावणार्‍यांनी रिटायरांचा भार उचलायचा) चाललेली त्यांची व्यवस्था आहे. त्यात कमावणारी लोकसंख्या आणि रिटायर्ड लोकसंख्या यांचं प्रमाण उलटं होत चालल्याने समस्या उभी राहात आहे. त्यांना कदाचित लोकसंख्या वाढवायला लागेल. किंवा बाहेरच्या देशांतून नागरिक आणावे लागतील. काहीजण म्हणतात की भारत, ब्राझील वगैरे देशांकडून हे युरोपियन मदत मागतील.. कोणी म्हणतात की त्याबदल्यात आपण त्यांना अटी घालू आणि आपल्या लोकांना तिथे पाठवू.. उडणारी कार ही बालकथांमधे किंवा फँटसी पिक्चरमधे असायची. आता अनेक कोटींची का होईना पण शक्य कोटीतली अशी कार बनली आहे. प्रत्यक्ष रस्त्यावर आली तरी त्यात चॅलेंजेस खूप आहेत, ट्रॅफिक आणि कायद्याचे. पण तरीही ती आता अशक्य गोष्ट राहिली नाही. मरण हे एजिंग प्रोसेसमुळे येतं.. या प्रोसेसवर इतकं संशोधन झालं की आता वय वाढण्याची प्रक्रिया अमर्यादित लांबवणं शक्य होऊ घातलंय. अर्थात मनुष्य अमर होणं हेही आता प्युअर फँटसी म्हणून मानता येणार नाही. या प्रकारे नैसर्गिक मरण टाळता आलं तरी अपघात, इजा, हत्या यांनी येणारं मरण टाळता येणार नाही. पण नैसर्गिक मरण टाळता येणं हेही नसे थोडके. सुरुवातीला हे अमरत्व महागडं असेल पण आत्तापर्यंतचा इतिहास पाहिला तर सगळ्या नवीन शोधांच्या किंमती इव्हेंच्युअली स्वस्त होत जाऊन सर्वांना परवडण्याजोग्या होतातच. असं झालं तर मग जिवंत राहण्याविषयीच्याच शेकडो समस्या येतील. नवीन जन्म बंद करावे लागतील. स्पेसमधे प्रवास करणं हे हाताच्या बोटावर मोजण्याइतक्यांना शक्य झालं होतं. आता स्पेस टुरिझम फार दूर नाही. सध्या महाग आहे पण वीसतीस वर्षांत तेही केसरी टूरतर्फे जावं इतकं सहज होईल. एड्सवर औषध अजून नाही. प्रसार झपाट्याने होतोय. तापमान वाढतंय, बर्फ वितळ्तंय. इन्फ्लेशन म्हणजे नेमकं काय? ते वाढतंय.. झिंबाब्वेसारख्या देशांत किमान लाखालाखांच्या नोटा छापाव्या लागताहेत. महागाई किती वाढेल? मुंबईत तीन वर्षांपूर्वी दहा लाखात मिळणारा फ्लॅट आज चाळीस लाखाचा झालाय आणि मुंबईच्या थोडं बाहेर दहा वर्षांपूर्वी चाळीस लाखात मिळणारा जमिनीचा प्लॉट वीस कोटीचा झालाय. किंमती अनंतापर्यंत वाढत जातील? घराची किंमत तीनशे कोटी आणि पगार एक कोटी अशी स्थिती खरंच येईल? आणखी काय काय होईल जगात? ...................................... हे सर्व वेडंवाकडं मिश्रण वर छापण्याचं कारण हे, की मला येणार्‍या शंभरेक वर्षांबाबत तुमच्या कल्पना जाणून घ्यायच्या आहेत. तुमच्या मते: कोणते शोध प्रत्यक्षात येतील? तंत्र किती पुढे जाऊ शकेल? की त्याला लोक विटतील? कोणत्या इव्हेंट्स / घटनांमुळे जगात जबरदस्त बदल होतील? आपली / आपल्या पुढच्या पिढीची लाईफस्टाईल कशी असेल? आर्थिक बाबतीत काय स्थिती असेल? माणसं सहज शंभरी गाठतील का? आणखीही अनंत मतं आणि विचार (आपापल्या वर्किंग फिल्डशी संबंधित किंवा जनरलही) आपल्या मनात येत असतील, किंवा आता येतील.. ते इथे मांडून आपली काही फोरसाईट दिलीत तर खूप आनंद होईल. आजच्या दिवसात जगावं, उद्याचा विचार करु नये अशी एक फिलॉसॉफी आहे, तिचा आदर करुन इथेच त्याची पोच देतो. कारण अशा स्वरुपाच्या प्रतिसादाने विचार पुढे जाणार नाही, म्हणून केवळ ते न म्हणण्याची विनंती करतो. मी स्वतःपासून सुरुवात करतो: काय होऊ शकेल याच्या कल्पना: -बँका फक्त मीडिएटर राहतील आणि कर्ज देऊ इच्छिणारा ग्राहक कर्ज घेऊ इच्छिणार्‍याला बँक या एजंटमार्फत थेट कर्ज देईल. -लग्न ही संकल्पना कालबाह्य -भारतीयांना अमेरिका / युरोप यांचे दरवाजे पुन्हा सताड खुले. -अवकाशप्रवासाची सहज उपलब्धता -कॅन्सरवर मूलगामी उपाय -मानवी मेंदूची मेमरी अन्य डिव्हाईसमधे ट्रान्सफर करुन घेणे शक्य. ................. ............. नेक्स्ट इज व्हॉट??
  • Log in or register to post comments
  • 35570 views

प्रतिक्रिया

Submitted by वपाडाव on Tue, 10/18/2011 - 14:18

Permalink

सॅमसंग....

:) उत्तम कल्पना
  • Log in or register to post comments

Submitted by माझीही शॅम्पेन on Tue, 10/18/2011 - 14:38

Permalink

१. सूर्यमालेतील सर्व ग्रह

१. सूर्यमालेतील सर्व ग्रह फुल्ल होतील , आंतर-आकाशगंगा प्रवास प्रचंड प्रमाणात वाढेल (आणि महाग पण होईल) २. आणखीन जास्त श्रीमंत लोकांना वस्तुमानपासून - प्रकाश - ते परत मूळ रूपात असा प्रकाशयाच्य वेगानी प्रवास करता येईल ३. क्लोनिन्ग आणि जीन्स बदल करून सुपर-ह्युमन अस्तिवात येईल ४. बायकाना मूल घालण्यपसून ते मासिक धर्म ह्या पासून सुट्टी. ५. सर्वांना सोप्या उपकरणाने उडता येईल कुठलीही वाहने वापरण्याची गरज पडणार नाही ६. स्वयंपाक कालबाह्य सगळ काही कप्सुल किवा इंजेक्षन किवा जन्मचच वेळी आयुष्य भरासाठी डोस पाजन्यात येईल , काहीही खाण हे फक्त व्हरचुअल असेल ७ कमीत कमी दोन तरी जीवन सृष्टी चा शोध लागेल , कदाचित त्याच्या बरोबर युध्य तह वैगरे होऊ शकतील तूर्ताच थांबतो :)
  • Log in or register to post comments

Submitted by कुंदन on Tue, 10/18/2011 - 14:45

Permalink

फार चिंता

फार चिंता करतोस तु. नाव बदलुन चिंतामणी ठेव. ;-)
  • Log in or register to post comments

Submitted by पाषाणभेद on Tue, 10/18/2011 - 14:48

Permalink

तिसरं महायुद्ध होईल व बरीचशी

तिसरं महायुद्ध होईल व बरीचशी पृथ्वी नष्ट होईल. पुन्हा जुन्या पाषाणयुगातले दिवस येतील. - पाषाणभेद - द प्रेडीक्टर
  • Log in or register to post comments

Submitted by मराठी_माणूस on Tue, 10/18/2011 - 14:49

Permalink

मरण हे एजिंग प्रोसेसमुळे

मरण हे एजिंग प्रोसेसमुळे येतं.. या प्रोसेसवर इतकं संशोधन झालं की आता वय वाढण्याची प्रक्रिया अमर्यादित लांबवणं शक्य होऊ घातलंय. अमर्यादित लांबवणं याबद्दल साशंक आहे
  • Log in or register to post comments

Submitted by ज्ञानव on Fri, 01/10/2014 - 09:38

In reply to मरण हे एजिंग प्रोसेसमुळे by मराठी_माणूस

Permalink

अमर्यादित लांबवणं याबद्दल साशंक आहे

बायो प्रिंटींगने ते ही शक्य आहे. आज फुफुस प्रिंट करून शरीरात फिट करण्याबाबत संशोधन चालू आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by मृत्युन्जय on Tue, 10/18/2011 - 14:52

Permalink

श्री श्री गविशंकर काय म्हणजे

श्री श्री गविशंकर काय म्हणजे काय सुसंगती नाय लागली हो. किती चिंता कराल? अवांतर: मला वाटले होते, पहिल्यांदा अवलियांनी (जालीय) आत्महत्या केली मग पंगाशेठ निवर्तले मग काही आयडी हद्दपार झाले आता काळेकाकांनी स्वत:ला स्थानबद्ध करुन घेतले आहे म्हणुन नेक्स्ट व्हॉट असा धागा टाकला की काय ;)
  • Log in or register to post comments

Submitted by गवि on Tue, 10/18/2011 - 15:03

In reply to श्री श्री गविशंकर काय म्हणजे by मृत्युन्जय

Permalink

चिंता? ऑ? चिंता कुठेशी

चिंता? ऑ? चिंता कुठेशी केल्येय? उलट कल्पना लढवतोय .. :)
  • Log in or register to post comments

Submitted by विजुभाऊ on Tue, 10/18/2011 - 14:55

Permalink

इतर ग्रहांवर वसती वगैरे होणार

इतर ग्रहांवर वसती वगैरे होणार नाही. साक्षरते मुळे जन्म दर कमी होईल. बहुधा शंभर वर्षांनन्तर जनन दर शून्यवत असेल. मानवाला हीच चिंता असेल.
  • Log in or register to post comments

Submitted by jaypal on गुरुवार, 10/20/2011 - 21:00

In reply to इतर ग्रहांवर वसती वगैरे होणार by विजुभाऊ

Permalink

विजुभाय

जर तवा मी जिता असन तर एका चुट्की सरशी ह्यो प्रस्न सोडविन. कस्स्स्स ? Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by सिफ़र (verified= न पडताळणी केलेला) on गुरुवार, 06/05/2014 - 17:18

In reply to विजुभाय by jaypal

Permalink

*lol*

*lol* *lol*
  • Log in or register to post comments

Submitted by चिरोटा on Tue, 10/18/2011 - 15:05

Permalink

आणखी

१) पृथ्वीपासून मंगळ,बुध,शुक्र पर्यंत मुंबई-पुणे सारखे एक्स्प्रेस वे. २) सकाळचे काम पृथ्वीवर, दुपारी आणी कुठ्ल्या ग्रहावर.. ३) माणसाचे ईतर प्राण्यांमध्ये मध्ये रुपांतर्, परत बॅक टू माणूस. सध्या ईथेच थांबतो आणि ईतरांना चान्स देतो.
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Tue, 10/18/2011 - 15:14

Permalink

कोणते शोध प्रत्यक्षात

कोणते शोध प्रत्यक्षात येतील? डिस्प्ले रिलेटेड शोध लागतील आणि निरनिराळ्या प्रकारचे डिस्प्ले पहायला मिळतील.( उदा. येउ घातलेले फ्लेक्सीबल डिस्प्ले.) तंत्र किती पुढे जाऊ शकेल? तंत्र बरेच पुढे जाईल ! ( तसेही गारगोटी घासणारा मानव सॅटॅलाईट आकाशात सोडण्याच्या कुशलते पर्यंत पोहचला आहेच म्हणा ! ) वेगवेगळे डिव्हाईस शरीरात बसवुन घ्यायची बहुधा फॅशनच येईल. ;) की त्याला लोक विटतील? ह्म्म... अती तिथे माती ! लोक टेक्नॉलॉजिच्या अती वापराने कंटाळवाणे जीवन जगतील ! आणि शांतता काय आणि कशी मिळवायची याचा अभ्यास / प्रयत्न / जमल्यास पीएचडी सुद्धा याच विषयात करतील. ;) लांब कुठे माणसांची गर्दी नसेल अशा डोंगर टेकड्यांवर राहण्याचा प्रयत्न लोक करतील. कोणत्या इव्हेंट्स / घटनांमुळे जगात जबरदस्त बदल होतील? वातावरण / पर्यावरण तसेच होणारी संभावित युद्ध यांनी जगात जबरस्त बदल होतील. आर्थिक बाबतीत काय स्थिती असेल? कठीण काळ असेल... ज्याच्याकडे पैसा आणि सत्ता असेल तोच श्रेष्ठ ठरेल. माणसं सहज शंभरी गाठतील का? कलियुगाचा विचार करता,त्याचे वर्णन वाचल्यावर ३०शी गाठणे सुद्धा मोठी गोष्ट ठरेल असे वाटते.
  • Log in or register to post comments

Submitted by गवि on Tue, 10/18/2011 - 15:50

In reply to कोणते शोध प्रत्यक्षात by मदनबाण

Permalink

लांब कुठे माणसांची गर्दी नसेल

लांब कुठे माणसांची गर्दी नसेल अशा डोंगर टेकड्यांवर राहण्याचा प्रयत्न लोक करतील. जमीन व्यक्तिगत मालमत्ता म्हणून विकत घेता येणं बंद होईल असं वाटतं का? (लँड सीलिंग अ‍ॅक्टप्रमाणे होल्डिंग लिमिट कमी होत होत शेवटी जमीन सरकारचीच. फक्त वर लीजने घरे बांधता येतील असं काही?)
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Tue, 10/18/2011 - 17:14

In reply to लांब कुठे माणसांची गर्दी नसेल by गवि

Permalink

जमीन व्यक्तिगत मालमत्ता

जमीन व्यक्तिगत मालमत्ता म्हणून विकत घेता येणं बंद होईल असं वाटतं का? (लँड सीलिंग अ‍ॅक्टप्रमाणे होल्डिंग लिमिट कमी होत होत शेवटी जमीन सरकारचीच. फक्त वर लीजने घरे बांधता येतील असं काही?) नाही.लोकांना जिथे माणसांची गर्दी कमी आहे तिथे जायला /रहायला आवडेल (निसर्ग राहिला तर निसर्गाच्या सानिद्यात) असं दर्शवायच आहे मला. थोडक्यात टेक सॅव्हीपणाचा कंटाळा माणसाला येईल आणि अतीशय साधे,"शांत" जिवन जगावे असे त्याला वाटु लागेल. उदा. अती क्रिकेट झाल्यामुळे आता क्रिकेट पहावेसे वाटत नाही,ही भावना मनात का येते ? तसेच काहीसे अती यांत्रिकपणा आयुष्यात आल्याने भविष्यातल्या मानवाला साधेपणे जगावेसे वाटेल, वेगळ्या जागी जिथे इतर माणसांची गर्दी नसेल / कमी असेल असे ठिकाण ते राहण्यासाठी शोधतील.
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Wed, 03/13/2013 - 16:25

In reply to कोणते शोध प्रत्यक्षात by मदनबाण

Permalink

डिस्प्ले रिलेटेड शोध लागतील

डिस्प्ले रिलेटेड शोध लागतील आणि निरनिराळ्या प्रकारचे डिस्प्ले पहायला मिळतील.( उदा. येउ घातलेले फ्लेक्सीबल डिस्प्ले.) २ वर्षा पूर्वी ज्या फ्लेक्सिबल डिस्ल्पे बद्धल मी बोललो होतो,त्याचे या वर्षी CES 2013 मधे दर्शन घडले. :) सॅमसंग कंपनीने हा डिस्प्ले तयार केला आहे.:) Samsung Youm Flexible Display Prototypes तसेच अ‍ॅन्ड्रोइडला स्पर्धा निर्माण झाली आहे ! :) ती सुद्धा फायरफॉक्समुळे ! कारण आता नविन ओएस लॉन्च झाली आहे. Firefox OS (project name: Boot to Gecko also known as B2G) तसेच सॅमसंग त्यांची नविन ओएस Tizen लवकरच बाजारात आणेल अशी शक्यता वाटते.
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Fri, 01/10/2014 - 09:17

In reply to डिस्प्ले रिलेटेड शोध लागतील by मदनबाण

Permalink

तसेच सॅमसंग त्यांची नविन ओएस

तसेच सॅमसंग त्यांची नविन ओएस Tizen लवकरच बाजारात आणेल अशी शक्यता वाटते. ज्या Tizen बद्धल बरीच चर्चा चालु होती ते लवकरच बाजारात येईल अशी अपेक्षा आहे. अँड्रॉईड, आयओएसला आता टक्कर देणार जपानी ‘टायझेन’!
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Tue, 06/03/2014 - 19:44

In reply to तसेच सॅमसंग त्यांची नविन ओएस by मदनबाण

Permalink

ज्या Tizen बद्धल बरीच चर्चा

ज्या Tizen बद्धल बरीच चर्चा चालु होती ते लवकरच बाजारात येईल अशी अपेक्षा आहे. शेवटी सॅमसंग ने त्यांचा Samsung Z हा Tizen { Tizen 2.2.1 } ओएस असलेला फोन लाँच केला. Image removed. Samsung Launches First Tizen Phone And It Is A Beast
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Sun, 06/15/2014 - 16:44

In reply to ज्या Tizen बद्धल बरीच चर्चा by मदनबाण

Permalink

तसेच अ‍ॅन्ड्रोइडला स्पर्धा

तसेच अ‍ॅन्ड्रोइडला स्पर्धा निर्माण झाली आहे ! Smile ती सुद्धा फायरफॉक्समुळे ! कारण आता नविन ओएस लॉन्च झाली आहे. Mozilla to sell '$25' Firefox OS smartphones in India

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- मेरे Dil Ka तुमसे Hai केहना... ;) { Armaan }
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Wed, 05/27/2015 - 11:39

In reply to डिस्प्ले रिलेटेड शोध लागतील by मदनबाण

Permalink

एलजीचा भिंतीवर चिटकवता येणारा

एलजीचा भिंतीवर चिटकवता येणारा सुपर थिन वॉलपेपर टीव्ही!

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Kehdoon Tumhen... :- DJ Aqeel
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on गुरुवार, 06/05/2014 - 09:06

In reply to कोणते शोध प्रत्यक्षात by मदनबाण

Permalink

वातावरण / पर्यावरण तसेच

वातावरण / पर्यावरण तसेच होणारी संभावित युद्ध यांनी जगात जबरस्त बदल होतील. चला प्राणवायु विकत घेउया... संदर्भ :- भारतातही जगण्यासाठी विकत घ्यावा लागेल प्राणवायू
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on गुरुवार, 06/05/2014 - 09:28

In reply to वातावरण / पर्यावरण तसेच by मदनबाण

Permalink

वेगवेगळे डिव्हाईस शरीरात

वेगवेगळे डिव्हाईस शरीरात बसवुन घ्यायची बहुधा फॅशनच येईल. तुमच्या शरिरात कोणती डिजिटल चीप बसवुन हवी आहे ? संदर्भ :- Why I want a microchip implant Would you implant an NFC chip into your hand? Would you have tattoo IMPLANTED under your skin? Artist has chip placed inside his hand that reveals artwork when read by a smartphone
  • Log in or register to post comments

Submitted by गवि on Tue, 10/18/2011 - 15:44

Permalink

साधारण पुढे काय होईल

साधारण पुढे काय होईल म्हटल्यावर जास्त करुन विज्ञानाचा / तांत्रिक भरार्‍यांचा विचार केला जातो. (परग्रह वगैरे) त्याखेरीज इतर फिल्ड्सविषयीही ऐकायला आवडेल. किंवा इतर क्षेत्रातल्या (आर्थिक, कला वगैरे) घडामोडींच्या सोबतीने विज्ञानही असेल असं एकूण दिसतंय. म्हणजे चित्रकार ब्रश ऐवजी काही इलेक्ट्रॉनिक वापरतील किंवा ब्रशने चित्र काढणंच ऑब्सोलीट होईल. बँका व्याज देऊ शकतील का? पैशाचं महत्व काय आणि कशा प्रकारचं होत जाईल? पैशाची किंमत? खूप गोष्टी बदलू शकतात.. फक्त फँटसी अशाच अर्थाने विचारत नाही..
  • Log in or register to post comments

Submitted by पिलीयन रायडर on Tue, 10/18/2011 - 15:52

Permalink

कितीही काहीही झालं...

..तरी माणुस चिकाटीनं जगायच सोड्णार नाही... काही तरी नविन शोधुन काढेलच.... बाकीचे प्राणी नामषेश झाले आपल्यामुळे तरी आपण जगत राहणार... ..सगळं काही बदलेल्..पण "जगण्याची इच्छा" सुटणार नाही...
  • Log in or register to post comments

Submitted by ज्ञानव on Fri, 01/10/2014 - 09:43

In reply to कितीही काहीही झालं... by पिलीयन रायडर

Permalink

हे भौतिक बदल झाले

मानसिक वैचारिक बदल आता तरी होतील का? निंदा, नालस्ती, टवाळी , चिमटे, गुद्दे , सूड, खून, बलात्कार ,पाशवीपणा हे जे प्रगतीचे बाय प्रोडक्ट्स आहेत ते बदलतील का? बाकी "ये जिना भी कोई जिना है लल्लू"
  • Log in or register to post comments

Submitted by गणपा on Tue, 10/18/2011 - 16:14

Permalink

बाकी काय शोध आलो न लागो पण ते

बाकी काय शोध लागो न लागो पण ते 'स्टार ट्रेक' मधल माणुस क्षणात अंतर्धान पावुन, इच्छीत स्थळी ट्रांसफर करणार्‍या ट्रान्स्पोर्टर यंत्राचा शोध कधी लागणार याची फार आतुरतेने वाट पहातोय. :) मी पहिला मोबाईल याच मालिकत पाहिला होता. :) Image removed. चित्र आंजा वरुन साभार.
  • Log in or register to post comments

Submitted by आनंदी गोपाळ on Sun, 06/15/2014 - 23:56

In reply to बाकी काय शोध आलो न लागो पण ते by गणपा

Permalink

ट्रान्स्पोर्टर जाऊ द्या तेल लावत.

हितं मी तुमच्या पाकृचा प्रिंटौट काढला की तो खाता आला पाहिजे असा कैतरी शोध हवा राव.
  • Log in or register to post comments

Submitted by अनुप ढेरे on Mon, 06/16/2014 - 13:56

In reply to ट्रान्स्पोर्टर जाऊ द्या तेल लावत. by आनंदी गोपाळ

Permalink

हे फार दूर आहे असं नाही वाटत.

हे फार दूर आहे असं नाही वाटत. थ्रीडी प्रींटिंग सध्या कायच्या काय गोष्टी करून दाखवत आहे.
  • Log in or register to post comments
Profile picture for user आत्मशून्य

Submitted by आत्मशून्य on Tue, 10/18/2011 - 17:03

Permalink

मिसळपावचे मालक बदलतील ;) बाकी काय जास्त डोकं चालत नाय.

अवांतर :- हलके घ्या.
  • Log in or register to post comments

Submitted by गणपा on Tue, 10/18/2011 - 17:10

In reply to मिसळपावचे मालक बदलतील ;) बाकी काय जास्त डोकं चालत नाय. by आत्मशून्य

Permalink

ह्याला अंदाज म्हणाव, सुप्त

ह्याला अंदाज म्हणाव, सुप्त इच्छा की भाकित ? :)
  • Log in or register to post comments
Profile picture for user आत्मशून्य

Submitted by आत्मशून्य on Tue, 10/18/2011 - 18:25

In reply to ह्याला अंदाज म्हणाव, सुप्त by गणपा

Permalink

वास्तव

वास्तव ;) (कोबायाशीमारू) - आत्मशून्य
  • Log in or register to post comments

Submitted by ५० फक्त on Tue, 10/18/2011 - 17:17

In reply to मिसळपावचे मालक बदलतील ;) बाकी काय जास्त डोकं चालत नाय. by आत्मशून्य

Permalink

५१ पैकी कोणत्या, म्हंजे

५१ पैकी कोणत्या, म्हंजे तुम्हाला काय इंटर्नल न्युज वैग्रे. अतिअवांतर - आज संध्याका़ळी तुझ्या ग्रहाजवळ जेवायला यायला जमेल का रे ?
  • Log in or register to post comments
Profile picture for user आत्मशून्य

Submitted by आत्मशून्य on Tue, 10/18/2011 - 18:23

In reply to ५१ पैकी कोणत्या, म्हंजे by ५० फक्त

Permalink

५१ पैकी कोणत्या, म्हंजे

५१ पैकी कोणत्या, म्हंजे तुम्हाला काय इंटर्नल न्युज वैग्रे.
असचं टाइमपास करतोय राव कसली न्युज, अंदाज, भाकित वैग्रे घेऊन बसलात राव. बाकी प्लॅनेटजवळ अवश्य भेट घेतल्या जाइल. (नॉस्ट्रेडॅम्स) - आत्मशून्य.
  • Log in or register to post comments

Submitted by छोटा डॉन on Tue, 10/18/2011 - 17:19

Permalink

माझ्या कल्पना ...

आम्हाला १०० वर्षे पुढे पाहवत नाही, आमची झेप पुढच्या ५० ( किंवा फार्फार तर २५ ) वर्षापर्यंतच. १. निम्मा भारत ( किंवा जमल्यास निम्मे जग ) पवार फ्यामिलीच्या नावावर असेल ( हे नेटवरुन साभार, आमची फक्त सहमती ) २. भारतात 'लोकपाल' नावाची संस्था अस्तित्वात येईल व लोक त्याच्याविरुद्ध उपोषणाला बसतील. ३. 'संसदेचे अधिवेशन' वगैरे गोष्टींपेक्षा जंतरमंतर, आझाद मैदान, क्रांती मैदान वगैरेवरच्या आंदोलनाला जास्त महत्व येईल. ४. फेसबुकवर 'लाईक' वगैरे करुन भारताचा पंतप्रधान वगैरे ठरवणे अशा गोष्टी शक्य होतील. ५. रिलायन्स बाकी सर्व उद्योगधंदे गुंडाळुन प्रामुख्याने 'मेणबत्त्या उत्पादना' क्षेत्रात जायंट म्हणुन नावाजली जाईल. ६. प्रसारमाधम्यांच्या चर्चा, फेसबुक वरच्या कमेंट्स आदींवरुन एखाद्याने पदावर रहावे अथवा राहु नये ह्याचे निर्णय घेतले जातील. ७. 'राळेगणसिद्धी' हे नवे सत्ताकेंद्र उदयास येईल, इकडुनच सर्व 'रिमोट डेस्कटॉप कनेक्शन्'ने काम करता येईल. ८. 'नागरी समिती'चे प्रमुख म्हणुन श्री. राहुल गांधी भारताच्या पंतप्रधान पदाची कितव्यांदातरी शपथ घेतील. भाजपा, काँग्रेस आदी सर्व पक्ष ह्या नागरी कमेट्यात विलीन होतील. ९. भारत घाना / त्रिनिदाद टोबॅगो / कंबोडिया / सोमालिया असल्या तत्सम देशांना हरवुन 'क्रिकेट विश्वचषक' कितव्यांदातरी जिंकेल. १०. प्रचंड भ्रष्टाचारामुळे आणि त्यातच सर्व पैसा संपल्याने 'दिल्ली ऑल्मिपिक्स' रद्द केले जातील. बाकी इतर सवडीने नंतर ... - छोटा डॉन
  • Log in or register to post comments

Submitted by फिरंगी on Fri, 03/15/2013 - 19:52

In reply to माझ्या कल्पना ... by छोटा डॉन

Permalink

हे उत्तम्...............

फेसबुकवर 'लाईक' वगैरे करुन भारताचा पंतप्रधान वगैरे ठरवणे अशा गोष्टी शक्य होतील. रिलायन्स बाकी सर्व उद्योगधंदे गुंडाळुन प्रामुख्याने 'मेणबत्त्या उत्पादना' क्षेत्रात जायंट म्हणुन नावाजली जाईल.
हे उत्तम्...............
  • Log in or register to post comments

Submitted by विजुभाऊ on Fri, 01/19/2024 - 11:06

In reply to माझ्या कल्पना ... by छोटा डॉन

Permalink

छोटा डॉन्शास्त्रेनी २०११ मधे

छोटा डॉन्शास्त्रेनी २०११ मधे वर्तवलेल्या भविष्यातील यातले काहीही घडले नाहिय्ये हे पाहून अत्यानंद झालेला आहे
  • Log in or register to post comments

Submitted by मराठे on Tue, 10/18/2011 - 18:37

Permalink

माझा अत्यंत आवडता असा हा

माझा अत्यंत आवडता असा हा टाईमपास आहे. तूर्त फँटसीज बाजूला ठेउन व्यावहारिक दृष्ट्या विचार करू: - लोकांचं आयुर्मान वाढतंच आहे. त्यामुळे सरासरी आयुर्मान ८० ते ९० होईल. - त्यामुळेच जी स्थिती आत्ता युरोप, जपान मधे आहे तिचं स्वरूप जागतीक आणि अधिक गंभीर असेल. - ह्याचा परिणाम म्हणून 'रिटायरमेंट' चं वय ५५, ६० न राहता ७० पर्यंत वाढलेलं असेल. - दुसरीकडे जननप्रमाण झपाट्याने खाली येइल. मुख्य कारण म्हणजे - घटस्फोटांचं प्रमाण वाढलेलं असेल - मुलं जन्माला घालणं हा एक 'व्यावहारीक' निर्णय असेल कारण मुलांच्या सांगोपनाचा खर्च अफाट वाढलेला असेल. - ह्याचा एक चांगला परिणाम म्हणजे अधिक चांसुसंस्कृत पिढी जन्माला येइल (हा माझा आशावाद) व जगातील ज्वलंत समस्यांवर चर्चा करून त्या सोडवल्या जातील. - पेट्रोल डिझेल यांचे भाव आकाशाला भिडतील पण त्याच बरोबर इतर उर्जा साधनांना प्राधान्य दिलं जाईल. शतकाच्या अखेरीस आपण पेट्रोल्/डिझेल वर अवलंबून राहणार नाही. - तंत्रद्यानामधे चिक्कार बदल घडतील. आपण प्रत्येक क्षणी जगाच्या संपर्कात असू आणि त्यासाठी कुठला फोन / टॅब वगैरे घेउन फिरण्याचीही गरज नाही. (तुम्ही पाहिलं नसेल तर प्रणव मिस्त्री ह्या भारतीय मुलाचं कौतुक इथे पहा). - अवकाश प्रवास स्वस्त असेल. दुसर्‍या ग्रहावर किंवा अवकाशात वस्ती करण्याचं तंत्रद्यान उपलब्ध असेल पण तो निर्णय तंत्रशास्त्राचा नसून अर्थशास्त्राचा असेल. ------ (चिंतोबा) मराठे
  • Log in or register to post comments

Submitted by निनाद मुक्काम … on Tue, 10/18/2011 - 19:43

Permalink

पुढील शंभर वर्षात भारत

पुढील शंभर वर्षात भारत महासत्ता बनेल . अपारंपरिक ऊर्जास्त्रोतांचा वापर वाढेल .चंद्रावर मानवी पहिली मानवी वसाहत निर्माण होऊन त्या निर्मितीत भारताचा वाटा असेल . पाकिस्तान एकतर चीनच्या घशात जाईल ( आता काश्मीर जात आहेच )किंवा त्यांची शकले होतील . अमेरिका व भारत जगाचा भूगोल बदलतील . जग विज्ञानभिमुख होईल . . (हिंदू धर्म जगभर जोमाने पसरेल हा माझा भाबडा आशावाद आहे .)
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on Tue, 10/18/2011 - 20:14

Permalink

आर्थिक बाबतीत काय स्थिती

आर्थिक बाबतीत काय स्थिती असेल? पैशाला असलेले वलय राहणार नाही. ज्या काय गरजा आहेत त्या भागल्या की झालं! माणसं सहज शंभरी गाठतील का? माणसं शंभरी गाठतील पण त्यांना ते नको असेल कारण माणसाने माणसाला आपुलकी कशी दाखवायची हेच माहीत नसेल मग जगून काय करायचं हेच समजणार नाही. ज्यांच्याकडे "काय म्हणता?", "कसे आहात?" हे विचारणारे सापडतील ते लोक एक्झिबिट म्हणून ठेवले जातील. आपुलकी दाखवणार्‍या एका दोघांचे असे झाले की बाकीचे लपून बसतील. मानसशास्त्र हा महत्वाचा विषय बनून राहील.
  • Log in or register to post comments

Submitted by यकु on Tue, 10/18/2011 - 22:23

Permalink

छ्या:! कल्पनारंजनाचा प्रश्न

छ्या:! कल्पनारंजनाचा प्रश्न आला की आमच्या डोक्श्याला आपोआप टाळे लागते. पण इथे आलेले प्रतिसाद रंजक आहेत. बाकी मला गविंच्या विचारी लेखनाचे नेहमीच कौतुक वाटत आले आहे. ;-) (वरचा मजला बंद पडलेला ) यशवंत
  • Log in or register to post comments
Profile picture for user सुहास..

Submitted by सुहास.. on Wed, 10/19/2011 - 15:31

In reply to छ्या:! कल्पनारंजनाचा प्रश्न by यकु

Permalink

यशदांशी सहमत !

यशदांशी सहमत !
  • Log in or register to post comments
Profile picture for user सोत्रि

Submitted by सोत्रि on Tue, 10/18/2011 - 22:48

Permalink

सर्व सायंस फिक्श्न

सर्व सायंस फिक्श्न कादंबर्‍यांमधले आणि स्पील्बर्ग मुव्हीज मधले 'चमत्कार' अस्तित्वात येतील. - (ह्याची अतीव खात्री असलेला) सोकाजी
  • Log in or register to post comments
Profile picture for user सोत्रि

Submitted by सोत्रि on Tue, 10/18/2011 - 22:52

Permalink

नेक्स्ट इज व्हॉट हे वाचुन

नेक्स्ट इज व्हॉट हे वाचुन मायक्रो सॉफ्ट्च्या प्रख्यात Where do you want to go today? ह्या जाहिरात घोषवाक्याची आठवण झाली :) - ( तांत्रिक प्रगतीच्या वेगाने भारलेला ) सोकाजी
  • Log in or register to post comments

Submitted by मन१ on Tue, 10/18/2011 - 23:00

Permalink

व्वॉव....

भारीच धागाय. चर्चेच्या प्रस्तावाइतकेच प्रतिसाद पण आवडले. वाचतोय.
  • Log in or register to post comments

Submitted by पिवळा डांबिस on Wed, 10/19/2011 - 04:02

Permalink

शंभर वर्षांनंतर...

१. ग्लोबल वॉर्मिंगमुळे पोलार आईसकॅप्स वितळून बहुतांशी जमीन पाण्याखाली जाईल... १अ. जमीनच पाण्याखाली गेल्याने सीमारेषा रहाणार नाहीत, पर्यायाने देशही रहाणार नाहीत. मग देशा-देशांत भांडणेही होणार नाहीत. २. सर्वत्र समुद्र झाल्याने होणारी वादळं ही प्रचंड भयानक असतील आणि त्यामुळे बरीचशी जमीनीवरील प्राणीजात बुडून मरेल. माणसं (जी जगतील-वाचतील ती) तरंगणारी शहरं बांधून रहातील. अणि त्यांत झुरळं आपला शिरकाव करून घेतील. ३. सर्व वंशांची सरमिसळ होऊन गोरा, काळा, ब्राऊन, चायनीज हे भेद रहाणार नाहीत. सगळेच दिसायला थोडेफार सारखेच! ४. धर्मसंस्था अस्तित्वात रहाणार नाही. जगबुडी होऊन भयानक मानवसंहार झाल्यानंतर (तरी) माणसाचा देवाच्या अस्तित्वावर पुनर्विचार होईल. ५. लग्नसंस्था अस्तित्वात रहाणार नाही. माणसं प्रजननासाठी लैंगिक संबंध ठेवणार नाहीत. क्लोन्स आणि टेस्ट्ट्यूब बेबीजच होतील. ६. पैसा (करन्सी) ही गोष्ट अस्तित्वात रहाणार नाही. ७. कॅन्सरवर विजय मिळणार नाही. परंतु कॅन्सर क्रॉनिक होईल. म्हणजे माणसं कॅन्सर झाल्यानंतरही पंधरा-वीस वर्षे जगतील. ८.माणसाचे आयुर्मान वाढेल आणि माणसं शेवटी अल्झहायमर्स, पार्किन्सन्स सारख्या मेंदूच्या रोगाने मरतील. मेलेल्या माणसांना समुद्रात फेकून देण्यात येईल. ९. अन्नाचा मुख्य स्त्रोत समुद्र झाल्यामुळे मुख्य अन्न समुद्री प्राणी आणि माशांचा वास येणारे सी-वीड होईल. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे, १०. हे सर्व पहायला मी जिवंत नसेन!!!!!!!!!!!!! :)
  • Log in or register to post comments

Submitted by नगरीनिरंजन on Wed, 10/19/2011 - 08:19

Permalink

अचूक सांगणे अवघड आहे.

आर्थिक बाबतीतः सन २०५० पर्यंत भारताच्या अर्थव्यवस्थेने अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले असेल. चीनने ते २०३० सालीच केलेले असल्याने भारतातले बहुतेक उद्योग चीनवर अमेरिका आणि युरोपपेक्षा जास्त अवलंबून असतील. बरेचसे भारतीय लोक मांदारिन भाषा शिकतील. उपभोगावर आधारित अर्थव्यवस्था कमीकमी करण्याचा प्रयत्न केला जाऊन आनंदावर आधारित अर्थव्यवस्था तयार केली जात असेल. त्यासाठी आजच्या जीडीपीसारखेच अत्यंत निरुपयोगी आणि सरसकट मोजमाप करणारे, चुकीचे आनंद निर्देशक तयार केले गेले असतील. त्यावरच्या बदलांवर शेअरबाजारात खरेदी-विक्री करणारे दलाल तेव्हाही असतीलच. सौर किंवा नवीनच शोधलेल्या इंधनावर चालणारी वाहने असतील. अशी वाहने बनवण्याची मक्तेदारी ठराविक कंपन्यांकडे असल्याने त्या कंपन्या गब्बर झालेल्या असतील. देशांपेक्षा मोठ्या अशा या कंपन्यांच्या तालावर जग नाचेल आणि ईस्ट इंडिया कंपनी सारखेच या कंपन्यांचे स्वतःचे सैन्यही अधिकृतपणे असेल. सामाजिक: २०५० पर्यंत भारताची लोकसंख्या २ अब्ज असेल आणि जगाची ९ अब्ज. यातील बहुसंख्य (५०%) लोक गरीब असतील. नवनवीन रोग होऊ लागले असतील आणि हृद्रोग, मधुमेह आणि रक्तदाब ही दुखणी सामान्य झाली असतील. जगाच्या एकूण उपलब्ध जमिनीपैकी बहुतेक जमीन शेतीसाठी आणि वस्तीसाठी वापरली जाऊन जंगले अगदी औषधापुरती उरली असतील. सर्व शेती जनुकांतरित बियाणांच्या सहाय्याने जास्तीतजास्त पीक काढून केली जात असेल पण जनुक बदलामुळे तयार होणार्‍या नित्य नवीन कीडींमुळे पुरेसे अन्यधान्य तयार करायला खूप कष्ट पडतील. या बियाण्यांचा मक्ता घेतलेल्या कंपन्याही गब्बर असतील. म्हणजेच जगातले मूठभर लोक अतिश्रीमंत आणि बरेचसे लोक खूप गरीब असे(च) चित्र राहील. तंत्रज्ञानः मध्यमवर्गीय माणसाचे सरासरी वयोमान १०० झाले असेल पण त्याचबरोबर वयाच्या तीशी-चाळिशीत आत्महत्या करणार्‍यांचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढलेले असेल. सतत ऑनलाईन असणे ही भावनिक गरज झालेली असेल आणि त्यातून नव्यानव्या मानसिक विकारांना माणसं बळी पडतील. 'आयडेंटिटी प्रोटेक्शन' हा एक मजबूत चालणारा धंदा झाला असेल आणि प्रत्येकालाच त्याची गरज पडेल. कधीही होऊ शकणार्‍या आण्विक संहाराच्या भीतीने 'नवे जग' शोधण्याचे वा निर्माण करण्याचे प्रयत्न शेवटच्या टप्प्यात आलेले असतील. द्रव्य-प्रतिद्रव्याच्या संयोगाने जवळजवळ प्रकाशाच्या वेगाने जाणारी याने तयार होऊ घातली असतील. अशा यानांमध्ये प्रवास करण्यासाठी ४००-५०० वर्षं जगू शकणारी माणसे आणि त्यांच्यासाठी यंत्रमानव तयार केले जात असतील. अतिवाहक द्रव्ये आणि चुंबक यांच्या सहाय्याने कोणताही आकार धारण करू शकणारी अंतराळ स्थानके केव्हाच अवकाशात विहरू लागली असतील आणि अशा स्थानकांवर राहणार्‍यांची संख्या लाखाच्या घरात असेल. अंतराळात जन्म झालेला माणूस अस्तित्वात असेल. कला: जुन्या जंगलांबद्दल, शुद्ध हवेबद्दल, मानवी नात्यांबद्दल नॉस्टॅल्जिक लिखाण प्रमाणाबाहेर वाढले असेल. चित्रकार मात्र तसेच असतील, पण चित्रांमध्ये शहरी जीवनाचे चित्रण जास्त असेल. शतकाच्या शेवटी किंवा पुढच्या शतकाच्या मध्यावर दोन शक्यता असतील असा कयास आहे. १. हवामान बदलामुळे किंवा अन्य काही कारणामुळे अन्नधान्य उत्पादनावर बराच परिणाम होऊन बहुसंख्य लोक उपासमारीने, रोगराईने मरतील. उरलेले जीव मुठीत धरून बिळांमधून राहतील. ज्यांना जमेल ते ग्रह सोडून जातील. २. वेळीच सावध होऊन किंवा मेंदूच्या विकासामुळे किंवा एखादा प्रभावशाली 'प्रेषित' येऊन लोकांच्या मनातली मरणाची भीती वाजवी होईल आणि लोक स्वतःहून हा तयार झालेला मानवी संस्कृती/नागरीकरणाचा डोलारा विघटीत करून, सगळं सोडून नैसर्गिक अवस्थेकडे परततील. बरेचसे लोक यातही मरतीलच पण येणार्‍या पिढ्यांसाठी एक नवी पहाट झालेली असेल. चक्र पूर्णत्वाकडे वळलेलं असेल.
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Wed, 10/19/2011 - 23:47

Permalink

आमची एक्स्पायरी डेट

आमची एक्स्पायरी डेट बरीच आधीची असल्यामुळे तेव्हा काय होईल याबद्दल डोकं चालवायचे कष्ट घेणार नाही! ;) :P
  • Log in or register to post comments

Submitted by मोग्याम्बो on गुरुवार, 10/20/2011 - 10:02

Permalink

सोन्याचे वाढते दर पाहून

ह्या जागतिक मंदीमुळे पैसा हे चलन बंद होऊन सोने हे एकमेव जागतिक चलन बनेल.
  • Log in or register to post comments

Submitted by समीरसूर on गुरुवार, 10/20/2011 - 12:58

Permalink

मस्त धागा

विचार करायला लावणारा धागा. माझे काही विचारः तंत्रज्ञानः
  1. मी माझ्या काँम्प्युटरसमोर बसलोय. माझ्या डोक्याला दोन वायरलेस पिना लावल्यात. मी 'लिहायचे' अशी आज्ञा करताच पटापट माझ्या डोक्यातले लिखाण माझ्या काँम्प्युटरच्या स्क्रीनवर उमटायला लागेल. एखादा शब्द नको असल्यास ती आज्ञा कॅच करून तो शब्द स्क्रीनवर खोडला जाईल. हे सध्या अस्तित्वात आहे की नाही माहित नाही पण असे काही तंत्रज्ञान निघाले तर मज्जाच येईल.
  2. कृत्रिमरीत्या माणसाची मेमरी वाढवता येईल. म्हणजे माझ्या मेंदूत एक चिप बसवून मला माझ्या मेमरीची स्पेस वाढवता येईल. मग फोटो मी त्या मेमरीत साठवून दुसरीकडे जाऊन प्रिंट करून घेऊ शकेन. परीक्षांच्या काळात अशा चिप्सचा धंदा तेजीत येईल. मग चिप्स फॉरमॅट करण्याचे तंत्रज्ञान निघेल आणि परीक्षेला जातांना चिप्सना एक पासवर्ड टाकून लॉक केले जाईल. प्रेयसीच्या चिपमध्ये हॅक करून जाता येईल. मग प्रियकराला आपल्या आधीच्या बकर्‍यांची माहिती मिळेल आणि त्यांनी काय-काय केले याची कदाचित सगळीच माहिती मिळेल. प्रेयसीला आपल्या प्रियकराच्या लफड्यांची माहिती मिळेल. तो दिवसातून १५ सिगारेटी फुंकतो असे कळल्यावर ती त्याच्यावर आगपाखड करेल आणि आपल्या पर्समधून बाटली काढून दोन घोट रिचवत त्याच्या या गुन्ह्याला उदार मनाने माफही करेल.
  3. मोबाईल (टॅब्लेटसारखे) हे एक सर्वशक्तिमान साधन बनेल. मोबाईलवरून तुम्हाला सगळे काही करता येईल. बूड हलवायची गरज पडणार नाही (अर्थात आवश्यक कामांसाठी ही अट शिथिल करावीच लागेल ;-)).
  4. सगळे जगच पेपरलेस होईल कारण पेपरची गरजच पडणार नाही. पैसे इलेक्ट्रॉनिकली ट्रान्स्फर होतील. बाकीची कागदपत्रे सॉफ्ट फॉरमॅटमध्ये स्टोअर केली जातील.
  5. टॉकीज नामशेष होतील. सगळ्यांच्या टॅब्लेटमध्ये चित्रपट डायरेक्ट ब्रॉडकास्ट केले जातील. टेलिकॉम ऑपरेटर्स ही जबाबदारी सांभाळतील. घरी बसून टॅब्लेटमधल्या प्रोजेक्टरचा वापर करून आरामात मोठ्या पडद्यावर चित्रपट बघता येतील.
  6. इलेक्ट्रॉनिक मेमरी हा प्रकार फक्त क्लाउडसारख्या प्लॅटफॉर्म्सवर शिल्लक राहील कारण झटकन काहीही क्लाउडमधून काढता आल्याने लोकल मेमरीची गरजच राहणार नाही.
  7. फेसबुक वगैरे बंद पडेल. लोकांना या ऑनलाईन प्रेजेन्सचा खूप कंटाळा येईल. लोकांना जिवंत अनुभवांची आस लागेल.
  8. सामाजिकः
    1. 'वाट्टेल तेव्हा, वाट्टेल तिथे, वाट्टेल त्याच्यासोबत, वाट्टेल तेवढा सेक्स' ही गोष्ट अगदी एसटीच्या 'आवडेल तिथे प्रवास' या घोषणेइतकाच खूप नॉर्मल होईल. अलिकडेच एका पाहणीत असं आढळून आलंय की प्रचंड शहरी भागात जवळपास ७०% मुले-मुली लग्नाआधी सेक्सचा अनुभव मनमुराद लुटतात. विवाह्यबाह्य संबंध वगैरे संकल्पना मोडीत निघतील कारण त्यांना राजरोसपणे मान्यता मिळेल. भूक लागल्यावर सॅण्डविच खाण्याइतकी सेक्स ही गोष्ट साधारण होईल. त्यातही 'नो स्ट्रींग्ज अ‍ॅटॅच्ड' संबंधांना मान्यता मिळेल. आज आत्ता आनंद घेतला, आता तू तुझ्या रस्त्याने आणि मी माझ्या रस्त्याने...पुन्हा भेटलो तर पुन्हा आनंद घेऊ किंवा सोबत बसून कॉफी पिऊ आणि आपपापल्या घरी जाऊ...हाय काय नाय काय...
    2. लोकं शांत ठिकाणी जाऊन राहणे पसंत करतील. शहरीकरणाचा वीट येईल.
    3. माणसांमधला प्रत्यक्ष संवाद वाढेल.
    4. वैश्विकः
      1. तापमानवाढ इतकी होईल की जग वितळून पुन्हा सजीव सृष्टीच्या निर्मितीची प्रक्रिया सुरु होईल. पुन्हा अश्मयुग सुरु होईल. डायनासोर्स येतील...आणि पुन्हा तीच कहाणी सुफळ संपूर्ण...
  • Log in or register to post comments
Profile picture for user आत्मशून्य

Submitted by आत्मशून्य on गुरुवार, 10/20/2011 - 16:38

In reply to मस्त धागा by समीरसूर

Permalink

जबरा...

.
  • Log in or register to post comments

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com