(हा कोणत्या दिशेला आहे प्रयास अजुनी)
ग्रासस्टांझाज ने केलेली गजल आम्हाला आवडली त्यावर आमची ही दाद ;)
हलकेच मलम लावू, किति या बुडास अजुनी?
हा कोणत्या दिशेला आहे प्रयास अजुनी?
ही प्यांट फाटली अन्, तुटल्या जरी वहाणा
'क्षितिजा' दिसे बरी हा, भलताच ध्यास अजुनी?
'ज्योती' लगेच पटवू, ही वल्गना कशाला?
वणवा उठेल कानी, 'नियती'स आस अजुनी!
उद्दाम कन्यका या काका म्हणोत मजला
उत्स्फूर्त खोकल्याची लपवीत ढास अजुनी!
ही स्यांडले खुणेची नेती मला घराशी!
होतो मुशाफिरीचा 'रंग्या'स भास अजुनी!
(इतरत्र पूर्वचाचणीसिद्ध)
विडंबन
हे ही एक विडंबन काव्य म्हणुनच
मस्त मस्त मस्त हो रंगाबाबू!
ओ काका!
छान
शॉलिट्ट्ट... उद्दाम कन्यका
दाद फार मनापासून दिली वाटत.
'ज्योती' लगेच पटवू, ही वल्गना
मूळ गझल आणि तीची दाद दोन्हीही
मस्त मस्त !
मूळ गझल आणि तीची दाद दोन्हीही