Skip to main content

(हा कोणत्या दिशेला आहे प्रयास अजुनी)

लेखक चतुरंग यांनी सोमवार, 17/10/2011 19:57 या दिवशी प्रकाशित केले.
ग्रासस्टांझाज ने केलेली गजल आम्हाला आवडली त्यावर आमची ही दाद ;) हलकेच मलम लावू, किति या बुडास अजुनी? हा कोणत्या दिशेला आहे प्रयास अजुनी? ही प्यांट फाटली अन्, तुटल्या जरी वहाणा 'क्षितिजा' दिसे बरी हा, भलताच ध्यास अजुनी? 'ज्योती' लगेच पटवू, ही वल्गना कशाला? वणवा उठेल कानी, 'नियती'स आस अजुनी! उद्दाम कन्यका या काका म्हणोत मजला उत्स्फूर्त खोकल्याची लपवीत ढास अजुनी! ही स्यांडले खुणेची नेती मला घराशी! होतो मुशाफिरीचा 'रंग्या'स भास अजुनी! (इतरत्र पूर्वचाचणीसिद्ध)
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 2515
प्रतिक्रिया 11

प्रतिक्रिया

विडंबन खुपच आवडले. काही ओळी क्रिप्टीक असल्यामुले खुपच आनंद जाहला. जे आयला रंगा बिगाडला की काय?

:) हे ही एक विडंबन काव्य म्हणुनच आवडले. बाकी रंगाशेटने बरेच दिसांनी कळफळकावरील धुळ झटकलेली पाहुन बर वाटल. एकुण काय दिवाळी जवळ येउन ठेपली.

ही स्यांडले खुणेची नेती मला घराशी! होतो मुशाफिरीचा 'रंग्या'स भास अजुनी!
=)) =)) =))

दाद आवडली.

शॉलिट्ट्ट... :) उद्दाम कन्यका या काका म्हणोत मजला उत्स्फूर्त खोकल्याची लपवीत ढास अजुनी! खी खी खी... ;)

'ज्योती' लगेच पटवू, ही वल्गना कशाला? वणवा उठेल कानी, 'नियती'स आस अजुनी!.......................... :-) उद्दाम कन्यका या काका म्हणोत मजला उत्स्फूर्त खोकल्याची लपवीत ढास अजुनी! :-D ---^---

छानच विडंबन हो.. अंमळ "हे चित्र दक्षिणेचे, दररोज मीच पाही.." ची आठवण करुन दिली ह्या विडंबनाने ;)