✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

धर्माच्या अड्ड्यात निधर्मी देश

अ — अत्रुप्त आत्मा, Tue, 10/18/2011 - 00:07
या कवितेची प्रेरणा---प्रकाश१११ यांची निधर्मी देशात..!! ही कविता,हे उघड आहे.पण तरीही दोन्ही मध्ये एक मूलभूत फरकही आहे. तो हा,,,की विषय व भावना जरी एक असली, तरी त्यांनी जे चित्र उभं केलय,त्यापेक्षा अधिक वस्तुनिष्ठ होण्याचा माझा प्रयत्न आहे. धार्मिकांच्या आतमध्ये निधर्मी हा देश आहे धर्म त्याचा आत्मा अन सेक्युलरी वेष आहे काही असे निधर्मी काही तसे स्वधर्मी सांगोत कोणी काही डोळ्यात फक्त गुर्मी झेंड्यात फक्त त्यांच्या देशभक्ती 'पेश' आहे देउळे नी राउळे ती भक्तीचे बाजार सारे खंगलेल्या माणसांचे मनाचे आजार सारे धर्म म्हणजे प्रेम म्हणुनी नजरेत सारा द्वेष आहे महा-राज दाढीवाले सदगुरुही चकचकीत सोज्वळंही कुणी भासे,भासे कुणी भगभगीतं उत्पादने ती वेगळी पण कंपनी ती एक आहे भक्तीलाही 'भाव' मोठा,पूजकांसी काय तोटा दहा किलोचे 'फळं' हवे मग,दलालांना फेक नोटा कर्मयोगा कुजवलेला षंढ तेथे त्वेष आहे देवालयाच इतुकी मद्यालये इथेही अभिषेक करुन घेण्या गर्दी जमे तिथेही नंतर पुन्हा कसे ते?...सारेच 'थंड' आहे गरीबीसही आळसाचा सदोदीतं शाप आहे पूर्व जन्मीचे प्रतापं...लोणंकडी थाप आहे ''हरवूच शोषकांना''...नुसता आवेष आहे

प्रतिक्रिया द्या
3546 वाचन

💬 प्रतिसाद (9)

-खरेच खूप छान जमलीय कविता.

प्रकाश१११
Tue, 10/18/2011 - 01:10 नवीन
-खरेच खूप छान जमलीय कविता. देउळे नी राउळे ती भक्तीचे बाजार सारे खंगलेल्या माणसांचे मनाचे आजार सारे धर्म म्हणजे प्रेम म्हणुनी नजरेत सारा द्वेष आहे छान ..!!
  • Log in or register to post comments

मस्त

प्रचेतस
Tue, 10/18/2011 - 06:50 नवीन
मस्त हो भटजीबुवा. सुरेख कविता लिहिली आहे.
  • Log in or register to post comments

फटका जबरदस्त बसतो आहे. छान

पाषाणभेद
Tue, 10/18/2011 - 08:08 नवीन
फटका जबरदस्त बसतो आहे. छान काव्य.
  • Log in or register to post comments

अरे व्वा!!

किसन शिंदे
Tue, 10/18/2011 - 09:08 नवीन
अतिशय सुंदर काव्य.
  • Log in or register to post comments

प्रकाश१११,

अत्रुप्त आत्मा
Tue, 10/18/2011 - 10:00 नवीन
प्रकाश१११, किसनराव,पा.भे,वल्ली ... सर्वांना धन्यवाद ... अवांतर-या प्रकारच्या कवितांना प्रतिसाद मिळाले की खरच बरं वाटतं... :-)
  • Log in or register to post comments

छान आहे कविता.. देउळे नी

मनीषा
Tue, 10/18/2011 - 10:02 नवीन
छान आहे कविता.. देउळे नी राउळे ती भक्तीचे बाजार सारे खंगलेल्या माणसांचे मनाचे आजार सारे धर्म म्हणजे प्रेम म्हणुनी नजरेत सारा द्वेष आहे ... अगदी खरं आहे !
  • Log in or register to post comments

रामदास फुटाणे स्टायलीत ल्हिले

विजुभाऊ
Tue, 10/18/2011 - 13:37 नवीन
रामदास फुटाणे स्टायलीत ल्हिले आहे
  • Log in or register to post comments

रामदास फुटाणे स्टायलीत ल्हिले

अत्रुप्त आत्मा
Tue, 10/18/2011 - 13:51 नवीन
रामदास फुटाणे स्टायलीत ल्हिले आहे असेल... सेहेवाग खेळताना तेंडल्याचा भास होतो कधी कधी.... बघणाय्रांना ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

देउळे नी राउळे ती भक्तीचे

गणेशा
Wed, 10/19/2011 - 00:08 नवीन
देउळे नी राउळे ती भक्तीचे बाजार सारे खंगलेल्या माणसांचे मनाचे आजार सारे धर्म म्हणजे प्रेम म्हणुनी नजरेत सारा द्वेष आहे
अप्रतिम
कंपणी एक आहे
आणि
सारेच थंड आहे
हे मात्र व्यव्स्थीत नाही वाटले. त्याएवजी कपणीत रोश आहे आणि उरला कोठे जोश आहे.. असे काही तरी असते तर छान वाटले असते असे वाटते.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा