चीता तैल, धार्मिक अपराध वगैरे..
काही दिवस हरिद्वारला गेलो होतो.
नाय नाय. प्रवासवर्णन वगैरे काय नाय.. नो वरीज.. तिथे दिसलेल्या एका "चिजे"वर मात्र हलकीफुलकी फुलक्यासारखी पोस्ट काढायचा मोह आवरला नाही. म्हणून गंगेचे फोटो सोडून बाजारभर हिंडून हेच करत होतो.. खास मिपासाठी..
काय?.. सांगतो..
सविस्तर साग्रसंगीत मुद्देसूद अस्ताव्यस्त माहिती देणार्या पाट्या हा पुण्याचा खास मानाचा तुरा आहे अशी माझी आजपर्यंत समजूत होती. पुण्याला पूर्ण मात देण्याइतकी नाही पण तरी चांगलीच कांपिटिसन अश्या पाट्या मला हरिद्वारात दिसल्या.
तर त्यातली काही "ताझा तस्वीरें" इथे पेश करतोय. टिप्पणीची फार आवश्यकता नाहीच. पण तरीही केल्या आहेत कारण पुण्याइतक्या सेल्फ एक्सप्लेनेटरी आणि "ठ्ठो" पाट्या अजून हरिद्वार शहरात नाहीत. शिकत असावेत अजून ते. सगळ्या पाट्यांमधे काही धमाल जोक आहे असं नव्हे पण महाराष्ट्रात कानी न पडणार्या वेगळ्याच शुद्ध घी मधल्या हिंदीच्या शब्दांचीही झलक इथे दिसतेय.
फोटो सौजन्य : मीच
पाट्यांचे फोटो काढताना मी संशयास्पद ठरुन मार खाण्याचा अनुभव इथे लिहायची वेळ येऊ नये म्हणून मोबाईलमधून जमेल तेवढ्या झपाझप फोटो काढले आहेत. कलादालन म्हणून पाहू नये असं म्हणून पाहतो.
१)
१ वर टिप्पणी: भात नाही घेतलात तर किती पोळ्या जास्त मिळतील हे बाहेरच पाटीवर लिहिण्यातले "डीटेलिंग" पाहून प्रिय पुण्याची आठवण झाली.
२)
२ वर टिप्पणी: सध्या बिझनेस खेचण्यासाठी वापरलेल्या गुडविलच्या "के बेटे..के बेटे" च्या माळेतले वरुन दुसरे प्राचीन पंडितजी श्री. मक्खन चक्खन यांचे नाव अत्यंत आवडण्यात आले आहे. सुखी माणूस असावा.
३)
३ वर टिप्पणी: पुण्याची तीव्र आठवण. भाषा वेगळी, भावना तीच..
४)
४ वर टिप्पणी: हा चष्म्याचा सेलवाला जाम चालू आहे. जो चश्मा गिर्हाईकाला आवडेल तो "फॅन्सी" ठरणार. आणि "फॅन्सी चश्मे"का रेट अलग से..
५)
५ वर टिप्पणी: वरुन चवथ्या क्रमांकाचे सूप (अगदीच अंदाज येत नसल्यास.. हॉट अँड सोअर सूप)आवडल्या गेले आहे. तिसर्या क्रमांकाचा पदार्थ मागण्याची इच्छा आणि धाडस झालेले नाही.
६)
६ वर टिप्पणी: हेच दुकानाचं नाव बरं का..
बाय द वे..दुकानाला काही "मनोज भांडार", "सत्कार भोजनालय" असं नाव द्यायलाच पाहिजे असं थोडंच आहे ?
प्रॉडक्ट आणि धंद्याचे नाव यांचं अद्वैत.
याच धर्तीवर पुण्यात "खमंग काकडी, साबुदाणा खिचडी" या नावाचं दुकान आता शोधीन.
७)
७ वर टिप्पणी: धार्मिक अपराध वाचून गांभीर्य पाळले गेले. हंसी मजाक होऊ नये म्हणून एक चांगला जोक आठवलेला असूनही हिला सांगितला नाही.
८)
८ वर टिप्पणी: नाही.. मुळातच मान्य करतो की हे तेल जबरी गुणकारी आहे. पण नेमके कशावर? "चोट मोच" आणि "जले कटे" हे दोन विकार वगळून बाकीच्यापैकी एकातरी रोगाच्या नावाचा अर्थ कोणी माफक शुल्क घेऊन सांगेल का?
...
...
...
याखेरीज हरिद्वारमधे एक "मेल-फिमेल" फॅमिली हॉटेल असे हॉटेल पाहण्यात आले. त्याचा, विशेषतः बोर्डाचा फोटो विविध कारणांस्तव आणि मारभयास्तव काढता आला नाही याची रुखरुख लागली आहे.
ऑस्सम फोटो झाला असता यार. हो. "मेल फिमेल फॅमिली हॉटेल" अशा नावाचं हॉटेल.. खरंच.. मी पाहिलं डोळ्यांनी..
......

......वर्गीकरण
प्रतिक्रिया
हॅहॅहॅ...... ५व्या नंबरचा
+१
नक्की किती..?
अगदी हेच
लै भारी
>>तो ३र्या क्रमांकाचा पदार्थ
ते लोक हातकणंगल्याला 'हाथ का
बरेचजणं
अरेरे
:)
अरेरे!
मी पण पाहिला मनाचा प्रतिसाद.
जाम मजा आली!
खरवाँ आहे बहुतेक ते. बाकी
अगदी एवढी छप्पर फाडके नाही पण
भन्नाट!
हरिद्वारी पाट्या
शोलिद !
त्या वंशावळीच्या पाटीत पहिले
पहिले दोन गृहुस्थ स्व. नाहीत
त्या पाटीवरचे निरिक्षण चांगले
जबरी!
मस्तच!
होडन सावर बेस्ट .....
मस्त
आंम्ही पुणेरी...
धार्मिक अपराध वाचून गांभीर्य
मस्त
ज्या गंगाकिनारी तुम्ही तो
सगळा धागा वाचून, पाहून ख्या
हेच म्हणते... होडन सावर हे
मस्त धागा! खूप ह्सले वाचून!
मस्त धागा!
"कढी़ चावल राजमा छोले पूरी"
त्यावरचं गंगा मईया वाचलत
जबरा
हा हा हा!!
इंदूरला आल्यापासून
शासकिय मदिरालय
;-) असे लिहीलेले बार आहेत.. विश्वास नाही? थांबा आता गविंसारखेच फोटो टाकतो..<< शासकिय मदिरालय >> हे वाचून
एक्दम मजेदार बोर्ड आहेत.
काही दिवस हरिद्वारला गेलो
लै भारी.
हाहाहा=)) =)) =)) होडन सावर
खरोखर असलीच परिस्थिती. एका
गुजराती भाषेत पोह्यांना पोवे
सगळे एकाहून एक भारी . मालक
दिल्लीहून नव्हे.. गुरगाव..
आजच ही एक पाटी फेसबुकावर
मी पुण्यात असताना
सह्याद्री फूट वेयर च्या वरती आहे ती पाटी