✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

चीता तैल, धार्मिक अपराध वगैरे..

ग
गवि यांनी
Mon, 10/10/2011 - 11:12  ·  लेख
लेख
काही दिवस हरिद्वारला गेलो होतो. नाय नाय. प्रवासवर्णन वगैरे काय नाय.. नो वरीज.. तिथे दिसलेल्या एका "चिजे"वर मात्र हलकीफुलकी फुलक्यासारखी पोस्ट काढायचा मोह आवरला नाही. म्हणून गंगेचे फोटो सोडून बाजारभर हिंडून हेच करत होतो.. खास मिपासाठी.. काय?.. सांगतो.. सविस्तर साग्रसंगीत मुद्देसूद अस्ताव्यस्त माहिती देणार्‍या पाट्या हा पुण्याचा खास मानाचा तुरा आहे अशी माझी आजपर्यंत समजूत होती. पुण्याला पूर्ण मात देण्याइतकी नाही पण तरी चांगलीच कांपिटिसन अश्या पाट्या मला हरिद्वारात दिसल्या. तर त्यातली काही "ताझा तस्वीरें" इथे पेश करतोय. टिप्पणीची फार आवश्यकता नाहीच. पण तरीही केल्या आहेत कारण पुण्याइतक्या सेल्फ एक्सप्लेनेटरी आणि "ठ्ठो" पाट्या अजून हरिद्वार शहरात नाहीत. शिकत असावेत अजून ते. सगळ्या पाट्यांमधे काही धमाल जोक आहे असं नव्हे पण महाराष्ट्रात कानी न पडणार्‍या वेगळ्याच शुद्ध घी मधल्या हिंदीच्या शब्दांचीही झलक इथे दिसतेय. फोटो सौजन्य : मीच पाट्यांचे फोटो काढताना मी संशयास्पद ठरुन मार खाण्याचा अनुभव इथे लिहायची वेळ येऊ नये म्हणून मोबाईलमधून जमेल तेवढ्या झपाझप फोटो काढले आहेत. कलादालन म्हणून पाहू नये असं म्हणून पाहतो. १) १ वर टिप्पणी: भात नाही घेतलात तर किती पोळ्या जास्त मिळतील हे बाहेरच पाटीवर लिहिण्यातले "डीटेलिंग" पाहून प्रिय पुण्याची आठवण झाली. २) २ वर टिप्पणी: सध्या बिझनेस खेचण्यासाठी वापरलेल्या गुडविलच्या "के बेटे..के बेटे" च्या माळेतले वरुन दुसरे प्राचीन पंडितजी श्री. मक्खन चक्खन यांचे नाव अत्यंत आवडण्यात आले आहे. सुखी माणूस असावा. ३) ३ वर टिप्पणी: पुण्याची तीव्र आठवण. भाषा वेगळी, भावना तीच.. ४) ४ वर टिप्पणी: हा चष्म्याचा सेलवाला जाम चालू आहे. जो चश्मा गिर्‍हाईकाला आवडेल तो "फॅन्सी" ठरणार. आणि "फॅन्सी चश्मे"का रेट अलग से.. ५) ५ वर टिप्पणी: वरुन चवथ्या क्रमांकाचे सूप (अगदीच अंदाज येत नसल्यास.. हॉट अँड सोअर सूप)आवडल्या गेले आहे. तिसर्‍या क्रमांकाचा पदार्थ मागण्याची इच्छा आणि धाडस झालेले नाही. ६) ६ वर टिप्पणी: हेच दुकानाचं नाव बरं का.. बाय द वे..दुकानाला काही "मनोज भांडार", "सत्कार भोजनालय" असं नाव द्यायलाच पाहिजे असं थोडंच आहे ? प्रॉडक्ट आणि धंद्याचे नाव यांचं अद्वैत. याच धर्तीवर पुण्यात "खमंग काकडी, साबुदाणा खिचडी" या नावाचं दुकान आता शोधीन. ७) ७ वर टिप्पणी: धार्मिक अपराध वाचून गांभीर्य पाळले गेले. हंसी मजाक होऊ नये म्हणून एक चांगला जोक आठवलेला असूनही हिला सांगितला नाही. ८) ८ वर टिप्पणी: नाही.. मुळातच मान्य करतो की हे तेल जबरी गुणकारी आहे. पण नेमके कशावर? "चोट मोच" आणि "जले कटे" हे दोन विकार वगळून बाकीच्यापैकी एकातरी रोगाच्या नावाचा अर्थ कोणी माफक शुल्क घेऊन सांगेल का? ... ... ... याखेरीज हरिद्वारमधे एक "मेल-फिमेल" फॅमिली हॉटेल असे हॉटेल पाहण्यात आले. त्याचा, विशेषतः बोर्डाचा फोटो विविध कारणांस्तव आणि मारभयास्तव काढता आला नाही याची रुखरुख लागली आहे. ऑस्सम फोटो झाला असता यार. हो. "मेल फिमेल फॅमिली हॉटेल" अशा नावाचं हॉटेल.. खरंच.. मी पाहिलं डोळ्यांनी.. ......
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
हे ठिकाण
लेखनप्रकार (Writing Type)
प्रतिसाद
आस्वाद

प्रतिक्रिया द्या
15211 वाचन

💬 प्रतिसाद (62)

प्रतिक्रिया

हॅहॅहॅ...... ५व्या नंबरचा

किसन शिंदे
Mon, 10/10/2011 - 11:33 नवीन
हॅहॅहॅ...... :D :D ५व्या नंबरचा फोटो आणी त्यावरची टिप्पणी पाहून जाम हसतोय. मेल-फिमेल नावाच्या हाटिलाचा फोटू पहायला आवडलं असतं, फोटो का नाही काढलात हो गवि?
  • Log in or register to post comments

+१

नगरीनिरंजन
Mon, 10/10/2011 - 12:30 नवीन
सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे

नक्की किती..?

प्रभाकर पेठकर
Mon, 10/10/2011 - 11:37 नवीन
फलकावर ४ रोट्या दाखवल्या आहेत आणि भात न घेतल्यास ६, म्हणजे भात न घेतल्यास एकूण १० रोट्या मिळाव्यात अशी, माफक, पुणेकरी अपेक्षा.
  • Log in or register to post comments

अगदी हेच

राही
Mon, 10/10/2011 - 14:39 नवीन
मनात आले होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

लै भारी

प्रचेतस
Mon, 10/10/2011 - 11:48 नवीन
एकदम खुसखुशित, चुरचुरित पाट्या. बघून जाम मजा आली. बाकी तिकडे स्वस्ताई प्रचंड दिसतेय. ३० रू थाळी फक्त. तो ३र्‍या क्रमांकाचा पदार्थ पटाटो चाप म्हंजे बटाटा चॉप्स असावेत. खखाँ म्हणजे खोकला बिकला आणि बिवाई म्हणजे बिमारी असावी. :)
  • Log in or register to post comments

>>तो ३र्‍या क्रमांकाचा पदार्थ

सूड
Mon, 10/10/2011 - 12:03 नवीन
>>तो ३र्‍या क्रमांकाचा पदार्थ पटाटो चाप म्हंजे बटाटा चॉप्स असावेत. काय हे वल्ली, निदान बटाट्याच्या सळ्या तरी म्हण की !! ;) गवि फोटो मस्तच, ते होडन सावर वाचल्यावर थोडी कल्पना आलीच, तोवर तुमची कमेंट वाचली आणि खात्री पटली. ते लोक हातकणंगल्याला 'हाथ का लंगडा' म्हणतात असं कुठेसं वाचलेलं आठवलं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

ते लोक हातकणंगल्याला 'हाथ का

मराठी_माणूस
Mon, 10/10/2011 - 12:05 नवीन
ते लोक हातकणंगल्याला 'हाथ का लंगडा' म्हणतात असं कुठेसं वाचलेलं आठवलं. हातकणंगल्याच्या रेल्वे स्टेशन वरचा बोर्ड हेच नाव दर्शवतो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

बरेचजणं

मास्टरमाईन्ड
गुरुवार, 10/12/2017 - 19:48 नवीन
हातकलंगडे पण म्हणतात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

अरेरे

मन१
Mon, 10/10/2011 - 11:45 नवीन
अरेरे.....
  • Log in or register to post comments

:)

प्रचेतस
Mon, 10/10/2011 - 12:18 नवीन
मनोबा, इथला अन् तिथला प्रतिसाद उलट सुलट झाला की काय? http://www.misalpav.com/node/19378#comment-345263 कृपया संपादित करून घ्या. (नायतर कोणीतरी तिथं बूच मारेल) ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मन१

अरेरे!

पैसा
Mon, 10/10/2011 - 12:39 नवीन
तिथे "मस्त" बघून मला पण एकदम चक्कर आली होती पण कोणाच्या लक्षात आलं नसेल तर राहू दे म्हणून गप्प बसले..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

मी पण पाहिला मनाचा प्रतिसाद.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 10/10/2011 - 21:11 नवीन
>>>>> "मस्त" बघून मला पण एकदम चक्कर आली होती ..... सेम टू सेम. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

जाम मजा आली!

पैसा
Mon, 10/10/2011 - 11:55 नवीन
हस हस हसतेय! पुरोहितानी बोर्ड लावायची कल्पना अतिशयच आवडल्या गेली आहे. त्यातून "मख्खन चख्खन" ........ "होडन सावर" आणि "पटाटो चाप" =)) =)) मुंबईच्या हिंदीला कशाला हसायचं या लोकानी? या इंग्लिशला घाबरून अंग्रेजानी इथून काढता पाय घेतला असावा! हंसी मजाक करना धार्मिक अपराध हैं? =)) =)) =)) बाकी चीता तैल... मधले गठिया म्हणजे गाउट, बयार म्हणजे हवा =)) हे माहिती होतं. बिवाई म्हणजे पायाच्या भेगा हे विकिवर सापडलं. त्या खखाँ चा उच्चार कसा करतात भाऊ?
  • Log in or register to post comments

खरवाँ आहे बहुतेक ते. बाकी

गवि
Mon, 10/10/2011 - 12:00 नवीन
खरवाँ आहे बहुतेक ते. बाकी शब्दांचे अर्थ (नि:शुल्क) सांगितल्याबद्दल अनेक आभार मानले जात आहेत. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

अगदी एवढी छप्पर फाडके नाही पण

मृत्युन्जय
Mon, 10/10/2011 - 12:11 नवीन
अगदी एवढी छप्पर फाडके नाही पण एका हाटेलाची मजेशीर पाटी पहलगाम मध्ये पाहिली होती: Image removed. सालं हाटेलाचं नाव देल्ली दी पंजाबी रसोई आणि स्पेशलायझेशन पंजाबी खाणे सोडुन सगळ्यात. ये बात कुछ हजम नही हुई. :)
  • Log in or register to post comments

भन्नाट!

मिसळलेला काव्यप्रेमी
Mon, 10/10/2011 - 12:51 नवीन
मजा आला... गवि, तुमच्या कल्पकतेची दाद द्यायला पाहीजे :)
कारण पुण्याइतक्या सेल्फ एक्सप्लेनेटरी आणि "ठ्ठो" पाट्या अजून हरिद्वार शहरात नाहीत. शिकत असावेत अजून ते.
ठ्ठो.... ;)
  • Log in or register to post comments

हरिद्वारी पाट्या

गणपा
Mon, 10/10/2011 - 13:02 नवीन
हरिद्वारी पाट्या आवडल्या. लोकं उगाच आमच्या पुण्याला नावं ठेवतात. :)
  • Log in or register to post comments

शोलिद !

माझीही शॅम्पेन
Mon, 10/10/2011 - 13:06 नवीन
शोलिद ! ________/|\___________
  • Log in or register to post comments

त्या वंशावळीच्या पाटीत पहिले

५० फक्त
Mon, 10/10/2011 - 13:31 नवीन
त्या वंशावळीच्या पाटीत पहिले दोन गृहुस्थ स्व. नाहीत काय, मधल्याच विकेट पड्लेल्या दिसत आहेत. बाकी पाट्या लई भारी, अवांतर - एक आव्हान इथल्या सर्व कुक व कुकीण मंडळीना जाहीर आव्हान, येत्या २४ तासात होडन सावर ची पाक्रु टाकुन २५ प्रतिसाद मिळवणा-यास शाजी पराठे पुणे येथे प्यार्टी.
  • Log in or register to post comments

पहिले दोन गृहुस्थ स्व. नाहीत

अत्रुप्त आत्मा
Mon, 10/10/2011 - 18:01 नवीन
पहिले दोन गृहुस्थ स्व. नाहीत काय, ...आगागागागा :bigsmile: त्या वंशावळीच्या पाटीत पहिले दोन गृहुस्थ स्व. नाहीत काय,मधल्याच विकेट पड्लेल्या दिसत आहेत. > :-D खपलो.... खत्री निरीक्षण...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

त्या पाटीवरचे निरिक्षण चांगले

रेवती
Mon, 10/10/2011 - 21:16 नवीन
त्या पाटीवरचे निरिक्षण चांगले आहे. शिवाय शेवटून दुसरा, ज्याचं नाव मोनू आहे त्याच्या मुलाचं नाव राज! म्हणजे खापर किंवा खापर खापर पणजोबा जिवंत असल्याचं खापर कोणावर फोडायचं हा प्रश्न वेगळा!;) बाकी ते होडन सावर सूप प्यायला तुम्ही हरिद्वार गाठायलाच हवं म्हणजे गंगा मईया (संदर्भ:छोले पुरीची पाटी.) तुमच्यावर प्रसन्न होईल आणि पाय बरा करेल.;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

जबरी!

फारएन्ड
Mon, 10/10/2011 - 13:40 नवीन
मेलो हसून :) ५० फक्त चे निरीक्षणही जबरी :)
  • Log in or register to post comments

मस्तच!

मेघवेडा
Mon, 10/10/2011 - 14:29 नवीन
हा हा हा.. मजा आली! 'होडन सावर' ब्येष्ट!
  • Log in or register to post comments

होडन सावर बेस्ट .....

विजय नरवडे
Mon, 10/10/2011 - 16:33 नवीन
होडन सावर बेस्ट .....
  • Log in or register to post comments

मस्त

जाई.
Mon, 10/10/2011 - 17:00 नवीन
मस्त
  • Log in or register to post comments

आंम्ही पुणेरी...

अत्रुप्त आत्मा
Mon, 10/10/2011 - 17:43 नवीन
ते वरती भात न घेतल्यास रोट्या ६,,,हे स्पष्टीकरण पुणेरी प्रव्रुत्ती दाखवतच,,पण पुण्यात ''भात न घेतल्यास जादा चपाती मिळत नाही'',,,''मागू नये''-हे त्या वाक्यातच ध्वनीत असतं.तर ''मागितल्यास इतर ग्राहकांदेखत अपमान करणेत येइल'' ही त्याची अध्याह्रुत ओळ असते... या वरुन १ किस्सा अठवला,आमच्या नवी पेठेत चिमणबागेत तिलक हॉटेल आहे,(तिथला चहा पूर्वी फेमस होता :-( )...तिथे वडे पार्सल मिळण्या संदर्भात १ पाटी होती >दोन नगास चटणी पार्सल मिळत नाही मी त्यांना म्हणालो- अहो तुमच्या समोर तर हा एकच नग उभा आहे,,मग द्या की...? मालक ओळखीचा असल्यानी त्यानी मला चटणी तर दिलीच,,शिवाय ''काय राव तुंम्ही अमचा आज वडा केला...हे हे हे'' वगैरे संवाद होऊन,,,दुसय्रा दिवशी त्यानी नगा'चा 'वडा' केला... :-)
  • Log in or register to post comments

धार्मिक अपराध वाचून गांभीर्य

श्यामल
Mon, 10/10/2011 - 18:00 नवीन
धार्मिक अपराध वाचून गांभीर्य पाळले गेले. हंसी मजाक होऊ नये म्हणून एक चांगला जोक आठवलेला असूनही हिला सांगितला नाही. >>> गवि, सगळ्या पाट्या आणि त्यावरच्या टिप्पण्या धमाल आहेत ! :smile:
  • Log in or register to post comments

मस्त

प्रदीप
Mon, 10/10/2011 - 18:16 नवीन
छान, खुसखुशीत फोटो व टिपण्णी. ज्या गंगाकिनारी तुम्ही तो फोटो काढलाय, तिथे स्मशान होतं काय? सुतकी चेहर्‍याने माणसे तिथे वावरत होती का? 'होड्डन सावर' चा अर्थ लक्षात नव्हता आला, त्याचे इन्टर्प्रिटेशन केल्याबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments

ज्या गंगाकिनारी तुम्ही तो

गवि
Mon, 10/10/2011 - 18:21 नवीन
ज्या गंगाकिनारी तुम्ही तो फोटो काढलाय, तिथे स्मशान होतं काय? सुतकी चेहर्‍याने माणसे तिथे वावरत होती का? हा हा.. अजिबात नाही. सर्वजण मजेत होते. दूरवरही स्मशान नव्हते. पूर्ण घाट भरुन असेच मजकूर होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रदीप

सगळा धागा वाचून, पाहून ख्या

रेवती
Mon, 10/10/2011 - 18:51 नवीन
सगळा धागा वाचून, पाहून ख्या ख्या करून हसत होते. होडन सावर सूप म्हणजे काय हे स्पष्ट केल्याशिवाय या जन्मात तरी समजलं नसतं. पटाटो चाप भारी आहे. गंगा किनारे ची सूचना फार आवडली. सरळ पापपुण्याच्या भाषेतच समजावलय.;) ज्यांनी दुसर्‍या साईडचा ढाबा विकलाय त्यांनी लिहिलेलं 'कृप्या' वाचून डोळे पाणावले.;) 'के बेटे, के बेटे' अशी परंपरा राजकारणात आलिये ती हरिद्वारहूनच! मीही एके ठिकाणी पाटी वाचली होती. येथे शाखाहारी आणि मौसाहारी जेवण मिळेल.
  • Log in or register to post comments

हेच म्हणते... होडन सावर हे

प्राजु
Wed, 10/12/2011 - 07:49 नवीन
हेच म्हणते... होडन सावर हे स्पष्ट केल्याशिवाय समजलं नव्हतंच मला.. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

मस्त धागा! खूप ह्सले वाचून!

यशोधरा
Mon, 10/10/2011 - 18:54 नवीन
मस्त धागा! खूप ह्सले वाचून! :)
  • Log in or register to post comments

मस्त धागा!

साधामाणूस
Mon, 10/10/2011 - 19:11 नवीन
मस्त धागा. आवडला.
  • Log in or register to post comments

"कढी़ चावल राजमा छोले पूरी"

मराठे
Mon, 10/10/2011 - 19:35 नवीन
"कढी़ चावल राजमा छोले पूरी" ... बराच वेळ मी हे "द्योले" काय प्रकरण आहे या विचारात पडलो होतो. !! बायदवे: मामलेदाराची मिसळ जिथे मिळते त्या दुकानाचं नाव नक्की काय आहे?
  • Log in or register to post comments

त्यावरचं गंगा मईया वाचलत

रेवती
Mon, 10/10/2011 - 21:11 नवीन
त्यावरचं गंगा मईया वाचलत का? हा हा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठे

जबरा

रमताराम
Mon, 10/10/2011 - 19:52 नवीन
'होडन सावर' हिट्टं.
  • Log in or register to post comments

हा हा हा!!

चतुरंग
Mon, 10/10/2011 - 20:27 नवीन
खल्लास हो गवि. होडन सावर हे जबराच!! ;) पं. मख्खन चख्खन सुद्धा शॉल्लिट. बाकी टमाटर मधले 'ट' आणि 'मा' हे खास पंजाबी उच्चारानुसार जोडून लिहिलेले बघून ड्वाले पाणावले. ;) (होडनसावरप्रेमी) पं. चतुरंग चतुर्वेदी
  • Log in or register to post comments

इंदूरला आल्यापासून

यकु
Mon, 10/10/2011 - 20:31 नवीन
इंदूरला आल्यापासून माझ्यासुध्दा मनात असा उद्योग करायचा किडा येतोय. पण कॅमवाला मोबाईल घेईपर्यंत वाट पहावी लागेल. इथे तर चक्क

शासकिय मदिरालय

;-) असे लिहीलेले बार आहेत.. विश्वास नाही? थांबा आता गविंसारखेच फोटो टाकतो..
  • Log in or register to post comments

<< शासकिय मदिरालय >> हे वाचून

चेतन सुभाष गुगळे
Mon, 10/10/2011 - 20:54 नवीन
<< शासकिय मदिरालय >> हे वाचून धर्मेंद्र च्या (बहुदा प्रतिज्ञा) चित्रपटामधील सरकारमान्य देसी पुलिस चौकी आठवली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यकु

एक्दम मजेदार बोर्ड आहेत.

शिल्पा ब
Mon, 10/10/2011 - 20:48 नवीन
एक्दम मजेदार बोर्ड आहेत. त्यांचं हिंदी समजायला बराच वेळ लागला हेसुद्धा जाता जाता सांगते.
  • Log in or register to post comments

काही दिवस हरिद्वारला गेलो

यकु
Mon, 10/10/2011 - 21:02 नवीन
काही दिवस हरिद्वारला गेलो होतो. नाय नाय. प्रवासवर्णन वगैरे काय नाय.. नो वरीज..
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) _____/\____
  • Log in or register to post comments

लै भारी.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 10/10/2011 - 21:13 नवीन
गंगा किनारे बैठकर हसी मजाक.....ला पैकीचे पैकी मार्क दिले. :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

हाहाहा=)) =)) =)) होडन सावर

प्रीत-मोहर
Mon, 10/10/2011 - 23:20 नवीन
हाहाहा=)) =)) =)) होडन सावर भारीच :) =)) =)) कित्ती तरी वेळ हसले हा लेख वाचुन :)
  • Log in or register to post comments

खरोखर असलीच परिस्थिती. एका

पाषाणभेद
Tue, 10/11/2011 - 12:22 नवीन
खरोखर असलीच परिस्थिती. एका ठिकाणी मी पण असेच पाहीले होते जसे की: थमसअप पवा म्हणजे पोहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रीत-मोहर

गुजराती भाषेत पोह्यांना पोवे

वपाडाव
Tue, 10/11/2011 - 12:46 नवीन
गुजराती भाषेत पोह्यांना पोवे म्हणतात... अन बटाट्याला बटाका..... असे बरेच वुच्चार आहेत जे थोडेफार प्रदेशानुसार चेंज होत असतात......
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाषाणभेद

सगळे एकाहून एक भारी . मालक

इरसाल
Tue, 10/11/2011 - 11:07 नवीन
सगळे एकाहून एक भारी . मालक हरिद्वारला दिल्लीहून गेला असाल. अगोदर कळवते तर भेटलो असतो ना?
  • Log in or register to post comments

दिल्लीहून नव्हे.. गुरगाव..

गवि
गुरुवार, 10/12/2017 - 15:44 नवीन
दिल्लीहून नव्हे.. गुरगाव.. सॉरी गुरुग्रामवरुन.. इट्स डिफरन्ट.. (आठवा.. मॅगी हॉट अॅन्ड स्वीट चिली टॉमॅटो सॉस.. इट्स डिफरंट..). लेट उत्तराबद्दल क्षमस्व.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इरसाल

आजच ही एक पाटी फेसबुकावर

चेतन सुभाष गुगळे
Tue, 10/11/2011 - 12:54 नवीन
आजच ही एक पाटी फेसबुकावर पाहिली. Image removed. बहुदा वाड्याला फ्लॅटपण देणार्‍यांनी केलेल्या सततच्या विचारणेला कंटाळून लावली असावी.
  • Log in or register to post comments

मी पुण्यात असताना

गवि
Tue, 10/11/2011 - 13:06 नवीन
मी पुण्यात असताना लक्ष्मीरोडवर भली मोठ्ठी वाड्याच्या इतक्याच रुंदीची निऑन साईन तयार करुन लावलेली पाहिली. "वाड्याचे मालक श्री.--- मालकाचे पूर्ण नाव नाव-वडिलांचे नाव-आडनाव---- हे आहेत. बहुधा मराठे किंवा तत्सम नाव होतं. नंतर सुधीर गाडगिळांनी त्यावर लेखही लिहिला होता कुठेसा. हल्ली काय स्थिती आहे माहीत नाही.
  • Log in or register to post comments

सह्याद्री फूट वेयर च्या वरती आहे ती पाटी

शाहिर
Tue, 10/11/2011 - 17:16 नवीन
लक्ष्मी रस्त्यावर .. मराठे आडनाव आहे..अजुनही आहे ती पाटी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा