तू ...
तुझे काजळ
घाली मोहोळ
काया कातळ
भासे मृगजळ
सौंदर्य नितळ
सरली मरगळ
भावना कुरळ
जशी हिरवळ
करुनी ओंजळ
झेलले वादळ
आसांचे वर्दळ
घाली गोंधळ
तुझाच दरवळ
घालतो भुरळ
अशी
आलीस जवळ
आता
अंतर अडगळ
आता
अंतर अडगळ
- विश्वेश
लेखनविषय:
याद्या
1084
प्रतिक्रिया
3
मिसळपाव
सुंदर
करुनी ओंजळ झेलले वादळ आसांचे
खरोखर उत्तम कविता