Skip to main content

आज मी जरी का नसलो येथे

लेखक पाषाणभेद यांनी मंगळवार, 11/10/2011 09:05 या दिवशी प्रकाशित केले.
जरी का नसलो येथे
आज मी जरी का नसलो येथे आठवणीत मी असणार आहे लिखाणात मी नसेना कोठे काव्यात मी असणार आहे ||धृ|| कोठून आलो कोठे निघालो? कोठे थांबून कोठे गेलो? थांग या सार्‍याचा कधी मला लागलाच नाही ||१|| अवचीत न जाणो का कधी भेट आपली झाली होती ओळखीचे वाटेन जेव्हा लकेर एक येईल कानी ||२|| मला न उरली काही आसक्ती आज कसली तोडूनी बांध सारे सागरा मिळाले सरितेचे पाणी ||३|| - पाषाणभेद (दगडफोड्या) ११/१०/२०११
काव्यरस

वाचने 1247
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया

पाषाणभेदा-वा . अवचीत न जाणो का कधी भेट आपली झाली होती ओळखीचे वाटेन जेव्हा लकेर एक येईल कानी ||२|| छान ,,सुंदर लिहिलीय कविता ..!!

पाषाणभेदा-वा . अवचीत न जाणो का कधी भेट आपली झाली होती ओळखीचे वाटेन जेव्हा लकेर एक येईल कानी ||२|| छान ,,सुंदर लिहिलीय कविता ..!!

आवडली. विशेषतः
अवचीत न जाणो का कधी भेट आपली झाली होती ओळखीचे वाटेन जेव्हा लकेर एक येईल कानी ||२||
हे मस्तचं!