मनातलं, जनातलं
लेखनप्रकार (Writing Type)
लिहु कि नको? का लिहावं? खरचं?
काय लिहाव? का? अनेक प्रश्न. मी का लिहितो? कशासाठी?
इथेच का लिहाव? ......
आजचा दिवस असाच गेला... आयुष्य का जगतो.. माहित नाही.. नक्की कुठे जायचय.. काय करायचय.
आजकाल मिपावर काय धिंगाणा चाललाय.. खरच चाललाय कि मला वाटतय. हे तर कायमचच.. बदल होत राहतात. कुणीतरी पिंग केलं होतं.. ते काय होतं. कुठे थांबेल? की स्वत:च थांबाव. एक ब्रेक घ्यावा. शांत जागेत जावं. फोटोग्राफी सुरु करावी का? जाउदेत..
आज काय जेवायचं. फेसबुकवर जाउया.. बघुया काय काय नविन आहे. अरे इथे पण काहीच नाही.. एखादा सिनेमा पाहुया. पण कोणता आणि काय मिळणार, ह्म्म्म्म आज एखाद्या मित्राला फोन करुया. पण त्याने काय होणार. तो मुड मधे नसेल तर. मग काय.. पुन्हा तेच. पुन्हा तेच म्हणजे काय. सगळं क्षणिक असतं, सापेक्षही असतं. मी कुठे आहे या सगळ्यात. म्हणजे चाल्ल्लय तरी काय. काहीतरी नविन करावं.. आयुष्याचा आनंद घ्यावा.. पण म्हणजे नक्की काय कराव. नाच करावा की गाणं म्हणावं.
आजची बातमी औरच होती. बायकोने नवर्याला मारुन त्याचे शरीराचे भाग कुकरमधे शिजवले? हे का होत असावं, असं काय घडलं असेल किंवा असं काय होत असेल मानवी मेंदुला की असे प्रकार घडावेत. स्टीव जॉब्स गेला म्हणे, आपणही असं काही करावं का? त्याच्यासारखं? सगळे लोक सगळ काही करू शकतात हा माझा ठाम विश्वास आहे. पण मग का थांबतात, मी का थांबतो कि थकतो. माहित नाही.
हे जग कदाचित असंच चालतं. पण मग असंच चालावं का? वाटतं की चांगलं काहीतरी करावं, पण कसं? माहित नाही.
ही नोकरी, घरदार हे सगळं असंच. मग मी कोण, का..
हापिसात रोजचंच जाणं.. आणि येणं.. रोज तेच प्रश्न. तेच अखंडचक्र.. विचारचक्र.. तेच लोकं तोच रस्ता, तेच काम.. लोकांना कटाळा कसा येत नाही ब्वॉ.. मलापण हेच वाटतं.. अरे हो सण आलाय. घरी फोन करावा लागेल.. बिल्स भरायची बाकी आहेत.. वाढदिवस येताहेत, गिफ्ट्स घ्यावी लागतील. बायको नक्की खुष आहे का. कसं कळेल.. वीकांताला तिला बाहेर फिरायला घेऊन जाउया, पण मग आराम कधी मिळेल.. आराम महत्वाचा नाही. असो.
बरेच दिवस झाले, चांगलं मटण नाही खाल्लं.. एखादा आठवडा निवांत मिळेल का. की सुट्टी टाकु.. अरे नको.. सुट्टी म्हणजे म्यानेजरच्या शिव्या.. पुढच्या महिन्यात बघुया..
ह्म्म्म्म्म जेवण करायची वेळ झाली आहे. आयला हे जेवण म्हणजे पण एक काम आहे.. रोज २-३ वेळा करावं लागतं.
पण आयुष्यात सुख आणि दु:ख म्हणजे काय. कारण ते पण सापेक्ष आहे ना..
मग मी खरच सुखी आहे कि दु:खी?
आपला,
मराठमोळा
प्रतिक्रिया
लवकर परत ये रे !
मनातल - जनातलं -२
चांगले प्रकटन आहे. आवडले.
अरेरे....!
इथल्याच एका छिद्रान्वेषी
काय झाल रे एकदम. काल परवा
याला स्मशानवैराग्य म्हणतात का?
तुमचं नुकतंच लग्न झालं आहे का
अंदाज अगदी बरोबर आहे. बाकी
सापेक्ष असते हो सगळे
माझ्याकडून धाग्याची लिंक कधीच चोप्य पास्त होत नाही बघा.
असं काही वाटायला लागलं तर
यावर ममो ची प्रतिक्रिया
:)