अनिल कुंबळे - एक जंबो गोलंदाज
अनिल कुंबळे संडास तुंबले हा वाक्प्रचार आम्ही शाळेत असताना लै म्हणजे लै च फेमस होता. वास्तविक अनिल कुंबळेचा आणि संडास तुंबण्याचा अर्थाअर्थी काही संबंध नाही. पण कुंबळे आणि तुंबले याचे यमक जुळते म्हणून बिचार्या कुंबळेवर विनोद व्हायचे. असाच एक इथे विषद न करतायेण्याजोगा विनोद त्याच्या फिरकी गोलंदाज असण्यावर पण व्हायचा. तो ही होण्यासारखे काही पाप के एन कृष्णास्वामी कुंबळ्यांच्या या पोराने केलेले नाही पण भारतीय इतिहासातला सर्वात यशस्वी गोलंदाज होउनदेखील त्याचे योग्य ते श्रेय कधीच न मिळणे ही कदाचित अनिल कुंबळेच्या आयुष्यातली सर्वात मोठी शोकांतिका असावी.
वास्तविक हा माणूस कपिल देवच्या अस्तानंतर भारतीय गोलंदाजीचा एकखांबी तंबू होता. कधी त्याने श्रीनाथला बरोबर घेउन भारतीय गोलंदाजीची धुरा वाहिली तर कधी वेंकटेश प्रसादला खांद्यावर घेउन. अध्ये मध्ये अॅबी कुरुविलापासुन हरभजन सिंग पर्यंत सग्ळे टिनपाड / मान्यवर गोलंदाज हजेरी लावून गेले पण हा माणूस अखेरपर्यंत प्रतिस्पर्धी संघाची सर्वात मोठी डोकेदुखी ठरला.
अझहर, सचिन, गांगुली, द्रविड कधी हरभजन तर कधी लक्ष्मण सगळेच कधी ना कधी भाव खाउन गेले पण कुंबळे एखाद्या विरक्त संन्यासाचा भाव चेहेर्यावर ठेवुन एकांड्या शिलेदाराची भूमिका निभावत आला. त्याच्याही आयुष्यात ते मोमेंट्स ऑफ फेम आले. नाही असे नाही. पण कुंबळेला जी काही प्रसिद्धी मिळाली त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त प्रसिद्धीचा आणी लोकप्रियतेचा हक्क त्याला नक्कीच होता, निवृत्तीनंतर २-३ वर्षांनी अजुनही आहे.
अनिल कुंबळेने त्याचे कसोटी पदार्पण १९९० मध्ये केले इंग्लंड विरुद्ध. या सामन्यात त्याने ३ बळीही मिळवले. त्यातला एक अॅलन लॅम्बचा होता. पण तरीदेखील त्याला पुढच्या सामन्यातुन डच्चु मिळाला आणि किस्मत उसपे इतना रुठी की नंतर २ वर्षे तो संघाबाहेर राहिला. त्यावेळेस जर सिलेक्टर्सना हे माहिती असले असते की हा माणूस भविष्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ९५०+ बळी मिळवणार आहे आणि जिथे सगळे दिग्गज फलंदाज नांग्या टाकतील त्या खेळपट्टीवर टिच्चुन उभा राहुन शतकही ठोकणार आहे तर कदाचित तो संघाबाहेर गेलाच नसता.
अगेंस्ट ऑल ऑड्स ही टिच्चुन राहण्याची त्याची जी विजिगिषु वृत्ती होती तिच त्याला यशस्वी करायची. एकदा साहेबांनी ठरवले की मग भलेही करंगळी मोडु दे की जबडा हा माणूस चेंडु हातात उड्वत गोलंदाजी साठी ह्जर व्हायचा. त्याची जिद्द अफाट होती आणि कुवत असामान्य. याच जिद्दीच्या बळावर या पट्ठ्याने ९२ साली झिंबाब्वे आणि दक्षिण अफ्रिकेच्या दौर्यावर स्वतःची वर्णी लावली. यातल्या दक्षिण अफ्रिके विरुद्ध पहिल्या कसोटीत त्याचे बकरे होते केपलर वेसल्स, जाँटी र्होड्स आणि सलामीवीर जिम्मी कूक. पण दुसर्या कसोटीत मात्र एका आगामी सुपरस्टारचा उदय लक्षात घेउन बहुधा सगळ्याच्या सगळ्या अफ्रिकन संघानेच कुंबळेसमोर लोटांगण घातले. यात त्याचे बळी होते हडसन, कर्स्टन, क्रोन्ये, मॅकमिलन, जॉटी र्होड्स (दोन्ही डावात) आणि रिचर्ड्सन (दोन्ही डावात) . तरीदेखील ९८ धावा काढणारा आणि ४ बळी घेणारा मॅकमिलन सामनावीर ठरला हे वेगळे. अफ्रिकन भूमीवर, वेगवान खेळपट्ट्यांवर या फिरकी गोलंदाजाने ८ बळी घेतले आणि मग त्यानंतर कधी मागे वळुन नाही बघितले. कदाचित त्यामुळेच कुंबळे हा फिरकी गोलंदाज होता यावर फार लोकांचा विश्वास बसत नाही :)
त्याच्या १८ वर्षाच्या कारकीर्दीत चेंडु वळला असे ठामपणे, छातीठोकपणे सांगता येइल असे चेंडु त्याने फार कमी टाकले असावेत. ९६ च्या विश्वचषकात उपांत्य फेरीच्या सामन्यात खेळपट्टीवर भगदाडे पडली होती. मुरलीचे चेंडु हातभर वळत होते. त्याचे वर्ण करताना एक मित्र म्हणाला "अरे बॉल एवढे वळत होते की कदाचित कुंबळे गोलंदाजी करत असला असता तर त्याचा बॉल सुद्धा वळल्याचा भास होउ शकला असता." . मित्राच्या या वक्तव्यावर आक्षेप घ्यायचे कुठलेही कारण आम्हाला सापडले नाही. कारण कुंबळे आमच्या लेखी फिरकी गोलंदाज नव्हताच. अहो ज्या माणासाच्या गोलंदाजीचा वेग वेंकटेश प्रसादच्या गोलंदाजीच्या आसपास पोचणारा असेल त्याला फिरकी गोलंदाज कसे म्हणावे? उद्या वेंकटेश प्रसादला ऑल राउंड स्पिनर घोषित कराल तुम्ही. :) . पण तरी ही कुंबळॅ मध्यमगती गोलंदाज होता की फिरकी याच्याशी मला काडीचे घेणेदेणे नाही. अहो जो माणूस पोत्याने बळी मिळवत होता त्याने पायाने , दाताने, केसाने, चालत, पळत. रांगत, झोपत कशीही गोलंदाजी केली तरी त्यावर आक्षेप घेणारे आम्ही कोण फुकणीचे? नसेल त्याचा बॉल वळत. पण त्याचा टॉपस्पिन आणि गुगली भल्याभल्यांना झेपले नाहीत हे खरे आहे ना? त्याची लाइन आणि लेंथ मॅक्ग्राच्या तोडात मारेल इतकी बिनचूक होती यात काही अतिशयोक्ती नाही ना? एका इनिंग मध्ये ७२ षटके टाकण्याइतका त्याचा स्टॅमिना अफाट होता हे कळते आहे ना? आणि कारकिर्दीत कधीही चेंडु न वळवता जर हा माणूस कसोटीत ६००+ आणि एकदिवसीय सामन्यात ३००+ बळी मिळ्वत असेल तर मरो ती फिरकी आणि खड्यात जावो तो राँग वन (त्याचा जो बॉल वळतो तो राँग वन असतो असे एक अतिशय साधे समीकरण आमच्या एका महान मित्राने ठरवले होते). कोणाला कौतुक आहे त्याचे?
कुंबळेने जेव्हा पदार्पण केले तेव्हा ज्येष्ठ आणि श्रेष्ठ खेळाडुंचे त्याच्याबद्दल फार काही चांगले मत नव्हते. "तो एक किफायतशीर गोलंदाज आहे " असे हातचे राखुन मत बिन्नी ने दिले होते तर प्रसन्नाने तर चक्क सांगितले होते की " अनिल कुंबळॅ काही चंद्रशेखरच्या तोडीचा नाही आणि जर त्याला यशस्वी व्हायचे असेल तर त्याला बॉल वळवणे शिकले पाहिजे" त्यानंतरच्या ज्ञात इतिहासात कुंबळेने चेंडु वळवुन बळी मिळवल्याची फारशी उदाहरणे सापडणार नाहीत. मग असे काय होते या शामळू दिसणार्या चष्मीश माणसात की ज्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तिसर्या क्रमांकाचे बळी मिळवले?
उत्तर हवे असेल तर २००२ सालच्या मे महिन्यात खेळल्या गेलेल्या भारत विरुद्ध वेस्ट इंडिज सामन्यातल्या तिसर्या दिवसाच्या शेवटच्या सत्रातला खेळ पहावा. पहिल्या डावात फलंदाजी करताना कुंबळेच्या जबड्यावर डिल्लनचा एक चेंडु आदळला आणि कुंबळेचा जबडा फ्रॅक्चर झाला. त्याच्यावर शस्त्रक्रिया करायला लागणार हे नक्की होते. तरीही जेव्हा गेल, हाइंड्स आणि सारवान समोरच भारतीय गोलंदाजी ढेपाळली आणि अजुन लारा, हूपर आणि चंदरपॉल तर बाकीच आहेत हे दिसत होते तेव्हा कुंबळेला राहवेना. त्याने जबड्यावर भले मोट्ठे बँडेज चढवुन सलग १४ षटके गोलंदाजी केली आणि त्यात लाराचा, सगळ्यात महत्वाचा बळी मिळवला. फ्रॅक्चर एवढे नोठे होते की कुंबळेला त्या दिवसाचा खेळ संपवुन भारतात परतवावेचे लागले आणि त्यानंतर भारतीय गोलंदाजीचे हाल कुत्र्याने देखील नाही खाल्ले. गांगुलीची अवस्था एवढी केविल्वाणी झाली होती की त्याने त्या सामन्यात सगळ्याच्या सगळ्या ११ खेळाडुंना गोलंदाजी दिली. अजय रात्रा आणि राहुल द्रविडने आलटुन पालटुन यष्टीरक्षण आणि गोलंदाजी केली. गांगुलीला शक्य असले असते तर त्याने विमान अर्ध्या रस्त्यातुन वळवुन कुंबळेला बोलावुन परत गोलंदाजी दिली असती. कारण तो एकच होता जो जबडा तुटलेला असुनदेखील चवताळलेला होता. शेर जख्मी है तो क्या हुआ फिर भी शेर है. त्याच्या या अफाट साहसाबद्दल क्रिकेटक्षेत्रातले दिग्गज काय म्हटले हे वाचण्यासारखे आहे:
"Cricket has a way of producing inspiring tales of valour for the country and this ranks at the top,"
- सुनिल गावसकर
"It was one of the bravest things I've seen on the field of play," - व्हिवियन रिचर्ड्स
'He is a champion player and a very committed one which we saw here itself. He is a man with a big heart,'' - सचिन
आणि एवढे सगळे प्रशंसोद्गार ज्याच्यबद्दल काढले जात होते तो कुंबळे मात्र स्थितप्रज्ञ योग्यासारखे म्हणाला:
"There was a bit of risk but I though the risk was worth it, at least I can now go home with the thought that I tried my best."
खेळात झोकुन देण्याच्या या समर्पित वृत्तीमुळे, विजीगिषु साहसामुळे, प्रखर इच्छाशक्तीमुळॅच शेन वॉर्नसारखा स्पिन किंवा मुरलीसारखा दुसरा नसुनदेखील कुंबळे प्रचंड यशस्वी ठरला.
प्रत्येक महान खेळाडुच्या कारकीर्दीत असा एक उत्तुंग क्षण येतो जो त्या खेळाडुच्या कारकीर्दीचे रुपक बनून राहतो. कुंबळॅसाठी तो क्षण माझ्यामते पाकिस्तानविरुद्ध एकाच डावात १० बळी मिळवुन किंवा वयाच्या ३६ व्या वर्षी जिथे तमाम श्रेष्ठ फलंदाज अपयशी ठरले त्या मालिकेत शत़क ठोकणार एकमेव फलंदाज बनूनही नाही आले. माझ्यामते २००२ च्या अँटिग्वा टेस्टमधली ती १४ षटके अनिल कुंबळेचे सगळे व्यक्तिमत्व प्रकट करुन जातात.
विक्रम त्याने आधीही केले आणि नंतरही. पाकिस्तान विरुद्धच्या एका कसोटीमधला स्कोरबॉर्ड सबकुछ अनिल कुंबळेच दाखवतो. तो सामना पाकिस्तान कॉट & बॉल्ड कुंबळेच होता. हीरो कपचा सामना ६ बळी घेउन त्याने असाच गाजवला. सर्वात जास्त पायचीत असोत की कॉट & बॉल्ड, विक्रम त्याच्याच नावावर जातो. एका डावात सर्वाधिक बळींचा विक्रमही असाच त्याच्याच नावावर शोभतो. पण एवढे होउनही कप्तानपदाची माळ गळ्यात पडण्यासाठी त्याला १७ वर्षे वाट बघावी लागली. त्या पदाचे त्याने सोने केले. त्याची लीडरशिप बघता त्याला कप्तान बनायला एवढा वेळ का लागला हेच कळाले नाही.
अनिल कुंबळे हा असाच होता. शांत, सिन्सियर, स्टुडियस, प्रसिद्धीपासुन, झगमगाटापासुन दूर राहणारा. त्यामुळेच इतक्या प्रचंड योगदानानंतरदेखील त्याला त्याच्या वाट्याची प्रसिद्धी नाही मिळाली. त्याचा कट्टर प्रतिस्पर्धी शेन वॉर्न त्याच्याबद्दल काय म्हणातो बघा:
“I have been lucky enough or unlucky enough to play against Anil for nearly 20 years. We are still playing against each other in the IPL. We all know what a gentleman he is, how humble he is - and the way he conducts himself on and off the field is a real example to everybody. More than the statistics, I think the one stand-out fact about Anil Kumble is the size of his heart. That is the most important thing about a person. He is a giver no matter what the situation."
अगदी असेच काहीसे सचिनही त्याच्याबद्दल बोलतो: "He is a man with a big heart"
बहुधा त्यामुळेच, त्याच्या "बडे दिलवाला" असण्यामुळेच कदाचित कुंबळेला जंबो म्हणत असावेत. त्याच्या गोलंदाजीचा वेग एका फिरकी गोलंदाजासाठी जंबो जेटसारखा आहे हे दुय्यम कारण असावे बहुधा. :)
तळटीपः सर्व छायाचित्रे जालावरुन विनापरवानगी साभार

वर्गीकरण
प्रतिक्रिया
ज ब ह र्या. भारतीय
मस्त!
क्रिकेटमधील आम्हाला फारसं कळत
मस्त!
झकास लेख!
गुगली
तेवढ्या छोट्या मोठ्या चुका
ते फरकाचं सोडा. आधी टॉप स्पिन
ते माहिती आहे हो
मस्त
+१.
खासच!! असाच एखादा फक्कड लेख
शीर्षक
प्रतिक्रिया पटली. त्यामुळे
मान्य
अनिल-आक्रमक वादळांच्या गर्दीत दुर्लक्षिला गेलेला शांत सुखद वारा
+१
क्लासच ++१;
लेख मस्तच..!
जंबो किंगबद्दल छान लेख
झकास !
एक नंबर
छान
आदर्श.....
मस्तच लेख आवडला,
छान
येकदम झकास !
लेख
मस्त लेख रे
सुंदर लेख!
मस्त लेख...
सर्वच वाचक /
लेख आवड्ला.
लेख आवडला
+ १ असेच म्हणतो!
मला आठवतंय कि एका भारतीय
वा काय लेख आहे!!! फिरोजशहा
अनिल कुंबळेचे अजून एक
मस्त लेख..