✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

चपला आणि सत्कार

५
५० फक्त यांनी
Tue, 10/04/2011 - 20:17  ·  लेख
लेख
दै. संचार - तारीख - १३.०९.२०११ पहिले पान स्था. वार्ताहर - सोलापुर शहर दिनांक ११ सप्टेंबर रोजी शहरात श्री गणॅश विसर्जन मिरवणुक सकाळी साडेदहा वाजता सुरु झाली. मिरवणुकीच्या दोन्ही मार्गावर बंदोबस्तासाठी शहर पोलीस व राज्य राखीव दलाच्या ८ तुकड्या तैनात करण्यात आलेल्या होत्या. सदर वृत्त हाती येईपर्यंत मानाच्या १२ गणपतींपैकी ३ गणपतींचे विसर्जन पुर्ण झालेले असुन, पत्रा तालिम मंडळाचा गणपती मल्लिकार्जुन देवळाच्या चौकात तर पाणिवेसचा गणपती टिळक चौकात होते. या वर्षी पाणिवेस मंडळाने डॉल्बी स्पिकरच्या भिंती न उभ्या करता फक्त ढोल व ताशे असाच मिरवणुकीचा थाट केल्याने समाजातील सर्व थरातुन कौतुक केले जात आहे. या बद्दलचे अधिक फोटो पान क्रमांक ४ वर. ...................................................................... एकतर काल पेपर नाही आणि आज ही नेहमीच्या बातम्या वाचुन निराश झालेला हर्षद, माधवी चहा देते का याकडे लक्ष देउन संचारची पानं उलटत होता. लग्नाआधी घरात नियमित मिळणारा चहा लग्नानंतर ब-याच प्रेस्टीज प्वाईंट पैकी एक का होतो यावर त्याचा मेंदु एका बाजुला विचार करतच होता, आता चवथ्या पानावरचे फोटो बघावेत, चुकुन एखादा आपला फोटो असेल असा विचार करुन तो फोटो पहायला लागला, सगळ्या फोटोच्या शेवटी उरलेल्या जागेत आता टाकायचीच म्हणुन टाकलेली एक बातमी होती, बाकी बातम्यांबरोबर आणि फोटो बरोबर न जुळणारी, पण त्यामुळेच लगेच नजरेत भरलेली., संचारची घडी घालुन ती बातमी वाचायला सुरुवात केली. स्था. वार्ताहर - सोलापुर ग्रामिण ,,,, ------------------ अर्थातच - क्रमश :
  • चपला आणि सत्कार - भाग २
  • चपला आणि सत्कार - भाग ३
  • चपला आणि सत्कार - भाग ४
  • चपला आणि सत्कार - भाग ५
  • चपला आणि सत्कार - भाग ६
  • चपला आणि सत्कार - भाग ०७
  • चपला आणि सत्कार - भाग ०८
  • चपला आणि सत्कार - भाग - ०९
  • चपला आणि सत्कार - भाग १०
  • चपला आणि सत्कार - भाग ११
  • चपला आणि सत्कार - भाग १२

Book traversal links for चपला आणि सत्कार

  • चपला आणि सत्कार - भाग २ ›
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
कथा
समाज
राहती जागा
लेखनप्रकार (Writing Type)
बातमी
प्रतिभा

प्रतिक्रिया द्या
11246 वाचन

💬 प्रतिसाद (26)

प्रतिक्रिया

ओह... कम ऑन!!

प्राजु
Tue, 10/04/2011 - 20:54 नवीन
ओह... कम ऑन!! :-|
  • Log in or register to post comments

काय झालं एकदम? ल्ह्यायचे

रेवती
Tue, 10/04/2011 - 20:58 नवीन
काय झालं एकदम? ल्ह्यायचे थांबलात का? सोलापुरातही सुरक्षाव्यवस्थेशिवाय विसर्जन होत नाही, तिथेही मानाचे गणपती असतात हे या बातमीवरून दिसून आले. मला वाटलं फक्त पुण्यातच असतं काय असं!;)
  • Log in or register to post comments

क्या बात है?

बहुगुणी
Tue, 10/04/2011 - 20:59 नवीन
कसल्या झपकन् 'क्रमशः' आलंय! कमीत कमी पॅराग्राफ्स मध्ये कमाल उत्सुकता :-)
  • Log in or register to post comments

हर्षदभौ,

प्रास
Tue, 10/04/2011 - 21:14 नवीन
हे हो काय? वाचायला सुरूवात नाही केली तर 'क्रमशः'? बहुत नाइंसाफी हैं भौसाहेब..... लिहा पुढचे प्रकरण लौकरात लौकर..... :)
  • Log in or register to post comments

पुढील भाग वाचण्यास उत्सुक...

गणेशा
Tue, 10/04/2011 - 21:34 नवीन
पुढील भाग वाचण्यास उत्सुक...
  • Log in or register to post comments

पुढील भागाच्या प्रति़क्षेत.

इंटरनेटस्नेही
Tue, 10/04/2011 - 21:54 नवीन
पुढील भागाच्या प्रति़क्षेत.
  • Log in or register to post comments

काय हो

प्रचेतस
Tue, 10/04/2011 - 22:04 नवीन
काय हो पन्नासराव, इतक्यातच क्रमशः...! पुढचा भाग येउ द्या लवकर. शीर्षक आणि आशय वाचून पुण्यातील अनंतचतुर्दशीच्या मिरवणुकीची आठवण आली. आदल्या दिवशी मंडळांचा सत्कार होतो आणि दुसर्‍या दिवशी रस्त्यात चपलांचा खच पडलेला दिसतो.
  • Log in or register to post comments

पुढचा भाग येउ द्या लवकर.

निवेदिता-ताई
Tue, 10/04/2011 - 22:10 नवीन
पुढचा भाग येउ द्या लवकर.
  • Log in or register to post comments

पुढील भागाच्या प्रतिक्षेत

जाई.
Tue, 10/04/2011 - 22:28 नवीन
पुढील भागाच्या प्रतिक्षेत
  • Log in or register to post comments

तीच तक्रार...

अत्रुप्त आत्मा
Tue, 10/04/2011 - 22:29 नवीन
इतक्या पटकन क्रमशः का?... चांगला शिनुमा सुरु झाला,आणी अता मुळ विषयाला तोंड फुटणार,एवढ्यात लाइट गेले... व थेटर मधे... अंधार......... :-(
  • Log in or register to post comments

पन्नासराव...

धन्या
Tue, 10/04/2011 - 22:42 नवीन
हेम्याच्या श्टोरीचं काय झालं ?
  • Log in or register to post comments

स्टंट

स्मिता.
Tue, 10/04/2011 - 22:49 नवीन
याला म्हणतात प्रसिद्धीकरताचे स्टंट!! उगा ४ ओळी खरडून उत्सुकता वाढवायची आणि क्रमशः टाकून महिनाभर आराम करायचा... ;)
  • Log in or register to post comments

''महिनाभर आराम करायचा...''

५० फक्त
Wed, 10/05/2011 - 08:28 नवीन
''महिनाभर आराम करायचा...'' स्मितातै, हे शब्दशः खरं आहे, सध्या एका पायावर भुमि पादाक्रांत करतो आहे त्यामुळं आरामच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्मिता.

अरे!?

स्मिता.
Wed, 10/05/2011 - 15:46 नवीन
अरे!? असं कारण आहे का? कुठे धडपडलात (हा शब्द हलकेच घेणे) बरे? ;) काळजी घ्या आणि लवकर बरे व्हा :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

सांगा की...

धन्या
Wed, 10/05/2011 - 19:07 नवीन
पन्नासराव, सांगा की कुठे धडपडलात ते. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्मिता.

तेच म्हणते. सांगा की

रेवती
Wed, 10/05/2011 - 20:41 नवीन
तेच म्हणते. सांगा की पन्नासराव, फक्त एकदाच सांगा. मी धडपडले तेंव्हा नाही का तुम्ही येऊन चौकशी केलीत!;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

काय हे.. ष्टुर्‍या अर्धवट

प्रीत-मोहर
Tue, 10/04/2011 - 22:56 नवीन
काय हे.. ष्टुर्‍या अर्धवट ठेवल्या तर हेम्याला उलटी गणित सांगायला लावणार ..... <निर्मीती सावंत मोड>आणी हे अस करत का कोणी? कथा अशी अपुर्ण नाही ठेवायची रे....
  • Log in or register to post comments

ओ प्रिमोबै, निर्मीती सावंत

धन्या
Tue, 10/04/2011 - 23:06 नवीन
ओ प्रिमोबै, निर्मीती सावंत मोड फक्त फक्त चालू केलात. बंद नाही केलात. भलतंच व्हायचं ना. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रीत-मोहर

कोडर

श्रावण मोडक
Wed, 10/05/2011 - 14:11 नवीन
कोडर आहेत त्या... ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

अच्छा, असं आहे होय. प्रोडक्शन

धन्या
Wed, 10/05/2011 - 19:10 नवीन
अच्छा, असं आहे होय. प्रोडक्शन सपोर्टवाल्याच्या पोटयापाण्याची सोय केली म्हणायची तर. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

बर्‍याच दिवसानी संचार च नाव

आनंद
Tue, 10/04/2011 - 23:11 नवीन
बर्‍याच दिवसानी संचार च नाव ऐकुन रंगा वैद्य (संस्थापक संचार) यांची आठवण आली लहान पणी त्यांच्या घरा जवळ्च रहात होतो,
  • Log in or register to post comments

प्रतिक्रिया

मन१
Wed, 10/05/2011 - 07:54 नवीन
प्रतिक्रिया पुढला भाग वाचल्यावरच देउ शकेन....
  • Log in or register to post comments

___/\____

प्यारे१
Wed, 10/05/2011 - 08:58 नवीन
___/\____
  • Log in or register to post comments

आता लिगामेण्ट शिऊन परत मिळे

मी ऋचा
Wed, 10/05/2011 - 11:51 नवीन
आता लिगामेण्ट शिऊन परत मिळे पर्यन्त भराभरा आधीची ष्टोरी पूर्ण करा आणि हिचे भाग पण पटापट टाका.
  • Log in or register to post comments

चपला आणि सत्कारहे वाचन इथले

मदनबाण
Wed, 10/05/2011 - 16:36 नवीन
चपला आणि सत्कार हे वाचुन इथले जुने दिवस आठवुन राहिले! म्हंटल नक्की मँटर काय झालयं ? (याचा डार्क मॅटरशी जवळुन देखील संबंध नाही.) उघडुन पाहिले तर हा फास्ट ट्रॅक धागा दिसुन राहिला...बरं वाटल ! पुढचा भाग जरा मोठा आणि लवकर टंका.
  • Log in or register to post comments

भाग -२ टाकला आहे -

५० फक्त
गुरुवार, 10/06/2011 - 00:07 नवीन
भाग -२ टाकला आहे - http://misalpav.com/node/19352
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा