(अनुवादीत. कवी- इंदीवर)
अंग तुझे चंदनासम
मन तुझे दोलायम
कुणी नका देवू दोष मला
जर झालो मी हिचा दिवाना
तुझी देहयष्टी भावलेली
तुझे नयन काजळलेले
सिंदुरबिंब तुझ्या माथ्यावरी
लाल निखारे ओठावरती
जरी कुणावरी पडॆ छाया
दुःख मनातले जाईल वाया
तू सुंदर तनाची सुंदर मनाची
मुर्ती असे तुझी सुंदरतेची
जरुरी आहे आज मला तुझी
किती करू मी तुझी अपेक्षा
ना होई सहन यापुढे प्रतीक्षा
श्रीकृष्ण सामंत
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2128
प्रतिक्रिया
4
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्तच..
मस्तच !!! सामंत साहेब फारच सुंदर..
मदनबाण.....
आभार
In reply to मस्तच.. by मदनबाण
मदनबाणजी,
आपल्याला कविता आवडली हे वाचून खूप बरं वाटलं.आभार.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com
आवडले
अनुवाद/भाषांतर आवडले. मात्र ध्रुवपदात 'धीरेसे तेरा यह मुसकाना' या ओळीचा अनुवाद करायला विसरलात वाटते ;)
(स्मरणशील)बेसनलाडू
'किसी और को शायद कम होगी' चा 'किती करू मी तुझी अपेक्षा' हा अनुवाद पटला नाही :(
(गोंधळलेला)बेसनलाडू
चूक दखवल्या बद्दल आभार
In reply to आवडले by बेसनलाडू
बेसनलाडूजी,
आपण दाखवलेल्या चूका बद्दल आभार.
त्याचं काय झालं,हे हिंदीतलं गाणं मी ऐकत असताना कागदावर उतरून घेत असताना आपण म्हण
ता ती ओळ "'धीरेसे तेरा यह मुसकाना' लिहायची विसरून गेलो.त्यामुळे तो आपल्याला फरक दिसला.
दुसरे म्हणजे आपण लिहिता ती ओळ
"'किसी और को शायद कम होगी' चा 'किती करू मी तुझी अपेक्षा' हा अनुवाद पटला नाही""
हा त्याचा अनुवाद नाहीच मुळी तो आपल्याला पटला नाही हे सहाजिकच आहे.तो अनुवाद
"पहले भी बहुत मैं तरसा हूँ" ह्या ओळीचा आहे
'किसी और को शायद कम होगी' ही ओळ पण माझ्या कडून उतरली न गेल्या मुळे त्याचा अनुवाद झालाच नाही.
खरं म्हणजे गाणं ऐकल्या नंतर मला उस्फुर्त लिहायची इच्छा झाली .आपण चूक दाखवली नसती तर ते तसंच राहून गेलं असतं.त्याबद्दल पुन्हा आभार
ही कविता मी अशाप्रकारे नवी आवृती म्हणून लिहित आहे.
अंग तुझे चंदनासम
मन तुझे दोलायम
हळुच तुझे हे खुदकणे
कुणी नका देवू दोष मला
जर झालो मी हिचा दिवाना
तुझी देहयष्टी भावलेली
तुझे नयन काजळलेले
सिंदुरबिंब तुझ्या माथ्यावरी
लाल निखारे ओठावरती
जरी कुणावरी पडॆ छाया
दुःख मनातले जाईल वाया
तू सुंदर तनाची सुंदर मनाची
मुर्ती असे तुझी सुंदरतेची
कुणा कदापी असो ती कमी
परि जरुरी आज मला तुझी
केव्हाचा असे मी वैतागलेला
नको तू वैतागू आता मला
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com