Skip to main content

आठवणी

लेखक मिसळलेला काव्यप्रेमी यांनी सोमवार, 26/09/2011 10:40 या दिवशी प्रकाशित केले.
वितळवूनी दिशा ह्या सार्‍या आभाळ हृदयात साचे दाटून आल्या घनसावळ्या विश्वास मन टिपून वेचे मेघांना सावरलेल्या त्या पापण्या सावलीच्या आठवणी डोळ्यात फुललेल्या विसरून पाकळ्या क्षणांच्या तळ्याच्या पटलावरती दिसे रांग बदकांची आईच्या मागेपुढती वसे झिंग पिल्लांची मग सरून जाते सारे उरे जीव उदास उदास फाटक्या झोळीत तारे सरे रात ह्या दिसास |- मिसळलेला काव्यप्रेमी -| (२६/०९/२०११)
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1996
प्रतिक्रिया 8

प्रतिक्रिया

कविता नॉर्मल स्टँडर्डने चांगलीच आहे. हळुवार आणि आर्द्र किंवा तत्सम. कौतुक खूप केलं असतं. पण तुझ्याकडून पूर्वी सेट झालेल्या अपेक्षेला नाय बा उतरत मित्रा.. असा माझा प्रॉब्लेम आहे.

मी.का. -छान आणि सुरेख कविता मेघांना सावरलेल्या त्या पापण्या सावलीच्या आठवणी डोळ्यात फुललेल्या विसरून पाकळ्या क्षणांच्या

शेवटचे कडवे अधिक जमले आहे आणि परिणामकारक आहे असे वाटले. (कवितेतले कळते असा दावा नाही).