Skip to main content

आपणच भान ठेवायला हव..............

लेखक gangotri_ यांनी सोमवार, 26/09/2011 या दिवशी प्रकाशित केले.
आमची पिलु(माझी छोटी शेजारिण ) काल घरी आली आणि म्हणाली " दीदी मी आज वर्गातल्या एका मुलाला कानाखाली दिली" आता ही पिलु 2 रीत आहे.मी तिला म्हटलं "पिल्या तू शाळेत मस्ती करायला जातेस का? मारामारी नाही करायची .." तर ती म्हणाली "दीदी तो मुलगा माला म्हटलं माझ्याशी लग्न करशील का???????" आता मात्र मला शॉक बसला.2 रीतल्या मुलांना कधीपासून लग्नाचं सुचायला लागलं ????? मी तिच्या शाळेत गेले , त्या मुलाशी बोलून त्याला समजावून सांगितलं की अभ्यासात लक्ष द्या . पण .......... पण..... प्रॉब्लेम सुटला का एवढ्यावरच?????? तो त्यांच्या पुरता मिटला . पण प्रश्न हा कायमच राहिला की मूल हे शिकतात कुठून? त्यांच्या कार्टून पाहण्याच्या विश्वात हे फॅड आल कुठून? याला जबाबदार कोण??? तुम्ही आम्हीच न ......... आपानच असले कार्यक्रम मुलांन पुढ पाहतो .मूल बाकी शिकणार काय मग ??? तेव्हा आपणच आता भान ठेवायला हव.........
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 9348
प्रतिक्रिया 40

प्रतिक्रिया

हे सारं यापूर्वीची पिढीही करीत असे >> दीदी तो मुलगा माला म्हटलं माझ्याशी लग्न करशील का?? असं म्हणणार्‍या मुलाला त्याचा अर्थ माहीत नसेल, त्यावर रागावणार्‍या मुलीलाही माहीत नसेल -- तेव्हा सध्यातरी दिवे घ्या टेक इट लाइटली

मुलं असं काहीबाही बोलत असतात नंतर विसरून जातात. त्यावरून मारामारी मात्र करू नये. आपण हे विषय त्यांच्यासमोर जेवढे ताणू तेवढे ते लक्षात राहतात. फार महत्व देवू नये असे वाटते. तुम्ही शेजारणीच्या शाळेत गेलात म्हणजे सख्खी शेजारीण दिसतिये.:)

जगू द्या हो त्या पिलूला!! आम्ही दुसरीत असताना शाळेत काय काय करत होतो हे सांगितलं तर आमच्या शाळेत जाऊन पार शांत घालावी लागेल की तुम्हाला. सर्वात महत्त्वाची गोष्ट, पालक-बिलक, शेपू-फिपू लोकांनी तर पोरांच्या शाळेत अजिबात जाऊ नये!

In reply to by Nile

सर्वात महत्त्वाची गोष्ट, पालक-बिलक, शेपू-फिपू लोकांनी तर पोरांच्या शाळेत अजिबात जाऊ नये! हेच मी माझ्या शिक्षकांना सांगुन दमले पण तरी सारखं निमंत्रण असायचं माझ्या पालकांना..मग काय करणार?

In reply to by शिल्पा ब

आमच्या तिर्थरुपांनीच "आता पोरगं आहे दिवटं म्हणून आम्ही किती वेळा कामंधंदे सोडून शाळेच्या चकरा मारायच्या?" असे विचारल्यानंतर फक्त चिठ्ठीवर आमचे काम भागू लागले! ;-)

In reply to by Nile

एकदाची अक्कल फुटल्यावर घरून मलाही असंच ओवाळून टाकलं होतं. वर पुन्हा "आईवडील शिक्षक आहेत तरी तू अशी का?" याचाही त्रास होताच. त्यावर एकदाच बाणेदारपणे दिलेलं उत्तर पुरलं, "त्यांनीही त्यांच्या लहानपणी मस्ती केली आहे." ;-) रेवतीताईचा प्रतिसाद पटला. पण पालक, शेपू, माठ वगैरे मला आवडतात.

In reply to by शुचि

दुसरीतल्या मुलीची तक्रार ऐकून, तिच्या शाळेत जाणार्‍या आणि त्या दुसरीतल्या मुलाला समजावून सांगणार्‍या आणि वर त्या पिटकुल्यांना ते कळले असेल असे गृहित धरणार्‍या कोणीतरी काकूबाई असतील नाही तर काय असतील? ;-) बाकी तुम्ही पण कायआजीबाईंसारखे प्रश्न विचारता हो! :P

In reply to by Nile

सर्वात महत्त्वाची गोष्ट, पालक-बिलक, शेपू-फिपू लोकांनी तर पोरांच्या शाळेत अजिबात जाऊ नये!
तेज्यायला आज पुन्हा ह्या निळ्याशी सहमत व्हायची वेळ आली. असो.. आमच्या शाळेत एकदाच पालकांना बोलावण्यात आले होते आमचे गुणगान गाण्यासाठी, त्याशीवाय १० वी चा फॉर्म देणारच नाही म्हणाले. मी आमच्या लाँड्रीवाल्याला घेऊन गेलो होतो मामा म्हणून. भेंडी .. हाय काय आन नाय काय ! बाकी त्या पिल्लुच्या शा़ळेत विनय सर शिकवत नाहीत का ?

एक महत्वाचा व गंभीर मुद्दा चर्चेला आलेला आहे. या वयाची मुले कार्टून चॅनल्स बघतात. बहूतेक कार्टून्स ही आयात केलेली असतात. अजाणत्या वयातल्या लहान मुलांचे निखळ बालपण हिरावून घेणारे संवाद, दृष्ये त्यात असतात. हगीमारू, शिनचॅन (अर्थात हा मलाही आवडतो), बेन टेन (बेन हा जरी चांगल्या प्रवृत्तीचा असला तरी ती अवाजवी साहसदृष्ये, किळसवाणे खलनायक त्यात आहेत.) ही त्यांची काही उदाहरणे आहेत. जरी मुले चांगली कार्टून्स बघत असतील जसे - मि. बीन, छोटा भीम (यातही भीम कडे मिटमिट्या डोळ्यांनी पाहणारी राजकन्या आहेच), भीम व कृष्ण (कृष्णा!) ई. त्यातल्या त्यात अमर चित्र कथा, चाचा चौधरी ही कार्टून्स चांगली आहे. एक मानूया की मुले चांगली कार्टून्स बघतात. पण प्राईम टाईम मध्ये रिमोट त्यांच्या वडीलधार्‍या़ंकडे (आईकडे??) असतो. त्यातल्या सिरीयल्स/ रियॅलीटी शोज, हिणकस कॉमेडी सर्कस(च) मधली प्रेमदृष्ये, पोषाख कुटूंबासहीत पाहतांना इतर कुटूंबीयांकडे डोळे चुकवून बघावी इतकी खराब असतात. (बॅचलर व्यक्तींनी कुटूंबासहीत ही दृष्ये, भाग पाहतो आहे ही कल्पना करा.) 'आता कार्टून्स बास झाले. आता डिसकव्हरी तत्सम चॅनेल्स बघ' अशी विनंती लहान सदस्यांना करावी लागते हे सत्य कुणीही सत्शील, कुटूंबवत्सल माणूस करेल अशी परिस्थीती आहे. नव्याचे मला वावडे नाही. किंबहूना बदल होणे हेच जीवन आहे. फक्त तो बदल योग्य वेळी व्हावा अशी आशा मनात आहे.

टॉम अँड जेरी सारख्या मस्त कार्टून्स मध्येही सतत मारामारी असते. व्हिलन असतात, हे व्हिलन मोठमोठे सिगार पीत असतात, टॉमच्या सेक्सी मैत्रीणी असतात, त्यांना गुलाब देऊन गुडघे टेकून प्रेमाची याचना करणारी दृश्य असतात. असो. ह्यावरून टिव्ही नविन आला होता (फक्त दूरदर्शन होतं) त्यावेळचा एक विनोद आठवला. तेंव्हा त्यावर चित्रपट दाखवले जायचे. अशाच एका टीव्ही समोर दोन लहान (केजी १ किंवा २ मधली) मुलं बसली आहेत. एक मुलगा आणि एक मुलगी. मुलगा मुलीला म्हणतो आहे,' रमेशची आई आहे नं, ती फार देवभोळी आहे, तिला अजूनही वाटतं देवबाप्पामुळे बाळ होतं'. असो.

पीबीएस चे कार्यक्रम सगळ्यात चांगले. क्लिफर्ड, क्युरीअस जॉर्ज, अँजलीना बॅलरीना, सुपर व्हाय इ. http://pbskids.org/ हे मुलांना लाउन देत चला. अमेरीकेत असाल लोकल चॅनलवर त्यांचे कार्यक्रम दिसतात. भीम, कृष्ण वगैरे कार्यक्रमातसुद्धा हिंसा दाखवतात, भडकपणा असतो. शिनचॅन वगैरे तर नकोच. मि. बीन्स त्यातल्यात्यात निरागस आहे. आपल्याकडे (भारतात) पीजी १३ वगैरे प्रकार नाहीत नाहीतर कार्यक्रमाचा अंदाज येतो. लेखाबद्दल : इतक्या लहान मुलांना असे प्रकार समजावायचे काही कारण नाही...त्यांना तेवढं समजत असेल असं वाटत नाही. आणि दुसर्‍याच्या मुलांना समजवायचं काय काम? तुम्हाला काळजी वाटली त्याच्या आई-बाबांना सांगायचं किंवा चर्चा करायची....नैतर पुढच्यावेळी जाल भांडायला!! :)

In reply to by शिल्पा ब

जॉर्जला ऊड्या मारताना पाहून जॉर्जने दाखवल्याप्रमाणे माझ्या मुलीने ­­लिव्हर तंत्र वापरले व तिच्या आईची शोकेस फोडली !

त्यापेक्षा डॉरेमोन बघा.नोबिता थोडा बुद्दू दाखवलाय पण ठीक आहे. त्यात कमीत कमी हिंसा तरी नाही पण सगळ्यांशी कसे वागावे ह्याचा धडा मिळतो. मस्त हलके फुलके मनोरंजन आहे.

In reply to by इरसाल

नाही हो... तेही काही फार चांगलं नाहीये... त्यात त्या शिझुकाला नेहमी बाथरूम मध्ये अंघोळिला गेलेली दाखवतात.. आणि मग नोबिता आणि डोरेमॉन ते पहातयेत... बर हे "चुकुन" नाही.. तर "मुद्दाम"... किंवा मग नोबिताच्या स्वप्नात तरी ती अंघोळ करत अस्ते... आणि हे घडत असताना, ह्या दोघंचेही चेहरे लाजुन गुलाबी झालेले दाखवतात.. आणि संवाद काहीसा असा.. "मुझे पता है के तुम्हे ये पसंद है... तुम्हे अच्छा लग रह है न??? " "नही..नही.. मैने कुछ नही देखा.." आणि हे बोलताना कमालीचा लाजलेला गुलाबी चेहरा... बाथरूम नसेल तर मग.. शिझुकाचा फ्रॉक उड्तोय.. मर्लिन मन्रो सारखा... आणि नोबिताचा परत गुलाबी चेहरा... मी हे किमान १० वेळा तरी पाहिलय... ह्याला काही "सेन्सोर" नाही का?? मुलं काही शिकतिल असं काही नाहीच का???

In reply to by पिलीयन रायडर

डोरेमॉनचं आमच्याकडेही जबरी अ‍ॅडिक्शन झालं आहे. शिन्चॅनपेक्षा आणि ते काहीतरी झुरळांचं किळसवाणं असतं त्या कार्टून्सच्या तुलनेत बरा म्हणून दाखवला गेला आणि डोरेमॉन डोक्यावर चढला. आता तर मला वाटतं कधीही टीव्ही लावा तो एका चॅनेलवर चालूच असतो. जवळजवळ २४ तास. शिझुकाचे तसले सीन परवडले. मला जास्त आवडत नाही तो नोबिताचा रडेपणा. काहीही झालं की डोरेमॉSSSSन मुझे बचाओ करुन डोळ्यातून रडूचे फवारे सुरु. बाकी सर्व ठीक आहे हो.. एवढे काय त्यात.. ते बाथरूमचं जरा ऑकवर्ड होतं हे खरंय. पण लहान पोरं अशा वेळी खट्याळपणेच बघत असतात. त्यात त्याहून जास्ती काही असेलसं वाटत नाही.

In reply to by गवि

आपण बघतो.. लहान मुलं असच करतात म्हणुन सोडुन देतो.. पण एखाद लहान मुलं बघतं , तेव्हा ते काय शिकत असेल?? मुळात ह्यातुन मुलांना मिळतच काय??? नोबिताचा रडेपणा? सुनियो चा स्वार्थीपणा? की त्या जाड्याची दादागिरी?? डोळे बिघडवुन घ्यायचे धंदे... शिन्चॅन तर का लहान मुलांसाठी आहे हेच मला कळ्त नाहि... किती घाणेरडं डिझाइन आहे त्या कार्टुन च...

In reply to by पिलीयन रायडर

मला टीका करायला आवडत नाही पण शिनचॅनच्या बाबतीत मात्र सरळसरळ विरोध करावासा वाटतो. उद्धटपणाचा अर्क.. काय ती फॅमिली. आईबाबा पैशासाठी वेडे. बाप तर नुसताच बियर घेऊन बसतो. आई जरा कुठे पैसेवाला दिसला की फ्लर्ट करायला मागेपुढे बघत नाही. एकमेकांना मारतात. वाट्टेल ते बोलतात. जरा बरी पोरगी दिसली की बाप तर पाघळतोच.. त्यावर कडी म्हणजे शिनचॅनही पाघळतो. आपली पोरं आपल्याला वाट्टेल ते बोलायला लागली आणि ते सहन होईनासं झालं तर शिनचॅन थांबवावा. तसं होत नसेल तर पाहू देत मग.

In reply to by गवि

+१० टु गवि, अगदी अगदी तो रडकेपणा घालवण्याचे १०० मार्ग असं पुस्तक लिहु शकेन मी आता, एवढा कंटाळलोय मी त्याला. त्यातल्या त्यात डोरा, पायरेटस ऑफ नो लँड आणि शॉन द शिप, हे भारी. शॉन द शिप, हे हिंदित बघा, हसुन हसुन वाट लागते, त्या मेंढ्यांना सैफ, आमिर आणि अजय देवगण यांच्या आवाजात ड्बिंग आहे. तसेच अजुन एक झिग अँड शार्को, हा पण प्रकार भारी आहे त्यात नाना पाटेकर आणि सर्किट्च्या आवाजात डबिंग आहे. ते झुरळांचे ऑगि अँड कॉकरोच, मधलं पण सनि देवलचं डबिंग मस्त आहे.

काहि वर्षांपूर्वीचा एक प्रसंगः आम्ही (बरेच जण होते) टिव्ही (विंग्रजी चित्रपट) बघत बसलो होतो. माझा भाचा (तेव्हा वय साधारण ३/४ असेल) तिथेच खेळत होता. अचानक त्या चित्रपटातील नायक नायिका आजुबाजुला चाललेले युद्ध, पडत्या बिल्डिंगा वगैरे विसरून चुंबनची आदलाबदल करण्यात मग्न झाले आनि नेमकं त्याच वेळी भाचा टिव्हीकडे टक लाऊन पहात होता. आता जर टिव्ही बंद केला तर त्याला जे पाहिलं त्यात विषेश वाटणार म्हणून तसाच चालु ठेवला. नंतर त्याने निरागसता काय म्हणतात त्या गुणाचा प्रत्यत देत आम्हाला अमूल्य माहिती दिली "ते बघितलं, त्या (पडणार्‍या बिल्डिंग वर बोट ठेऊन) 'बिड्लिंग' खालून ती लाल बश 'थ्री' वेळा अशी (इथे अ‍ॅक्शन) गेली" तेव्हा तुम्ही जे पहाताय तिथेच किंवा तेच मुले पाहत असतील असे समजू नका :)

In reply to by ऋषिकेश

आमच्या एका मित्राचा भाचा वय वर्षे ४ त्याच्याकडे सुट्टीत राहायला आल होता. बहुदा सतत काँप्युटर गेम्स काय खेळतो म्हणून मित्राने तो संगणक बंद केला. त्यावर हे भाचे महाराज त्याला म्हणाले "मामा पुन्हा चालु करून दे नाहीतर मी तुला बलवीर पाशा म्हणीन."

In reply to by ऋषिकेश

खालून ती लाल बश 'थ्री' वेळा अशी (इथे अ‍ॅक्शन) गेली" आणि तुम्हाला तिथुन बस गेल्याचाच पत्ता नसेल. लाल, निळी की पिवळी हा तर प्रश्नच नाही. :)

एकदा एक बाप टीव्हीवरचा फक्त दोन वस्त्रात वावरणार्‍या मुलींचा कार्यक्रम मोठ्या चवीने पाहात असतो. तेवढ्यात त्याचा शाळकरी मुलगा तिथे येतो आणि पाहतो. बापाला फार अपराधी वाटून तो म्हणतो, 'बिचार्‍या गरीब मुली आहेत कपड्यालाही पैसे नाहीत.' त्यावर मुलगा म्हणतो, 'ह्याहून 'गरीब' मुली पाहायच्या असतील तर माझ्याकडे सीडी आहे.'.

पिलु चे अभिनंदन ! २ रीत असल्यापासूनच तिला नारी शक्ती चे भान आहे . प्रश्न मिटला कशावरून ? २ रीत ल्या मुलाला तुम्ही काय समज दिली हे जाणून घ्यायला आवडेल .. या वयातल्या मुलांना साधारणपणे रोजच अनेक लोकांकडून वेगवेगळ्या कारणांसाठी रागावून घ्यायला लागते (नाईलाजाने) ..पण त्यातल्या किती गोष्टी लक्षात ठेवून परत केल्या जात नाहीत या बद्दल शंकाच आहे. आणि लहान मुलं ही अनुकरण करत असतात .. त्याचा त्यांना अर्थ माहित असतोच असे नाही.

गुड गॉड, हे २०११ चालु आहे ना नक्की. म्हणजे अशी प्रपोजल्स २ री ते आठवी किमान वर्षाला दोन करुन सुद्धा मार खाय्ची पाळी कधीच आली नाही. अगदी घरी सुद्धा माहीत होते. पण त्याना सुद्धा काहीही प्रॉब्लेम नव्हता.

In reply to by विनायक प्रभू

तुमच्या आजकालच्या प्रपोजल्स विषयी सुद्धा घरी माहिती असते का? ;)

सर्व प्रपोजल्सची संगतवार चर्चा होते.(डायनिंग टेबलवर) म्हणुनच तर चांगल्या देवा म्हटले आहे परा. असो. तुला यादृच्छिक प्रयोग म्हणजे काय ते माहीत आहे का?

In reply to by विनायक प्रभू

म्हणजे stochastic का ? नाही माहिती :( समजवा.

स्युडो रँडम पद्धत म्हणतात.

हे सगळ टिव्ही चेनल्स मुळेच होत असाव. आमच्या बालपणी आमची भातुकलीने सुरवात असायची, आई-बाबा खेळुन सुवर्णमध्य गाठायचो आणि करीयर ओरीयंटेड डॉक्टर-डॉक्टर खेळुन शेवट असे. असो$$$$ गेले ते दिन गेले cry