Skip to main content

राधा गौळण

लेखक पाषाणभेद यांनी शुक्रवार, 23/09/2011 06:08 या दिवशी प्रकाशित केले.
राधा गौळण
आळवणी करते कृष्णाची; राधा गौळण मी मथूरेची ||धृ|| दुध दही करण्यासाठी; बाजारी मथुरेच्या नेण्यासाठी पहाटेच उठूनी धारा काढीते गायींची ||१|| गोपींकांना सवेत घेवूनी; यमूना तिरावर रास खेळूनी वाट पाहते नंदलालच्या मुरलीची ||२|| मायेच्या पाशात न शिरण्या; मोहांपासूनी विलोभी होण्या आस लागली तुझ्या न माझ्या मिलनाची ||३|| - पाषाणभेद (दगडफोड्या) २३/०९/२०११

वाचने 1614
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

छान. आवडलं. आधीच्या चावनट धाग्यानंतर असं देवाचं लिहिल्याने तुम्हाला पुण्य लागेल. शंभो!!

In reply to by शिल्पा ब

हॅं हॅं हॅं आमचीं पापं पुण्यांची दोन्हीं तागडं एकां सरंळ रेषेंत राहण्याचीं आम्हीं काळजीं करतं असतों. त्यामूळें कधीं हें तर कधीं तें. असों. कवितां आवडलीं तें महत्वाचें. कसें शिवशंभो..................!!!!

In reply to by शिल्पा ब

आधीच्या चावनट धाग्यानंतर असं देवाचं लिहिल्याने तुम्हाला पुण्य लागेल
:-) डायरेक देवाचं लिहीलं तर?

In reply to by नगरीनिरंजन

लिहुन बघा अन आम्हाला सांगा काय वाटतंय ते...समजुन घ्यायला हवं तर विद्वानांची मदत घ्या.(मिपावरच बरेच विद्वान सापडतील.)