राधा गौळण
आळवणी करते कृष्णाची; राधा गौळण मी मथूरेची ||धृ||
दुध दही करण्यासाठी; बाजारी मथुरेच्या नेण्यासाठी
पहाटेच उठूनी धारा काढीते गायींची ||१||
गोपींकांना सवेत घेवूनी; यमूना तिरावर रास खेळूनी
वाट पाहते नंदलालच्या मुरलीची ||२||
मायेच्या पाशात न शिरण्या; मोहांपासूनी विलोभी होण्या
आस लागली तुझ्या न माझ्या मिलनाची ||३||
- पाषाणभेद (दगडफोड्या)
२३/०९/२०११
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1640
प्रतिक्रिया
4
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान. आवडलं. आधीच्या चावनट
छान. आवडलं.
आधीच्या चावनट धाग्यानंतर असं देवाचं लिहिल्याने तुम्हाला पुण्य लागेल.
शंभो!!
हॅं हॅं हॅं आमचीं पापं
In reply to छान. आवडलं. आधीच्या चावनट by शिल्पा ब
हॅं हॅं हॅं
आमचीं पापं पुण्यांची दोन्हीं तागडं एकां सरंळ रेषेंत राहण्याचीं आम्हीं काळजीं करतं असतों. त्यामूळें कधीं हें तर कधीं तें.
असों. कवितां आवडलीं तें महत्वाचें. कसें
शिवशंभो..................!!!!
आधीच्या चावनट धाग्यानंतर असं
In reply to छान. आवडलं. आधीच्या चावनट by शिल्पा ब
:-) डायरेक देवाचं लिहीलं तर?
लिहुन बघा अन आम्हाला सांगा
In reply to आधीच्या चावनट धाग्यानंतर असं by नगरीनिरंजन
लिहुन बघा अन आम्हाला सांगा काय वाटतंय ते...समजुन घ्यायला हवं तर विद्वानांची मदत घ्या.(मिपावरच बरेच विद्वान सापडतील.)