✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

(रमी)

प — पिवळा डांबिस, Sat, 09/17/2011 - 03:47
यासाठी वापरलेला कच्चा माल पत्तेजुडग्याच्या मंथनातून १३ रत्ने बाहेर आली. एक्का, तिर्री, दश्शी, गुलाम राजा वगैरे वगैरे. पण कुशल खेळाडूला रमी ही जमवावी लागते. ती रमी प्रकट झाल्यावर पत्ते उघड करण्याआधीच्या काही क्षणांवर ही लहान कविता आहे. त्रयोदश गुणी एक्का; नव्व्या, राजा ही लाभला असीमकौशल्ये प्रकटे रमी एकवर्णा, एकवंशा, क्वचित विदूषकस्पर्शा पाठराखीण जिची लक्ष्मी अवघड होणे ही जरा, तरी मालक मी अनुरूप तिजला लक्ष्मी ही जिची पाठराखीण आहे अशी ही स्वतः अतिशय चंचल रमी शेवटी तिच्या कर्त्याच्या चरणी लीन झाली. :)

प्रतिक्रिया द्या
6337 वाचन

💬 प्रतिसाद (23)

(No subject)

३_१४ विक्षिप्त अदिती
Sat, 09/17/2011 - 03:53 नवीन
Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.
  • Log in or register to post comments

हा हा हा मस्त विडंबन जमलेय.

पाषाणभेद
Sat, 09/17/2011 - 03:58 नवीन
हा हा हा मस्त विडंबन जमलेय. नव्या ऐवजी दस्सा नाही का मिळाला? काल मी "रम" विषय घेवून तिन ओळी बनवल्या होत्या. पण नंतर (फुलांची बाग) करतांना हा प्रयत्न सोडून दिला. (फारच थोड्या लोकांनी ती फुलबाग बघीतली. परदेशी पाहूणे आलेल्या पर्यटकांना ती फुलबाग सहन न झाल्याने माळ्याने नंतर ती फुलबाग उखडून टाकली. असो.) रमा, रमी झाली आता कुणीतरी 'रम' घ्या आता.
  • Log in or register to post comments

अरे वा डांबीस? किती छान लिहिल

अनामिक
Sat, 09/17/2011 - 04:13 नवीन
अरे वा डांबीस? किती छान लिहिल आहे. त्रयोदश गुणी एक्का; नव्व्या, राजा ही लाभला असीमकौशल्ये प्रकटे रमी अगदी सह्ज ताल येतो वाचता वाचता. सुंदर ! एकवर्णा, एकवंशा, क्वचित विदूषकस्पर्शा एक या शब्दाची द्विरुक्ती सुंदर ! पण क्वचित नंतर छोटासा पॉज घ्यावासा वाटतोय, अन मग विदूषकस्पर्शा, मला वाटतय 'राजा ही' नंतर पण एक पॉज चालेल पाठराखीण जिची लक्ष्मी अवघड होणे ही जरा, तरी मालक मी अनुरूप तिजला सुरेख हो ! सुरेख ! चारच ओळी पण सुरेख !
  • Log in or register to post comments

+१

स्पंदना
Sun, 09/18/2011 - 10:18 नवीन
हेच म्हणायला आले होते. खुपच छान अन अभ्यासपुर्ण काव्य !! सुरेख सुरेख!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनामिक

:)

सिद्धार्थ ४
Sat, 09/17/2011 - 04:29 नवीन
मस्त विडंबन जमलेय. :)
  • Log in or register to post comments

>> एकवर्णा, एकवंशा, क्वचित

शुचि
Sat, 09/17/2011 - 04:49 नवीन
>> एकवर्णा, एकवंशा, क्वचित विदूषकस्पर्शा >> =)) =)) =))
  • Log in or register to post comments

हेहेहे!

प्रियाली
Sat, 09/17/2011 - 06:12 नवीन
पिडांना रमी लागलेली दिसते
  • Log in or register to post comments

खतरनाक....

आत्मशून्य
Sat, 09/17/2011 - 06:24 नवीन
हॅहॅहॅ
  • Log in or register to post comments

+१

मूकवाचक
Sat, 09/17/2011 - 12:28 नवीन
खतरनाक ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आत्मशून्य

व्यसनप्रधान!

नगरीनिरंजन
Sat, 09/17/2011 - 06:45 नवीन
त्रयोदशगुणी एक्का, राजा वगैरे म्हणजे पत्त्यांतून रमी प्रकटली आणि तिची पाठराखीण लक्ष्मी आहे ही जुगाराची व्यसनप्रधान कल्पना मला टाकाऊ वाटते. त्यामुळे कवितेचा आस्वाद वगैरे घेणं मला जमणार नाही.
  • Log in or register to post comments

हा हा हा

शहराजाद
Sat, 09/17/2011 - 07:21 नवीन
फर्मास विडंबन
  • Log in or register to post comments

हॅ हॅ हॅ!!

चतुरंग
Sat, 09/17/2011 - 07:43 नवीन
जबराट हो पिडा! मस्तच जमवलीए की रमी!! ;) (रमी कशी खेळतात हे नेहेमीच विसरणारा) रंगा
  • Log in or register to post comments

हाहाहा!

पैसा
Sat, 09/17/2011 - 07:51 नवीन
लेखनाची क्याटेगरी "प्रेमकाव्य" वाचूनच ह.ह.पु.वा. एकच शंका आहे, >>रमी शेवटी तिच्या कर्त्याच्या चरणी लीन झाली. म्हणजे शेवट पत्ते फेकून दिलेत की काय?
  • Log in or register to post comments

मस्तच!

विकास
Sat, 09/17/2011 - 09:37 नवीन
मस्तच! =)) मला या निमित्ताने गदिमांची "रमी" नामक कविता आठवली! Image removed. Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments

वाह वाह... मस्त जमलीय रमी

सुहास झेले
Sat, 09/17/2011 - 10:10 नवीन
वाह वाह... मस्त जमलीय रमी :D :D
  • Log in or register to post comments

मस्त! कॉमॅ.

कॉमन मॅन
Sat, 09/17/2011 - 10:10 नवीन
मस्त! :) कॉमॅ.
  • Log in or register to post comments

लै भारी

चित्रा
Sat, 09/17/2011 - 10:51 नवीन
मस्तच विडंबन!
  • Log in or register to post comments

एकदा

श्रावण मोडक
Sat, 09/17/2011 - 11:00 नवीन
बसलं पाहिजे एकदा डाव जमवायला.
  • Log in or register to post comments

ग्लेनफिडिश बरोबर घेऊन

Nile
Sat, 09/17/2011 - 11:53 नवीन
बसलं पाहिजे एकदा डाव जमवायला.
सहमत. ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

रचनेचा प्रयत्न बराच चांगला

परिकथेतील राजकुमार
Sat, 09/17/2011 - 11:34 नवीन
रचनेचा प्रयत्न बराच चांगला आहे,,,पण हीचे व्रुत्त काय समजावे,की अनाव्रुत्त समजावे...पण अनाव्रुत्तही म्हणता येत नाही... राहुन राहुन काही तरी राहिल्यासारखे वाटते...
  • Log in or register to post comments

रम

विनायक प्रभू
Sat, 09/17/2011 - 13:19 नवीन
'रम' ला विसरलात? येउ द्यात. (प्रतिक्षेत विप्र)
  • Log in or register to post comments

रम

तिमा
Sat, 09/17/2011 - 17:02 नवीन
झणझणीत चटकदार चकणा, काजु, टिक्काही लाभला गांधीदिनी, निराश मन असता, म्हातारा भिक्षु हसला | सेलावरी कॉल करुनी, तो मित्रगण जमविला करर्र, दोन कॅट मिसळूनी, रमीचा डाव टाकिला| पेल्यावर पेले रिचवुनि, स्वर जेंव्हा उच्च जाहला उदरातील अग्नि प्रज्वलित, तो स्वर्ग उभा ठाकला ||
  • Log in or register to post comments

महान विडंबक पिडामास्तुर की

अत्रुप्त आत्मा
Sat, 09/17/2011 - 18:25 नवीन
महान विडंबक पिडामास्तुर की जय! ;-) ...की जय! ;-) ...की जय! ;-) बोला पुंडलिकानी वरुन जोरात हा..णली विटकर... :-D
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा