डॉ. स्ट्रेंजलव्ह ... आणि माझं स्फोटांवर प्रेम जडलं
"डॉ. स्ट्रेंजलव्ह" हा चित्रपट आपण पाहू या असं माईकने घरात जाहीर केलं तेव्हा सर्व ब्रिटीश घरमित्रांनी जोरात "हेऽऽऽ" करत गलका केला. त्यांच्या लेखी आम्ही काही "फकिन' फॉरीनर्स" मात्र एकमेकांकडे "हे काय नाव झालं का?" अशा चेहेर्यांनी पहात होतो. अर्थात असलं काहीतरी नाव बनवून आम्हाला बनवण्याचा म्याडपणा माईक करू शकतो अशीच खात्री त्यात जास्त होतो. तो दाणदाण पावलं वाजवत डीव्हीडी घेऊन टीव्हीरूममधे आलाही.
"Dr Strangelove: How I Learned to Stop Worrying and Love the Bomb" असं नाव असणार्या चित्रपटाबद्दल प्रचंड कुतूहल पोस्टर बघूनच निर्माण झालं. सबटायटल्सशिवाय समजणारा हा चित्रपट अशी एक टुकार ओळख मी करून देऊ शकते. चित्रपटाची गोष्ट विकिपीडीयावर, आयएम्डीबीवर आहे तर मी ती ही सांगत नाही. या चित्रपटाची गोष्ट सांगण्यापेक्षा त्यातल्या छोट्याश्याच विनोदी गोष्टी सांगून चित्रपट बघण्यासाठी वाचकांना उद्युक्त करावं असा माझा विचार आहे. फक्त त्यासाठी चार ओळींची पार्श्वभूमी: शीतयुद्धाच्या काळात हा चित्रपट घडतो. रश्या आणि अमेरिकेची शस्त्रास्त्र स्पर्धा, अंतराळ स्पर्धा आणि शांतीस्पर्धाही जोरदार सुरू आहे. एक म्याड अमेरिकन ब्रिगेडीयर जनरल रिपर, रश्याच्या आण्विक भट्ट्यांवर हल्ला करण्याचा फतवा काढतो. बराचसा चित्रपट अमेरिकेत घडलेला दाखवला आहे.
- दोघांचं भांडण सोडवण्यासाठी तिसरा त्यांना ओरडतो, "Gentlemen, you can't fight in here! This is the War Room!"
- डॉ. स्ट्रेंजलव्ह अमेरिकन राष्ट्राध्यक्षाही संबोधताना दोनदा 'माय फ्यूरर' असं म्हणतो आणि स्वतःची चूक सुधारत 'द प्रेसिडंट' म्हणतो. त्याचा एक हात नाझी झालेला असतो. दुसर्या हाताने तो हा नाझी हात सतत दाबायचा प्रयत्न करत असतो. पीटर सेलर्सचा डॉ. स्ट्रेंजलव्ह झबरदस्तच आहे.
- पीटर सेलर्सच्या एकूण तीन भूमिका या चित्रपटात आहेत. त्याने रंगवलेला ब्रिटीश आर्मीतला 'एक्सचेंज ऑफिसर' मँड्रेकही तेवढाच मजेशीर आहे. आपला बॉस रिपर याने विमानं मागे बोलवावीत यासाठी सदैव त्याचे क्षीण प्रयत्न सुरू असतात
- मँड्रेकला अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाला लवकरात लवकर फोन करून कोड सांगायचा असतो. इतर सर्व फोन लाईन तुटल्यावर तो पे-फोनचा वापर करतो. खिशातली नाणी संपत आली म्हणून तो अमेरिकन ऑफिसरला कोकाकोलाच्या मशीनवर गोळी घालून नाणी काढायला सांगतो. त्या ऑफिसरने मँड्रेकला "राष्ट्राध्यक्षाला तुझ्याशी बोलायचं नसेल तर कोका कोला कंपनी तुझ्यावर नुकसानीचा दावा गुदरेल" अशी धमकी देणं 'प्रसंगानुरूप'च म्हणायचं.
- टर्जीड्सन हा कडवा राष्ट्रवादी जनरल शांतताप्रेमी राष्ट्राध्यक्षाला सतत उचकवण्याचा प्रयत्न करत असतो. जेणेकरून रश्यावर आता एवीतेवी हल्लाबोल केलेला आहे तर मग आणखी बॉम्ज टाकू या. त्याचे संवाद इथे देण्यात अर्थ नाही आणि जॉर्ज स्कॉटच्या हावभाव, देहबोली, अभिनयाबद्दल लिहीणं अशक्य आहे.
- अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष आणि (ऐकू न येणारा) रशियन प्रीमीयर यांच्यातले सगळेच फोन-संवाद (का मोनोलॉग्ज?) हहपुवा आहेत. अमेरिका आणि रश्याने एकत्र येऊन अमेरिकन विमानांनी रश्यावर हल्ला करू नये याची उपाययोजना करणं हा त्यातला महान प्रकार.
- एअरफोर्स पायलट्सना 'इमर्जन्सी'साठी जो किट दिलेला असतो त्याची यादी वाचली जाते. प्रत्यक्षात काय दिलं जातं याची मला कल्पना नाही. तो भयंकर मोठा विनोद आहे; त्यावर तो वाचणाराच म्हणतो, "एवढ्या सामुग्रीवर व्हेगासमधे चिक्कार मजा करता येईल."
- शेवटी काही ठराविक लोकांनी खोल खाणीत जाऊन लपावं असं डॉ. स्ट्रेंजलव्हच्या सूचनेवरून ठरतं. मानवजात वाचवण्यासाठी खाणीत रहाणार्या पुरूषांना एक-स्त्री-व्रत तोडावं लागेल काय असा प्रश्न अमेरिकन टर्जीड्सनला पडतो. मूळचा जर्मन, नाझी डॉ. स्ट्रेंजलव्ह त्याला 'खेदाने' होकार देतो. आणि या सर्व कल्पनेला उचलून धरतो तो रश्यन राजदूत, " I must confess, you have an astonishingly good idea there, Doctor."
वर्गीकरण
प्रतिक्रिया
डॉ. स्ट्रेंजलव्ह
Gentlemen, you can't fight in here! This is the War Room
नाही रे, मराठीतले
जरुर बघावा लागेल...
गेल्या काही दिवसांपासून
सहमत...
तुमच्या शुद्धलेखनाला
कळकळ समजली. बरोबर टायपायचा
शुध्दलेखन
+१
आमास्नी बी 'रश्या'
आय-रॅक
चुकांची दुरुस्ती
>>माझ्या ओळखीतली रश्यन लोकं
त्यांना करु द्या हो कसाही.
>> मी ते ही बदलायचं बदलायचं
आज दुपारीच डाऊनलोड केला आहे.
चांगला लेख. आवडला.
सिनेमा छान आहे.
बर्यापैकी असहमत
शीतयुद्धाचे संदर्भ माहित नसले
डाऊनलोड करायला लावला आहे
मी सुद्धा.....
अगदि अगदि....
मस्तच
+१
पार्टी? अब्रह्मण्यम!
?
थे पर्त्य अर्थात द पार्टी
डाऊनलोडिंगला लावला आहे....
थे पर्त्य लवकरच बघण्यात आल्या
बघायला पाहिजे
ओक्के
डाऊनलोडायला लावतो!
डाऊनलोडला लावण्यात आला आहे...
हा चित्रपट २-३ वर्षापूर्वी पाहिला होता, एवढा काही खास वाटला नाही
जगातील सर्वोत्तम विनोदी
मस्त!
+१
बघणार
चित्रपट आवडला. टर्जिडसन कहर
छान
हॉलीवूडच्या सटिरिकल
ह्ह्म्म्म......... बघायला