Skip to main content

पाहूच की

लेखक मिसळलेला काव्यप्रेमी यांनी बुधवार, 14/09/2011 16:26 या दिवशी प्रकाशित केले.
पाण्याला आवड असून चालत नाही रंगांची अन् आरशाला प्रतिमांची . आरशाला तरी मुभा असते अंधारात डोळे मिटण्याची कवीला मात्र पाण्यासारखेच राहावे लागते अंधार असो वा उजेड नावड असो वा आवड त्याला लिहावीच लागते, हृदयातून उमटणारी ओळ . जसे पाण्याला घ्यावाच लागतो, त्यात मिसळणारा रंग . पडलाच उजेड तर दिसेलच कि जगाला पाण्याचा रंग आणि कवीची ओळ म्हणूनच मी निवांत आहे . माझ्या ओळीच्या प्रारब्धिही असेलच कि उजेड उजळेल तेव्हा पाहूच की |- मिसळलेला काव्यप्रेमी -| (१४/०९/२०११)
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 3272
प्रतिक्रिया 21

प्रतिक्रिया

मस्त हो मिका.
पाण्याला आवड असून चालत नाही रंगांची अन् आरशाला प्रतिमांची
हे बेष्टच. लै दिसानी आलासा ?

कवीला मात्र पाण्यासारखेच राहावे लागते अंधार असो वा उजेड नावड असो वा आवड त्याला लिहावीच लागते, हृदयातून उमटणारी ओळ छान ओळी. प्रारब्धिही हा शब्द तितका सहज वाचता येत नाही, असे वाटले.

माझ्या ओळीच्या प्रारब्धिही असेलच कि उजेड उजळेल तेव्हा पाहूच की.... जे ब्बात... ये हींमत अच्छी लगी... :-)

मिका कविसमाजाच्या मनातले लिहून कविसमाजासाठी योग्य योगदान दिले आहे. जय कविसमाज!! पाभे (कविसमाजाध्यक्ष)

In reply to by पाषाणभेद

>>जय कविसमाज!! =)) =)) पाभेंना अभिप्रेत आहे की नाही कोण जाणे पण आम्हाला आणखी एक 'स्पेस' दिसते आहे या शब्दात. :)

खरच पाण्याला आवड असून चालत नाही रंगांची अन् आरशाला प्रतिमांची ???? मस्त. पहिल्या ओळीतच दिल बेहद्द खुष ! मांगो मिका आज कुछ भी मांगो। दिन बना दिया आपने मेरा ।

मस्तच!! पण ही आधी प्रसिद्ध केली होतीस का कुठे? वाचल्यासारखी वाटतेय. ( चोरीचा आरोप नव्हे बरं हा :P )

In reply to by स्वानन्द

ऑर्कुटवर प्रसिद्ध केली होती, शिवाय माझ्या खरडवहीवरही होती काही दिवस!!

कविता, कल्पना आवडली.. आरशाचे रुपकही चांगले होते.. ते मधेच का सोडले? (अर्थात कवीचे स्वातंत्र्य वगैरे मान्य आहेच!)

१ नंबर!!!! आरशाला तरी मुभा असते अंधारात डोळे मिटण्याची कवीला मात्र पाण्यासारखेच राहावे लागते अंधार असो वा उजेड नावड असो वा आवड त्याला लिहावीच लागते, हृदयातून उमटणारी ओळ हे खूप खूप खूप खूप खूपच छान लिहिले आहे... तोडच नाही. अनन्यच!!

त्याला लिहावीच लागते, हृदयातून उमटणारी ओळ ही ओळ फाराच आवडली