✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

पाहूच की

म — मिसळलेला काव्यप्रेमी, Wed, 09/14/2011 - 16:26
पाण्याला आवड असून चालत नाही रंगांची अन् आरशाला प्रतिमांची . आरशाला तरी मुभा असते अंधारात डोळे मिटण्याची कवीला मात्र पाण्यासारखेच राहावे लागते अंधार असो वा उजेड नावड असो वा आवड त्याला लिहावीच लागते, हृदयातून उमटणारी ओळ . जसे पाण्याला घ्यावाच लागतो, त्यात मिसळणारा रंग . पडलाच उजेड तर दिसेलच कि जगाला पाण्याचा रंग आणि कवीची ओळ म्हणूनच मी निवांत आहे . माझ्या ओळीच्या प्रारब्धिही असेलच कि उजेड उजळेल तेव्हा पाहूच की |- मिसळलेला काव्यप्रेमी -| (१४/०९/२०११)

प्रतिक्रिया द्या
3250 वाचन

💬 प्रतिसाद (21)

व्वा..! बर्‍याच दिवसांनी

किसन शिंदे
Wed, 09/14/2011 - 16:29 नवीन
व्वा..! बर्‍याच दिवसांनी लिहते झालात.
  • Log in or register to post comments

काव्य आवडले

जाई.
Wed, 09/14/2011 - 18:13 नवीन
काव्य आवडले
  • Log in or register to post comments

छान !

परिकथेतील राजकुमार
Wed, 09/14/2011 - 18:16 नवीन
मस्त हो मिका.
पाण्याला आवड असून चालत नाही रंगांची अन् आरशाला प्रतिमांची
हे बेष्टच. लै दिसानी आलासा ?
  • Log in or register to post comments

छान कविता.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 09/14/2011 - 18:29 नवीन
कवीला मात्र पाण्यासारखेच राहावे लागते अंधार असो वा उजेड नावड असो वा आवड त्याला लिहावीच लागते, हृदयातून उमटणारी ओळ छान ओळी. प्रारब्धिही हा शब्द तितका सहज वाचता येत नाही, असे वाटले.
  • Log in or register to post comments

>>पाण्याला आवड असून चालत नाही

नगरीनिरंजन
Wed, 09/14/2011 - 19:10 नवीन
>>पाण्याला आवड असून चालत नाही रंगांची अन् आरशाला प्रतिमांची हो ओळ छान चमकली!
  • Log in or register to post comments

माझ्या ओळीच्या

अत्रुप्त आत्मा
Wed, 09/14/2011 - 23:49 नवीन
माझ्या ओळीच्या प्रारब्धिही असेलच कि उजेड उजळेल तेव्हा पाहूच की.... जे ब्बात... ये हींमत अच्छी लगी... :-)
  • Log in or register to post comments

मिका कविसमाजाच्या मनातले

पाषाणभेद
गुरुवार, 09/15/2011 - 02:10 नवीन
मिका कविसमाजाच्या मनातले लिहून कविसमाजासाठी योग्य योगदान दिले आहे. जय कविसमाज!! पाभे (कविसमाजाध्यक्ष)
  • Log in or register to post comments

>>जय कविसमाज!! =))

नगरीनिरंजन
Fri, 09/16/2011 - 12:00 नवीन
>>जय कविसमाज!! =)) =)) पाभेंना अभिप्रेत आहे की नाही कोण जाणे पण आम्हाला आणखी एक 'स्पेस' दिसते आहे या शब्दात. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाषाणभेद

ननि ती 'स्पेस' आम्हासही दिसली

किसन शिंदे
Fri, 09/16/2011 - 13:13 नवीन
ननि ती 'स्पेस' आम्हासही दिसली बर. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन

कधी विचारच नाही केला.

स्पंदना
गुरुवार, 09/15/2011 - 05:32 नवीन
खरच पाण्याला आवड असून चालत नाही रंगांची अन् आरशाला प्रतिमांची ???? मस्त. पहिल्या ओळीतच दिल बेहद्द खुष ! मांगो मिका आज कुछ भी मांगो। दिन बना दिया आपने मेरा ।
  • Log in or register to post comments

मस्तच!! पण ही आधी प्रसिद्ध

स्वानन्द
गुरुवार, 09/15/2011 - 20:59 नवीन
मस्तच!! पण ही आधी प्रसिद्ध केली होतीस का कुठे? वाचल्यासारखी वाटतेय. ( चोरीचा आरोप नव्हे बरं हा :P )
  • Log in or register to post comments

हो

मिसळलेला काव्यप्रेमी
Fri, 09/16/2011 - 11:04 नवीन
ऑर्कुटवर प्रसिद्ध केली होती, शिवाय माझ्या खरडवहीवरही होती काही दिवस!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वानन्द

काव्य आवडले.

अभिजीत राजवाडे
Fri, 09/16/2011 - 08:14 नवीन
छान आणि ओघवते आहे.
  • Log in or register to post comments

मस्तच...आवडली !! पहिल्या

सुहास झेले
Fri, 09/16/2011 - 11:28 नवीन
मस्तच...आवडली !! पहिल्या दुनोळीत पकड घेतली कवितेची...
  • Log in or register to post comments

कविता, कल्पना आवडली..

ऋषिकेश
Fri, 09/16/2011 - 12:02 नवीन
कविता, कल्पना आवडली.. आरशाचे रुपकही चांगले होते.. ते मधेच का सोडले? (अर्थात कवीचे स्वातंत्र्य वगैरे मान्य आहेच!)
  • Log in or register to post comments

१ नंबर!!!! आरशाला तरी मुभा

निनाव
Fri, 09/16/2011 - 18:09 नवीन
१ नंबर!!!! आरशाला तरी मुभा असते अंधारात डोळे मिटण्याची कवीला मात्र पाण्यासारखेच राहावे लागते अंधार असो वा उजेड नावड असो वा आवड त्याला लिहावीच लागते, हृदयातून उमटणारी ओळ हे खूप खूप खूप खूप खूपच छान लिहिले आहे... तोडच नाही. अनन्यच!!
  • Log in or register to post comments

आवडली

रामदास
गुरुवार, 09/22/2011 - 21:52 नवीन
त्याला लिहावीच लागते, हृदयातून उमटणारी ओळ ही ओळ फाराच आवडली
  • Log in or register to post comments

छान...

मदनबाण
Fri, 09/23/2011 - 10:15 नवीन
छान... :)
  • Log in or register to post comments

व्वा!!!!!!!!

अनिदेश
गुरुवार, 02/21/2013 - 17:16 नवीन
मस्त :)
  • Log in or register to post comments

जियो! एकदम खणखीत!!

इनिगोय
गुरुवार, 02/21/2013 - 18:40 नवीन
जियो! एकदम खणखीत!!
  • Log in or register to post comments

जियो! एकदम खणखणीत!!

इनिगोय
गुरुवार, 02/21/2013 - 18:41 नवीन
जियो! एकदम खणखणीत!!
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा