✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

एक स्वतःची भाषा

आ
आशु जोग यांनी
गुरुवार, 09/15/2011 - 00:14  ·  लेख
लेख
मिसळीवर वावरताना आपल्या लक्षात येइल. मिसळीची एक स्वतःची भाषा आहे. काही स्वतःचे शब्द आहेत. आपण त्याची यादी करुया उदा... मोठे व्हा जिलब्यापाडू लिखाण हलवाई भंपक आपल्याला आठवणार्‍या शब्दांची आपण भर घालावी ---
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
नृत्य
धोरण
संस्कृती
म्हणी
भाषा
वाक्प्रचार
वाङ्मय
शिक्षण
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
विचार
मत
प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
44751 वाचन

💬 प्रतिसाद (163)

प्रतिक्रिया

वॄत्ती

आशु जोग
गुरुवार, 09/15/2011 - 00:15 नवीन
मिसळीची जशी स्वतःची भाषा आहे तशीच स्वतःची एक वॄत्ती आहे ती आमचे काही आदरणीय सदस्य लवकरच दाखवतील (बस ! थोडासा इंतजार)
  • Log in or register to post comments

सहमत!!!

भुमन्यु
Fri, 02/22/2013 - 13:50 नवीन
+१ .... आगदी सहमत..... प्रतिक्रियांच्या प्रतिक्षेत....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आशु जोग

वाढदिवसाच्या शुभेच्छा

मी-सौरभ
गुरुवार, 09/15/2011 - 00:45 नवीन
:)
  • Log in or register to post comments

बरोबर!

पिवळा डांबिस
गुरुवार, 09/15/2011 - 02:30 नवीन
अजून काही.... १. बाजार उठवला २. टेंपोत बसवला ३. या वीकांताला नक्की करीन ४. ड्वाळे पानावले ५. इनो घ्या . . . . १०. फक्त निरिक्षण नोंदवले. बाकी चालू द्या... :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मी-सौरभ

नावांचा अपभ्रंश

चेतन सुभाष गुगळे
गुरुवार, 09/15/2011 - 01:10 नवीन
इथले काही सदस्य सर्रास दुसर्‍या सदस्याच्या नावाचा अपभ्रंश करतात. ज्याने टोपण नाव धारण केले आहे त्याला कदाचित वाईट वाटत नसेल, पण ज्यांची खरी नावे आहेत त्यांना असे केल्यावर त्रास होतोच ना? अजुन एक प्रकार म्हणजे नावाचे आणि आडनावाचे पहिले अक्षर जोडून भलताच शब्द बनविणे. हजारो शब्द टंकण्याची क्षमता असलेले लोक केवळ श्रम वाचविण्याकरिता असले उपद्व्याप करतात असे मला वाटत नाही. (खरं तर copy paste ची सुविधा असताना श्रम कसले पडतात?) यात त्या सदस्याला चिडविण्याचाच उद्देश दिसून येतो. निदान मला तरी कोणी माझा अशा प्रकारे उल्लेख केलेला आवडत नाही.
  • Log in or register to post comments

काहीतरी गैरसमज होतोय का? इथे

अनामिक
गुरुवार, 09/15/2011 - 01:34 नवीन
काहीतरी गैरसमज होतोय का? इथे नावाचे संक्षिप्त रुप हे सहजगत्या दिले जाते. उदा. गवी असो की घासुगुर्जी, मुसुशेठ असोत किंवा विप्र, श्रामो असोत की बिका... कुणीही कुणाची टर उडवण्याकरता असे करत नाहीत. शिवाय ज्यांच्या नावाचे संक्षिप्तरुप केले जाते त्यांचाही काही आक्षेप नाही. त्या-त्या सदस्याशी बोलताना सोपे पडावे म्हणून असे केले जात असावे, आणि एकदा का ते नाव रुळले की सर्रास वापरात येणे होणारच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चेतन सुभाष गुगळे

तुमचाही काहीतरी गैरसमज झालाय..

चेतन सुभाष गुगळे
गुरुवार, 09/15/2011 - 01:49 नवीन
गवि हे संक्षिप्तरूप नाही. इथे पाहा. http://www.misalpav.com/user/12865 त्यांनी धारण केलेले नाव तितकेच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनामिक

नाही आधिचे त्यांचे नाव

अनामिक
गुरुवार, 09/15/2011 - 02:02 नवीन
नाही आधिचे त्यांचे नाव गगनविहारी होते... सगळे त्यांना गवी म्हणायला लागल्यावर त्यांनी त्यांचा आयडीच गवी एवढा मर्यादित ठेवलाय. कोणत्या गोष्टीचा बाऊ करायचा आणि कोणत्या गोष्टीचे वाईट वाटून घ्यायचे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चेतन सुभाष गुगळे

:-)

३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 09/15/2011 - 02:06 नवीन
अनामिक असं नाव धारण करणारा आयडीचे नावाबद्दलचे विचार वाचून सुसंगती जाणवली. (दोन नावांची तरीही नावं ठेवणारी) अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनामिक

(दोन नावांची तरीही नावं

अनामिक
गुरुवार, 09/15/2011 - 02:12 नवीन
(दोन नावांची तरीही नावं ठेवणारी) अदिती कोणती, कोणती? आता अभ्यास वाढवा म्हणू नकोस.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

+१

Nile
गुरुवार, 09/15/2011 - 02:13 नवीन
सहमत आहे. हो विक्षिप्त काकू, चला नाव घ्या आता!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनामिक

तु नाव घ्या म्हंटल्यावर अदिती

अनामिक
गुरुवार, 09/15/2011 - 02:16 नवीन
तु नाव घ्या म्हंटल्यावर अदिती अगदी लाजून "घड्यावर घडे, सात सात घडे...." असं काहीतरी तर सुरु नाही ना करणार असं वाटून गेलं बघ!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

इश्श! असं कसं नाव घ्यायचं

३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 09/15/2011 - 02:40 नवीन
इश्श! असं कसं नाव घ्यायचं सगळ्यांसमोर?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनामिक

काय नाय ओ. चालतंय की.

पाषाणभेद
गुरुवार, 09/15/2011 - 02:45 नवीन
काय नाय ओ. चालतंय की. आता एवढे नाव घ्या नाव घ्या म्हनुं र्‍हायलेत तर घ्या की ओ नाव.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

शी बै

३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 09/15/2011 - 02:47 नवीन
अच्रत, बव्लत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाषाणभेद

छान छान..

योगी९००
गुरुवार, 09/15/2011 - 09:42 नवीन
अच्रत, बव्लत छान नावे घेतली तुम्ही....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

ठेंकू

३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 09/15/2011 - 09:47 नवीन
;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगी९००

नावं

नितिन थत्ते
गुरुवार, 09/15/2011 - 09:52 नवीन
ओ, तुम्हाला नावं घ्यायला सांगितली. त्यांना तुम्ही घरात काय म्हणता ते नाही विचारलं !!!! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

स्वानुभव

३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 09/15/2011 - 10:03 नवीन
स्वानुभवाचा "फायदा" झालेला दिसतोय! ;-) नेहेमीप्रमाणे अंमळ गल्लत होते आहे चिच्चा तुमची! माझी दोन नावं आहेत, तीसुद्धा जन्मदात्यांनीच ठेवलेली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

इश्श! बापरे......... तुम्हाला

विजुभाऊ
Fri, 09/16/2011 - 16:00 नवीन
इश्श! बापरे......... तुम्हाला असे काही शब्द माहीत असतील असे वाट्ले नव्हते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

छ्या!

ऋषिकेश
गुरुवार, 09/15/2011 - 09:52 नवीन
म्हंटल्यावर अदिती अगदी लाजून "घड्यावर घडे, सात सात घडे...." असं काहीतरी तर सुरु नाही ना करणार असं वाटून गेलं
छ्या! मला वाटलं 'सूर्यमालेच्या कोनाड्यात ठेवले सात ग्रह आणि अबकचं नाव घेते माझा ग्रह पहिला' असा उखाणा असेल म्हणून
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनामिक

=))

३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 09/15/2011 - 10:01 नवीन
भलतेच ग्रह हां तुझे ऋ! असलं काहीतरी बोलले तर माझेच ग्रह फिरतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश

'सूर्यमालेच्या कोनाड्यात

बिपिन कार्यकर्ते
Fri, 09/16/2011 - 15:12 नवीन
'सूर्यमालेच्या कोनाड्यात ठेवले सात ग्रह आणि अबकचं नाव घेते माझा ग्रह पहिला'
=)) ... अगदी दोन अक्षरांनी हुकला बघ उखाणा! ;) बाकी असला अगदी वर्जिनल उखाणा लिहिल्याबद्दल ऋचे अभि?नंदन!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश

>>कोणत्या गोष्टीचा बाऊ

मी ऋचा
गुरुवार, 09/15/2011 - 10:41 नवीन
>>कोणत्या गोष्टीचा बाऊ करायचा प्रतिक्रियेत वर गविंचे नाव आल्याने वरील वाक्य चुकुन "कोणत्या गोष्टीचा ब्राऊ करायचा असे वाचले ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनामिक

हॅ हॅ हॅ

योगी९००
गुरुवार, 09/15/2011 - 11:12 नवीन
प्रतिक्रियेत वर गविंचे नाव आल्याने वरील वाक्य चुकुन "कोणत्या गोष्टीचा ब्राऊ करायचा असे वाचले हॅ हॅ हॅ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मी ऋचा

चेतन आणि अनामिक तुम्ही शाजी

५० फक्त
गुरुवार, 09/15/2011 - 11:33 नवीन
चेतन आणि अनामिक तुम्ही शाजी पराठा कट्ट्याला आला असता ना तर तुम्हाला बरंच काही कळालं असतं गगनविहारी ते गवि बद्दल असो..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनामिक

आमाला शाजी पराठा खायला कोणी

अनामिक
गुरुवार, 09/15/2011 - 18:04 नवीन
आमाला शाजी पराठा खायला कोणी बोलावलंच नाही :( आणि आमी बोलावणं आल्याशिवाय कुट्टं बी जात न्हाई :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

गवी असो की घासुगुर्जी,

बिपिन कार्यकर्ते
Fri, 09/16/2011 - 15:10 नवीन
गवी असो की घासुगुर्जी, मुसुशेठ असोत किंवा विप्र, श्रामो असोत की बिका...
बरोबर रे अन्या! मला तर ते नाव चिकटलेच आहे.. इतके की मला अगदी लहानपणापासून ओळखणारी एक व्यक्ती आता त्याच नावाने हाक मारते मला! :( ... मला तर अजिबात आवडत नाही ते नाव... पण काय करणार! मागे त्या चक्रम अदितीने एक भले मोठ्ठे लांबलचक नाव पाडले होते मला त्यापेक्षा हे बरे! असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनामिक

निदान मला तरी कोणी माझा अशा

सोत्रि
गुरुवार, 09/15/2011 - 10:05 नवीन
निदान मला तरी कोणी माझा अशा प्रकारे उल्लेख केलेला आवडत नाही.
तुमच्या आवडीनिवडींची जेवढी काळजी घेता तेवढीच दुसर्‍यांच्याही घेत चला. इथे टोपणनाव घेउन वावारणार्‍यांचा एक उद्देश असतो टोपणनाव घेण्याचा. तुम्ही मात्र सगळ्यांच्या खर्‍या नावाचा उल्लेख कर करुन प्रतिसादावर प्रतिसाद देत असता. ह्यावर काही जणांनी निषेध नोंदवला आहेच ऑलरेडी. मलाही मला माझ्या इथल्या टोपणनावाने संबोधले गेलेले आवडते. आशा आहे आपण ह्यापुढे दुसर्‍यांच्या आवडीनिवडींपण विचार कराल. - (टोपणनाव आवडणारा) सोकाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चेतन सुभाष गुगळे

अगदी हेच म्हणणार होतो.

विश्वनाथ मेहेंदळे
गुरुवार, 09/15/2011 - 11:51 नवीन
अगदी हेच म्हणणार होतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोत्रि

स्वताकडे बघा

शाहिर
गुरुवार, 09/15/2011 - 16:39 नवीन
तुम्ही सुद्धा ज्याम्ची खरोकर्चि नावे महित अहेत तीच वापरता ,, ए खाद्या संस्थळावर जर एक व्यक्ती टोपण नावाने असेल तर तुम्ही त्यांचे खरे नाव घेउन ) प्रतिसादा मधे) त्या व्यक्तीची प्रायव्हसी भंग करत आहत ..हे टोपण नावांपेक्षा वाइट अहे..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चेतन सुभाष गुगळे

हे पुन्हा वाचा.

चेतन सुभाष गुगळे
गुरुवार, 09/15/2011 - 01:44 नवीन
<< ज्याने टोपण नाव धारण केले आहे त्याला कदाचित वाईट वाटत नसेल, पण ज्यांची खरी नावे आहेत त्यांना असे केल्यावर त्रास होतोच ना? >> << निदान मला तरी कोणी माझा अशा प्रकारे उल्लेख केलेला आवडत नाही >> इतरांचं मला माहीत नाही, पण माझ्याबाबतीत तरी मी अनेकदा स्पष्ट सांगितलंय तरी काही जण मुद्दाम असं करतात... तुमच्या << शिवाय ज्यांच्या नावाचे संक्षिप्तरुप केले जाते त्यांचाही काही आक्षेप नाही. >> ह्या वाक्याला काहीच अर्थ नाही, कारण माझा आक्षेप मी नोंदविला आहेच...
  • Log in or register to post comments

बरं झालं तुम्ही हे स्पष्ट

नगरीनिरंजन
गुरुवार, 09/15/2011 - 06:17 नवीन
बरं झालं तुम्ही हे स्पष्ट सांगितलंत. इथून पुढे मी तरी तुम्हाला चेतन सुभाष गुगळे या पूर्ण नावानेच संबोधिन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चेतन सुभाष गुगळे

धन्यवाद.

चेतन सुभाष गुगळे
गुरुवार, 09/15/2011 - 10:43 नवीन
नावांचा उल्ले़ख करण्याच्या काही पद्धती आहेत (मी ठरविलेल्या नाहीत, पुर्वीपासूनच आहेत). त्या अशा :- नाव - मधले नाव - आडनाव वामन हरी पेठे नाव - आडनाव लता मंगेशकर आडनाव - नाव - मधले नाव सरकारी कागदपत्रांमध्ये अवलंबिली जाणारी पद्धत नावाचे आद्याक्षर - मधल्या नावाचे आद्याक्षर - आडनाव पु. ल. देशपांडे नावाचे इंग्रजी आद्याक्षर - मधल्या नावाचे इंग्रजी आद्याक्षर - आडनाव जी. ए. कुलकर्णी वरीलपैकी कुठल्याही पद्धतीत आडनावाचा पुर्ण उल्लेख केला जातो. आडनावाचे आद्याक्षर घेतले गेल्यास ते इंग्रजी असते. वी. शांताराम आडनावाचे केवळ मराठी आद्याक्षर घेण्याची कुठली ही रुढ पद्धत मला तरी दिसून आलेली नाही. इथे असे करण्यात चिडविण्याचा हेतू दिसून येतो. त्यामुळेच मी या पद्धतीवर आक्षेप नोंदविला आहे. बाकी आपल्या सहकार्याबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन

>>आडनावाचे केवळ मराठी

विश्वनाथ मेहेंदळे
गुरुवार, 09/15/2011 - 11:40 नवीन
>>आडनावाचे केवळ मराठी आद्याक्षर घेण्याची कुठली ही रुढ पद्धत मला तरी दिसून आलेली नाही. तुम्ही गोनीदा हे नाव ऐकले आहे का हो ?? त्यातील "दा" हा बंगालीतला "दा" नाही असे निरीक्षण नोंदवू इच्छितो. >>इथे असे करण्यात चिडविण्याचा हेतू दिसून येतो. त्यामुळेच मी या पद्धतीवर आक्षेप नोंदविला आहे. गुगळे, आपण (म्हणजे आपण सगळे) इयत्ता तिसरी किंवा चौथीत आहोत का हो ? अपमान करण्याच्या अनेक चांगल्या पद्धती असताना, हे असे कोण कशाला चिडवेल ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चेतन सुभाष गुगळे

<< तुम्ही गोनीदा हे नाव ऐकले

चेतन सुभाष गुगळे
गुरुवार, 09/15/2011 - 12:07 नवीन
<< तुम्ही गोनीदा हे नाव ऐकले आहे का हो ?? त्यातील "दा" हा बंगालीतला "दा" नाही असे निरीक्षण नोंदवू इच्छितो.>> त्यांच्या आडनावाचे आद्याक्षर असेल तर दा वर अनुस्वार हवा. << आपण (म्हणजे आपण सगळे) इयत्ता तिसरी किंवा चौथीत आहोत का हो ? >> आपण सगळे एकाच वर्गवारीत येतो का? म्हणजे तुम्ही, मी व इतर अनेक मान्यवर सोडले तर काही मंडळी तिसरी चौथीच्याही खालच्या पातळीवर येऊन प्रतिसाद देतात. म्हणूनच संपादकांना नंतर त्यांचे प्रतिसाद उडवावे लागतात. या धाग्यावर काल रात्री दिसणारे काही प्रतिसाद आज गायब झालेले तुम्हाला जाणवले नाही का? << अपमान करण्याच्या अनेक चांगल्या पद्धती असताना, हे असे कोण कशाला चिडवेल ? >> त्या पद्धती समजण्यासाठी तेवढी बौद्धिक पात्रता सगळ्यांकडे असतेच असे नाही. शिवाय हे झटपट आणि आयतं उपलब्ध होतं. शिवाय तुम्ही म्हणता तसे हे अपमान करण्यासाठी वापरण्यात येणारे संबोधन नसेल तर आद्याक्षरानंतर ठिपका देण्यात यावा अन्यथा वेगळाच अर्थ निघतो. जसे की इथल्याच संकेतस्थळावरील एक ज्येष्ठ व मान्यव सदस्य यांचे नाव सुधीर काळे आहे. जर त्यांचे नाव या पद्धतीत लिहायचे झाले तर सु.का. असे लिहायला हवे. टिंब वगळून एकापुढे एक आद्याक्षरे मांडल्यास तिसरा वेगळाच शब्द होईल व त्याचा भलताच अर्थ होईल. ज्याला असा अर्थ अभिप्रेत आहे, ती व्यक्ती मुद्दाम च तसा उल्लेख करण्याची शक्यता आहे. बाकी अत्रे पीके आये है आणि देसाई माका दूध पी रहे है सारखे विनोद टिंब वगळल्यामुळेच घडले आहेत. शिवाय ही मंडळी तेव्हा तिसरी / चौथीत नव्हती तरी त्यांनी अशी चिडवा चिडवी केलीच की.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

>>त्यांच्या आडनावाचे

विश्वनाथ मेहेंदळे
गुरुवार, 09/15/2011 - 14:05 नवीन
>>त्यांच्या आडनावाचे आद्याक्षर असेल तर दा वर अनुस्वार हवा. तुम्हाला खरोखरच असे वाटते का की तो "दा" दाण्डेकर (हा शब्द असाही लिहितात) मधला नाही आहे? केवळ वादासाठी वाद घालत असाल तर चालू द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चेतन सुभाष गुगळे

तुम्ही बै भारीच गंभीर होता हो

शिल्पा ब
गुरुवार, 09/15/2011 - 11:42 नवीन
तुम्ही बै भारीच गंभीर होता हो चेगुसु!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चेतन सुभाष गुगळे

शिल्पातै,

प्रास
गुरुवार, 09/15/2011 - 11:49 नवीन
खर्रं खर्रं सांगा हं.... तुम्हाला 'चेसुगु' म्हणायचं होतं ना....? ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

आवरा!

नगरीनिरंजन
गुरुवार, 09/15/2011 - 11:52 नवीन
नाहीतर ते मिपा सोडून जातील आणि आपण पुढील काळातल्या वाचनानंदाला मुकू.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रास

वाचनानंद नव्हे चिडविण्यातला आनंद

चेतन सुभाष गुगळे
गुरुवार, 09/15/2011 - 12:50 नवीन
<< नाहीतर ते मिपा सोडून जातील आणि आपण पुढील काळातल्या वाचनानंदाला मुकू. >> अनेकदा सोडून गेलो आहे, पण ज्यांना माझे लेखन आवडते ते मला व्यक्तिगत संपर्क करतात आणि इथे लेख टाकण्यास सुचवितात. त्यामुळे मी सुखावतो आणि पुन्हा इथे लेख प्रकाशित करतो. काल मात्र एका व्यक्तीने यातलंही रहस्य उघड केलं. त्यांच्या मते माझं लेखन इथे कुणालाच आवडत नाही, किंवा कुणी असलेच तर ते अत्यल्पसंख्य आहेत. पुन्हा बोलावणारी मंडळी वाचनानंदासाठी बोलवितात असा गोSSड गैरसमज करण्यात काहीच अर्थ नसून या लेखांवर चिडवाचिडवी करायला मिळावी म्हणून ही मंडळी नेहमीच एखाद्या गिर्‍हाईकाच्या शोधात असतात. मी त्यांचे आभार मानले आणि भेजा फ्राय (रजत कपूर, विनय पाठक) बघण्यास सांगितले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन

>>. त्यांच्या मते माझं लेखन

नगरीनिरंजन
गुरुवार, 09/15/2011 - 13:06 नवीन
>>. त्यांच्या मते माझं लेखन इथे कुणालाच आवडत नाही, किंवा कुणी असलेच तर ते अत्यल्पसंख्य आहेत. पुन्हा बोलावणारी मंडळी वाचनानंदासाठी बोलवितात असा गोSSड गैरसमज करण्यात काहीच अर्थ नसून या लेखांवर चिडवाचिडवी करायला मिळावी म्हणून ही मंडळी नेहमीच एखाद्या गिर्‍हाईकाच्या शोधात असतात. हे असं सरसकटीकरण चुकीचे आहे. लेख चांगला असेल तर इथे लोक चांगलंच म्हणतात असा अनुभव आहे. चिडवणारेही विखारी भावनेने चिडवत नाहीत. ते मोकळ्या मनाने घ्या आणि सोडून द्या. स्वतः लेख टाकण्याबरोबरच इतरांच्या लेखनाची दखल घेणे हे ही तितकेच महत्त्वाचे आहे. एकदा तुम्ही मिसळून गेलात आणि इथल्या संस्कृतीप्रमाणे वागण्याचा प्रयत्न केलात तर तुम्हाला कळेल की इथला एकही सदस्य खोडसाळ नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चेतन सुभाष गुगळे

इथला एकही सदस्य खोडसाळ

मराठी_माणूस
गुरुवार, 09/15/2011 - 13:19 नवीन
इथला एकही सदस्य खोडसाळ नाही. खुप धाडसी विधान आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन

>>खुप धाडसी विधान आहे तुमच्या

नगरीनिरंजन
गुरुवार, 09/15/2011 - 13:44 नवीन
>>खुप धाडसी विधान आहे तुमच्या काही प्रतिसादांमधले अवांतर आणि तुमचे धागे पाहून आता असं वाटतंय खरं ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी_माणूस

व्याख्येत तफावत आहे.

मराठी_माणूस
गुरुवार, 09/15/2011 - 15:14 नवीन
व्याख्येत तफावत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन

विनोदी ला धाडसी हा समानार्थी

विश्वनाथ मेहेंदळे
गुरुवार, 09/15/2011 - 17:48 नवीन
विनोदी ला धाडसी हा समानार्थी शब्द आहे की काय ? बाकी ननि, तुमचे मूळ विधान हे पण सरसकटीकरणच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी_माणूस

होय.

नगरीनिरंजन
गुरुवार, 09/15/2011 - 20:56 नवीन
>>तुमचे मूळ विधान हे पण सरसकटीकरणच आहे होय. पण कमीतकमी ते (फॉल्स का होईना) पॉझिटिव्ह तरी आहे ;-) अवांतरः विमे, तुमचे लग्न होऊन मुलेबाळे होतील तेव्हासाठी एक टिप: नवरा किंवा बायको यापैकी एक जण मुलांना रागावत किंवा समजावत असेल तर दुसर्‍याने मध्ये मध्ये बोलून चुका काढू नये. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

हाण तिच्यायला!!

Nile
गुरुवार, 09/15/2011 - 21:00 नवीन
>>नवरा किंवा बायको यापैकी एक जण मुलांना रागावत किंवा समजावत असेल तर दुसर्‍याने मध्ये मध्ये बोलून चुका काढू नये. =)) ननिकाका आपल्या मुलाला समजावत आहेत आणि विमे काकू "असूद्या हो, लहान आहे तो अजून" वगैरे म्हणत आहेत असे चित्र डोळ्यांसमोर आले. ;-) बाकी विमेकाका सद्ध्या समुपदेशन मोड मध्ये दिसताहेत, इतरांनाच असे करा, तसे करू नका वगैरे सांगत आहेत. आणि आता त्यांनाच असे-तसे करू नका असा प्रतिसाद आल्याने सर्कल कसे पुर्ण झाल्यासारखे वाटले. ;-) (ह. घेणे, अन समुपदेशन चालू ठेवणे हो विमे! :P )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन

ननि आणि निळ्या _ /\ _

३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 09/15/2011 - 21:51 नवीन
ननि आणि निळ्या _ /\ _
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

स्प ष्टी क र ण

चेतन सुभाष गुगळे
गुरुवार, 09/15/2011 - 13:29 नवीन
<< हे असं सरसकटीकरण चुकीचे आहे. >> मी केलेलं नाहीय. माझ्याशी काल संपर्क करणार्‍या त्या विशिष्ट सदस्याचं हे वैयक्तिक मत आहे. ते मी इथे मांडलंय. << लेख चांगला असेल तर इथे लोक चांगलंच म्हणतात असा अनुभव आहे. >> कदाचित त्यांना माझे लेख चांगले वाटत नसतील. << चिडवणारेही विखारी भावनेने चिडवत नाहीत. ते मोकळ्या मनाने घ्या आणि सोडून द्या. >> तसेच करतो की. उदाहरण म्हणून सांगतो. इथली भांडणं इथंच. बाहेर त्याचा उल्लेखही मी करीत नाही. इथले एक मान्यवर सदस्य यांनी माझ्या मागच्या धाग्यावर सकारात्मक प्रतिक्रिया दिली. त्यानंतर पुन्हा स्वतंत्र धागा काढून त्या लेखाची जोरदार खिल्ली उडविली आणि या संकेतस्थळावर असं चालु असतानाच शेजारी दुसर्‍या खिडकीतून फेसबुक उघडून मला त्यांनी तिकडे मित्र बनविले. माझा निवासी पत्ता विचारला, छान मैत्रीपुर्ण गप्पा मारल्या. मी थोडीच तिकडे इकडचा उल्लेख करतोय? सोडूनच द्यावं लागतं.. कारण तिकडे ते खर्‍या नावाने माझे खरे खुरे मित्र झालेत आणि इकडे मात्र त्यांच्या टोपणनावाने माझी खोटी खोटीच चेष्टा करताहेत. आपल्या दोन्ही संकेतस्थळांवरच्या भुमिकेतला फरक मला स्पष्टपणे कळावा म्हणून आता त्यांनी मला सूचना केलीय की इथे खर्‍या नावाचा उल्लेख ही करू नका. टोपण नावानेच संबोधा. << स्वतः लेख टाकण्याबरोबरच इतरांच्या लेखनाची दखल घेणे हे ही तितकेच महत्त्वाचे आहे. >> तुम्ही माझ्या इतर धाग्यांवरील प्रतिक्रिया वाचूनही असे मत मांडताय म्हणजे कमाल आहे. आताही माझी ही प्रतिक्रिया श्री. आशु जोग यांच्या धाग्यावर प्रकाशित होत आहे, माझ्या धाग्यावर नव्हे. << इथला एकही सदस्य खोडसाळ नाही. >> हे असं सरसकटीकरण नक्कीच चुकीचे आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा