✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

आकाशातल्या ठोम्ब्या बद्दल ....!

स
सुधीर मुतालीक यांनी
Tue, 09/06/2011 - 19:36  ·  लेख
लेख
काल जिम मधून खाली उतरलो. साडे आठ वाजले होते. गाडी जवळ पोचताना जिम कडे जाणारा मित्र भेटला. हा बहुदा माझ्या बरोबर असतो, सातच्या सुमारास. आज इतक्या उशिरा येतोय म्हटल्यावर गुड मॉर्निंग ऐवजी साहजिकच माझ्या कडून त्याच्यावर प्रश्न आपटला गेला, "अरे, आज इतका उशीर का ?" त्याचे स्पष्टीकरण चालु झाले. " काल श्रावण संपला ना. त्यामुळे रात्री उशिरा पर्यंत 'बसलो' होतो. श्रावणाच्या म्हैना भरात सॉलिड तहान लागली होती. मित्र ही होते बरेच. दहा दिवस आधीच ठरवून ठेवले होते. फार मजा केली. एकदम आउट ! पार कल्ला केला. आता आणि दहा दिवस बंद ना. गणपती आहे, बाप्पा. आपण नाही गणपतीत घेत. त्यामुळे आज जरा उशीर झाला." मी " ओके, गुड डे." एवढंच म्हणालो. मित्राच्या निवेदनाला लॉग आउट केलं आणि गाडी कडे सटकलो. गाडीत नेमका गुलाम अली ' हंगामा है क्यो बरपा, थोडीसी जो पीली है ..' ची अर्धवट राहिलेली गझल संपवत होता. त्यामुळे मित्राच्या काल पर्यंत दाटून आलेल्या कंठाची पुन्हा एकदा आठवण झाली. प्यायची तर बिनधास्त प्यायची ना. श्रावण किंवा गणपती साठी स्वत:वर बलात्कार कशाला ? दहा दिवस आधी प्लानिंग म्हंजे त्याही वेळी इच्छा झालीच असेल ना. प्यावेसे वाटले असेलच ना. आणि गणपती यायच्या आधी एकच दिवसाचा चान्स मिळाल्यावर आधीच्या महिना भराची आणि नंतरच्या दहा दिवसांची एकत्र पिऊन घ्यायची हा केव्हढा त्रास ? आणि कशासाठी ? आणि त्या दिवसांमध्ये इच्छा होऊन प्यायची का नाही ? तो एकच दिवस जो मध्ये होता त्या दिवशीच का चालते ? माझा मान्सीक त्रास असा होता की त्या महिन्यात आणि नंतरच्या दहा दिवसात असा काय फरक असतो ज्यामुळे आपल्या इच्छांचे दमन माझ्या मित्रांना करावे लागते? या श्रद्धाळू लोकांची गणितं मला कधीच कळत नाहीत. वर्ष भर कुणाचा ना कुणाचा असा त्रास असतोच. परवा पार्टी करू असं ठरवायचं असेल तर एकजण तरी म्हणतोच ' मित्रा परवा गुरुवार आहे बरं का, दत्ताचा वार आहे. दुसरा दिवस निवडा.' श्रद्धेचा आणि या बलात्काराचा नैतिक सबंध काय ? गणपतीच्या आदल्या दिवशी काय नसतं जे त्या दहा दिवसात असतं ? म्हंजे आदल्या दिवशी गणपती पिताना बघत नाई का ? तो आलेला नसतो म्हणुन त्याला चालतं की तो आलेलाच नाही त्यामुळे त्याला विचारायचा संबंधच काय ? किंवा तो आलेला नसल्यामुळे तो बघू शकत नाही, त्याला समजतच नाही. या पिण्याच्या पार्श्वभूमीवर तर एक भारी किस्सा आहे माझ्या कडे. आमच्या गावात म्हंजे निपाणीला एक देवी असते. बहुतेक ग्राम देवता वगैरे असते. कारण ती एका किल्ल्यात असते. जुना भुईकोट किल्ला असतो. नवरात्रतात मोठा उत्सव असतो. असणारच. देवी आहे. दसऱ्याच्या पूजेला देवीला चक्क दारूचा नैवेद्य दाखवतात. आणि नैवेद्य म्हंजे असं छोट्याश्या वाटीत चमचाभर वाढून नाई देत. डायरेक्ट बाटली - म्हंजे क्वार्टर - उघडतात आणि देवीच्या नाकाला लावतात. तशी पद्धतच आहे. आणि मग तिचा चेहरा भक्तांना दाखवतात. पुण्यवान लोकांना म्हणे तिचा झिंगता चेहरा आरशात दिसतो. खूप लहान असताना मला खूप टेन्शन यायचं. कारण मला ती झिंग कधीच दिसली नाही. आता बोला. देवाला हवी की नको ? त्याच्या समोर चालते की नाही ? माझा त्याचा फारसा सबंध भर यौवना पासुन नाहीच. म्हंजे त्यांच्या पैकी - गणपतीआदी - कुणाचाच संपर्क नाही, फारसा परिचय ही नाही. त्यामुळे त्यांच्या संदर्भात पाळायची पथ्ये ही फारशी माहिती नाहीत. पण वाचना मुळे त्यांच्या - म्हंजे दिवाबिवाच्या - काही खास बाबी माहिती आहेत. म्हंजे परमेश्वराने चराचर व्यापलेले आहे. आणि तो सगळीकडे असतो.आणि आपण जे जे करतो त्याची म्हणे तो नोंद ठेवतो. आणि त्या नोंदींचा रेफरन्स घेऊन मेल्यावर आपल्या पाप पुण्याचा म्हणे हिशोब तो मांडतो. आणि मग आपले डीपार्टमेंट ठरवतो. म्हंजे नरक की स्वर्ग वगैरे. आता एव्हढी लांबलचक श्रद्धा ठेवणा-यांना हे माहिती नसतं का ? एखादे पाप करताना आपल्याला तो पाहतोय ? गुप्तपणे ! त्यामुळे तो घरी आला काय किंवा नसला काय, फरक नाई पडला पाहिजे. त्याचा वार असला काय किंवा नसला काय, फरक नाई पडला पाहिजे. कारण तो चराचर व्यापुन राहिलाय ना. भक्त प्रह्लादाने नाई का त्याच्या उद्दाम बापाला, हिरण्यकश्यपुला सांगितलं होतं की माझा नारायण सगळी कडे आहे. या खाम्बामध्येही आहे. त्याच्या बापाने मग खांबाला लाथ मारली. लाथ लागल्यामुळे रागावून त्यातून नरसिंह नामक नारायणाचा अवतार बाहेर आला .त्याने हिरण्यकश्यपुला मारून टाकलं. हे सगळ्यांना मीहिती असेलच ना. म्हंजे श्रद्धाळूना तरी. पण तरीही हेच श्रद्धाळू " चोरून" एखादी गोष्ट कशी करू शकतात ? चोरून म्हंजे इकडे तिकडे कुणी बघत नाही असं बघून. वा समजून. हो, म्हंजे डोळे मिटून दुध पिणाऱ्या मांजरी सारखं. शिर्डीच्या एका भक्ताने कमाल केली. एक सोन्याने मढवलेली शाल बनवली. किमती हिऱ्यांचा भराव असलेली.एकदम महागडी. तशी सगळी कडे बातमी फुटली. टीवी वर, पेपरात, इमेल वर दणका चालु झाला. करोडो रुपयाची शाल. भल्या भल्या भक्तांना फ़्रस्ट्रेट करून टाकलं. त्याना वाटलं हा सगळ्यात जवळ जाणार बाबांच्या. आपल्या पुढे. आपण तर फक्त चांदीचा मुकुटच चढवलाय. पण थोड्याच दिवसात गम्मत झाली.ती सोन्याची शाल खोटी असल्याची देवस्थानाला कुणीतरी सांगितलं. तो हिरो हे 'प्रामाणिक' पणे कबुल करून रिकामा झाला. मला तेच म्हणायचंय. देवावर आहे ना तुमचा विश्वास? मग तो सगळी कडे आहे हे कसं काय बुवा ही जनता विसरू शकते ? कित्येक चोरांच्या बातम्या टीवी वर वगैरे असतात ना. अमकी चादर चढवली. तमकी पूजा बांधली. या जनतेवर भ्रष्टाचाराचे, धमकी दिल्याचे वा अन्य कसले तरी हमखास आरोप कसे असतात? त्या जेडे च्या मारेक-या चा कुठल्यातरी देवावर विश्वास होता. खून केल्यावर तो पहिल्यांदा त्या देवाला गेला असे कुठेतरी वाचलं. म्हंजे येडं कोण आहे ? जनता की देव ? भक्ती बरोबर येणारी नैतिकता मला कधी दिसत नाही त्यामुळे ही त्याचे आणि आपलं कधी जमलंच नाही. तो एकतर नसावाच किंवा असला तर अत्यंत अकार्यक्षम म्हंजे ढिम्म असावा. कुठे दिसला नाही त्यामुळे आपण नाई त्याच्या मागे धावणार असे म्हटलं तर हमखास एक टोमणा कानावर येतो की तो पापी लोकांना दिसत नाही. हो पण माझे जाऊ द्या हो. तो असेल तर काही ठिकाणी त्याने त्याचा प्रताप दाखवायलाच हवा होता. पंधरा वीस दिवसापूर्वी असेल, एका कार्यालयात वाट बघत मुंबईत बसलो होतो. वेळ घालवायला समोर टेबलावर पडलेला टाइम्स ऑफ इंडिया चाळायला घेतला. ती बातमी वाचायची नव्हती पण परत परत तिकडे डोळे जात होते. शेवटी डोळ्यांनी माझ्या मनाला घट्ट पकडलं आणि त्या बातमीवर घेऊन गेले. घटना मुंबईतली. एक चिमुरडी सुमारे आठ नऊ वर्षाची. बिस्कीट आणायला घराजवळच्या दुकानाकडे उड्या मारत चाललेली. वाटेत तिचा बाप भेटला. तो हल्ली फारसा घरी नसतो. बाबा भेटल्यावर चिमुरडीला आनंद झाला. तो म्हणाला चल माझ्याबरोबर. तश्याच उड्या मारत ती बाबा बरोबर गेली. एक २० - २१ वर्षाच्या पोराकडे तो बाप तिला घून गेला. त्याला म्हणाला ही घे तुला. हिचे काय करायचं ते कर. त्या हरामखोर बापाला आई ने घराबाहेर काढलं होतं. कारण आपल्याच तीस वर्षाच्या पोरीबरोबर त्याला झोपायचं होतं. घराबाहेर काढलं म्हणुन तो बायकोवर चिडला होता. तिचा बदला घ्यायचा होता. तो २० - २१ वर्षाचा गुंड तिला एका स्टेशन वर घेऊन गेला. वारंवार तिच्यावर बलात्कार त्याने केला. काम झाल्यावर रुळा शेजारच्या एका नाल्यात तिला फेकून दिली. वेदनेनं बेजार झालेली चिमुरडी आक्रोश करत त्या दलदली मध्ये गटांगळ्या खाऊन मेली. मला वाचुन दरदरून घाम फुटलेला. शरीर प्रचंड थरथरत होतं. पळत फ्रेश रूम मध्ये जाऊन उलटी होते का पाहिलं. जमलं नाई. धावत गाडी कडे गेलो. बसलो. सुरु केली. लांबवर गेलो. काचा बंद केल्या जोरजोरात पाच मिनिटं. किंचाळलो. थोडा मोकळा झालो. ....... मला आकाशातला मायबाप दिसत नाही. हे मान्य. पण त्या चिमुरडीचा काय हो दोष? पाप आणि पुण्याच्या चक्रात अजुन अडकलेलाही नव्हता तो जीव. मग तिच्या वर एव्हढा भीषण अत्याचार होताना चराचर व्यापलेला तो परमेश्वर करत काय होता, शेजारी उभा राहुन? तो असेल वा नसेल. मी दखल घेण्याच्या लायकीचा तो नक्की नाही, माझ्या वयाच्या सोळाव्या वर्षापासूनच. sudhirmutalik@gmail.com
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मांडणी
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन

प्रतिक्रिया द्या
28110 वाचन

💬 प्रतिसाद (117)

प्रतिक्रिया

थोडा गैरसमज तर नव्हे?

हुप्प्या
Sat, 09/17/2011 - 00:59 नवीन
<<असो. एक मजेशीर किस्सा सांगते, आधीही एक-दोनदा लिहिलेला असेल, पण तरीही: <<..... <<त्या गोर्‍याला श्रावण म्हणजे काय हे ही माहित नसेल, पण संयम आणि सभ्यपणा नक्की माहित असावा. नाही का? आपण जरा जास्तच ठामपणे निष्कर्ष काढत आहात. आपल्याकडे बघून "तसे" काही वाटलेही नसेल. एखाद्या मांजराच्या पिल्लाला वा पाखराला मदत करायची इतक्याच तटस्थपणे त्याने मदत केली असेल. त्यामुळे हा त्या व्यक्तीच्या संयम वा सभ्यपणाची कसोटी पहाणारा तो क्षण होता हा आपला गैरसमज आहे असे वाटते आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

पाणी = H2O अशी परमेश्वराची फ़ोड करणे शक्य नाही

वाहीदा
Mon, 09/12/2011 - 19:06 नवीन
परमेश्वराचे अस्तित्व अन विश्लेषण हे सर्व Occult Sciences या सदरात मोडतात. पण त्याचे यथोचित्त न्यान संपादन करणे फ़क्त आम्हा मनुष्यालाच शक्य आहे . या सर्व गोष्टी प्रयोगशाळेत बुध्दिप्रामाण्यवादावर तपासून पहाणे अन सिध्द करणे एवढे नक्कीच सोपे नाही जसे पाणी = H2O तशीच परमेश्वराची फ़ोड करणे शक्य आहे का ? तर नाही हेच उत्तर मिळेल आधुनिक जगातील एक महान शास्त्रज्ञ डॉ. स्टीफन हॉकिन्स यांनी एके ठिकाणी म्हटले आहे, ''परमेश्वराचे अस्तित्व सिद्ध करणे कठीण आहे, परंतु त्याहीपेक्षा जगात परमेश्वर नाही' हे सिद्ध करणे जास्तच कठीण आहे.'' For thousands of years philosophers and theologians have struggled with the classical problem of why an all-loving and all-powerful God would allow evil to exist. In all that time NOBODY has come up with a complete answer. First, some have tried to solve the problem of evil by simply saying God doesn't exist. Evil and good are simply two aspects of reality that war against one another. But if there is no God, there is no Creator to create the ultimate values of good and evil. And if there is no good and evil,the problem of suffering is gone too. If God does not exist, our moral indignation over what we think is wrong is simply personal prejudice, subjective feeling.Bertrand Russell said, "There is no God, therefore there is no good and evil." But deep within us something cries out against the murder of innocent people, the abuse of children, the rape of women. We know these are wrong because our consciences rise up against them. The conscience is actually a gift from the Creator who is just and who defines good and evil. The fact that a conscience exists indicates therefore, that there is a conscience giver. For without a conscience-giver, without God,we couldn't tell what is good and what isn't. In fact, just before Bertrand Russell died, he said, 'To love is good. To hate is evil." Isn't it amazing that we as human beings have an innate ability and desire to distinguish between good and evil, right and wrong? Don't make the mistake of using moral indignation as an argument against God's existence. For if there is no God, there is no authority to define what is absolutely right and what is absolutely wrong. हल्ली बरीच शिकलेली मंडळी 'जगात परमेश्वर आहे' याच्यावर फारसा विश्वास ठेवत नाही अन खऱ्या श्रद्धेलाही अंधश्रद्धा म्हणून हिणवू लागली आहेत. पण एक गोष्ट आपण जरूर ध्यानात ठेवा, की प्रत्येक जीवाने वा मनुष्यप्राण्याने आपल्या जीवनात कुठेतरी, कोणावर तरी आपल्या स्वत:च्या हिताकरिता श्रद्धा ठेवावी. कोणी म्हणेल 'जगात श्रद्धा ठेवण्याच्या उंचीची वा लायकीची माणसं कुठं आहेत? कुठे आहेत असे आदर्श?' यावर मला कोणीतरी सांगीतलेले बोल आठविले "तुम्हाला जगात कुणीही आदर्श दिसत नसेल, सद्गुणी दिसत नसेल वा कुणावरही श्रद्धा ठेवावी असे वाटत नसेल, तर किमान एखाद्या 'दगडा'वर तरी श्रद्धा ठेवा. अट एकच की ती तुमची श्रद्धा खरी असावी, नि:संशय व निर्मळ असावी.'' ते गृहस्थ पुढे म्हणाले, ''या तुमच्या साध्या दगडावरील खऱ्या श्रद्धेमुळे, त्या दगडामध्ये किंवा पाषाणामध्ये 'देवत्व' निर्माण होईल की नाही हे मला माहित नाही, परंतु तुमच्या अंत:करणामध्ये 'देवत्व' निश्चितच निर्माण होईल, असा माझा पूर्ण विश्वास आहे" मी स्वतः मुर्तिपूजक नाही पण त्यांनी 'अंत:करणामधली देवत्वा' बध्द्ल जे सांगीतले ते मात्र मला खुप आवडले
  • Log in or register to post comments

सहानुभूतीशून्य स्वार्थाचे नमुने

धनंजय
Tue, 09/13/2011 - 00:15 नवीन
सहानुभूतीशून्य स्वार्थाचे नमुने बघण्यात-ऐकण्यात आले की फार वाईट वाटते, हे खरे आहे.
  • Log in or register to post comments

देवाबद्दल...

चित्रगुप्त
Tue, 09/13/2011 - 03:19 नवीन
देवाबद्दल वेगळे विचार मांडणारी पुस्तके: Image removed. Image removed. Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments

डॅनिकेन

प्रियाली
Tue, 09/13/2011 - 04:00 नवीन
डॅनिकेन साहेबांना जमिनीला नाक घासून साष्टांग नमस्कार. ;) बाकी चालू द्या!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

अरेरे

नंदन
Tue, 09/13/2011 - 04:10 नवीन
>>> डॅनिकेन साहेबांना जमिनीला नाक घासून साष्टांग नमस्कार. --- मी डॅनिकेन साहेबांचं नाव वाचून पॉपकॉर्नचा पुडा घेऊन आलो होतो. एकाच वाक्यात त्यांची अशी बोळवण केलेली पाहून अंमळ निराशा झाली ;). बादवे, सूक्ष्मरुपाने मंगळावर गेलेल्या प. वि. वर्तकांबद्दल अजून कोणी कसे लिहिले नाही?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली

त्यांनी (म्हणजे कोणी?) तुलाच

३_१४ विक्षिप्त अदिती
Tue, 09/13/2011 - 05:24 नवीन
त्यांनी (म्हणजे कोणी?) तुलाच बुद्धी नाही का दिली प. वि. वर्तकांबद्दल लिहीण्याची!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन

'माणूस पॄथ्वीवर उपराच' असे एक

अप्पा जोगळेकर
Tue, 09/13/2011 - 20:14 नवीन
'माणूस पॄथ्वीवर उपराच' असे एक पुस्तज 'सुरेशचंद्र क्षीरसागर' नावाच्या पुण्याच्या एका इसमाने लिहिलेले आहे. त्या पुस्तकात या डॅनिकेनचा उल्लेख आहे. चार्ल्स डार्विन खोटा आहे म्हणण्यापर्यंत या माणसाने मजल मारली आहे. त्यामुळे आम्ही तरी सदर पुस्तक पुढे वाचू शकलो नाही. शिवाय पुरावे म्हणून दिलेले फोटो इतके अस्पष्ट आहेत की ज्याचे नाव ते. जाउंद्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

क्षीरसागर की नाडकर्णी?

प्रियाली
Tue, 09/13/2011 - 20:46 नवीन
मला वाटतं नाडकर्णी. चू. भू. द्या. घ्या. पुरातन मडक्यावर परग्रहवासियांची चित्रे होती हे दाखवण्यासाठी एक मडके डॅनिकेनने आपल्या ओळखीच्या कुंभाराकडून बनवून घेतले होते अशी माहिती मिळाली होती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर

होय नाडकर्णीच.

३_१४ विक्षिप्त अदिती
Tue, 09/13/2011 - 22:38 नवीन
होय नाडकर्णीच. अलिकडेच सुरेशचंद्र नाडकर्णी यांचे निधन झाले. ही बातमी. अवांतर: खूप वर्षांपूर्वी 'पृथ्वीवर माणूस उपराच' हे मी वाचलं होतं. तेव्हा ते मजेशीर (विनोदी या अर्थाने) वाटलं होतं. डार्विनचा उत्क्रांतीवाद वाचायचा म्हणून त्याची दोन पुस्तकं (The journey of Beagle आणि The origin of species) विकत घेतली. रटाळ वाटली, नंतर कधीतरी वाचू म्हणून ठेवून दिली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली

क्षीरसागर नाही नाडकर्णीच.

अप्पा जोगळेकर
Wed, 09/14/2011 - 22:11 नवीन
दुरुस्तीबद्दल आभार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली

देवाबद्दल अजून एक विचार मांडणारी ही एक क्लिप !

हुप्प्या
Tue, 09/13/2011 - 03:35 नवीन
अर्थात कलिंगडातला संदेश (नाही, ही पाककृती नाही)! http://www.youtube.com/watch?v=l8-8WJxA-cI
  • Log in or register to post comments

लेख आवडला. शेवटचे उदा. भयंकर.

शिल्पा ब
Tue, 09/13/2011 - 04:37 नवीन
लेख आवडला. शेवटचे उदा. भयंकर. :(
  • Log in or register to post comments

लेख आत्ता वाचला.. देवाचं काय

अर्धवट
Tue, 09/13/2011 - 12:55 नवीन
लेख आत्ता वाचला.. देवाचं काय माहित नाय बा.. असेल तेथे सुखात र्‍हावं त्यानं.. आम्ही आपले भाउसाहेब पाटणकरांचा उपदेश मानणारे सांगशी निष्काम कर्मा, कृष्णा अरे वेदांत तू समजला की काय आम्हा किर्लोस्करांचा पंप तू मोक्ष हा परमार्थ ऐसे सांगशी जेथे तिथे तू तरी देवा कधी आहेस का गेला तिथे? भोगीशी ऐश्वर्य, सारे वंदिति एच्छा तुझी सन्यास पण सार्‍या जगाने, घ्यावा अशी इच्छा तुझी निष्कामता अंगी, थोडी जरी असती तुझ्या धावूनी सार्‍या येत्या, आमच्याकडे गोपी तुझ्या अरे भगवंता भेटुनीया, मज काय देशील तू? मंत्र्या परी येशील, थोडा हासूनी जाशील तु प्रारब्ध जर अमुचे, आम्हा आहे भोगायचे सांग तर आम्ही कशाला,कुंकू तुझे लावायचे देवाची माझ्यापुरती व्याख्या म्हणजे "माझी सद्सद्विवेकबुद्धी म्हणजे देव"
  • Log in or register to post comments

कविता आवडली अन पटली.

शिल्पा ब
Tue, 09/13/2011 - 21:20 नवीन
कविता आवडली अन पटली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवट

वा!

दैत्य
Wed, 09/14/2011 - 00:21 नवीन
वा! बरेच दिवसांनी भाऊसाहेब पाटणकरांची गझल्/कविता वाचून मस्त वाटलं! इथे ती टाकल्याबद्दल धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवट

सुरेख गझल आहे

मूकवाचक
Fri, 09/16/2011 - 17:56 नवीन
ती इथे टाकल्याबद्दल धन्यवाद. प्रारब्ध जर अमुचे, आम्हा आहे भोगायचे सांग तर आम्ही कशाला,कुंकू तुझे लावायचे या जोडीलाच ... एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा| गुरुकृपे त्याचा नाश होय || हे ही वाचले. गझल वाचनाचा आनन्द लुटलाच, त्या बरोबर अध्यात्मिक वैधव्य टाळलेलेच बरे असे वाटले. असो. (पुपे याना धन्यवाद.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवट
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा