काल जिम मधून खाली उतरलो. साडे आठ वाजले होते. गाडी जवळ पोचताना जिम कडे जाणारा मित्र भेटला. हा बहुदा माझ्या बरोबर असतो, सातच्या सुमारास. आज इतक्या उशिरा येतोय म्हटल्यावर गुड मॉर्निंग ऐवजी साहजिकच माझ्या कडून त्याच्यावर प्रश्न आपटला गेला, "अरे, आज इतका उशीर का ?" त्याचे स्पष्टीकरण चालु झाले. " काल श्रावण संपला ना. त्यामुळे रात्री उशिरा पर्यंत 'बसलो' होतो. श्रावणाच्या म्हैना भरात सॉलिड तहान लागली होती. मित्र ही होते बरेच. दहा दिवस आधीच ठरवून ठेवले होते. फार मजा केली. एकदम आउट ! पार कल्ला केला. आता आणि दहा दिवस बंद ना. गणपती आहे, बाप्पा. आपण नाही गणपतीत घेत. त्यामुळे आज जरा उशीर झाला." मी " ओके, गुड डे." एवढंच म्हणालो. मित्राच्या निवेदनाला लॉग आउट केलं आणि गाडी कडे सटकलो.
गाडीत नेमका गुलाम अली ' हंगामा है क्यो बरपा, थोडीसी जो पीली है ..' ची अर्धवट राहिलेली गझल संपवत होता. त्यामुळे मित्राच्या काल पर्यंत दाटून आलेल्या कंठाची पुन्हा एकदा आठवण झाली. प्यायची तर बिनधास्त प्यायची ना. श्रावण किंवा गणपती साठी स्वत:वर बलात्कार कशाला ? दहा दिवस आधी प्लानिंग म्हंजे त्याही वेळी इच्छा झालीच असेल ना. प्यावेसे वाटले असेलच ना. आणि गणपती यायच्या आधी एकच दिवसाचा चान्स मिळाल्यावर आधीच्या महिना भराची आणि नंतरच्या दहा दिवसांची एकत्र पिऊन घ्यायची हा केव्हढा त्रास ? आणि कशासाठी ? आणि त्या दिवसांमध्ये इच्छा होऊन प्यायची का नाही ? तो एकच दिवस जो मध्ये होता त्या दिवशीच का चालते ? माझा मान्सीक त्रास असा होता की त्या महिन्यात आणि नंतरच्या दहा दिवसात असा काय फरक असतो ज्यामुळे आपल्या इच्छांचे दमन माझ्या मित्रांना करावे लागते? या श्रद्धाळू लोकांची गणितं मला कधीच कळत नाहीत. वर्ष भर कुणाचा ना कुणाचा असा त्रास असतोच. परवा पार्टी करू असं ठरवायचं असेल तर एकजण तरी म्हणतोच ' मित्रा परवा गुरुवार आहे बरं का, दत्ताचा वार आहे. दुसरा दिवस निवडा.' श्रद्धेचा आणि या बलात्काराचा नैतिक सबंध काय ?
गणपतीच्या आदल्या दिवशी काय नसतं जे त्या दहा दिवसात असतं ? म्हंजे आदल्या दिवशी गणपती पिताना बघत नाई का ? तो आलेला नसतो म्हणुन त्याला चालतं की तो आलेलाच नाही त्यामुळे त्याला विचारायचा संबंधच काय ? किंवा तो आलेला नसल्यामुळे तो बघू शकत नाही, त्याला समजतच नाही. या पिण्याच्या पार्श्वभूमीवर तर एक भारी किस्सा आहे माझ्या कडे. आमच्या गावात म्हंजे निपाणीला एक देवी असते. बहुतेक ग्राम देवता वगैरे असते. कारण ती एका किल्ल्यात असते. जुना भुईकोट किल्ला असतो. नवरात्रतात मोठा उत्सव असतो. असणारच. देवी आहे. दसऱ्याच्या पूजेला देवीला चक्क दारूचा नैवेद्य दाखवतात. आणि नैवेद्य म्हंजे असं छोट्याश्या वाटीत चमचाभर वाढून नाई देत. डायरेक्ट बाटली - म्हंजे क्वार्टर - उघडतात आणि देवीच्या नाकाला लावतात. तशी पद्धतच आहे. आणि मग तिचा चेहरा भक्तांना दाखवतात. पुण्यवान लोकांना म्हणे तिचा झिंगता चेहरा आरशात दिसतो. खूप लहान असताना मला खूप टेन्शन यायचं. कारण मला ती झिंग कधीच दिसली नाही. आता बोला. देवाला हवी की नको ? त्याच्या समोर चालते की नाही ?
माझा त्याचा फारसा सबंध भर यौवना पासुन नाहीच. म्हंजे त्यांच्या पैकी - गणपतीआदी - कुणाचाच संपर्क नाही, फारसा परिचय ही नाही. त्यामुळे त्यांच्या संदर्भात पाळायची पथ्ये ही फारशी माहिती नाहीत. पण वाचना मुळे त्यांच्या - म्हंजे दिवाबिवाच्या - काही खास बाबी माहिती आहेत. म्हंजे परमेश्वराने चराचर व्यापलेले आहे. आणि तो सगळीकडे असतो.आणि आपण जे जे करतो त्याची म्हणे तो नोंद ठेवतो. आणि त्या नोंदींचा रेफरन्स घेऊन मेल्यावर आपल्या पाप पुण्याचा म्हणे हिशोब तो मांडतो. आणि मग आपले डीपार्टमेंट ठरवतो. म्हंजे नरक की स्वर्ग वगैरे. आता एव्हढी लांबलचक श्रद्धा ठेवणा-यांना हे माहिती नसतं का ? एखादे पाप करताना आपल्याला तो पाहतोय ? गुप्तपणे ! त्यामुळे तो घरी आला काय किंवा नसला काय, फरक नाई पडला पाहिजे. त्याचा वार असला काय किंवा नसला काय, फरक नाई पडला पाहिजे. कारण तो चराचर व्यापुन राहिलाय ना. भक्त प्रह्लादाने नाई का त्याच्या उद्दाम बापाला, हिरण्यकश्यपुला सांगितलं होतं की माझा नारायण सगळी कडे आहे. या खाम्बामध्येही आहे. त्याच्या बापाने मग खांबाला लाथ मारली. लाथ लागल्यामुळे रागावून त्यातून नरसिंह नामक नारायणाचा अवतार बाहेर आला .त्याने हिरण्यकश्यपुला मारून टाकलं. हे सगळ्यांना मीहिती असेलच ना. म्हंजे श्रद्धाळूना तरी. पण तरीही हेच श्रद्धाळू " चोरून" एखादी गोष्ट कशी करू शकतात ? चोरून म्हंजे इकडे तिकडे कुणी बघत नाही असं बघून. वा समजून. हो, म्हंजे डोळे मिटून दुध पिणाऱ्या मांजरी सारखं.
शिर्डीच्या एका भक्ताने कमाल केली. एक सोन्याने मढवलेली शाल बनवली. किमती हिऱ्यांचा भराव असलेली.एकदम महागडी. तशी सगळी कडे बातमी फुटली. टीवी वर, पेपरात, इमेल वर दणका चालु झाला. करोडो रुपयाची शाल. भल्या भल्या भक्तांना फ़्रस्ट्रेट करून टाकलं. त्याना वाटलं हा सगळ्यात जवळ जाणार बाबांच्या. आपल्या पुढे. आपण तर फक्त चांदीचा मुकुटच चढवलाय. पण थोड्याच दिवसात गम्मत झाली.ती सोन्याची शाल खोटी असल्याची देवस्थानाला कुणीतरी सांगितलं. तो हिरो हे 'प्रामाणिक' पणे कबुल करून रिकामा झाला. मला तेच म्हणायचंय. देवावर आहे ना तुमचा विश्वास? मग तो सगळी कडे आहे हे कसं काय बुवा ही जनता विसरू शकते ? कित्येक चोरांच्या बातम्या टीवी वर वगैरे असतात ना. अमकी चादर चढवली. तमकी पूजा बांधली. या जनतेवर भ्रष्टाचाराचे, धमकी दिल्याचे वा अन्य कसले तरी हमखास आरोप कसे असतात? त्या जेडे च्या मारेक-या चा कुठल्यातरी देवावर विश्वास होता. खून केल्यावर तो पहिल्यांदा त्या देवाला गेला असे कुठेतरी वाचलं. म्हंजे येडं कोण आहे ? जनता की देव ?
भक्ती बरोबर येणारी नैतिकता मला कधी दिसत नाही त्यामुळे ही त्याचे आणि आपलं कधी जमलंच नाही. तो एकतर नसावाच किंवा असला तर अत्यंत अकार्यक्षम म्हंजे ढिम्म असावा. कुठे दिसला नाही त्यामुळे आपण नाई त्याच्या मागे धावणार असे म्हटलं तर हमखास एक टोमणा कानावर येतो की तो पापी लोकांना दिसत नाही. हो पण माझे जाऊ द्या हो. तो असेल तर काही ठिकाणी त्याने त्याचा प्रताप दाखवायलाच हवा होता. पंधरा वीस दिवसापूर्वी असेल, एका कार्यालयात वाट बघत मुंबईत बसलो होतो. वेळ घालवायला समोर टेबलावर पडलेला टाइम्स ऑफ इंडिया चाळायला घेतला. ती बातमी वाचायची नव्हती पण परत परत तिकडे डोळे जात होते. शेवटी डोळ्यांनी माझ्या मनाला घट्ट पकडलं आणि त्या बातमीवर घेऊन गेले. घटना मुंबईतली. एक चिमुरडी सुमारे आठ नऊ वर्षाची. बिस्कीट आणायला घराजवळच्या दुकानाकडे उड्या मारत चाललेली. वाटेत तिचा बाप भेटला. तो हल्ली फारसा घरी नसतो. बाबा भेटल्यावर चिमुरडीला आनंद झाला. तो म्हणाला चल माझ्याबरोबर. तश्याच उड्या मारत ती बाबा बरोबर गेली. एक २० - २१ वर्षाच्या पोराकडे तो बाप तिला घून गेला. त्याला म्हणाला ही घे तुला. हिचे काय करायचं ते कर. त्या हरामखोर बापाला आई ने घराबाहेर काढलं होतं. कारण आपल्याच तीस वर्षाच्या पोरीबरोबर त्याला झोपायचं होतं. घराबाहेर काढलं म्हणुन तो बायकोवर चिडला होता. तिचा बदला घ्यायचा होता. तो २० - २१ वर्षाचा गुंड तिला एका स्टेशन वर घेऊन गेला. वारंवार तिच्यावर बलात्कार त्याने केला. काम झाल्यावर रुळा शेजारच्या एका नाल्यात तिला फेकून दिली. वेदनेनं बेजार झालेली चिमुरडी आक्रोश करत त्या दलदली मध्ये गटांगळ्या खाऊन मेली. मला वाचुन दरदरून घाम फुटलेला. शरीर प्रचंड थरथरत होतं. पळत फ्रेश रूम मध्ये जाऊन उलटी होते का पाहिलं. जमलं नाई. धावत गाडी कडे गेलो. बसलो. सुरु केली. लांबवर गेलो. काचा बंद केल्या जोरजोरात पाच मिनिटं. किंचाळलो. थोडा मोकळा झालो. ....... मला आकाशातला मायबाप दिसत नाही. हे मान्य. पण त्या चिमुरडीचा काय हो दोष? पाप आणि पुण्याच्या चक्रात अजुन अडकलेलाही नव्हता तो जीव. मग तिच्या वर एव्हढा भीषण अत्याचार होताना चराचर व्यापलेला तो परमेश्वर करत काय होता, शेजारी उभा राहुन? तो असेल वा नसेल. मी दखल घेण्याच्या लायकीचा तो नक्की नाही, माझ्या वयाच्या सोळाव्या वर्षापासूनच.
sudhirmutalik@gmail.com
वाचने
28227
प्रतिक्रिया
117
मिसळपाव
प्रतिक्रिया
परमेश्वरावर श्रद्धा हा पर्याय
लेख आवडला आणि विचारांशी सहमती.
In reply to परमेश्वरावर श्रद्धा हा पर्याय by शुचि
भाग्यवान आहात...
In reply to लेख आवडला आणि विचारांशी सहमती. by ३_१४ विक्षिप्त अदिती
फारच भोळ्या ब्वॉ तुम्ही काकू!!
In reply to परमेश्वरावर श्रद्धा हा पर्याय by शुचि
लेख
सहमत
शेवटी भयानक प्रसंग सांगितलाय.
भक्ती बरोबर येणारी नैतिकता
प्रश्न
In reply to भक्ती बरोबर येणारी नैतिकता by मदनबाण
साधी उत्तरं
पहिलं पाप
In reply to साधी उत्तरं by राजेश घासकडवी
पहिलं?
In reply to पहिलं पाप by ३_१४ विक्षिप्त अदिती
प्रतिक्रिया
In reply to पहिलं? by मन१
इंद्रजाल का मायाजाल?
In reply to प्रतिक्रिया by मुक्तसुनीत
येकदम बेस आर्ग्युमेण्ट ओ
In reply to इंद्रजाल का मायाजाल? by ३_१४ विक्षिप्त अदिती
थोडी भर ...
In reply to पहिलं? by मन१
हा उपहास अनाठायी नाही ...
In reply to साधी उत्तरं by राजेश घासकडवी
पण इथे ज्या तत्वज्ञानाचा
In reply to हा उपहास अनाठायी नाही ... by मूकवाचक
गुरुत्वाकर्षण कशाने उत्पन
In reply to पण इथे ज्या तत्वज्ञानाचा by मदनबाण
नासा ही संस्था सर्वसाधारण
In reply to गुरुत्वाकर्षण कशाने उत्पन by ३_१४ विक्षिप्त अदिती
अरेच्च्या!
In reply to नासा ही संस्था सर्वसाधारण by मदनबाण
+१
In reply to अरेच्च्या! by Nile
जाता येता स्टीफन हॉकिंगने /
In reply to +१ by ३_१४ विक्षिप्त अदिती
ते एक असो.
In reply to जाता येता स्टीफन हॉकिंगने / by मदनबाण
>>लहानपणीचा ''साखळी साखळी''
In reply to ते एक असो. by ३_१४ विक्षिप्त अदिती
वस्तूमान असेल तर
In reply to गुरुत्वाकर्षण कशाने उत्पन by ३_१४ विक्षिप्त अदिती
रांग लंबर
In reply to वस्तूमान असेल तर by मराठी_माणूस
वर सरसकट "हा विज्ञानाच्या
In reply to रांग लंबर by ३_१४ विक्षिप्त अदिती
बरोबर वाचलंत तुम्ही. वाचनात
In reply to वर सरसकट "हा विज्ञानाच्या by मराठी_माणूस
धन्यवाद बाकी विज्ञानाला
In reply to बरोबर वाचलंत तुम्ही. वाचनात by ३_१४ विक्षिप्त अदिती
यष्टी?
In reply to गुरुत्वाकर्षण कशाने उत्पन by ३_१४ विक्षिप्त अदिती
मनाचे खेळ
म्हणजे बाबा रणछोडदास अगदी
In reply to मनाचे खेळ by प्रियाली
जे होते ते चांगल्यासाठीच होते
हम्म
+१
In reply to हम्म by रमताराम
म्हंजे म्हंजे??
In reply to +१ by पिवळा डांबिस
हम्म
In reply to म्हंजे म्हंजे?? by Nile
नाही वाचलीए :-(
In reply to हम्म by रमताराम
अतीशय मार्मिक लेखन,,, गंमत
शीव शीव शीव !!!
In reply to अतीशय मार्मिक लेखन,,, गंमत by अत्रुप्त आत्मा
कशाला?
In reply to शीव शीव शीव !!! by धन्या
कशाला म्हणजे काय? आम्ही गेलो
In reply to कशाला? by Nile
कशाला काढा म्हणे?? ....खिक्क
In reply to कशाला? by Nile
असं आहे होय...
In reply to कशाला काढा म्हणे?? ....खिक्क by अत्रुप्त आत्मा
गोंधळ !!
... आता एव्हढ्या पसार्याचे
In reply to गोंधळ !! by अर्धवटराव
नक्कीच !!
In reply to ... आता एव्हढ्या पसार्याचे by ३_१४ विक्षिप्त अदिती
आकाशातल्या ठोंब्याचा उत्सव
लेख विचारप्रवर्तक आहे
बेलगाम इच्छांवर थोडा काबू ठेवण्याची थोडी इच्छा
In reply to लेख विचारप्रवर्तक आहे by चित्रा
विषय वाढवत नाही
In reply to बेलगाम इच्छांवर थोडा काबू ठेवण्याची थोडी इच्छा by शाहिर
सहमत.
In reply to लेख विचारप्रवर्तक आहे by चित्रा
सहमत
In reply to सहमत. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
एकच अशी केस मांडल्यामुळे.....
In reply to सहमत by मूकवाचक
थोडे स्पष्टीकरण
In reply to एकच अशी केस मांडल्यामुळे..... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आज कल इस तरफ देखता है कम ..
संपूर्ण लेखाशी सहमत !
In reply to आज कल इस तरफ देखता है कम .. by परिकथेतील राजकुमार
वहीदाचा आयडी-पासवर्ड चोरीस
In reply to आज कल इस तरफ देखता है कम .. by परिकथेतील राजकुमार
नवीनच भानगड?
In reply to वहीदाचा आयडी-पासवर्ड चोरीस by रामदास
तो मी नव्हेच :-)
In reply to वहीदाचा आयडी-पासवर्ड चोरीस by रामदास
तो मी नव्हेच? ??? पर्याचा
In reply to तो मी नव्हेच :-) by वाहीदा
फिर सुबह होगी १९७५ ????
In reply to आज कल इस तरफ देखता है कम .. by परिकथेतील राजकुमार
सहमत
ठोंब्या
बट
In reply to ठोंब्या by विनायक प्रभू
ही
In reply to बट by Nile
दखल घेण्याच्या लायकीचा लेख
ओ गोरेगांवकर...
In reply to दखल घेण्याच्या लायकीचा लेख by चेतन
ओ वाकडे साहेब. लेखाची दखल
In reply to ओ गोरेगांवकर... by धन्या