Skip to main content

डोक्यावरचे केस लग्नाआधी कमी झाल्यास काय करावे?

लेखक pramanik यांनी बुधवार, 31/08/2011 19:01 या दिवशी प्रकाशित केले.

वाचने 2200
प्रतिक्रिया 35

प्रतिक्रिया

कोणाचे केस, कोणाच्या लग्नाआधी हे स्पष्ट नसल्याने पास. >>शास्त्रक्रीया करून घ्यावी व मोकळे व्हावे.( शक्य पण खर्चिक) ही शास्त्रक्रिया काय असते ??

In reply to by सूड

http://www.hairrevive.com/results.htm हे मुंबई मध्ये असल्यास. बाकी जालावर फार आहेत.गेल्या महिन्यात ऋणी ने जेथे केले ते सर्जन फार्जो ही जगविख्यात आहेत.

In reply to by pramanik

खरच ज्या पुरुषांच्या डोक्यावर कमी केस आहेत ते पाहिले कि वाइट वाटते.. पुरुषांच्या डोक्यावर असलेले दाट केस हे त्यांच्या मर्दानी सौंदर्याचे लक्षण आहे.... दाट केसातुन स्त्री ने बोटे व हात फिरवणे हे प्रणय व ममतेचे लक्षण आहे...०ओशो.... टकल्यांच्या दुख्खात सहभागी...

In reply to by अविनाशकुलकर्णी

पुरुषांच्या डोक्यावरचे कमी केस हे त्यांच्या दाट टेस्टोस्टोरॉन्चे लक्षण असते काका...

In reply to by सूड

चालायचंच हो..... ते न्हवं का... शास्त्रात मामाच्या मांडीवर बसुन जावळं काढत्यात..... तसंच कुणाच्या तर कुठं तर बसुन केशरोपण करत असतीला....

जी व्यक्ती तुम्हाला तुमच्या सर्व गुणावगुणांसकट स्वीकारायला तयार नाही तिच्याशी लग्न खरच तुम्हाला करावसं वाटतं? नंतर आयुष्य वैराण होण्यापेक्षा अशी मुलगी शोधा जी आनंदाने तुमचा सर्वस्वी स्वीकार करेल. "केस हेच आयुष्य नाही ...." ला मत दिले आहे.

In reply to by परिकथेतील राजकुमार

केस हेच आयुष्य नाहीये.नाव ठेवणा-या लोकांना शुद्र मानून दुर्लक्ष करावे.
की क्षूद्र? शुद्र मानून म्हणजे हिंदूंतील खालच्या जातीत असलेल्या लोकांच्या मताकडे दुर्लक्ष्य करा असे? शूद्र = चार वर्णातील एक वर्ण क्षत्रिय ब्राह्मण वैश्य शूद्र क्षूद्र = अतिशय लहान, खिजगणतीत न येणारा, दुर्लक्ष्य करता येण्यासारखा वाक्यात उपयोग - संशोधनाचे महत्त्व पाहता लेखनातीला पाहता क्षूद्र चुका पाहू नयेत.

In reply to by प्यारे१

@प्यारे१ साध्य झाले जे हवे होते ते.हेच की आज ह्या समस्याबाबत विज्ञानात प्रगती झाली असली तरी सामान्यांना त्याची हवी तशी माहीती नाही.हे 'जेनेटीकली रेजीस्टंट' केस आपले स्वःताचे असुन एका ठीकाणाहुन दुस-या ठीकाणी 'रोपण' केले जाते. मी स्वःता ह्या सर्जरीने लाभ झालेले पाहीले आहेत प्रत्यक्ष.अगदी शेव केल्ले तरी पुन्हा नैसर्गीकपणे उगवतात :-) हर्शा भोगलेने जिथे सर्जरी केली तो डॉ.मनोज खन्ना सुमार आहे.डॉ.मधु हेच काही ठरवुन दीलेल्या प्रमाणात बसतात. माझी सर्जरी मुंबईत झाली.

In reply to by शैलेन्द्र

माझ्या प्रतिसादात कुठे केली आहे ते आधीच सांगितले आहे. खर्च १-१.२० पर्यंत आला. २००० ग्राफ्ट्स. खालील फोटो १५०० ग्राफ्ट्सचा आहे. http://www.hairrevive.com/images/frontal%20restorations/1big.jpg फक्त माहीतीसाठी लिंक शेअर करत आहे,नियमबाह्य असल्यास काढावी. धन्यवाद.

In reply to by pramanik

अरे व्वा , चांगलीच प्रगती झाली की. जरा डिट्टेल वार वर्णन येउ द्या.किती काळ लागला , काय काय पथ्यपाणी पाळावे लागले ?

In reply to by आंसमा शख्स

क्षत्रिय ब्राह्मण वैश्य शूद्र पारम्पारिक वर्णांश्रमांचा हा क्रम ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र असा आहे.... :) बाकी चालू द्या....

In reply to by मृगनयनी

पारम्पारिक वर्णांश्रमांचा हा क्रम ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र असा आहे....
आता त्या बढाया सांगून काय उपयोग म्हणा. :) तव केसाभार साठी तनु ही झिजू दे| तव टकलावरी मन हे निजू दे | तव स्मरणी ठेवी ही झिंज्या रिझाया | नमस्कार माझा तुला विगधारी || ..

In reply to by मृगनयनी

पारम्पारिक वर्णांश्रमांचा हा क्रम ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र असा आहे....
झाशी ब्रिगेडच्या संस्थापक आणि ब्राह्मण टायगर्सच्या अध्यक्षा आल्या. जरा कुठे कोण काय बोलले की आल्याच बामणबै धावत.

In reply to by मृगनयनी

पारम्पारिक वर्णांश्रमांचा हा क्रम ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र असा आहे....
हा हा, त्या काळात फक्त ब्राह्मण असल्या गोष्टी लिहून ठेवायचे म्हणून त्यांनी आपलं लिहून ठेवलं काहीबाही. बाकी सत्ता क्षत्रियांकडे, संपत्ती वैश्यांकडे... ब्राह्मणांच्या हाती फक्त घंटा (पूजेसाठी). :) बाकी चालू द्यात... :)

जीव द्या ऑप्शन का नाहीए? म्हणजे केस जाणेचा अन जीव देणेचा संबंध नसला तरी धागालेखकाने हा ऑप्शन विसरणे चांगले नव्हे.

माझ्या सगळ्या टाकल्या मित्र्न्ना गर्ल फ्रेड आहे.संपूर्ण टक्कल करण्याचा ऑप्शन बराय.टक्कल करताना जिलेट चे ब्लेड वापरा...........

अरे टकल्या अस्ल्याचे एवढे फायदे आहेत. ते कशाला विसरतोस १) कटिंग चा खर्च वाचला नाहीतरी सध्या कटिंगचे रेट फार वाढलेत २) भारी भारी शाम्पु वा तेले वाचलीत.त्यामुळे खर्चात बचत. शिवाय दोन महत्वाच्या बाबी तु विसरतोस. "टकल्या " लोकांना बायको छान मिळते आणि "टकले " लोक निर्धन क्वचितच असतात त्यामुळे "टक्कल " पडल्याचे वाइट वाटुन घेउ नकोस.

खरंच सांगतो, केस असले काय नसले काय त्याने लग्नानंतर काही फरक पडत नाही. इन फॅक्ट बरेच वेळेला केस नसल्याने फायदाच होतो. असो.

In reply to by बिपिन कार्यकर्ते

इन फॅक्ट बरेच वेळेला केस नसल्याने फायदाच होतो. असो.
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) काय बिका, कार्यकर्ते वैनी आहेत का मिपा वर? ;-)

शस्त्रक्रिया कसली, हे समजले नाही, स्पष्टीकरण द्यावे, म्हणजे मत देता येइल.

सर्वात आधी, लग्न झाल्यावर तुम्ही केसा॑च॑ काय करणार आहात ते ठरवा...!!! एकदा का ते ठरवल॑, की पुढे काय करायच॑ हे ठरवण॑ सोप्प॑ जाईल. नाही का ??????

आपली 'केस' वेगळी आहे,असे स्विकारुन टकलाचे-सामाजिक,राजकीय,व्यक्तिगत फायदे/तोटे पाहुन ;-) धोरण अखावे... येवढं करुनही बोंब झाली,तर अपलं 'टक्कल' झाकायला वीग आहेतच...निरनिराळे ;-)