ती आणि ते
गावाच्या घराघरातून ती नांदते
आणि प्रत्येक माणसात उगम पावून
खळाळत्या नदीसारखी
गल्लीबोळातून वाहते
बैलाचा बळी देऊन मांस खाणारा
कंटाळून सोवळ्यात जातो
तेव्हा ती थोडी बदलते
कमरेला झाडू लावणारा
चिडून पुस्तक हाती धरतो
तेव्हा ती थोडी वळते
उमटत असतात लाटा तिच्यात
तिच्यावर विहार करणार्यांच्या क्रीडेने
घुसळली जाते तिच्या तळाशी
गुदमरून बुडणार्यांच्या आकांताने
जिवंत असतो गाव रसरशीतपणे
तिच्यातल्या लाटा-भोवर्यांमुळे
नि:स्तब्ध गावतटावर फक्त ते
तिच्या रक्षणासाठी बसलेल्यांचे सांगाडे....
कविता आवडली
धन्यवाद.
??
सुंदर कविता. ज्याचं बालपण
छान कविता - बैलाचा बळी देऊन
व्वाह
कविता आवडली. मला वाटते -
कलाकृती!! नगरी, सुरेख!
छान कविता
कल्पक!
सुंदर कविता..