Skip to main content

ती आणि ते

लेखक नगरीनिरंजन यांनी रविवार, 28/08/2011 08:29 या दिवशी प्रकाशित केले.
गावाच्या घराघरातून ती नांदते आणि प्रत्येक माणसात उगम पावून खळाळत्या नदीसारखी गल्लीबोळातून वाहते बैलाचा बळी देऊन मांस खाणारा कंटाळून सोवळ्यात जातो तेव्हा ती थोडी बदलते कमरेला झाडू लावणारा चिडून पुस्तक हाती धरतो तेव्हा ती थोडी वळते उमटत असतात लाटा तिच्यात तिच्यावर विहार करणार्‍यांच्या क्रीडेने घुसळली जाते तिच्या तळाशी गुदमरून बुडणार्‍यांच्या आकांताने जिवंत असतो गाव रसरशीतपणे तिच्यातल्या लाटा-भोवर्‍यांमुळे नि:स्तब्ध गावतटावर फक्त ते तिच्या रक्षणासाठी बसलेल्यांचे सांगाडे....
लेखनविषय:

वाचने 2542
प्रतिक्रिया 11

प्रतिक्रिया

कुठल्याही पळी, पंचपात्री कमंडलूत ती सामावत नाही ओंजळीपलिकडे कशात ती कधीच मावत नाही शेवटच्या ओळीत 'तिच्या रक्षणासाठी' ऐवजी 'थोपवण्यासाठी बांध घालून बसणारे' रूपकाला अधिक धरून झालं असतं.

In reply to by राजेश घासकडवी

>>शेवटच्या ओळीत 'तिच्या रक्षणासाठी' ऐवजी 'थोपवण्यासाठी बांध घालून बसणारे' रूपकाला अधिक धरून झालं असतं. खरंय, पण मग ते तितकेसे अ‍ॅब्सर्ड वाटले नसते. :)

भाषा व संस्कृती रक्षक व्याकरणशास्त्री/ प्रमाणभाषाप्रेमी?

छान कविता - बैलाचा बळी देऊन मांस खाणारा कंटाळून सोवळ्यात जातो तेव्हा ती थोडी बदलते कमरेला झाडू लावणारा चिडून पुस्तक हाती धरतो तेव्हा ती थोडी वळते हे आवडले ..