फेसबुक आणि मास्लोची चढती भाजणी
नीलीमा चहाचा कप खाली ठेवत पुन्हा एकदा तोच प्रश्न विचारती झाली - "पण शुचि मला एक कळत नाही तुला जिम आहे, पुस्तकं आहेत,रुममेट आहेत मग फेसबुकची गरजच काय?"
माझ्या प्रश्नार्थक चेहेर्याकडे पाहून ती उत्तरली "अगं म्हणजे "किलींग टाईम इज नॉट अ प्रॉब्लेम."
यावर परत परत तक्रार काय करायची म्हणून मी अचूक भावनिक मुद्दा शोधू लागले - "हे बघ नीलू" मीदेखील चहाचा घुटका घेत म्हटले "प्रत्येक मित्र-मैत्रिणीचे माझ्या आयुष्यात काही एक स्थान आहे. काही जणांच्या कमेंट्स तर काही जणांनी टाकलेले व्हिडीओ तर काही जणांची विचारपूस मला ताजीतवानी करते, रोज नव्या दिवसाला सामोरी जायची उभारी देते. आणि यात मला तरी काही वावगं वाटत नाही."
नीलू परत एकदा विचारमग्न चेहरा करत उत्तरली - "शुचि खरं सांग दिवसांतले किती तास तू फेसबुकवर पडीक असतेस? रात्री मधेच उठलीस तर तू फेसबुक रिफ्रेश करतेस असं तूच म्हणतेस मग हे बरोबर का?"
नीलू न्यायाधीशी भूमिकेत शिरल्याने मीदेखील आता डिवचले गेले होते - "वेल तुझे म्हणणे खरे आहे. माझ्याकरता फेसबुक हे व्यसन होऊन बसले आहे पण त्यामागचं कारण तर समजाऊन घे" मी इरेला पेटून म्हटले "तुला मानवी गरजांची मास्लोची चढती भाजणी माहीतच असेल. पैकी तीसरी गरज आहे एखाद्या समूहाचा घटक बनणे/ नाळ जोडणे (कनेक्टेडनेस)/ प्रेम आणि मैत्री. तर चवथी गरज आहे स्वप्रतिष्ठा."
नीलूने तिचा मोर्चा आता चहाकडून लाडवाकडे वळवला होता.लाडवाचा तुकडा मोडत ती म्हणाली - "बरं मग? मास्लोच्या चढत्या भाजणीचा इथे काय संबंध?"
"नीलू संबंध आहे. जर फेसबुकमुळे मला एखाद्या गटाशी, माझ्या मित्रमैत्रिणींशी घट्ट वीण जोपासल्यासारखी वाटत असेल तर माझी तीसरी गरज पूर्ण होत नाही का? : )
शिवाय कोणी माझे फोटो, प्रतिक्रिया "लाईक" केल्या तर स्वप्रतिष्ठा, अहं सुखावण्याची चवथी गरजही पूर्ण होते."
नीलू आता बारीच वैतागलेली दिसत होती. "शुचि तू ऑफीसात जातेस तेव्हा या गरजा पूर्ण नाही होऊ शकत का?"
मी - "अगं कसं शक्य आहे? ऑफीसच्या आवारात एकदा प्रवेश केला की कोणी कोणाचा मित्र नसते अथवा शत्रू नसते. तेव्हा कनेक्टेडनेस, मैत्री या गरजा ऑफीसात कशा पूर्ण होतील ?"
नीलू तिचाच मुद्दा पुढे दामटत म्हणाली - "शुचि फेसबुक हे भावनिक गरजा अप्रत्यक्षरीतीने पूर्ण करण्याचे साधन आहे/असावे याच्याशी मी तरी असहमत आहे. कारण हे म्हणजे तुम्ही एक समांतर आयुष्य जगू लागता असे मला दुर्दैवाने म्हणावे लागेल."
नीलूने एव्हाना लाडू संपवला होता आणि मी देखील या न संपणार्या वादसत्राला कंटाळले होते.
"बरं समांतर आयुष्य तर समांतर आयुष्य. एकटेपणापेक्षा ते बरे." म्हणून मी आमची भेट आवरती घेतली.
प्रतिक्रिया
हं.....
सहमत. मीही (समजून उमजून)
प्रकाटाआ
मला आपला प्रतिसाद आवडला होता.
शुचि, फेसबुकावर खातं असावं का
थोडे लाडू इकडे पाठव ग!
सहमत
शूचीताइ आता वेळ आली आहे
आत्मशून्य आपल्याला काय आवडले
रोचक
पुन्हा एकदा व्यक्तीगत निवड
छान
व्यक्तीगत मामला
निवेदिका-नीलिमा संवाद
प्रश्न-उत्तरे
ऐकावे जनाचे ...
व्यक्तिगत हक्काबाबत निरीक्षण कोणाकडून कृतीकरिता?
दोघांशी सहमत
वादसत्र
>> फेसबुकवर मित्र मैत्रिणींची
न्याय
फेस्बुकवगैरेकायअसते?प्रश्नसंप
हे असते.
काय असते ?
मस्त लेख!!!
चर्चा अतिशय सुरेख, अन माहिती
५००/१०००
>>श्याम मानव यांनी माझी
फ्रेंड रिक्वेस्ट नाकारणे
धन्यवाद तै
अगदी अगदी
हा हा हा
ह्या माहिती बद्दल धन्यवाद रे
खरं सांगू का... माझे आधी
असंख्य जुने शाळेतले
+१
ह्म्म
शेवटी कुठल्याही गोष्टीचे
विचारजंत कूठचे!
वा
सहमत
आपल्याला अनोळखी व फारशी गती
ऑफीसमधे न भेटणारे फेसबुकवर
लिंक
फेसबुक चांगले की वाईट हा खर
प्रकटन ठीक वाटले. लाडू कुठले
बरेचदा लोक ओळख नसताना
आणि कळलं तरीसुद्धा
मला फेसबुक एका मर्यादेपर्यंत
फेस्बुक!
Pagination