साद रामेश्वरमची .... - भाग १
"शशिकांतजी आप को हमारे साथ रामेश्वरम आना है।"
असा हुकूम वजा आदेश मला फोनवरून आला व मी तात्काळ होकार कळवला. झाले. मी कामाला लागलो.
तोवर हवाई प्रवासाची तिकीटे आली.
मधल्याकाळात मला महर्षीं अत्रींच्या जीव नाडीत सांगण्यात आले,
"तुला सांगून अजूनही अमुक अमुक ते सोपस्कार तू केलेले नाहीस. आम्हाला कल्पना आहे की तू मुद्दाम टाळत नाहीस पण त्याची तातडी आहे हे लक्षात ठेव. मी, अत्री, आता नाडीवाचकाला अशी आज्ञा करतो की त्याने तुझ्यासाठी व तुझ्या पत्नीसाठी सांगितलेली गोष्ट त्याच्या खर्चाने करावी."
मी ते उत्तर ऐकून थक्क झालो. कारण आत्तापर्यंत माझ्या व कुटुंबियांकरिता केलेल्या सर्व शांती-दीक्षा माझ्या खर्चाने मी करत आलो आहे. पुर्वीपासून अनेक लोक त्यांचे अनुभव मला सांगत की त्यांना शांती-दीक्षेच्यासाठी महर्षी म्हणाले की तुला परवडेल तितकी दक्षिणा नाडीवाचकाला दे किंवा तुला शांतीदीक्षा करायची गरज नाही. तू जे नाडी वाचकाला देशील ते पुरे आहे. ते आदेश नाडी केंद्रातील लोक तत्परतेना पाळतात. जादापैशाची मागणी करत नाहीत.
आजकालच्या जमान्यात पैशासाठी काहीही करायला तयार असलेले लोक पाहून असे काही नाडीकेंद्र चालक महर्षींचे आदेश आपणहून मानतात वेळोवेळी फुकट नाडी कथन करतात यावर विश्वास बसणे शक्य नाही. आता तर त्याचा मला पण प्रत्यक्ष अनुभव येणार होता. नाडीवाचन झाल्यावर नाडी केंद्र संचालक म्हणाले, "असे आदेश मला आधून मधून मिळतात. तेंव्हा आपण संकोच मानू नका. आपणां उभयतांसाठी सर्व व्यवस्था मी करतो. आपण केंव्हा तमिळनाडूत जाणार ते फक्त ठरवा."
या दरम्यान मला रामेश्वरला जायला निमंत्रण आले. एरव्ही टाळमटोल करणारी पत्नी ही आश्चर्यकारकरित्या तयार झाली लगेच तिचे हवाईतिकीट काढले.
रामेश्वरमला जायला मदुराईपर्यंत हवाईप्रवास झाला. एक मिनी बस तयार होती. त्यात आरूढ होऊन आमची रामेश्वरमला रवानगी झाली. तेथील समुद्रात स्नान झाले आणि आम्ही नाडी वाचनाला सरसाऊन बसलो.
"आज नाही उद्या सकाळी" असा आदेश झाला म्हणून रात्री गप्पांना उत आला.
"बताईये ना शशिकांत जी, आजकल आपका क्या चल रहा है? अशा विचारणांना उत्तरे देता नाकी नऊ आले.
आमच्यासोबत आलेले १२जण आधी एकदा रामेश्वरमला येऊन परत काशी-वाराणशीला गंगेत स्नान करून परत रामेश्वरमला आले होते. ते ही फार थकले होते. सकाळी नाडी पट्ट्याशोधायला सुरवात झाली. काही पट्ट्या बाद झाल्यावर एका पट्टीत नावे, जन्मदिनांक, ग्रहमान जुळले अन वाचनाला प्रारंभ झाला. त्यातील वर्णन ऐकून सगळ्यांना थक्क व्हायला झाले. नंतर आणखी अनेकांच्या पट्या निघाल्या त्यातील कथनांनी अनेकांना उत्साह आला. दुपारच्या जेवणानंतर पुन्हा एकादा महफिल जमली. करता करता संध्याकाळ व्हायला लागली, तेंव्हा एकांची पट्टी वाचायला सुरवात होणार तेंव्हा आदेश आला, "आपण रामेश्वराची वाळू व जल काशीना गंगेत सोडलेत आणि तेथील जल आणि मृत्तिका कथनाप्रमाणे रामेश्ररमच्या समुद्रात सोडलीत. पण त्या धांदलीत एक गोष्ट करायला आपण विसरलात. ती केली की वाचन करायला पुर्ण परवानी मिळेल. तोवर नाही." झाले. चर्चा झाली खरोखर आम्ही २२ विहिरीतील जलाने अंघोळ केलेली नव्हती असे उत्पन्न झाले. आम्ही धावलो. कारण तेथे स्नानाची वेळ सुर्यास्तापर्यंतच असते. आम्ही पोहोचलो तोवर फक्त काही मिनिटे उरली होती. पटापट तिकिटे काढून एका एका विहितील पाणी पाळीपाळीने आम्ही १४ जणांनी अंगावर घेत २२ विहिरींची परिक्रमा पूर्ण केली आणि परत कपडे बदलून वाचनाला बसलो. तेंव्हा महर्षी म्हणाले, "अशी त्वरा करावी, तेंव्हाच मनाच्या निश्चयाची परीक्षा होते. आत्ता केलेल्या स्नानाचा विसर तु्म्हाला पडणार मग तुम्ही त्वरेने ती करणार. हे सर्व पुर्व नियोजित होते. जसे आम्ही आता तुम्हाला जे कथन करणार आहोत. ते ही असेच पुर्व नियोजित असेल."
"तुम्ही आता त्या एकाची नाडीपट्टी वाचायला मनाने तयार झाला आहात. आणि आम्हीही."
त्याच काळात अण्णा हजाऱ्यांचे उपोषण भर-बहरात होते. कधी नव्हे ते भारतभर उत्साहाने जनप्रवाह आपापल्यापरीने काही तरी करून दाखवायला सरसावला होता. त्यावर महर्षी काही भाष्य करतात काय? किंवा सूचक काही वर्तवतात काय? याची उत्सुकता आम्हाला होती.
तिकडे आम्हा पति- पत्नीसाठी आणखी काय आश्चर्य तयार होते?....
भाग २ .... मधे वाचकांनी उत्सुकता दर्शवली तर उचलेन लेखणी...
वाचने
3590
प्रतिक्रिया
21
मिसळपाव
प्रतिक्रिया
वाचतोय.
वाचकांनी उत्सुकता दर्शवली तर उचलेन लेखणी...
पुढील भाग येऊ द्या!
पुढील भाग अजुनच रंजक असावेत
In reply to पुढील भाग येऊ द्या! by अनंत छंदी
अच्छा, तो नाडी ऐसे धागे धागे
In reply to पुढील भाग अजुनच रंजक असावेत by jaypal
लै भारी!
In reply to पुढील भाग अजुनच रंजक असावेत by jaypal
उत्सुकता जीव घेईल माझा.
आणि माझाही....
In reply to उत्सुकता जीव घेईल माझा. by नगरीनिरंजन
पुढील भाग वाचण्यास उत्सुक.
+१
In reply to पुढील भाग वाचण्यास उत्सुक. by शुचि
आपण उत्सुकता....
>>आम्ही २२ विहिरीतील जलाने
=))=))=))=))
In reply to >>आम्ही २२ विहिरीतील जलाने by अन्या दातार
निष्पन्न...
पुढील भाग वाचण्यास उत्सूक..
वाचकांचे बारीक लक्ष
In reply to पुढील भाग वाचण्यास उत्सूक.. by योगी९००
आभारी आहे..
In reply to वाचकांचे बारीक लक्ष by शशिकांत ओक
बावीस
बाव, बावीस,
पावले आधी टाकून हात पुढे करावा लागेल
भाग २ ...महर्षी आले भेटायला....