एक अगदी मनाला भिडणारा लेख नुकताच वाचनात आला. त्या लेखाची 'लोकप्रभा' साप्ताहिकातली लिंक येथे देत आहे. अवश्य वाचा.
http://www.loksatta.com/lokprabha/20110902/andolan.htm
पुण्याजवळच्या अत्यंत सुपीक आणि सुंदर अशा मावळ खोर्याची विकासाच्या नावाखाली सुरु असलेली लूट, राजकारण्यांची अधू दृष्टी, तिथल्या साध्या माणसांची होणारी परवड आणि पैशाच्या मोहात उडून जाणारी अस्सल मावळ संस्कृती याचा खूप चांगला ऊहापोह लेखक श्रीरंग गायकवाड यांनी या लेखात केलेला आहे.
विकासचा राक्षस या सुपीक मावळाला गिळंकृत करणार अशी भीती या लेखातून व्यक्त होतेय. चाकण एमाआयडीसी, तळेगाव एमाआयडीसी, दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरीडॉर, विविध टाऊनशिप्स, लवासा सिटी, नटनट्या, राजकारणी, उद्योजक यांचे अवाढव्य फार्महाऊसेस, मोठ-मोठी हॉटेले, ढाबे, इत्यादी विकासाची अक्राळ-विक्राळ भुते मावळाचा उत्तुंग इतिहास पायदळी तुडविणार असे चित्र सध्या दिसतेय. नुकतेच झालेले आंदोलन, पोलिसांनी केलेला गोळीबार, त्यात मारले गेलेले निष्पाप जीव, या आंदोलनाचे आणि शेतकर्यांच्या संतापाचे कारण, केवळ भाजपला पाठिंबा देणारा भाग म्हणून पुणे जिल्ह्यात शक्तीशाली असूनदेखील राष्ट्रवादी काँग्रेसकडून होणारी पराकोटीची उपेक्षा, गलिच्छ राजकारण या सगळ्यांचा लेखकमहाशयांनी खूप चांगला वेध घेतलेला आहे.
जमिनीचा चतकोर तुकडा विकूनही कधीही न पाहिलेल्या रकमा हातात पडल्यावर इथली संस्कृती पार बदलून गेलेली आहे. महागड्या बाईक्स, स्कॉर्पिओ (हा तर त्यांचा ब्रँडच आहे), रंगीबेरंगी गॉगल मिरवणार्या मस्तवाल पोरांच्या झुंडीच्या झुंडी या भागात तयार झाल्या आहेत. दिवसभर उंडरणे, अरेरावी करणे, दारू ढोसणे, नोटांची पुडकी फेकून दौलतजादा करणे आणि एक दिवस हातातला पैसा संपला की बापुडवाणा चेहरा करून कोपर्यात पडून राहणे ही या भागातली नित्याची गोष्ट झालेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना आपल्या मनगटातल्या अफाट ताकदीचा भक्कम आधार देणारे मावळे आता स्वतःचा तोल सावरत लपून-छपून चालणार्या डान्स बारमधल्या छछोर बारबालांच्या केसांमध्ये इश्काचा आणि अय्याशीचा आधार शोधत आहेत. याला विकास म्हणायचे का? म्हणूनच हा अस्सल मर्हाटी मुलूख आता अमराठी लोकांच्या हातात चालला आहे. लेखक म्हणतात आता फक्त ३०% जमीन शेतकर्यांच्या प्रत्यक्ष ताब्यात राहिलेली आहे; बाकी ७०% जमिनीचा 'विकास' झालेला आहे. ज्या वेगाने हजारो एकरातले इतके महत्वाकांक्षी प्रकल्प या भागात तयार होत आहेत त्यावरून पुढच्या काही वर्षात 'मावळ' फक्त इतिहासातच शिल्लक राहील अशी सार्थ भीती लेखकाने व्यक्त केलेली आहे.
काळासोबत बदलणे, विकासाच्या संधी निर्माण करणे ठीकच आहे पण विकासाची पावले इतकी खोलवर जाऊ नयेत ज्यामुळे एखाद्या भागातली निसर्गनिर्मित व्यवस्थाच कंगाल होऊन जावी. पुण्याच्या आस-पास हेच घडत आहे. अफाट गर्दी, वखवखलेली माणसे, अतिस्वार्थी राजकारणी, गुंडांच्या मदतीने बळकावल्या जाणार्या सुपीक जमिनी, वाहनांनी खचाखच भरलेले रस्ते आणि गल्ल्या...कुठे जाणार आहोत आपण?
काल कर्वे रस्त्यावरून येतांना नळ स्टॉपच्या सिग्नलला थांबलो होतो. गुरगुरणारर्या कुत्र्यांप्रमाणे सगळी वाहने अधाशी नजरेने सिग्नलकडे बघत होती. केव्हा एकदाचा सिग्नल हिरवा होतो आणि केव्हा आम्ही आमच्या गाड्या सुसाट सोडतो अशी एक विचित्र अधीरता त्या सगळ्या भागात पसरलेली होती. एक आजोबा हळू-हळू रस्ता ओलांडत होते. सिग्नलचे घड्याळ पुढे सरकत होते. १०, ९, ८, ७...माझ्या छातीत अकारण धस्स होत होते. आजोबा जर सिग्नल सुटण्याआधी रस्ता क्रॉस नाही करू शकले तर? वाहनांची ही बेदरकार फौज अचानक पिसाळलेल्या कुत्र्यांच्या झुंडीप्रमाणे त्यांच्या अंगावर धावून गेली तर? गडबडून त्यांचा तोल गेला तर? गाडीमधल्या किंवा दुचाकीवरच्या एखाद्या 'सुशिक्षिता'ने त्यांच्या या असहायतेला उद्देशून सणसणीत शिवी हासडली तर? त्यांच्या सन्माननीय वृद्ध आणि हळव्या संवेदनेला "ये थेरड्या..." किंवा "ये म्हातार्या, दिसत नाही का?" असे विखारी शब्द टोचले तर? मला कसेसेच होऊ लागले. आपण सुशिक्षित म्हणवतो खरे स्वतःला पण त्याला काही अर्थ नाही. ही उदाहरणे मी स्वतः पाहिलेली आहेत म्हणून माझी भीती अधिकाधिक वाढत जात होती. शेवटी सगळे आकडे संपल्यावर वाहने रानटी कुत्र्यांसारखी पुढे झेपावली. आजोबा जेमतेम पदपथापर्यंत पोहोचतच होते. थोडं भांबावणं, थोडं चिडणं अशा मिश्र भावनांचा अनुभव घेत आजोबा एकदाचे पदपथावर पोहोचले आणि माझा जीव भांड्यात पडला...
कसली आहे ही घाई? कुठे जायचंय? ऑफीसला? पिक्चरला? मॉलमध्ये? हॉस्पिटलमध्ये? शाळेत? कॉलेजला? पार्टी करायला? दारू ढोसायला? घरी? नक्की जायचंय कुठे? एवढी घाई कसली आहे? सरासरी सगळे सिग्नल मिळून आणि रस्त्यांमधला एकूण वेळ मिळून आपण १० मिनिटे जास्त नाही देऊ शकत? सतत हॉर्न वाजवून रस्त्यांची वाट लावणार्यांना काय राष्ट्रपतींना भेटायचे असते की बराक ओबामांना? त्या आजोबांसारखं थोडं हळू चाललं तर काय आभाळ कोसळणार आहे? विकासाचा वेग जीवघेणाच का असायला हवा? हळू-हळू, थोडं बेतानं, थोडं इथे, थोडं तिथं, थोडं सबुरीनं असं नाही का चालणार? एकापाठोपाठ एक अवाढव्य प्रकल्प लगेच, आत्ताच, इथेच का? एक इथे, दुसरा नागपूरात, तिसरा नाशकात, चौथा सोलापूरात, पाचवा नगरमध्ये, सहावा जळगावला, सातवा कोल्हापूरात, आठवा सांगलीत, नववा बीडमध्ये, दहावा रत्नागिरीत, अकरावा वर्ध्याला...काय हरकत आहे? पुण्यात जागा आहे, पाणी आहे, मुंबईशी कनेक्टीविटी आहे, वीज आहे म्हणून पुण्याचाच जीव घ्यायचा का? मुंबई आर्थिक राजधानी आहे म्हणून मुंबईलाच कधीही स्फोट होऊ शकणारा एक अत्यंत धोकादायक बाँब बनवायचं का? टिचभर जागेत दीड कोटी लोकं राहतात हो त्या मुंबईत! लोकलमधून अक्षरशः मेंढरासारखी कोंबलेली माणसं बघितली की कीव येते मुंबईची. अस्ताव्यस्त पसरलेल्या गलिच्छ झोपडपट्ट्या बघून मुंबईच्या भविष्याचं काय असा प्रश्न पडत नाही राजकारण्यांना? 'मुंबई स्पिरीट' म्हणून गोंडस नाव देऊन मुंबईवर होणारे अत्याचार विसरले जाणार थोडेच आहेत. कसलं स्पिरीट? काही दुसरा ऑप्शन आहे का? कुठल्या शहराला दुसरा ऑप्शन असतो? कुठलं शहर बाँबस्फोटांनंतर थांबलंय? तुम्ही-आम्ही आपण थांबू शकतो का? यात कसलं आलंय स्पिरीट? ही आपल्या नेत्यांनी केलेली साखरपेरणी आहे. स्तुतीचे चार शुष्क शब्द फेकले की आपल्याला खुश व्हायला होतं आणि यातच या लोकांचं फावतं.
पुढील १५ वर्षात काय चित्र असेल काहीच सांगता येत नाही. पुण्यात दरवर्षी जवळपास सव्वादोन लाख वाहने रस्त्यावर येतात. पार्किंगला कुठेच जागा मिळत नाही. विचार करा, १५ वर्षांनी काय अवस्था होईल. रस्ते रुंद करायला जागा नाही, नवनवीन प्रकल्प येतच आहेत, राजकारणी आपली तुंबडी भरतच आहेत. आत्ताच अठरा लाखाच्या घरात आहे पुण्यातल्या वाहनांची संख्या! ज्या अंतराला पूर्वी २० मिनिटे लागायची त्या अंतराला आता १-१.५ तास लागतो.
जीवन जास्त जटिल होत चाललंय, निष्पाप मरतोय..हीच का विकासाची फळं? विषारी आहेत खरी....
वाचने
6893
प्रतिक्रिया
51
मिसळपाव
प्रतिक्रिया
एक इथे, दुसरा नागपूरात, तिसरा
तुम्ही खूप तळमळीने लिहीता. पण
खरं आहे
In reply to तुम्ही खूप तळमळीने लिहीता. पण by नगरीनिरंजन
+१
In reply to तुम्ही खूप तळमळीने लिहीता. पण by नगरीनिरंजन
लेख आवडला आहे.
>>ही घाई कसली हे खरच कळत
In reply to लेख आवडला आहे. by सहज
???
In reply to >>ही घाई कसली हे खरच कळत by नितिन थत्ते
पुणे स्टेशनच म्हणायचे
In reply to ??? by पंगा
हम्म्म्म...
In reply to पुणे स्टेशनच म्हणायचे by नितिन थत्ते
डेक्कन> जंम रस्ता > सीओईपी >
In reply to हम्म्म्म... by पंगा
नेमके!
In reply to डेक्कन> जंम रस्ता > सीओईपी > by नितिन थत्ते
ओ भौ......
In reply to डेक्कन> जंम रस्ता > सीओईपी > by नितिन थत्ते
रस्ता...
In reply to ओ भौ...... by मन१
डेक्कन> जंगली महाराज रस्ता >
In reply to हम्म्म्म... by पंगा
शक्य आहे
In reply to डेक्कन> जंगली महाराज रस्ता > by नितिन थत्ते
हॅ हॅ हॅ
In reply to शक्य आहे by सहज
भयानक...
भयानक...
सगळं भयानक आहे खरं पण सुरुवात
लोकसंख्या
In reply to सगळं भयानक आहे खरं पण सुरुवात by llपुण्याचे पेशवेll
किती धर्मांध होत चाललो आहोत
In reply to लोकसंख्या by समीरसूर
तसं वाटत नाही
In reply to किती धर्मांध होत चाललो आहोत by llपुण्याचे पेशवेll
गल्ली चुकतोय असं अजिबात वाटत
In reply to तसं वाटत नाही by समीरसूर
प्रतिसाद
In reply to गल्ली चुकतोय असं अजिबात वाटत by llपुण्याचे पेशवेll
समीरसूर साहेब, मुद्देसूद
In reply to प्रतिसाद by समीरसूर
चर्चा?
In reply to समीरसूर साहेब, मुद्देसूद by llपुण्याचे पेशवेll
समीरसाहेब, तो पुपे चेष्टा
In reply to चर्चा? by समीरसूर
चेष्टाच
In reply to समीरसाहेब, तो पुपे चेष्टा by रेवती
पुप्या सुधार सुधार रे..
In reply to चेष्टाच by समीरसूर
पुप्या सुधार सुधार रे..
In reply to पुप्या सुधार सुधार रे.. by अर्धवट
+१ -१
In reply to किती धर्मांध होत चाललो आहोत by llपुण्याचे पेशवेll
मुद्देसूद
In reply to +१ -१ by मन१
अवांतर होइल.
In reply to मुद्देसूद by समीरसूर
पण
+१००००००००००
In reply to पण by चिरोटा
नाही
In reply to पण by चिरोटा
लोकप्रभेतील
लेख तळमळीने लिहिलाय हे
पुण्यात सिग्नलवर एक भयावह
मान्य
In reply to पुण्यात सिग्नलवर एक भयावह by विजुभाऊ
मान्य
In reply to पुण्यात सिग्नलवर एक भयावह by विजुभाऊ
पुण्यात सिग्नलवर एक भयावह
काही साधे उपाय आहेत.
पदपथ बांधा किंवा आकाशमार्ग
In reply to काही साधे उपाय आहेत. by मन१
दु:खद घटना आहे.
In reply to पदपथ बांधा किंवा आकाशमार्ग by रेवती
अतिक्रमण
In reply to काही साधे उपाय आहेत. by मन१
सहमत आहे
सहमत.
In reply to सहमत आहे by बाळकराम
तळमळ
जबरदस्त लेख!
जबरदस्त लेख!