मोटरसायकलः बजाज बॉक्सर मॉडेल २००० चे, १०० cc
बर्याच दिवसापासून माझ्या मोटरसायकलची सरासरी धाव (अॅव्हरेज) काढायची होती. काल वेळ मिळाला म्हणून गॅरेजमध्ये गेलो. पेट्रोलचे कंटेनर घेतले अन गॅरेजवाल्याला सांगितले की मीच गाडी घेवून अॅव्हरेज तपासून बघतो. पहिल्यांदा कार्बोरेटरमधले पेट्रोल संपवण्यासाठी पेट्रोल कॉक बंद केला अन एखाद्या कि.मी. पर्यंत गाडी बंद झाली. आयटीआय सिग्नलच्या समोरच काही ट्रॅफीक हवालदार गाड्या अडवत होते. सरळ त्यांच्यासमोरच गाडी बंद झाली. मी गाडी स्टँडला लावली. कंटेनरची नळी इनलेट ला जोडली. पेट्रोल टँक मधून १०० ml पेट्रोल कंटेनर मध्ये काढले मिटरचे रिडींग ५२६.१ घेतले. मोटरसायकल एमाडीसीतून गाडी त्रंबकेश्वराच्या दिशेने चालवायला सुरूवात केली. साधारण ४० कि.मी. स्पिड ठेवायचा असे मनात होते. सातपुरला काही ट्रॅफीक लागले. गियर खाली आणावे लागले. एकदा पाय टेकवून गाडी दोन सेकंदाकरता उभी करावी लागली. त्रंबकविद्यामंदीराच्या ३००/ ३५० मिटर पुढे गाडी बंद झाली. त्यावेळचे ओडोमिटरचे रिडींग ५३५ होते. हे झाले ९ कि.मी. १०० ml साठी. म्हणजे एका लिटरला ९० कि.मी.
एका लिटरला ९० कि.मी. म्हणजे फारच चांगले अॅव्हरेज आले. मला वेळ होताच. म्हणून अजून पुढे जावून अॅव्हरेज बघण्याचे ठरविले. पाऊस पडत नव्हताच. म्हणजे पडून गेलेला होता. कारण पावसाळा असून त्रंबकेश्वराला पाऊस नाही असे सहसा होत नाही. सगळीकडे हिरवळ होती. त्रंबकेश्वरचा रस्ता तसा शांत असतो. भाविक लोकांच्या गाड्यांची वर्दळ चालू होती. त्रंबकेश्वराला श्रावणात जाण्याचा हिरवळ, पाऊस हा मोठा फायदा असतो.
परत कंटेनर उघडले अन त्यात टँकमधून १००ml पेट्रोल काढले. गाडी चालवायला सुरूवात केली. महिरावणीच्या थोडे पुढे कंटेनरमधले पेट्रोल संपले म्हणून गाडी बंद झाली. या वेळचे ओडोमिटरचे रिडींग ५४३ होते. म्हणजे ५३५-५४३=८ कि.मी. १०० ml साठी. म्हणजे एका लिटरला ८० कि.मी. यावेळी रस्ता थोडा चढावाचा होता म्हणून मला गाडी थोडी रेस करावी लागली. यावेळी थोडा स्पिड ४० ते ५५ कि.मीच्या दरम्यान होता.
आता मोटरसायकल रस्त्याच्या बाजूला घेतली. पुन्हा टँकमधून १००ml पेट्रोल कंटेनरमध्ये काढले अन नाशिकच्या दिशेने माघारी वळालो. आता रस्ता उताराचा होता. त्याचा फायदा घेत मी उतारावर इंजीन बंद करून चालवत असे. यामुळे नक्कीच अॅव्हरेज वाढ होणार होती. अॅव्हरेज काढतांना इंजीन तर चालूच पाहीजे. पण नक्की किती अॅव्हरेज वाढतो ते काढण्यासाठी मी हा प्रयोग करून पाहीला. तसेच या तिसर्या वेळी स्पिड सतत ४० वरच ठेवला.
त्रंबकविद्यामंदिराच्या थोडे पुढे मोटरसायकल बंद झाली. रिडींग आले: ५५३.३. म्हणजे ५४३-५५३=१०. म्हणजेच १ लिटरला १०० कि.मी.
लागोपाठ तिन वेळा अॅव्हरेज काढला त्याचा मध्ये (mean) ९० कि.मी. येतो. (९०+८०+१००/३=९०)
प्रत्येक १००ml पेट्रोल घेण्यात काही त्रूटी लक्षात घेवून, काही तांत्रीक बाबी, हवेचा वेग, मोटरसायकल चालवण्याची पद्धत आदी गोष्टी लक्षात घेवून आपण मिळालेला अॅव्हरेज आणखी कमी करू. ८५ किमी करू. ८० करू किंवा डोक्यावर पाणी गेले ७५ करू. म्हणजे एकुणच आताच्या घडीला मला चांगला अॅव्हरेज मिळाला होता.
वाचने
25557
प्रतिक्रिया
81
मिसळपाव
प्रतिक्रिया
हा पण मुद्दा ध्यानात घ्यावा
ते तर खरेच आहे. पण काल
In reply to हा पण मुद्दा ध्यानात घ्यावा by चेतन सुभाष गुगळे
तुम्ही डबल सीट की सिंगल सीट
In reply to ते तर खरेच आहे. पण काल by पाषाणभेद
नाशिक!!!
फफफफफोटो??
सहमत. पाभेजी खरेच तिकडचे
In reply to फफफफफोटो?? by निनाद
यांची गाडी चोरावी का
सीबीझेड आणि पल्सर वगैरे
In reply to यांची गाडी चोरावी का by शाहिर
(संसारी १०० सीसीवाला) -
In reply to सीबीझेड आणि पल्सर वगैरे by गवि
दुसरी पद्धत
चारचाकी वाहनांकरिता योग्य
In reply to दुसरी पद्धत by सुनील
इंधन पुर्ण भरायच म्हणजे
In reply to चारचाकी वाहनांकरिता योग्य by चेतन सुभाष गुगळे
माझी नवीन यामाहा sz शहरात
नवीन गाडी घेतलि हे कळाले
In reply to माझी नवीन यामाहा sz शहरात by स्पा
शाहिर....
In reply to नवीन गाडी घेतलि हे कळाले by शाहिर
ब-याच दिवसांनी थोडा तांत्रिक
आपली व सुनिल यांची
In reply to ब-याच दिवसांनी थोडा तांत्रिक by ५० फक्त
माफ करा....
In reply to आपली व सुनिल यांची by पाषाणभेद
माझी
In reply to ब-याच दिवसांनी थोडा तांत्रिक by ५० फक्त
आपण ही नवीन गाडी घेतली असे कळाले ..
In reply to ब-याच दिवसांनी थोडा तांत्रिक by ५० फक्त
अॅवरेज
कोणाला?
In reply to अॅवरेज by विनायक प्रभू
मास्तर, रस्त्यावर चालणार्या
In reply to अॅवरेज by विनायक प्रभू
गाड्या
In reply to मास्तर, रस्त्यावर चालणार्या by शैलेन्द्र
मास्तर एक शंका आहे गाडीला
In reply to अॅवरेज by विनायक प्रभू
स्टेपनी
In reply to मास्तर एक शंका आहे गाडीला by विजुभाऊ
विजुभौना असं विचारायचय की
In reply to स्टेपनी by विनायक प्रभू
माहिती हवी आहे...
In reply to अॅवरेज by विनायक प्रभू
रस्त्यालाच ओवर ऑइलींग केल तर?
In reply to माहिती हवी आहे... by पिवळा डांबिस
हो
In reply to माहिती हवी आहे... by पिवळा डांबिस
थॅन्क्यू!
In reply to हो by विनायक प्रभू
फटफटी
In reply to थॅन्क्यू! by पिवळा डांबिस
(No subject)
In reply to फटफटी by विनायक प्रभू
मस्त धागा.. १०० मिली
रीझर्व्ह ला आली गाडी की
गणेशा, स्पीड : कायम अबोव्ह
In reply to रीझर्व्ह ला आली गाडी की by गणेशा
८०-९० वर जे मिळत ते ४०-५० वर
In reply to गणेशा, स्पीड : कायम अबोव्ह by इरसाल
>>मुंबईत ४२-४८ अॅवरेज
In reply to रीझर्व्ह ला आली गाडी की by गणेशा
माझी स्प्लेंडर बहुते ५० ते ६०
६ वर्षे
In reply to माझी स्प्लेंडर बहुते ५० ते ६० by विजुभाऊ
आईका .......
वोक्के...
In reply to आईका ....... by शाहिर
खराय
In reply to वोक्के... by मी-सौरभ
काका....
In reply to खराय by विनायक प्रभू
गाडी चा ठीक आहे
In reply to काका.... by मी-सौरभ
''चारचाकीसाठी, हायवेवर
तुम्ही सांगीतलेली गोष्ट
In reply to ''चारचाकीसाठी, हायवेवर by ५० फक्त
मायलेज
अवांतर: फुएल गेज अचूक नसणे हा
In reply to मायलेज by खेडूत
आम्ही आमच्या डरायवर पण डौट
In reply to अवांतर: फुएल गेज अचूक नसणे हा by गणपा
आणि अशा प्रकारे शॅम्पेन भाऊ
In reply to आम्ही आमच्या डरायवर पण डौट by माझीही शॅम्पेन
''मायलेज मोजायची शास्त्रीय
पेट्रोल उडालं (evaporate) तरी
गाडी चालवलीय कधी? मला वाटल
In reply to पेट्रोल उडालं (evaporate) तरी by ३_१४ विक्षिप्त अदिती
गाडी चालवलीय कधी? मला वाटल
In reply to गाडी चालवलीय कधी? मला वाटल by शैलेन्द्र
+१
In reply to गाडी चालवलीय कधी? मला वाटल by ३_१४ विक्षिप्त अदिती
आता उगीच कळुन न
In reply to गाडी चालवलीय कधी? मला वाटल by ३_१४ विक्षिप्त अदिती
हा प्रतिसाद लाऊड थिंकींग म्हणा हवं तर!
In reply to आता उगीच कळुन न by शैलेन्द्र
बहुधा तुम्हा दोघांना अभिप्रेत असलेली वाहनेच वेगवेगळी असावीत
In reply to हा प्रतिसाद लाऊड थिंकींग म्हणा हवं तर! by ३_१४ विक्षिप्त अदिती
इंजिनात पेट्रोल जळतं तिथे
In reply to गाडी चालवलीय कधी? मला वाटल by ३_१४ विक्षिप्त अदिती
इंजिनात पेट्रोल जळतं तिथे
In reply to इंजिनात पेट्रोल जळतं तिथे by वपाडाव
इंजिनात पेट्रोल जळतं तिथे
In reply to इंजिनात पेट्रोल जळतं तिथे by ३_१४ विक्षिप्त अदिती
चार चाकी व दुचाकीत फरक असतो..
In reply to इंजिनात पेट्रोल जळतं तिथे by वपाडाव
हु श्श्श्श
आमच्या अमरावतीला या एवरेज
तुमची बाई कमला आवडली
मस्त ...
>> जास्त वेळ थांबायचे असल्यास
In reply to मस्त ... by छोटा डॉन
६० सेकंद किंवा त्याहून अधिक
In reply to >> जास्त वेळ थांबायचे असल्यास by ३_१४ विक्षिप्त अदिती
साधकबाधक चर्चा होते आहे.
In reply to मस्त ... by छोटा डॉन