✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

मोटरसायकलची सरासरी धाव (अ‍ॅव्हरेज)

प
पाषाणभेद यांनी
Fri, 08/26/2011 - 09:32  ·  लेख
लेख
मोटरसायकलः बजाज बॉक्सर मॉडेल २००० चे, १०० cc बर्‍याच दिवसापासून माझ्या मोटरसायकलची सरासरी धाव (अ‍ॅव्हरेज) काढायची होती. काल वेळ मिळाला म्हणून गॅरेजमध्ये गेलो. पेट्रोलचे कंटेनर घेतले अन गॅरेजवाल्याला सांगितले की मीच गाडी घेवून अ‍ॅव्हरेज तपासून बघतो. पहिल्यांदा कार्बोरेटरमधले पेट्रोल संपवण्यासाठी पेट्रोल कॉक बंद केला अन एखाद्या कि.मी. पर्यंत गाडी बंद झाली. आयटीआय सिग्नलच्या समोरच काही ट्रॅफीक हवालदार गाड्या अडवत होते. सरळ त्यांच्यासमोरच गाडी बंद झाली. मी गाडी स्टँडला लावली. कंटेनरची नळी इनलेट ला जोडली. पेट्रोल टँक मधून १०० ml पेट्रोल कंटेनर मध्ये काढले मिटरचे रिडींग ५२६.१ घेतले. मोटरसायकल एमाडीसीतून गाडी त्रंबकेश्वराच्या दिशेने चालवायला सुरूवात केली. साधारण ४० कि.मी. स्पिड ठेवायचा असे मनात होते. सातपुरला काही ट्रॅफीक लागले. गियर खाली आणावे लागले. एकदा पाय टेकवून गाडी दोन सेकंदाकरता उभी करावी लागली. त्रंबकविद्यामंदीराच्या ३००/ ३५० मिटर पुढे गाडी बंद झाली. त्यावेळचे ओडोमिटरचे रिडींग ५३५ होते. हे झाले ९ कि.मी. १०० ml साठी. म्हणजे एका लिटरला ९० कि.मी. एका लिटरला ९० कि.मी. म्हणजे फारच चांगले अ‍ॅव्हरेज आले. मला वेळ होताच. म्हणून अजून पुढे जावून अ‍ॅव्हरेज बघण्याचे ठरविले. पाऊस पडत नव्हताच. म्हणजे पडून गेलेला होता. कारण पावसाळा असून त्रंबकेश्वराला पाऊस नाही असे सहसा होत नाही. सगळीकडे हिरवळ होती. त्रंबकेश्वरचा रस्ता तसा शांत असतो. भाविक लोकांच्या गाड्यांची वर्दळ चालू होती. त्रंबकेश्वराला श्रावणात जाण्याचा हिरवळ, पाऊस हा मोठा फायदा असतो. परत कंटेनर उघडले अन त्यात टँकमधून १००ml पेट्रोल काढले. गाडी चालवायला सुरूवात केली. महिरावणीच्या थोडे पुढे कंटेनरमधले पेट्रोल संपले म्हणून गाडी बंद झाली. या वेळचे ओडोमिटरचे रिडींग ५४३ होते. म्हणजे ५३५-५४३=८ कि.मी. १०० ml साठी. म्हणजे एका लिटरला ८० कि.मी. यावेळी रस्ता थोडा चढावाचा होता म्हणून मला गाडी थोडी रेस करावी लागली. यावेळी थोडा स्पिड ४० ते ५५ कि.मीच्या दरम्यान होता. आता मोटरसायकल रस्त्याच्या बाजूला घेतली. पुन्हा टँकमधून १००ml पेट्रोल कंटेनरमध्ये काढले अन नाशिकच्या दिशेने माघारी वळालो. आता रस्ता उताराचा होता. त्याचा फायदा घेत मी उतारावर इंजीन बंद करून चालवत असे. यामुळे नक्कीच अ‍ॅव्हरेज वाढ होणार होती. अ‍ॅव्हरेज काढतांना इंजीन तर चालूच पाहीजे. पण नक्की किती अ‍ॅव्हरेज वाढतो ते काढण्यासाठी मी हा प्रयोग करून पाहीला. तसेच या तिसर्‍या वेळी स्पिड सतत ४० वरच ठेवला. त्रंबकविद्यामंदिराच्या थोडे पुढे मोटरसायकल बंद झाली. रिडींग आले: ५५३.३. म्हणजे ५४३-५५३=१०. म्हणजेच १ लिटरला १०० कि.मी. लागोपाठ तिन वेळा अ‍ॅव्हरेज काढला त्याचा मध्ये (mean) ९० कि.मी. येतो. (९०+८०+१००/३=९०) प्रत्येक १००ml पेट्रोल घेण्यात काही त्रूटी लक्षात घेवून, काही तांत्रीक बाबी, हवेचा वेग, मोटरसायकल चालवण्याची पद्धत आदी गोष्टी लक्षात घेवून आपण मिळालेला अ‍ॅव्हरेज आणखी कमी करू. ८५ किमी करू. ८० करू किंवा डोक्यावर पाणी गेले ७५ करू. म्हणजे एकुणच आताच्या घडीला मला चांगला अ‍ॅव्हरेज मिळाला होता.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
25322 वाचन

💬 प्रतिसाद (81)

प्रतिक्रिया

हा पण मुद्दा ध्यानात घ्यावा

चेतन सुभाष गुगळे
Fri, 08/26/2011 - 09:41 नवीन
मोटरसायकलची टाकी समोर असते. जेव्हा आपण वाहन उन्हात उभे करतो तेव्हा बरेच इंधन वाफ रुपाने बाहेर पडते. सरासरी धाव अजूनच कमी होते.
  • Log in or register to post comments

ते तर खरेच आहे. पण काल

पाषाणभेद
Fri, 08/26/2011 - 10:11 नवीन
ते तर खरेच आहे. पण काल पेट्रोल कंटेनर मध्ये होते. नुकताच पाऊस पडून गेलेला होता. अन मिळालेला ९० किमी चा अ‍ॅव्हरेज ७५ किमी पर्यंत कमी करण्यासाठी 'तांत्रिक तॄटी' गृहीत घेतल्या गेलेल्या आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चेतन सुभाष गुगळे

तुम्ही डबल सीट की सिंगल सीट

चेतन सुभाष गुगळे
Fri, 08/26/2011 - 11:37 नवीन
तुम्ही डबल सीट की सिंगल सीट प्रवास करता यावरही हे अवलंबून असते. १०० सीसी मोटरसायकलचा प्रिस्क्राइब्ड पेलोड साधारण १३० किग्रॅ असतो. तेवढा लादून मग काढलेली सरासरी धाव नोंद करावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाषाणभेद

नाशिक!!!

उदय के'सागर
Fri, 08/26/2011 - 10:05 नवीन
माझं नाशिक ... वॉव!!!! :)
  • Log in or register to post comments

फफफफफोटो??

निनाद
Fri, 08/26/2011 - 11:25 नवीन
सर फोटो कुठे आहेत त्रंबकेश्वर रस्त्याचे? फोटो? फोटो?? फोटो??? पाहिजे! पाहिजे!! पाहिजे!!!
  • Log in or register to post comments

सहमत. पाभेजी खरेच तिकडचे

मराठी_माणूस
Sat, 08/27/2011 - 12:29 नवीन
सहमत. पाभेजी खरेच तिकडचे निसर्ग सुंदर फोटो टाका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद

यांची गाडी चोरावी का

शाहिर
Fri, 08/26/2011 - 11:29 नवीन
माझी सी बी झेड फक्त ४० सरासरी देते.. जळली माझी
  • Log in or register to post comments

सीबीझेड आणि पल्सर वगैरे

गवि
Fri, 08/26/2011 - 11:42 नवीन
सीबीझेड आणि पल्सर वगैरे बाईक्स या अ‍ॅव्हरेजसाठी थोड्याच असतात साहेब? १०० सीसी बॉक्सर घेऊन फिरणे आणि १५० / १८० /२२० सीसी सीबीझी / पल्सर घेऊन फिरणे..फरक नाही का त्यात? काहीतरी प्रीमियम म्हणून पण चीज असते ना हो ? (संसारी १०० सीसीवाला) - गवि.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाहिर

(संसारी १०० सीसीवाला) -

वपाडाव
Mon, 08/29/2011 - 11:23 नवीन
(संसारी १०० सीसीवाला) - गवि.
ही गाडी गविंना खेचते यातच तिचे अ‍ॅव्हरेज आले....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

दुसरी पद्धत

सुनील
Fri, 08/26/2011 - 11:31 नवीन
फारच किचकट पद्धत आहे बॉ तुमची! आमची पद्धत अशी - १) टाकी फुल्ल करायची आणि मीटरचे रीडींग घ्यायचे. २) सुमारे शे-दिडशे किलोमीटर गेल्यावर पुन्हा टाकी फुल्ल करायची. फुल्ल करताना किती पेट्रोल टाकले गेले याची नोंद करायची. ३) क्रमांक १ आणि २ मधीर रीडींगवरून सरासरी काढायची. ४) असे तीन्-चार वेळा करायचे आणि अंतीम सरासरी काढायची. प्रत्येक वेळी शे-दिडशे किमी नंतर सरासरी काढली जाते यांत सर्व प्रकारच्या वाहतुकीचा समावेश होतो - शहरातील गर्दी, मोकळा रस्ता, हाय वे इ. त्यामुळे येणारे उत्तर हे वास्तवाला अधिक जवळ जाणारे असते.
  • Log in or register to post comments

चारचाकी वाहनांकरिता योग्य

चेतन सुभाष गुगळे
Fri, 08/26/2011 - 11:41 नवीन
तुम्ही सूचविलेली पद्धत चारचाकी वाहना करिता अत्यंत योग्य आहे. दुचाकी वाहनाची टाकी पूर्ण भरली तर प्रवास करताना इंधन कधी कधी बाहेर येऊन वाया जाऊ शकते. त्याकरिता वाहन रिजर्व वर आले असता ५ लिटर इंधन भरून पुन्हा रिजर्व वर येई पर्यंतचा प्रवास किमी मध्ये मोजावा व त्यास ५ ने भागावे ही अत्यंत सोपी सुटसुटीत पद्धत. हल्ली अनेक वाहनांच्या टाक्या बर्‍याच मोठ्या असतात त्यामुळे ५ ऐवजी ८ / १० / १२ लिटर इंधन ही भरू शकता. फक्त टाकी संपूर्ण भरल्यास इंधन बाहेर येणार नाही ही काळजी घ्यायला हवी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील

इंधन पुर्ण भरायच म्हणजे

शैलेन्द्र
Fri, 08/26/2011 - 14:58 नवीन
इंधन पुर्ण भरायच म्हणजे पेट्रोलच्या नळीच्या फर्स्ट लॉकपर्यंत भरायचं..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चेतन सुभाष गुगळे

माझी नवीन यामाहा sz शहरात

स्पा
Fri, 08/26/2011 - 11:46 नवीन
माझी नवीन यामाहा sz शहरात साधारण ४५ आणि महामार्गावर ५०देतेय
  • Log in or register to post comments

नवीन गाडी घेतलि हे कळाले

शाहिर
Fri, 08/26/2011 - 14:53 नवीन
माझी नवीन यामाहा sz
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

शाहिर....

स्पा
Fri, 08/26/2011 - 15:06 नवीन
;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाहिर

ब-याच दिवसांनी थोडा तांत्रिक

५० फक्त
Fri, 08/26/2011 - 11:47 नवीन
ब-याच दिवसांनी थोडा तांत्रिक विषय आला, खुप छान वाटलं, माझी पहिली गाडी सुझुकी हिट १२५ सिसि, पुणे सिटिमध्ये ६५ किमिप्रलि पर्यंत द्यायची टँक फुल मेथडने, नंतर मिंटी ( पॅलिओ -१.१) सिटित १५ किमिप्रलि तर हायवेला १७.५ किमिप्रलि देते, सन्माननीय अपवाद - मागच्या वर्षीची गोवा ट्रिप १८.५ किमिप्रलि. सध्या नवि रेड मर्क्युरी २२० सिसि बजाज अ‍ॅव्हेंजर पहिल्या सर्विसिंग नंतर ४० किमिप्रली देते आहे. माझं कोणतीही गाडी चालवणं अतिशय सभ्यपणाचं आहे, त्यामुळं हे असे हेवा वाटावा अस्या अ‍ॅव्हरेजनं गाडी चालवणं शक्य होतं. याबाबत वल्ली, मालोजीराव, धमु, सुर्यपुत्र यांचे विचार ऐकण्यास उत्सुक.
  • Log in or register to post comments

आपली व सुनिल यांची

पाषाणभेद
Fri, 08/26/2011 - 12:38 नवीन
आपली व सुनिल यांची अ‍ॅव्हरेजची काढण्याची पद्धत सारखीच आहे. चेतन गुगळे म्हणतात त्या प्रमाणे हवामान (उन, उष्णता, पेट्रोल उडून जाणे) आदी. गोष्टींमुळे समाधानकारक/ आदर्श (idle) स्थिती प्रत्येक वेळी मिळेलच असे नाही. म्हणून इंजीनचे पर्यायाने गाडीचे अ‍ॅव्हरेज काढण्यासाठी कोठेतरी एकमत करावे लागेल. त्यामुळे १००ml पेट्रोल घेवून अ‍ॅव्हरेज काढणे योग्य आहे. अर्थात यातही रस्त्याची स्थिती, रहदारी, चालवण्याचा स्पिड, पद्धत, वाहकाचे वजन आदी गोष्टी गृहीत धराव्याच लागतील. याचमुळे कालच्या चाचणीत मी खालील गोष्टी केल्या: १. मी स्व:ता माझीच गाडी चालवली. २. सरासरी ४०KMPL स्पिड ठेवला. ३. कमी रहदारीच्या रस्त्याने गाडी चालवली. ४. काल उन्ह, वारा जास्त नव्हता. ५. रस्ता समाधानकारक, खड्डे विरहीत होता. (१० चा १२ होता.) ६. तिसर्‍या चाचणीच्या वेळी अ‍ॅव्हरेज १००किमी झाला (वाढला) कारण मी उताराला इंजीन बंद करत होतो. (जुन्या बॉक्सरला हे स्विच आहे.). यामुळे इंजीन योग्य प्रकारे कार्य करत आहे हेही सिद्ध झाले. मी हे जाणतो की शहरात असल्या अ‍ॅव्हरेजला व असल्या चाचणीला वाव नसतो. शहरात तो कमी मिळेलच. म्हणूनच मी सरासरी मिळालेला ९०KMPL चा अ‍ॅव्हरेज ७५KMPL धरला आहे. मी सुद्धा जाणकारांचे मते जाणून घ्यायला उत्सूक आहे. त्याचप्रमाणे नविन मोटरसायकल आता घ्यावी का? असाही प्रश्न पडला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

माफ करा....

वपाडाव
Mon, 08/29/2011 - 11:27 नवीन
पण काही चुकांची दुरुस्ती करु इच्छितो >>>गोष्टींमुळे समाधानकारक/ आदर्श (idle) स्थिती प्रत्येक वेळी मिळेलच असे नाही.>>> IDEAL >>>२. सरासरी ४०KMPL स्पिड ठेवला.>>> kmph
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाषाणभेद

माझी

प्रचेतस
Fri, 08/26/2011 - 14:22 नवीन
माझी पल्सर साधारण ५५ किमी पर्यंत सरासरी देते. अर्थात हल्ली पावसाळ्यात रस्त्यावर पडलेले खड्डे, झालेला चिखल, निसरडे रस्ते यामुळे हल्ली गियर्स आणि ब्रेक्सचा वापर जास्त करावा लागतोय त्यामुळे ह्या सीझन पुरता तरी ५० पर्यंत खाली आलोय. पेट्रोल जर सकाळी भरले तर थोडेसे जास्त पेट्रोल येते असे आमचे मत जे चुकीचेहीअसू शकेल(पेट्रोलची घनता पहाटे/सकाळी सर्वाधिक असते). १ लिटरमागे एका किलोमीटरचा तरी फरक पडावा. अर्थात अजून सरासरी काढून पाहिली नाहीये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

आपण ही नवीन गाडी घेतली असे कळाले ..

शाहिर
Fri, 08/26/2011 - 19:34 नवीन
नवि रेड मर्क्युरी २२० सिसि बजाज अ‍ॅव्हेंजर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

अ‍ॅवरेज

विनायक प्रभू
Fri, 08/26/2011 - 14:36 नवीन
गाडीचे अ‍ॅवरेज वाढवण्याकरता व्य. नी करा.
  • Log in or register to post comments

कोणाला?

daredevils99
Fri, 08/26/2011 - 15:23 नवीन
गाडीचे अ‍ॅवरेज वाढवण्याकरता व्य. नी करा. कोणाला?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू

मास्तर, रस्त्यावर चालणार्‍या

शैलेन्द्र
Fri, 08/26/2011 - 15:27 नवीन
मास्तर, रस्त्यावर चालणार्‍या गाडीचाच ना? नाहीतर व्यनी करायचो नी पोपट व्हायचा..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू

गाड्या

विनायक प्रभू
Fri, 08/26/2011 - 16:14 नवीन
सर्व गाड्या रस्त्यावरच धावतात. व्य.नि. केल्यागेल्या आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शैलेन्द्र

मास्तर एक शंका आहे गाडीला

विजुभाऊ
Fri, 08/26/2011 - 16:45 नवीन
मास्तर एक शंका आहे गाडीला स्टेपनी असेल तर अ‍ॅव्हरेज वाढते की स्टेपनी नसल्यास अ‍ॅव्हरेज वाढते ? तुमचा मौलीक अनुभव उपयोगी पडेल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू

स्टेपनी

विनायक प्रभू
Fri, 08/26/2011 - 17:05 नवीन
काय विजुभौ? स्टेपनी आणि अ‍ॅवरेज चा संदर्भ जोडताय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

विजुभौना असं विचारायचय की

शैलेन्द्र
Fri, 08/26/2011 - 17:38 नवीन
विजुभौना असं विचारायचय की स्टेपनी वापरताना अ‍ॅव्हरेज चांगला मिळतो की रेग्युलर टायरवर चांगला मीळतो.. मला वाटत रेग्युलर टायरवर चांगला मिळावा.. तो रुळलेला असतो ना.. तरी आपली कमेंट ऐकायला आवडेलच..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू

माहिती हवी आहे...

पिवळा डांबिस
Sat, 08/27/2011 - 00:21 नवीन
गाडीचे अ‍ॅवरेज वाढवण्याकरता व्य. नी करा. मास्तर, गाडीला ओव्हर ऑयलिंग करून चालवल्यास अ‍ॅव्हरेज वाढेल का हो? तुमचे मत व्यनि करा (बाकी फटफटीला काही लोक गाडी का म्हणतात हे मला अजिबात कळलेलं नाही!!!:))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू

रस्त्यालाच ओवर ऑइलींग केल तर?

शैलेन्द्र
Sat, 08/27/2011 - 01:17 नवीन
रस्त्यालाच ओवर ऑइलींग केल तर?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

हो

विनायक प्रभू
Sat, 08/27/2011 - 09:38 नवीन
ओव्हर ऑयलिंग करुन चालवली की अ‍ॅवरेज वाढते हे 'वैश्विक सत्य' आहे. अवांतरः वै.स. ही आजकाल्ची मिपावरची फॅशन आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

थॅन्क्यू!

पिवळा डांबिस
Sat, 08/27/2011 - 11:06 नवीन
ओव्हर ऑयलिंग करुन चालवली की अ‍ॅवरेज वाढते हे 'वैश्विक सत्य' आहे. आता फटफटीला काही लोक गाडी का म्हणतात तेही सांगाल का गुरुवर्य? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू

फटफटी

विनायक प्रभू
Sat, 08/27/2011 - 14:55 नवीन
नवी असते तेंव्हा गाडीच म्हणतात. अगदी ५० सी सी मोपेड सुद्धा गाडी म्हटली जाते. एकदा जुनी झाली ती गाडी आवाज करु लागते. तेल पाणी वंगण न झाल्यामुळे (आणखीन एक वैश्विक सत्य) मग तीला फटफटी म्हणतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

(No subject)

पिवळा डांबिस
Sun, 08/28/2011 - 09:58 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू

मस्त धागा.. १०० मिली

शैलेन्द्र
Fri, 08/26/2011 - 14:46 नवीन
मस्त धागा.. १०० मिली पद्धतीपेक्षा वर उल्लेख आलेली रीझर्व्ह ते रीझर्व्ह ही योग्य पद्धत आहे, कारण यात सगळ्या प्रकारच्या परीस्थीतीचा अ‍ॅव्हरेज मिळतो. अजुन एक, जर दुचाकीला चांगला अव्हरेज हवा असेल तर टाकी शक्यतो भरलेली ठेवावी म्हणजे पेट्रोल उडत नाही. चारचाकीसाठी, हायवेवर (मुंबै- पुणे किंवा पुणे- बंगलोर सारखा) गाडीने १००-१२० चा स्पीड घेतला की न्युट्रल टाकावा (गाडी बंद करु नये, पॉवर ब्रेक असतील तर फेल होतात,) गाडी हळु हळु स्पीड कमी होत ३-४ की मी चालते, ) अस करत गाडी ८० पर्यंत येवु द्यावी, परत पाचव्या गियरमधे उचलावी. पुन्हा हळु हळु १२० वर नेवुन न्युट्रल करावी. २-३ किमीने अ‍ॅव्हरेज वाढतो.
  • Log in or register to post comments

रीझर्व्ह ला आली गाडी की

गणेशा
Fri, 08/26/2011 - 15:00 नवीन
रीझर्व्ह ला आली गाडी की पेट्रोल भरायचे.. पुन्हा रिझर्व ला आली की ती किती किलोमिटर पळाली ते कळते आणि कीती पेट्रोल भरले होते हे माहित असल्याने अ‍ॅवरेझ काधतो... तरीही माझी गाडी कमी अ‍ॅवरेझ देते का आजकाल असा प्रश्न उपस्थीत होण्याआधीच, मी येथील पेट्रोल भेसळयुक्त आहे , म्हणुन पेट्रोलपंपच बदलतो. apache 150 cc : पुण्यात ५० ते ५५ किमी अ‍ॅवरेज मुंबईत ४२-४८ अ‍ॅवरेज .. स्पीड : कायम अबोव्ह ८०-९० किमी/अवर
  • Log in or register to post comments

गणेशा, स्पीड : कायम अबोव्ह

इरसाल
Fri, 08/26/2011 - 15:36 नवीन
गणेशा, स्पीड : कायम अबोव्ह ८०-९० किमी/अवर जर ठेवलास न तर कधीच चांगला अवरेज मिळणार नाही. ४०/५० किमी/तास ह्यावर अतिशय योग्य किंवा जास्त अवरेज मिळतो. स्पीडोमीटरवर पण ४० ते ५० अशी हिरवी रेघ मारलेली असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा

८०-९० वर जे मिळत ते ४०-५० वर

शैलेन्द्र
Fri, 08/26/2011 - 16:06 नवीन
८०-९० वर जे मिळत ते ४०-५० वर कधीच मिळत नाही हो.. खरं तर या सगळ्या गाड्यांना आता एक अजुन वरचा गियर हवाय..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इरसाल

>>मुंबईत ४२-४८ अ‍ॅवरेज

विश्वनाथ मेहेंदळे
Fri, 08/26/2011 - 18:27 नवीन
>>मुंबईत ४२-४८ अ‍ॅवरेज .. >>स्पीड : कायम अबोव्ह ८०-९० किमी/अवर तुम्ही नक्की मी राहतो त्याच मुंबईत वाहन चालवता ना ? इथे 3० चा स्पीड घेता आला तर आनंदाने नाचतात म्हणे लोकं, तुम्ही कायम रात्री ११ नंतरच चालवता की काय बाईक ? दुसरा मुद्दा म्हणजे, मुंबईत कुठल्याच रस्त्यावर ८०-९० हा ग्राह्य वेग नाही. म्हणजे तुम्ही कायमच नियम मोडता ? मग पोलिसांनी पकडले तर नियमानुसार दंड भारता की तोडपाणी करता ? ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा

माझी स्प्लेंडर बहुते ५० ते ६०

विजुभाऊ
Fri, 08/26/2011 - 15:12 नवीन
माझी स्प्लेंडर बहुते ५० ते ६० अ‍ॅव्हरेज देत असावी. आठवड्याला साधारणतः २ लिटर पेट्रोल लागते. मात्र मागचे ६ महिने पेट्रोल भरायचे वेळच आलेली नाही
  • Log in or register to post comments

६ वर्षे

daredevils99
Fri, 08/26/2011 - 15:21 नवीन
मागचे ६ महिने पेट्रोल भरायचे वेळच आलेली नाही मे मागचे ६ वर्षे पेट्रोल भरलेले नाही कारण माझ्याकडे बाईकच नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

आईका .......

शाहिर
Fri, 08/26/2011 - 19:40 नवीन
माझी ( खर तर वडिलांची ) हीरो होंडा सी डी १०० ...आज वर किमि : १,४०,००० ( फार नाही हो ..झाली तीला सुद्धा १२ वर्षे ) अजुन ६०-६५ अ‍ॅव्हरेज देते .. (आणि ( माझी ) सी बी झी ४० ला मेटा कुटी ने टेकते ) पण पोरि सी डी १०० .म्हणला कि नाक मुरडतात :( जुने ते सोने !!
  • Log in or register to post comments

वोक्के...

मी-सौरभ
Sat, 08/27/2011 - 00:02 नवीन
माझ्याकडे पण ह्याच दोन गाड्या आहेत. पण या दोन्ही गाड्यांची तुलना करण चुकीच आहे.... सीबीझी चालवल्यावर सीडी १०० एकदम लहान वाटायला लागते :) मला पण रेसेर्वे ते रेसेर्वे पद्धतच सोपी वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाहिर

खराय

विनायक प्रभू
Sat, 08/27/2011 - 10:59 नवीन
दोन वेगवेगळ्या पॉवर च्या गाड्या चालवल्यानंतर हे फील येणारच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मी-सौरभ

काका....

मी-सौरभ
Sat, 08/27/2011 - 23:17 नवीन
आपल्या सारख्या अणुभवी लोकांनी अनुमोदन दिल्यावर तर खात्रीच पटली की 'दोन वेगवेगळ्या पॉवर च्या गाड्या चालवल्यानंतर हे फील येणारच.'
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू

गाडी चा ठीक आहे

शाहिर
Tue, 08/30/2011 - 07:34 नवीन
गाडी नुसार मुलिंचे प्रमाण कमी जास्त होत असल्याचा अनुभव ....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मी-सौरभ

''चारचाकीसाठी, हायवेवर

५० फक्त
Fri, 08/26/2011 - 21:02 नवीन
''चारचाकीसाठी, हायवेवर (मुंबै- पुणे किंवा पुणे- बंगलोर सारखा) गाडीने १००-१२० चा स्पीड घेतला की न्युट्रल टाकावा (गाडी बंद करु नये, पॉवर ब्रेक असतील तर फेल होतात,) गाडी हळु हळु स्पीड कमी होत ३-४ की मी चालते, ) अस करत गाडी ८० पर्यंत येवु द्यावी, परत पाचव्या गियरमधे उचलावी. पुन्हा हळु हळु १२० वर नेवुन न्युट्रल करावी. २-३ किमीने अ‍ॅव्हरेज वाढतो.'' - का उगा नवख्या डायवरना आत्महत्या करायला लावताय २-३ किमिच्या अ‍ॅवरेज साठी, कोणत्याही स्पिडला गाडी अचानक न्युट्रल करणे म्हणजे, ६० फुटावर दिसत असलेल्या शताब्दि समोर रुळ ओलांडणे. गाडि चालत असताना, बंद करणे हे एक कारण सोडुन कधीहि न्युट्रल करु नये, इंजिन ब्रेकिंग हा एक मोठा फायदा घालवुन बसतो, आणि बहुतेक नव्या गाड्यांना ४-५ (पेट्रोल, व्हिस्टा, फिगो, पोलो, व्हेरिटो - पेटरिटो) व बहुतेक सगळ्या डिझेल गाड्यांना ५ गिअर हा ओवरड्राइव्ह असतो, म्हणजे बाकी गिअर १ : १.२ / १.३ असे असतील तर हे गिअर १ : ०.९५ असे असतात, त्यामुळे या गिअर मध्ये साधारण ५-१० सेकंद गाडी एकाच स्पिडला चालत असेल तर मायक्रोप्रोसेसर इंजिन आर्पिएम कमि करुन वापरले जाणारे इंधन कमी करतात, हा प्रयोग पुर्ण मोकळ्या रस्त्यावर करुन पाहता येईल, पण गाडीला टॅकोमिटर हवे त्यासाठी. बाकी उपाय परत..
  • Log in or register to post comments

तुम्ही सांगीतलेली गोष्ट

शैलेन्द्र
Fri, 08/26/2011 - 21:39 नवीन
तुम्ही सांगीतलेली गोष्ट माझ्या गाडीत तरी होत नाही.. जसे १०० च्या स्पीडला साधारण २७००-२८०० आर पी एमलाच गाडी चालत राहते. मी न्युट्रल केली की १००० आर पी एमला येते व इंजीन ब्रेकऐवजी गाडीच्या घर्षनाने वेग कमी होत जातोच. तसही ब्रेक दाबताना क्लच दाबला की इंजीन फ्री होते. तुम्ही सांगीतलेला धोका मला तरी कधी जाणवलेला नाही, पण नवीन ड्रायव्हरने हे आपल्याला जमत का ते एकदा आजमावुन बघाव हे चांगल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

मायलेज

खेडूत
Fri, 08/26/2011 - 21:06 नवीन
'त्या' कंपनी चे वाहन घ्यायचे नाही असे फार आधीपासून ठरवले होते. मग हीरो होंडा सी डी शंभर घेतली आणि ती चौदा वर्षे मस्त चालू आहे. मेंटेनन्स जवळ जवळ नाही पण मायलेज मोजले तर ६५/ लि मिळते. (जगात सगळे लिटर्स पर १०० कि मी का बघतात कोण जाणे!) मायलेज मोजायची शास्त्रीय पद्धत आपल्याला घरी वापरणे शक्य नाही, प्रत्यक्षात exhaust पण अभ्यासावा लागतो त्यामुळे गाडीची कार्यक्षमता कळते. मग रिज़र्व ते रिज़र्व ही त्यातल्या त्यात चांगली पद्धत आहे. सर्व प्रकारचे रस्ते आले पाहिजेत आणि घाट चढ़ उतार पण. शिवाय दोन्ही चाकाताल्या हवेचा दाब योग्य हवा. गाडी वरचे वजन पण सारखे हवे. शिवाय पेट्रोल चा दर्जा पण महत्वाचा आहे. नाहीतर दर वेळी वेगळे मायलेज! अवांतर: फुएल गेज अचूक नसणे हा आणखी गमतीदार प्रकार आहे. भल्या भल्या उत्पादकांना आजही प्रॉब्लेम आहे. (टाकी चा आकार अनियमित असल्याने) त्यामुळे मोटारींच्या मायलेज वर तर थेट परिणाम होतो! खेडूत
  • Log in or register to post comments

अवांतर: फुएल गेज अचूक नसणे हा

गणपा
Fri, 08/26/2011 - 21:57 नवीन
अवांतर: फुएल गेज अचूक नसणे हा आणखी गमतीदार प्रकार आहे. भल्या भल्या उत्पादकांना आजही प्रॉब्लेम आहे. (टाकी चा आकार अनियमित असल्याने) त्यामुळे मोटारींच्या मायलेज वर तर थेट परिणाम होतो!
फुल टु सहमत. सध्या माझ्या गाडीत हाच लोचा आहे. टाकी फुल केली की दुसर्‍या दिवशी टाकी ३/४ रिकामी दिसते तर कधी अर्धीच दिसते. (आम्ही आमच्या डरायवर पण डौट खाउन आहोत. लेकाचा नक्कीच नळी टाकुन स्वतःच्या बाईकसाठी इंधन काढत असणार.) म्हणुन सध्या टाकी फुल करुन मायलेज काढणे चालु आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खेडूत

आम्ही आमच्या डरायवर पण डौट

माझीही शॅम्पेन
Sat, 08/27/2011 - 12:52 नवीन
आम्ही आमच्या डरायवर पण डौट खाउन आहोत
बाब्बो ! ड्रायव्हर मूळे तुमच्या "गाडीचा" मायलेज कमी होतोय ! सांभाळा !!! :) (कृ ह घ्या)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा